सरमिसळ
रविवारचा दिवस . शाळेला सुट्टी . दिन्या आणी पक्या "इविल डेड" बघत बसले होते .
काहि वेळाने जग्याही टपकला . पिक्चर संपल्यावर त्याने पिन मारली .
"कसले पोराटोरांचे सिनेमे बघताय . खरे स्काउट असाल , तर 'गन्स ऑफ नॅवरॉन' बघा ."
ते ऐकुन पेटलेला दिन्या गल्लीतल्या लायब्ररीमधुन ती कॅसेट घेउन आला .
थोड्या वेळाने रम्या आला . फिल्म संपल्यावर तो पचकला .
" हि वॉरफिल्म भारी आहे . पण शेवटी शोले तो शोले . "
चेकाळलेला पक्या तडक "शोले" घेउन आला .
रात्री दिन्याला आठवले "आपला होमवर्क राहुन गेला . उद्या मास्तर बडवणार . "
हॉलमधे आई , बाबा "व्हायरस , जागतीक संकट" असे काहितरी बोलत होते .
तेवढ्यात रम्याचा फोन आला . त्याने महत्वाची बातमी दिली .
"घरगुती समारंभामुळे मास्तर आठवडाभर रजेवर आहेत ."
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
24 Apr 2020 - 5:41 pm | गणेशा
+१