[शशक' २०२०] - सॄजन!

राघव's picture
राघव in स्पर्धा
18 Apr 2020 - 10:01 am

सॄजन!

"आज काय करणार तो कोण जाणे.. दररोज आपलं इकडचं तिकडे!"
"तुझी कौलं तरी शाबूत आहेत.. माझ्या पानांची तर दर दिवशी नवीन झैरात होते! पण कालची चांगली होती जरा."
"ख्या..ख्या.. ते बरीक खरं हां.. आधी तर पुंगळ्या होत्या.. समजतंच नव्हतं की नक्की आहे काय!"
"बास हां.. आधीच सटकलेलं आहे. काल तर आजुबाजूला पाणीच दिसायला लागलं होतं.. एरवी काही फुलं वगैरे तरी असतात..!"
"जाऊ दे रे.. नवीन काय ते पाह्यचं.. वैतागलो तरी आपण वाट बघतोच ना दररोज त्याची?"

त्या इवल्या हातांनी हळूच बाबाची स्केचबुक खाली घेतली आणि पलंगाखालच्या नेहमीच्या जागेत स्वारी निघाली.. आज त्या झाडाला घराच्या मागे तो नक्की फिट्ट करणार होता!

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2020 - 12:54 pm | चौथा कोनाडा

नक्की काय त्याची संगती लागली नाही,
जाणाकारांनी प्रबोधन करावे !

एक लहान मुलगा चित्र काढत असतो. त्या चित्रातल्या दररोजच्या दोन गोष्टी म्हणजे एक झाड आणि एक घर. त्या दोघांचा तो संवाद.

जव्हेरगंज's picture

18 Apr 2020 - 2:09 pm | जव्हेरगंज

असंच काहीतरी दिसतंय!!
जबरदस्त लिहीलंय..!!

+१

गामा पैलवान's picture

18 Apr 2020 - 2:23 pm | गामा पैलवान

सहमत आहे. अधिकेक!
+१
-गा.पै.

निओ's picture

18 Apr 2020 - 3:30 pm | निओ

+१

गामा पैलवान's picture

18 Apr 2020 - 4:57 pm | गामा पैलवान

अवांतर :

एक शंका आहे. ते सॄजन नसून सृजन हवं होतं ना?

-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2020 - 6:10 pm | चौथा कोनाडा

हे सॄजन नक्की कसं लिहिलं असावं याबद्दल जाम कुतुहल आहे !

चांदणे संदीप's picture

18 Apr 2020 - 6:15 pm | चांदणे संदीप

सॄ

स + र्‍ + उ + उ

सं - दी - प

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2020 - 8:21 pm | चौथा कोनाडा

+१
मस्त, वेगळ्याच प्रकारची आहे.
समजायला जड गेली होती, उत्खनक यांनी उलगडून दाखवल्यावर समजली.

बबन ताम्बे's picture

24 Apr 2020 - 5:59 pm | बबन ताम्बे

+१

गणेशा's picture

24 Apr 2020 - 6:06 pm | गणेशा

+१

पलाश's picture

25 Apr 2020 - 8:36 pm | पलाश

+१

मनस्विता's picture

27 Apr 2020 - 9:28 pm | मनस्विता

+१

मायमराठी's picture

29 Apr 2020 - 11:17 pm | मायमराठी

आवडली

निशाचर's picture

29 Apr 2020 - 11:51 pm | निशाचर

+१