आधुनिक 'सीता'
नोकरी गेल्याने बायकोमुलांसोबत महिनाभर गावीच होता. कालच लेटर आलं. नवी नोकरी आडगावी, सोयसुविधांची वानवा! एकट्या माणसाची खायचीप्यायचीही आबाळ!
'पंधरा वर्षे! मुरलेला संसार! दोन गोंडस फुलं आणि चांगला कमावता नवरा! काय कमी पडलं हिला? पण सांगायचं कोणाला? तोंड दाबून बुक्क्यांचा मार!', तो विचारात गढलेला.
'पंधरा वर्षे! मेलेला संसार! दोन कोमेजलेली फुलं आणि बाहेरख्याली नवरा! काय कमी केलं आपण? पण सांगायचं कोणाला? तोंड दाबून बुक्क्यांचा मार!', तिने निश्वास सोडला.
सकाळीच तिने निर्णय दिलेला. 'मुलांची शाळा, दवाखान्याची सोय होईल. सासूसासर्यांकडे लक्ष देता येईल. शेतीवाडी, दुकानात मदत होईल. मी गावीच राहणार!'
घरात सर्वजण खूष!
तिला उमगले होते, 'सीता ज्याच्यासोबत वनवासात गेली, तो 'राम' होता!'
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
15 Apr 2020 - 4:26 pm | चांदणे संदीप
+१
सं - दी - प
15 Apr 2020 - 4:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडेश.
(प्लसवन नंतरच्या राऊंडला लिहीन. सध्या पोच)
-दिलीप बिरुटे
15 Apr 2020 - 6:35 pm | प्राची अश्विनी
+1
15 Apr 2020 - 6:44 pm | प्रचेतस
+१
15 Apr 2020 - 7:35 pm | शेखर
+१
16 Apr 2020 - 3:48 pm | Cuty
+1
16 Apr 2020 - 4:02 pm | मोहन
+१
16 Apr 2020 - 4:20 pm | गामा पैलवान
+१
-गा.पै.
17 Apr 2020 - 9:22 am | प्रमोद देर्देकर
कथा कळली नाही .
नायक नोकरी नाही म्हणुन गावी येतो राहतो आणि नविन नोकरी स्वीकारत नाही कारण ती आडगावात असते अशी सुरवात.
आणि ती लगेच घरीच राहाण्याच्या प्रयत्न करते. ही काय टोटल लागत नाही.
17 Apr 2020 - 1:14 pm | निओ
+१
17 Apr 2020 - 1:39 pm | असा मी असामी
मस्त
17 Apr 2020 - 1:46 pm | जव्हेरगंज
+1
18 Apr 2020 - 11:48 am | सुबोध खरे
+१
18 Apr 2020 - 6:12 pm | विश्वजित रामदास जाधव
+१
19 Apr 2020 - 12:35 pm | तुषार काळभोर
कथा ठीक, पण शेवटचं वाक्य एकदम उच्च कोटीचं!
24 Apr 2020 - 12:12 am | श्वेता२४
+१
27 Apr 2020 - 10:51 am | टर्मीनेटर
+१
आवडली!
28 Apr 2020 - 5:50 pm | मनस्विता
+१
29 Apr 2020 - 10:20 am | सुमो
+1