कडं
बँकेत ती "कुठे आहे तो" हेच शोधत होती.
"तो कोण?" ते तिला माहीतही नव्ह्ते. रोज लोकलच्या डब्यातील मधल्या जाळीतून एकमेकांकडे पहात नयनमटक्का खेळायचे. एकदम रुबाबदार, नीटनेटके कपडे, थोडासा सावळा असा तो तिच्या मनात पहिल्यांदा पहाताक्षणीच भरला होता. तिच्याकडे हळूच बघताना तो केसांवरून हात फिरवायचा, त्यावेळी त्याचे हातातले कडं तिच्या डोळ्यात मस्त चमकायचे.
तो बॅकेत काम करतो हे कळल्यावर मुद्याम काम घेऊन ती आली होती. वाटेत त्याच्याशी लग्न झाले तर रोज त्याचे कडं पुसेन असली स्वप्ने रंगवतच ती आली होती.
"शिपाई.... पाणी आणा मॅडमसाठी..."
.
.
.
.
.
.
.
.
.
.
दुसरे दिवशीपासून तिने लोकलची वेळ बदलली. तिच्या मनातले भरलेले त्याचं कडं त्या शिपायाच्या हातात अजिबात शोभत नव्हतं.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
25 Apr 2020 - 12:38 pm | निओ
+१
25 Apr 2020 - 12:45 pm | संजय क्षीरसागर
वा-कडं वागणं बरं नाही.
27 Apr 2020 - 3:54 pm | योगी९००
वा-कडं वागणं... मस्त प्रतिक्रिया..
25 Apr 2020 - 1:37 pm | अनिंद्य
+१
वा-कडं वागणं :-))
25 Apr 2020 - 1:50 pm | कुमार१
+१
* नयनमटक्का >>>
छान शब्द. अर्थ काय ?
? मिचकावणे .
25 Apr 2020 - 3:27 pm | अनिंद्य
@ कुमार१
ऑंख मटक्का , नैनमटक्का हिंदीत मुबलक वापरतात. बॉलीवुडी भाषेत तर हमखास.
अर्थ = नेत्रपल्लवी :-)
25 Apr 2020 - 3:47 pm | कुमार१
बराच अनुभव दिसतोय तुम्हाला त्याचा !!
25 Apr 2020 - 4:10 pm | अनिंद्य
काय राव कायबी बोलता :-))
26 Apr 2020 - 4:16 pm | pspotdar
नयनमटक्का=नेत्रपल्लवी
25 Apr 2020 - 1:57 pm | सौंदाळा
,,+१
25 Apr 2020 - 5:09 pm | मोहन
+१
25 Apr 2020 - 5:14 pm | शा वि कु
+1
26 Apr 2020 - 9:57 am | श्वेता२४
+१
26 Apr 2020 - 12:47 pm | तुषार काळभोर
श श क स्पर्धेत रोजच्या प्रवासात 'नयनमटक्का' मधून होणारे दोन झोल वाचायला मिळाले. इच्छुकांनी सावध राहावे, अशी विनम्र सूचना.
26 Apr 2020 - 12:52 pm | अनिंद्य
हे ‘इच्छुकांनी लाभ घ्यावा’ असे पाहिजे ना ? ;-)
26 Apr 2020 - 3:49 pm | तुषार काळभोर
इच्छुकांनी काळजीपूर्वक बघून लाभ घ्यावा.
26 Apr 2020 - 2:55 pm | रीडर
+1
26 Apr 2020 - 6:58 pm | तेजस आठवले
+१
27 Apr 2020 - 1:32 am | स्मिताके
+१
27 Apr 2020 - 11:39 am | मनस्विता
+१
27 Apr 2020 - 3:53 pm | योगी९००
+१ आवडली.
27 Apr 2020 - 3:53 pm | एमी
हा हा
लव्हमॅरेजचा किडा कथापण साधारण अशीच आहे. कोणी पाचशे रुपये मागतंय तर कोणी महिना चाळीस हजार पगार मागतंय ;)
+१
27 Apr 2020 - 10:12 pm | टीकोजीराव
+१ आवडली
28 Apr 2020 - 10:04 am | टर्मीनेटर
+१
आवडली
28 Apr 2020 - 11:41 pm | शेखरमोघे
+१
29 Apr 2020 - 2:24 pm | शब्दसखी
+१