सोशल डिस्टन्स
"ओ.. भाऊ, जरा सहा फूट दूर हाला की हो. डाक्टरबाबू काय म्हनलेत विषाणुबाबत?"
"लई गारठा झाल्ता म्हनूनशान उब मिलते काय बघत व्हतो तुमच्या शेजारी."
"अस्स व्हय! विषाणुबाधा नाय ना? मंग राहूदे. नाव काय म्हनलं?"
"आता एस्पितलात नाव घिऊन काय राहलेत भाऊ? पेशंट आकड्याने ३५६ म्हनत्यात मले."
"आन मी २४५. सात दिस हाय इथं. पतंग पकडाया धावलो आनि छपरावून डोस्क्यावर पडलो राव."
"माझं बी काय फुटकं नशीब. टरकने धडक दिली म्होरनं. डायवर पडलाय वरच्या वार्डात आनि मी इथं."
तेव्हढ्यात दरवाजा उघडतो...
"साटम!... जरा कोपऱ्यात सरकवा २४५. काय पसरलाय सहा फूट सोशल डिस्टन्सवर!
आणि ३५६ ला फॅमिली न्यायला आलीय. आणा बाहेर बॉडी."
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
23 Apr 2020 - 10:54 pm | ज्योति अळवणी
वा
23 Apr 2020 - 10:58 pm | तुषार काळभोर
.
24 Apr 2020 - 12:06 am | श्वेता२४
+१
24 Apr 2020 - 1:29 pm | मोहन
+१
24 Apr 2020 - 4:33 pm | गणेशा
+१
24 Apr 2020 - 5:35 pm | जव्हेरगंज
+१
(कोरोना उगाच मध्ये आणला याच्यात) अन्यथा कथा ताकदीची आहे.
25 Apr 2020 - 8:24 pm | पलाश
+१
25 Apr 2020 - 9:47 pm | चहाबाज
कोरोना कथेत हवाच!
27 Apr 2020 - 3:34 pm | शलभ
+1
29 Apr 2020 - 11:29 pm | निशाचर
+१