फत्ते
फिरून फिरून ती तिथेच येत होती, पण त्या चौघांची तिच्यावर कडक नजर होती. तिची अस्वस्थता वाढत होती. ते मागे हटायला तयार नव्हते. तिची घालमेल मी दुरूनच न्याहाळत होते. त्यांना हुलकावणी देणे खूपच कठीण होते. पण तिला तिथपर्यंत पोचायचेच होते. ती अधीर झाली होती. तिचे काम होऊ दे अशी मी देवाला विनवणी करत होते.
आता ते जरा कंटाळले, इकडे तिकडे हलले. ती संधीची वाटच पहात होती.
क्षणार्धात त्या चौघांना आपली चूक कळली, त्यांनी तिच्यावर हल्ला केला. मी भयभीत झाले. त्यांनी तिला जमिनीवर लोळवले. पण शिताफीने ती निसटली आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला.
कावळ्याच्या घरट्यात अंडी घालण्याचे कोकिळेचे काम फत्ते झाले होते.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
22 Apr 2020 - 9:25 pm | सौंदाळा
+१
मस्तच, सुखांत शेवटामुळे जास्तच आवडली
23 Apr 2020 - 7:55 am | सुखी
सुखांत कसा? कावळ्याची पिले मरणार मग
25 Apr 2020 - 4:31 pm | नमिता श्रीकांत दामले
+९
मास्त जमली आहे कथा
22 Apr 2020 - 10:03 pm | जव्हेरगंज
मस्त रंगवली आहे!!👏
22 Apr 2020 - 10:18 pm | गणेशा
+1
22 Apr 2020 - 10:18 pm | गणेशा
+1
22 Apr 2020 - 10:31 pm | भ ट क्या खे ड वा ला
चालू वसंतात असे काही दिसले व त्यावरून सुचले असे वाटतय .
22 Apr 2020 - 11:06 pm | ज्योति अळवणी
उत्तम लिहिली आहे. शेवट तर मस्तच
23 Apr 2020 - 6:51 am | OBAMA80
+१
23 Apr 2020 - 7:03 am | प्रमोद देर्देकर
+१
23 Apr 2020 - 7:56 am | सुखी
+१
23 Apr 2020 - 7:56 am | कुमार१
+१
23 Apr 2020 - 8:37 am | अनिंद्य
+१
23 Apr 2020 - 2:12 pm | ऋतु हिरवा
+1 मस्त वेगळीच
23 Apr 2020 - 2:42 pm | Nitin Palkar
छान जमलीय.
23 Apr 2020 - 7:12 pm | भ ट क्या खे ड वा ला
+१
23 Apr 2020 - 7:13 pm | कोण
+१
23 Apr 2020 - 7:14 pm | भ ट क्या खे ड वा ला
+१
23 Apr 2020 - 11:02 pm | तुषार काळभोर
छान कलाटणी
23 Apr 2020 - 11:43 pm | श्वेता२४
+१
24 Apr 2020 - 1:33 pm | मोहन
+१
25 Apr 2020 - 7:32 pm | नमिता श्रीकांत दामले
+1
25 Apr 2020 - 10:31 pm | चहाबाज
वा वा! काय निसर्गाची कमाल आहे पहा! अचूक टिपलीय कथेत कोकिळेचे प्रयत्न. आवडली.
28 Apr 2020 - 9:42 am | टर्मीनेटर
+१
आवडली!
29 Apr 2020 - 5:49 am | सुमो
+1
29 Apr 2020 - 11:32 pm | निशाचर
आवडली.
2 May 2020 - 5:36 pm | ऋतु हिरवा
धन्यवाद सर्वांना !