पषम पूरी

कंजूस's picture
कंजूस in पाककृती
17 Apr 2020 - 8:48 pm

पषम् पूरी हा केरळी प्रकार आहे. राजेळी केळ्याची भजी. कोची, तिरुवनंथपुरम जाणाऱ्या रेल्वेत हा पदार्थ नाश्त्याला मिळतो. चहा आणि गरम पषम् पुरी खातात. कसे करायचे याचे विडिओ युट्युबवर बरेच आहेत. केरळी लोक मोठी वरून लाल सालीची आणि आतून सोनेरी पिवळसर असलेली राजेळी केळीच वापरतात. पण आपण इथे साधे केळेच वापरले आहे.
लॉकडाऊनमुळे अगदी साधे सोपे आणि पौष्टिक प्रकार करण्यासाठी उत्तम.

कृती
फोटो १
पदार्थ आणि तयारी.

दोन छोटे चमचे मैदा, एक छोटा चमचा तांदूळ पीठ, किंचीत मीठ, किंचित हळद, एक छोटा चमचा दही, साखर चवीनुसार (दोन चमचे) घालून पीठ भिजवून दोन तास ठेवायचे.
फोटो २
केळ्याचे लांबडे जाडसर काप काढून पिठात भिजवून तेलात तळायचे. सनफ्लावर तेल वापरले. केरळी लोक खोबऱ्याच्या तेलात तळत असले तरी आपल्याला जमायचे नाही.


हे पीठ मैद्याचे असल्याने अगदी कामापुरते घ्यावे लागते कारण इतर बेसनचे पीठ उरल्यास ते निरनिराळ्या भज्यांसाठी संपवता येते तसे याचे नाही.
फोटो ३
तळताना.

फोटो ४
पषम् पूरी तयार.

भजी गोडसर असल्याने फार करून उपयोग नाही. म्हणून थोडाच प्रयोग केला. रेल्वेत खिडकीत बसून बाहेरचा निसर्ग पाहाण्याची मजा आता घेता येणार नाही पण घराच्या बाल्कनीत बसून पषमपूरी आणि चहा घेऊन पाहा.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Apr 2020 - 8:57 pm | कंजूस

१) पषम मधल्या 'ष ' चा उच्चार 'श्ष' असा जीभ आत वळवून मल्याळी लोक करतात. इंग्रजीत Pazham असे लिहितात.
रेल्वेत तमिळ प्रवासीही बरेच असतात त्यांच्यासाठी 'पळ्ळम पूरी' ओरडत विकतात.
२)सगळे पदार्थ 'कंजूस' मापाने आहेत.

शेखरमोघे's picture

19 Apr 2020 - 5:31 am | शेखरमोघे

सुन्दर वर्णन - दक्षिणेतला एक छान street food चा प्रकार करायला किती साधा आहे हे व्यवस्थित सान्गितलत तुम्ही!
तमिळ मधला आपल्या "ळ" च्या जवळपासचा पण वेगळाच असा एक कठिण उच्चार बर्‍याच वेळा इन्ग्रजीत "zh" वापरून (कसाबसा) सादर केला जातो जसे : Dravid Munnetra Kazhagam किन्वा Kanimozhi मधला "ळ" (सारखा) भाग.

त्यामुळे हा पदार्थ तमिळमध्ये उच्चारताना साधारण 'पळ्ळरम पूरी' व्हावा.

प्रचेतस's picture

17 Apr 2020 - 9:01 pm | प्रचेतस

व्वा..!
एकदम वेगळी पाकृ, आवडली.

वामन देशमुख's picture

17 Apr 2020 - 10:00 pm | वामन देशमुख

माझ्यासाठी नवीन पाकृ; आवडली. लॉकडाउनपासून फळे आणणं बंद केलं आहे, नंतर करून बघेन.

अरे वा... नविन पाककृती समजली !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aithey Aa... :- Bharat

सस्नेह's picture

19 Apr 2020 - 6:45 am | सस्नेह

सुरेख तांबूस सोनेरी पषम पुरी मस्तच दिसतेय

दिपस्तंभ's picture

20 Apr 2020 - 4:24 pm | दिपस्तंभ

केरळ ला भेट दिली तेव्हा खाल्लं आहे हे. केरळ मध्ये गोड असलेली पझमपुरी तामिळनाडूत मात्र तिखट करतात, तिखट नावापुरते.. तामिळनाडू मध्ये खूप कमी तिखट खातात.