कातरवेळ
तीनचार तास रडून रडून तिच्या डोळ्यातलं पाणीसुद्धा आता वाहायच थांबलं होतं. ती भिंतीला टेकून मांडी घालून जमिनीकडे डोळे करून बसली होती. नजर मेल्यासारखी झालेली. तिच्या शेजारी चारपाच जणी बसल्या होत्या, पण त्या तरी किती सांत्वन करणार.
मध्येच त्यातली एक उठली, बाहेर जाऊन नजर टाकून आली. अजून कुणीच आलं नव्हतं. जरा अंधार व्हायला लागला तसं दुसरीने जाऊन बाहेरची लाईट लावली.
तेव्हढ्यात बाहेर कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली. दोन पुरुष असावेत. घरातल्या सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
तिने तर श्वास घेणंच जवळजवळ बंद केलेलं.
"झालं ऑपरेशन. शुद्धीवर नाही आली अजून, डॉक्टर म्हणाले होईल व्यवस्थित. पण आता सहा जणांनी नासवल्यावर जगून तरी काय करंल!"
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
19 Apr 2020 - 2:09 pm | जव्हेरगंज
:(
फारच तीक्ष्ण!
+१
19 Apr 2020 - 2:48 pm | ज्योति अळवणी
Ohh... अत्यंत परिणामकारक
19 Apr 2020 - 2:48 pm | ज्योति अळवणी
Ohh... अत्यंत परिणामकारक
19 Apr 2020 - 2:53 pm | सौंदाळा
+१
19 Apr 2020 - 3:48 pm | मन्या ऽ
:(
19 Apr 2020 - 7:11 pm | मोहन
+१
20 Apr 2020 - 5:07 pm | निओ
+१
20 Apr 2020 - 5:12 pm | शा वि कु
.
20 Apr 2020 - 5:36 pm | चौथा कोनाडा
+१
बाप रे !
20 Apr 2020 - 10:50 pm | वीणा३
मला कळलंय ते बरोबर आहे का - जी भिंतीला टेकून बसली होती ती रेप झालेल्या मुलीची आई आहे का?
20 Apr 2020 - 10:58 pm | पलाश
+१
21 Apr 2020 - 7:16 am | OBAMA80
+१
21 Apr 2020 - 8:46 am | शेखर
+१
21 Apr 2020 - 12:13 pm | आनन्दा
+१
21 Apr 2020 - 10:44 pm | स्मिताके
+१ बापरे. सुन्न करणारी कथा.
24 Apr 2020 - 3:07 pm | ऋतु हिरवा
सहा जणांनी नासवली हे सुन्न करणारे आहे. पण जगून काय करेल... हे पटत नाही. जगल्यास करण्यासारखे खूप काही असते. अशी उदाहरणे समाजात आहेत.
24 Apr 2020 - 8:41 pm | संजय क्षीरसागर
फुल स्टोरी लिहीली आहे त्यामुळे गंडलीये.
ऑपरेशन झालंय म्हटल्यावर घरचे हॉस्पिटलमधे हवेत, ते घरी बसून कुणाची वाट पाहातायंत ?
27 Apr 2020 - 11:53 am | मनस्विता
+१
27 Apr 2020 - 1:00 pm | टर्मीनेटर
+१
28 Apr 2020 - 8:41 pm | आवडाबाई
+१
29 Apr 2020 - 7:37 am | सुमो
+1