नमस्कार मिपाकर
कुणीही कधी विचार केला नसेल अश्या परिस्थितीत आपण सर्वजण अडकलो आहे
जर कुणी आपल्याला असे थांबा म्हटले असते तर आपन कधीच थांबलो नसतो पन ते निसर्गाने किंवा मानव निर्मित उपद्रव्या मुळे सर्व जग थोडा वेळ का थांबलो आहे. काही काळ असेना सर्व जण स्वतच्या कुटुंबासोबत किंवा स्वतःसोबत वेळ घालवत आहेत.
काही दिवसापूर्वी प्रशांत चा फोन आला कि लॉक डाउन वरती माझे अनुभव लिहण्याची विनंती केला म्हणून हा छोटासा प्रयत्न करत आहे.
फेब्रुवारी मध्ये ऑफिस च्या कामासाठी अमेरिकेला जायचे होते. चीनमध्ये कोरोनाने विषाणूने ऊहान शहराला विळखा घातला होतो. त्याने अजून बाकीच्या देशात आपले पाय फारसे पसरले नव्हते पण अमेरिकेत एकाला याची लागण झाली होती. त्यामुळे घरामध्ये आणि मनामध्ये थोडी चिंतेचे वातावरण झाले होते. ऑफिस मधून आम्ही बरेच जण या अधिकृत कार्यक्रम ला जाणार होतो आणि करोनाने अजून आपले उग्र रूप दाखवले नव्हते किंवा चीन ने ते लपवले होते. २ आठवड्याचा कार्यक्रम आवरून मि २४ फेब्रुवारी ला मायदेशी परत आलो. योग्य वेळी घरी सुखरूप पोचलो होतो. आत्तापर्यन्त केरळ सोडून कुठेही कोरोनाचा रुग्ण भारतामध्ये सापडला नव्हता. काही दिवसातच ९ मार्च ला न्युज चॅनेल्स वर बातमी झळकली कि पुण्यामध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला आणि सर्वांचे काळजाचे ठोके वाढले. जो कोरोना चीन मध्ये होता तो आता आपल्या दारात येऊन पोचला होता. आत्तापर्यन्त या विषाणू ने यूरोपीय देशामध्ये धुमाकूळ घालायला सुरवात केली होती आणि कित्येक लोकांचा जीव सुद्धा घेतला होता.
पुण्याची बातमी समजताच ऑफिसामध्ये चिंतेचे वातावरण सुरु झाले. सरकारी यंत्रणा ची तयारी सुरु झाली होती. कोरोना महामारी पासून देशाला कसे वाचवायचे यावरती प्रयन्त सुरु झाले. आमच्या ऑफिस मध्ये हि तयारी सुरू झाली. जर घरातून काम करायची वेळ आली तर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टीची माहिती गोळा होऊ लागली होती. त्यावेळी पुसटशी हि कल्पना नव्हती कि आपल्याला असे कित्येक दिवस घरातून काम करायला भाग पडेल. देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च ला जनता कर्फ्यू घोषित केला होता. १७ मार्च ला सर्वाना ई-मेल आला कि १८ मार्च पासून सर्वानी घरातून काम करायचे आहे. मग काय सगळ्याची गडबड उडाली. थोडी फार आधीच तयारी असल्यामुळे आणि आमच्याकडे gotomypc सॉफ्टवेर जे ऑफिस मधील संगणक घरून जोडता येत होते ते आधीच होते तर काहींना लॅपटॉप दिले गेले. पुढील काही दिवस माझे सर्वांचे घरातून ऑफिस सेटअप करण्यात गेले यामधे हा पहिला आठवडा अघोषित लॉक डाउन चा पार पडला. २२ मार्च ला जनता कर्फ्यू होता. या लढ्यामध्ये जे सैनिक डॉक्टर पोलीस सफाई कामगार याना मानवंदना देण्यासाठी हा उपक्रम घोषित केला होत पण हि वादळापूर्वीची कोरोनाचे वादळ रोखण्यासाठी शांतता होती. सरकार ने थोडा उशीर झाला होता पण अगदी योग्य पद्धीतीने लॉक डाउन ची सुरवात केली होती. हा शंखनाद १३० करोड लोकांना या महामारी पासून वाचवण्याच्या लढाईची सुरवात होती. सर्वानी आपल्या सर्व सैनिकांना आपल्या घरच्या बाल्कनी मधून खिडकी मधून टाळ्या वाजवून धन्यवाद दिले . काही अधिक उत्साही लोकांनी रस्त्यावर येऊन जे अपेक्षित नव्हते ते प्रदर्शन केले असो.
गुढीपडावा सणासाठी गावी जायचे होते पण वर्क फ्रॉम होम सेटअप ची जबादारी आल्यामुळे आम्ही मंगळवारी दुपारी जायचे ठरवले होते परंतु काही समजण्याचे आत संपूर्ण देश लॉकडाउन मध्ये गेला होता आणि हा नवीन शब्द आमच्या शब्दकोशात सामील झाला होता. जेव्हा लॉकडाउन घोषित झाला तेव्हा थोडा वेळ वाटले कि शनिवारी का नाही गेला आपण पण नंतर विचार केला कि सर्वानी हाच विचार केला तर सरकारने ज्या उद्देशासाठी हा लॉकडाउन घोषित केला आहे याच्या आपण विरुद्ध वागलो असतो आणि आपल्या गावाकडील घरच्याना अडचणीत आणले असते. त्यामुळे जे होते तो चांगल्यासाठी होते या उक्ती प्रमाणे आम्ही स्वीकार केले पण फक्त मुलाचा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न होता कारण मला घरून काम करण्याची सुविधा होती. बायकोला हि तिची घराची आणि ऑफिस चे काम होते. मग सुरु झाला लॉकडाउन प्रवास . घराचा दरवाजा बंद झाला आणि चार भिंतीच्या आत आमच्या चौघांचा हा प्रवास सुरु झाला . .
सायकलीग ची आवड होत काही वर्षांपूर्वी ट्रायथलॉन चे वेड लागले होते तेव्हा पावसाळ्यात सायकलिंग सराव साठी होम ट्रेनर विकत घेऊन ठेवला होता. नव्याचे नऊ दिवस झाल्यानंतर बेड च्या खाली तो धूळ खात पडला होता. तसा तो वापराने इतकी काही सहज गोस्ट नाही. कारण प्रत्येक वेळीस त्याची टायर बदलणे आणि परत जर आपल्याला बाहेर सायकलिंग साठी जायचे असेल तर परत ती बदलणे खुप त्रासाचे असते. सध्या ऑफिसला सायकलने जात असल्यामुळे ट्रेनर चा फारसा उपयोग होत नव्हता. बाहेर सायकलिंग ची जी मजा आहे ती काही ट्रेनर वापरण्यात नाही हा माझे वैयक्तिक मत आहे त्यामुळे काही दिवसापूर्वी हा ट्रेनर विकण्याचे ठरवले होते पण म्हणत ना जे होते ते चांगल्या साठी तसे याचे झाले. १४ एप्रिल पर्यन्त आता फिटनेस साठी याचीच साथ मिळणार होती. त्याला बेड खालून बाहेर काढून साफ करून आणि सायकलची टायर बदलून घेतली . ट्रेनिन्ग साठी लागणारे स्पीड आणि कॅडेन्स सेन्सर सेटअप करू लागलो. बरेच दिवस वापर नसल्यामुळे स्पीड सेन्सर ची बॅटरी संपली होती . लॉकडाउन मुळे ती मिळण्याची आशा फार कमी होती. तरीही प्रयन्त करून आलो पण काही उपयोग्य झाला नाही. मग थोडी शोधाशोध केल्यावर एक जुनी बॅटरी सापडली त्याच्यामध्ये थोडा जीव होता आणि माझे काम झाले. असा हा अट्टाहास करून घरीच सायकलिंग करण्यास सज्ज झालो.
आमच्या सौ व मुलीला चित्रकला खुप आवड आहे. त्यामुळे त्या दोघीनी चित्रकला वहीचा ताबा घेतला. बघता बघता नवीन नवीन चित्र कोऱ्या पेपर वर उमटू लागली. अडगळीत पडलेले बुद्धिबळ चे सैनिक आणि पट बाहेर आले आणि मुलाला त्यामध्ये आवड निमार्ण झाली. मुलाचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी मराठी आणि इंग्लिश लिहण्याचा सराव सुरु झाला. बायकोनी कोणता तरी लेख लिहून काढण्या पेक्षा आई ,वडील , गावाकडील माहिती लिहण्याचे लेख दिले. हा उपक्रम खुप उपयोगी पडला. मुलांनि आपल्या बद्दल आणि आपल्या कुटूंबाबद्दल माहिती गोळा करायला सुरवात केली आणि ती कागदावर कशी लिहतात ते पाहण्यात खुप मज्या आली. दररोज एक विषयावर एक पान मराठी आणि इंग्रजि मध्ये लिहण्यासाठी त्याची धडपड सुरु झाली. अडगळीत पडलेले पत्ते काढून कुटूंबाबरोबर संध्याकाळी व्यकय चे खेळ सुरु झाला आणि बालपणीचे उन्हाळाच्या सुट्टीचे दिवस आठवू लागले. मुले लहान असून इतक्या लवकर खेळाचे डावपेच शिकले त्यामुळे खेळ खेळण्यात खुप मजा येऊ लागली. माझ्या मुलाचे खराब पत्ते मिळाल्यावर त्याची प्रतिक्रिया पोट धरून हसायला लावत होते . हरयाला लागल्यावर मुलीचे संतप्त होणे मुलाचा हा निरागस पण इतक्या जवळून पाहायला मिळत होता अशा आनंदच्या क्षणांना सोबत घेऊन छान असे झोपी जाऊ लागलो आहे.
स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी भरपूर वेळ मिळू लागला त्यामुळे असे नव नवीन उपक्रम हाती घेऊ लागलो होतो आमच्या सौ ना आधी स्वयंपाकाची तशी फारशी आवड नव्हती पण ती आता मुलासाठी इंटरनेट वरून बघून आणि व्हाट्स अँप स्टेटस साठी दररोज नवीन पदार्थ घरी बनू लागले होते . म्हणत ना जेव्हा आपण स्वयंपाक मनापासून केला कि त्याची चव काही वेगळीच असते. आणि आई हि स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटूंबासाठी स्वयंपाक करत असते त्यामुळे त्याला वेगळी अशी गोडी असते. पण मला त्याची चिंता वाटू लागली कारण असे चमचमीत पदार्थ आणि जेवन आणि घरी बसुन वजन वाढले तर काय करायचे. खुप प्रयन्त करून ९० किलो चा ७५ किलो ला वजनाचा काटा आणला होता. अमेरिका ट्रिप नंतर आकडा ८० कडे धाव घेत होता. त्यासाठी सायकलिंग आणि फिटनेस ऍक्टिव्हिटी वाढवावी लागणार होती. माझी मुलगी स्वयंपाकाचे धडे सौ कडून शिकू लागली. एक दिवस चपातीचे कणिक मळून दिली . एक दिवस चपाती केली. मुलीच्या हाताची चपाती खाण्याचा आनंद शब्दात लिहणे अवघड आहे. मुलाने मनापासुन दररोज देव पूजा करू लागला होता. दूरदर्शन ने लोकांसाठी रामायण आणि महाभारत मलिका सुरु केल्या होत्या व आम्हाला या मलिका आमच्या भूतकाळात घेऊन गेल्या होत्या. त्यावेळी आमच्या गावात एकच दूरदर्शन संच होता त्यामुळे तो पाहण्यासाठी तासान तास रांगेत उभे राहून व नतर गर्दीमध्ये बसून आम्ही ह्या मालिका सुरवातीला पहिल्या होत्या. नंतर घरोघरी दूरदर्शन संच आले होते. त्यामुळे आता दिवसाचे सकाळचे २ आणि संध्याकाळचे २ तास कसे जायला लागले कळलेच नाही. त्यातच मोगली हि मालिका पण सुरु झाली मुलांनाही यामध्ये गोडी निर्माण झाली आणि त्याचे निरागस असे प्रश्नांना उत्तर देताना त्याच्यामध्ये आमचे बालपण दिसू लागले.
पाच एप्रिल ला देशाचे पंतप्रधान यांनी सायंकाळी आपल्या घरी बालकनीमध्ये दीप लावण्यास सांगितले. यावरती बरेच उलट सुलट चर्चा सुरु झाली. पण मला वाटते लॉक डाउन मध्ये अडकले लोकांमध्ये एक प्रकारची ऊर्जा आणि मनातील मरगळ काढण्यासाठी केलेला हा प्रयन्त असेल असे मला वाटले. सर्व लोक सकाळपासून सायंकाळची आतुरतेने वाट पाहत होती. सर्वानी आपल्या बालकनी मध्ये छान असे सजवले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदानं आणि उच्छाह दिसत होता आणि हेच या काळात गरज होती.आणि या कोरोनाच्या महामारी मध्ये सर्वांची साथ हवी होती.
!!तमसो मा ज्योतिर्गमय!!या श्लोका प्रमाणे या महामारीच्या अंधकारातून आपल्याला हा दीप प्रकाशाकडे घेऊन जाण्याचे प्रतीक होते
आमच्या इंडो ऍथलेटिक सोसायटी चे सदस्य व्हाट्स अँप ग्रुप वर दररोज आपले फिटनेस ऍक्टिव्हिटी ची पोस्ट करतात त्यामुळे एकमेकांना प्रोच्छाहन मिळून थोडा का होईना आणि कोणताही का होईना व्यायाम होत असतो . लॉक डाउन मध्ये घरच्या घरी वेगवेगळे व्यायाम प्रकार सर्वानी सुरवात केले . कोणी दोरी उड्या मारू लागले, कुणी सूर्यनमस्कार, कुणी घराच्या घरी चालू लागले. हे पाहून मी थोड्या उड्या , सूर्यनमस्कार सुरु केले. या वर्षाच्या सुरवातीला जसे सर्वजण ठरवतात तसे मी वर्षेच्या शेवटी प्रयन्त १०० सूर्यनस्कर घालण्याचे ठरवले होते. पण कामामुळे ( खरे तर आळसामुळे) ह्याची तयारी राहून गेली होती आणि नवीन वर्षाचा संकल्प बाजूला पडला होता. एक दिवस अवधूत गुरव च्या स्टेटस ला मेसेज होता हनुमान जयंतीला त्याने सर्वाना सूर्यनमस्कार घालण्याचे व किती घातले हे पाठवायला सांगितले. हा पोस्ट वाचून मला माझ्या नवीन वर्षाचा संकल्प आठवला आणि ठरवले कि आपण त्या दिवशी जमतील तेवढे सूर्यनमस्कार घालायचे आणि अवधूत ला रिप्लाय केला आव्हान स्वीकारले. मग काय थोडी थोडी तयारी सुरु केली. हनुमान जयंती दिवशी मी आयुष्यात पहिल्यांदा ५१ सूर्यनमस्कार घातले व माझा सोबत मुलांनी २१ सूर्यनमस्कार घातले. लॉक डाउन मुळे माझ्या नवीन वर्षाचा संकल्प च्या दिशेने वाटचाल सुरु झाली होती. ५१ सूर्यनमस्कार ची पोस्ट ग्रुप वर केली तर सुशील मोरे नि ७५ सूर्यनमस्कार ची पोस्ट टाकली आणि सांगितले कि १०० लवकरच करणार आहे. मी हि ठरवले कि १०० सूर्यनमस्कार करू. जेव्हा आपण एकादी गोष्ट करायची म्हटली आणि स्वतः मधला आळस झटकून कामाला लागला कि अशक्य अशी कोणतीही गोष्ट राहत नाही . याचिच प्रचिती आली वर्षाच्या शेवटी पूर्ण करण्याचे ध्येय ११ एप्रिल ला १०१ सूर्यनमस्कार तेही ३५ मिनिटामध्ये पूर्ण केले. थोडा अभ्यास आणि इंटरनेट वरील एक्स्पर्ट चे विडिओ पाहिल्यावरती लक्ष्यात आले कि थोडे अजून सूर्यनमस्कार योग्य पद्धतीमध्ये केले पाहिजे त्यासाठी सराव सुरु केले.
अश्या पद्धतीने हा लॉकडाउन चा काळ स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासोबत आनंदात जात आहे. ह्या लॉक डाउन मुळे काही लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टर आणि पोलीस यंत्रणांवर खुप सारा भार पडला आहे. व्यासायिक पुढील आव्हानां कसे सामोरे जायचे याचा विचार करत आहेत शेतकरीच्या फळे भाजीपाला शेतात अडकून पडला आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीची काळजी आहे. अदृश्य अश्या विषाणू ने सर्व जगाला वेठीस धरले आहे.
निसर्गातील मनुष्य असा प्राणी आहे ज्याने स्वतःच्या बुद्धिमत्तेवर निसर्गावर मात करण्याचा प्रयन्त सुरु केला आहे. पण त्याचा धोका वेळीच ओळखून स्वतःला सावरण्याची हीच वेळ आहे नाहीतर मनुष्य स्वतःचा अंत करण्यास स्वतः जबादार असणार आहे.
मानवजात कितीही प्रगत झाली तरी निसर्गाच्या अमर्यादित,अदभुत शक्तिपुढे तो किती खुजा आहे हेच वारंवार समोर आले आहे. त्यामुळे निर्सगाचा आदर हा झालाच पाहीजे.
घरी राहा !! सुरक्षित राहा !!
स्वतः आणि कुटूंबासोबत सुंदर वेळ व्यतीत करा !!
-अजित पाटील
प्रतिक्रिया
20 Apr 2020 - 11:11 am | Nitin Palkar
लॉकडाउनही एन्जॉय करता येऊ शकतो... कार्यालयीन कामाचे काय केलेत.... त्याचीही माहिती अपेक्षित होती.
20 Apr 2020 - 11:29 am | धर्मराजमुटके
लॉकडाऊन चे सगळेच लेख सुंदर आहेत. मात्र एक नम्र विनंती आहे. आज जगभरात लाखो लोक उपाशी आहेत, काहींना एक वेळचे जेवण नशीब होत नाहिये. आपल्याला घरात काय खायचे काय नाही यावर बंदी नाही किंवा तुम्ही खाण्यापिण्याची फार मजा करत आहे असे देखील मला म्हणायचे नाही. मात्र केवळ उपाशी बांधवां बद्द्ल सहसंवेदनाशील असावे म्हणून वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे फोटो प्रदर्शन व्हॉटसअॅप, फेसबूक किंवा अन्य कोणत्याही संस्थळावर टाळता आले तर बरे होईल असे मला मनापासून वाटते. कृपया विनंतीचा विचार व्हावा. विनंती चुकीची असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावे.
धन्यवाद !
20 Apr 2020 - 11:43 am | वामन देशमुख
हे कोणत्याही काळात, कोणत्याही ठिकाणी लागू होतं.
पण म्हणून कोणत्याही काळात, कोणत्याही ठिकाणी, कुणीही, कसलेही सेलेब्रेशन करू नये का?
अर्थात, तुमच्या वरील मताचा आदर आहेच!
20 Apr 2020 - 11:48 am | धर्मराजमुटके
सेलीब्रेशन करण्यावर आक्षेप नाहीच. तो ज्याच्या त्याचा वैयक्तीक प्रश्न आहेच. त्यात हस्तक्षेप नाहीच. मात्र सध्या काळ कठीण असल्यामुळे उपाशी लोकांच्या भावनांचा थोडा जास्त विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. सुचना नाही. आणि अपेक्षा चुकीची असली तरी त्याबद्दल दिलगीरी देखील अगोदरच व्यक्त करत आहे. आपल्याही मताचा आदर आहेच.
बाकी यावर अधिक लिहिणे टाळतो. लेखातल्या बाकी चांगल्या बाबींवर चर्चा करुया. धन्यवाद !
20 Apr 2020 - 2:50 pm | वामन देशमुख
जाऊ द्या धर्मराजमुटके साहेब, असं दिलगिरी (खाली तर चक्क माफी, अयोग्य, अल्पमत...) वगैरे काही म्हणू नका हो. आता त्या तुमच्या प्रतिसादाला मी पहिला उपप्रतिसाद दिला आणि त्यानंतर वणवा पेटला, subsequently, "मोदींशिवाय कुठलाही वाद पूर्ण होणार नाही" या न्यायाने मग तेही आले. चलता है!
बाकी, अजित पाटलांनी या लेखात, शब्द, चित्रे, चलतचित्रे यांची मनमोहक गुंफण केलीय, नाही का?
20 Apr 2020 - 11:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विनंती चुकीची आणि काहीच्या काही वाटल्यामुळे दुर्लक्षच केले आहे. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
20 Apr 2020 - 12:38 pm | चौकस२१२
मी पण सहमत आहे बिरुटे यांच्याशी... येथे जी लोक खाण्यासंबंधी लिहीत आहेत ते एक नवीन छंद आणि वेळ जावा म्हणून किंवा घरातील गृहिणीला मदत म्हणून करीत आहेत यात कोना गरिबाला हिणवण्यासाठी आहे असे नाही किंवा चैन कशी चाललयीय हे दाखवण्यासाठी नाही .. आणि बरेचदा पाकृ वैगरे जुनी पूर्वी केलेली असते ...त्यामुळे हि कल्पना निरर्थक वाटली मला पण धमु यांची
21 Apr 2020 - 12:02 pm | नावातकायआहे
कल्पना निरर्थक वाटली मला पण धमु यांची
"धमु (धमाल मुलगा)" कुठे आहेत काही कल्पना?
20 Apr 2020 - 12:13 pm | मोदक
तुम्ही असा का विचार करत नाही की..
समजा जगभरातल्या लाखो उपाशी बांधवांचा आणि प्राण्यांचा विचार करून तुम्ही रोज भाकरी पाण्यात बुडवून खाल्ली... तर फायदा होणार
१) शेतकरी आणि त्यावर अवलंबून असणारे घटक
२) नगरपालिका - पाण्यासाठी
३) अन्न शिजवण्यासाठी आवश्यक घटकांच्या अनुषंगाने जे लागतील ते घटक
बस्स..
तुम्ही त्याऐवजी बटर पावभाजी, चीज डोसा किंवा व्हेज मख्खनवाला खाल्लेत तर.. वरील तीन घटकांसोबत
४) इतर भाज्या पिकवणारा शेतकरी
५) डेअरी उद्योग
६) बेकरी उद्योग
७) किराणा मालाचा दुकानदार
८) कदाचित डॉक्टर
इतक्या जणांचा फायदा करून देऊ शकता. चवीचे खाऊन तुमची मनस्थिती चांगली राहील.. हा आणखी एक फायदा.
मनापासून विनंती करत आहे - दुर्लक्ष करू नये. :)
20 Apr 2020 - 12:21 pm | धर्मराजमुटके
मी दोन्ही प्रतिक्रियेमधे मला काय म्हणायचे आहे ते पुरेसे स्पष्ट केले आहे. कोणी काय खावे याबद्द्ल माझे काही म्हणणे नव्हतेच. असो. इथे पुन्हा एकदा जाहिर माफी मागत आहे. माझे प्रतिसाद अयोग्य आणि अल्पमतात आहे त्यामुळे संपादकांनी उडविला तरी चालेल.
धन्यवाद !
20 Apr 2020 - 12:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संपादक काय करतील ते माहिती नाही, आपलं मतं आहे, सर्वांना पटलं पाहिजे,असं काही नसतं. वाटलं लिहिलं,विषय संपला. अल्पमत वगैरे काही नसतं जालावर. लोकांचा तर अजिबात विचार करायचा नसतो.
समजा कोणी एक ऑप्शनल फरमान काढलं असतं की, प्यारे देशवासियो आज रात बारा बजहसे, हम कुछ दिन, याने की पाच मैं तक सिर्फ एक वक्तही खाना खायेंगे जिसमे दाल-भात मेन कोर्स रहेगा. जींस वजह से भूके गरिबोकी प्रति सहसंवेना जतायेंगे. इसमेसे बुजर्गो और बीमार लोगोको छूट दी जायेंगी.
तर तुमच्या प्रतिसादाला खुप लाइक आले असते, आणि तुम्ही बहुमतात राहिला असता. ;)
-दिलीप बिरुटे
20 Apr 2020 - 12:45 pm | धर्मराजमुटके
एकंदरीत मोदी तुम्हाला फारच आवडतात असं दिसतं पण टायमिंग चुकले हो ! रात्री ८ वाजता पाहिजे होते ना :)
20 Apr 2020 - 6:07 pm | मोदक
नोटबंदीचे घाव आहेत ते मुटके साहेब... जssरा खोलवर गेले असावेत..
घ्या की समजून. :D
20 Apr 2020 - 6:13 pm | मोदक
माफी नका हो मागू... तुमचे मत तुम्ही लिहिले ते तुमच्या दृष्टीने बरोबर आहे म्हणूनच लिहिले ना.. मग कशाला माफी वगैरे मागताय..?
बिन्धास्त व्यक्त व्हा आणि समजा कांही चुकलेच तर मत बदलण्याची तयारी ठेवा.. बस्स..
20 Apr 2020 - 2:52 pm | वामन देशमुख
मोदकराव, काय काय तरी पॉईंट शोधून काढलेत राव चमचमीत खाण्याच्या हट्टापायी!
(अर्थात प्रतिसादातील आशय पटला आणि आवडला हेवेसांन)
20 Apr 2020 - 6:41 pm | मोदक
:D
20 Apr 2020 - 11:39 am | वामन देशमुख
छान लिहिलंय; आवडलं.
20 Apr 2020 - 11:53 am | कंजूस
छान लेखन. सायकल ट्रेनर म्हणजे सायकलचा ट्रेडवॉक वाटतोय. ----
हार्टबीट कसे समजतात स्ट्रावा'ला?
20 Apr 2020 - 3:10 pm | अजित पाटील
हार्ट रेट सेन्सर मिळतो किंवा गर्मीन च्या घड्याळात हे मोजता येते आणि ride strava ला उप्पोअड होते
20 Apr 2020 - 12:02 pm | मोदक
घरी राहा !! सुरक्षित राहा !!
स्वतः आणि कुटूंबासोबत सुंदर वेळ व्यतीत करा !!
+१११
सुंदर लेख हो पाटील साहेब.
आता वेळ आहेच तर शेतीत नवीन काय काय प्रयोग केले आणि त्याचे अनुभव लिहून काढा..!!
20 Apr 2020 - 3:16 pm | अजित पाटील
शेती बदल नक्की लिहिण्याचा प्रयत्न करू
20 Apr 2020 - 3:16 pm | अजित पाटील
शेती बदल नक्की लिहिण्याचा प्रयत्न करू
20 Apr 2020 - 12:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन आवडले. नियमित लेखन करीत राहा सर.
-दिलीप बिरुटे
20 Apr 2020 - 3:17 pm | प्रशांत
आता पाककृती येवु द्या
आणि हो शेतीवर एक लेख लिहुन थांबलात. ट्रेनर वर बसल्या बसल्या विचार करा आणि कुल डाउन नंतर लिहुन काढा.
पु ले शु
20 Apr 2020 - 12:19 pm | चौथा कोनाडा
व्वा, लॉकडाऊनचा कालावधी मस्त व्यतित करता आहात !
तुमच्या सायकलिंग आणि सुर्य नमस्कारासाठी _/\_
हस्ताक्षर सुधारणा, चित्रकला, पाककला या साठी वेळ देऊन छंद जोपासला हे भारीच !
20 Apr 2020 - 3:14 pm | अजित पाटील
पाककृती इंटरनेट वरून चोरल्या आहेत ☺️
20 Apr 2020 - 1:01 pm | चौकस२१२
केक केलेले दिसत आहेत २-३ मग जरा पाकृ पण चिकटवा
20 Apr 2020 - 2:13 pm | प्रचेतस
छान लिहिलंय एकदम.
चित्रकारी आवडली. पाकृचे फोटो पाहून तोंड खवळलंय जाम.
20 Apr 2020 - 3:20 pm | प्रशांत
मग काय बनणार आज, फोटो काढुन ठेव पाकृ टाकायला.
20 Apr 2020 - 2:32 pm | खिलजि
सूर्यनमस्कार तेही १०१ .. मानलं राव . मीपण मारतो पण १० ते १२ .. मला नाही म्हंटल तरी २० मिनिटे लागतात .. प्रत्येक नमस्कराला मी बराच वेळ देतो असे तुमच्या वेळेवरून दिसून येते आहे .. पण एक सांगू का , मी बराच वेळ देतो त्यामुळे मला खूप फरक पडलेला आहे .. बराच म्हणजे शब्दातही सांगता येणार नाही एवढा .. वजन बरेच आटोक्यात आले आहे , श्वास प्रक्रिया एकदम मक्खन झालीय .. शंखनाद पहिला जेमतेम १५ सेकंद करायचो तो आता चांगलाच ३० सेकंदापर्यंत पोचलाय .. वाण्याकडे जाताना इमारतीतील लोकांनी चौकशीही केली आणि स्तुतीही ..
20 Apr 2020 - 3:07 pm | अजित पाटील
यावरती काम चालू आहे नक्की लवकर योग्य पद्धतीने 101 करण्याचा प्रयत्न करेन
20 Apr 2020 - 7:20 pm | सौ मृदुला धनंजय...
सुंदर लेख.लॉक डाऊन सेलिब्रेशन छान आहे.
20 Apr 2020 - 9:11 pm | ज्योति अळवणी
लेख आवडला
छान लिहिले आहे
20 Apr 2020 - 9:11 pm | ज्योति अळवणी
लेख आवडला
छान लिहिले आहे
20 Apr 2020 - 11:10 pm | रीडर
छान आणि सकारात्मक लेख.
26 Apr 2020 - 9:30 am | गणेशा
वा वा..
काय मस्त धागा.. हेवा वाटावा असा..
त्यात मोदक आणि सरपंचांच्या कृपेने आमचे सायकल प्रेम चालू झाले त्यामुळे तर आणखीन च मज्जा आली.. धागा उघडल्यावर सायकलीचेच फोटो पहिले पाहून वाचायला सुरुवात केली...
नंतर काढलेली चित्र मनात घर करून गेली... माझ्या मुलीला गावाला सोडलं आहे तिची खूप आठवण आली.. मला चित्रकला खूप आवडायची.. मुली बरोबर मस्त चित्र काढलेत आधी..
बाकी खाण्याचे फोटो पाहून तिथले काही वाचले पण नाही फक्त फोटो पाहूनच इतके भारी वाटले कि बस कि बस..
अप्रतिम परिपूर्ण धागा...
खूप खूप आवडला