चित्र
आज पुन्हा चित्र काढताना माझे इतर कशातच लक्ष नव्हते, कॅनव्हास वरील चेहर्यावरचे भाव आज तंतोंतंत बरोबर आल्या सारखे वाटत होते.
पण माझ्या रोजच्या प्रत्येक चित्रा बाबतीत असेच होते, मला त्या चित्रात काय सांगायचे आहे हे रेखाटून झाले की मला ते चित्र वेगळेच भासू लागते, जणु ते मला काही तरी सांगत आहे जीवनातल्या असंख्य क्षणांची शिदोरी पुन्हा माझ्यापुढे उलगडते आहे, पुन्हा नवा दृष्टीकोण मला देते आहे असेच वाटते.
आज चित्र पुर्ण झाल्यावर मी ड्रॉईंगरुम मधुन बाहेर आले... घरात सगळी शांतता होती, चहा टेबलावरती तसाच गार झालेला होता.
मी मात्र प्रसन्न होते, बाबा गेल्यानंतरचे हे त्यांचे मी रेखाटलेले तीनशे पासष्टावे चित्र होते.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
19 Apr 2020 - 5:50 pm | चौथा कोनाडा
मस्त !
19 Apr 2020 - 5:58 pm | ज्योति अळवणी
+१
19 Apr 2020 - 5:58 pm | ज्योति अळवणी
+१
19 Apr 2020 - 7:06 pm | मोहन
+१
19 Apr 2020 - 9:54 pm | स्वलिखित
+11
27 Apr 2020 - 1:06 pm | टर्मीनेटर
+१
आवडली!
27 Apr 2020 - 9:26 pm | मनस्विता
+१
29 Apr 2020 - 7:35 am | सुमो
+1