लॉकडाऊन: चोविसावा दिवस

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
17 Apr 2020 - 10:56 am
गाभा: 

" लुक डाऊन" डाउन अंडर "अर्थात घरबंदीचा अमुकवा दिवस

" लुक डाऊन" डाउन अंडर "
याचा शब्दशः अर्थ घेऊन नका मंडळी... डाऊन अंडर म्हणजे दक्षिणे कडे
जगाच्या एका कोपऱ्यातील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश
या देशातील आजची परिस्थिती आणि पुढे यावर लिहिण्याआधी इथली समाज रचना राजय रचना , आर्थिक रचना हे थोडे समजवून घेणे आव्यश्यक आहे
कारण परदेश म्हणले कि बहुतेक जण फक्त अमेरिका असा विचार करतात ...तसेच सध्याच्या बिकट परिस्थितीत वेगवेगळ्या समाज रचनेंना कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागत असेल ? हा हि एक कुतूहलाचा विषय होऊ शकतो म्हणून ...हे जरा सविस्तर
- एकूण लोकसंख्या साधारण २.७ करोड ,क्षेत्रफळ साधारण भारताच्या ३ पट पण असे असले तरी ६-७ शहरात लोकसंख्या एकटविलेली . साधारण ६,५०० लागण , ६५ मृत्यू , ३.५ लाख चाचण्या, ( १५ एप्रिल )
- सधन देशात गणना केली जाते ,
- अर्थरचना हि साधारण भांडवशाही आणि समाजवद या मध्ये कुठे तरी बसणारी (सध्याचे सरकार उजव्या हुजूर विचारसरणीचे)
- मुख्य उत्पन्न, शेतीची निर्यात, खनिजे निर्यात , शिक्षण निर्यात आणि पर्यटक ( जर्मनी सारखे तांत्रिकी गोष्टीतून मिळणारे उत्पन्न कमीच )
- 7 राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेश , भारतासारखी संसदीय व्यवस्था
- वैद्यकीय व्यवस्था सरकारी आणि खाजगी दोन्ही परंतु सरकारी यंत्रणा जगातील एक चांगली म्हणून वाखाणण्यासारखी पण त्यात सुद्धा प्रश्न असलेली म्हणजे अस चेष्टेने म्हणाले जाते कि जर "इमर्जन्सी आजारी परिस्थिती किंवा बाळंपण व्हावे तर ते औट्रेलियात पण अति महत्वाची नसलेली एखादी शास्त्रीक्रिया करायची असेल तर इथे फार वाट पाहावी लागेल त्यापेक्षा थायलंड किंवा भारत बरा! )
- आयात आणि निर्याती साठी चीन वर अवलंबून असण्याचे प्रमाण बऱयापैकी पण त्याच बरोबर अमेरिकेची येथे गुंतवणूक भरपूर पण त्याचा रोजच्या जीवनावर फार परिणाम दिसत नाही
थोडक्यात "मध्यमार्गाने " चालणार देश ( ना टोकाची भांडवलशाही ना टोकाचा समाजवाद )
- रोजचं जीवनात "कामवाली बाई / चपराशी" हि चैन जवळ जवळ नाहीच , मिपाकरांचं भाषेत "लाकडाच्या घरात राहून स्वतःचच भांडी आणि धुनी करणारे जास्त !!!"
- बेरोजगारी साधारण ५% ( आता तात्पुरती ११% पर्यंत गेली आहे)
- शाळा बहुतेक सरकारी आणि खाजगीना पण सरकारी अनुदान
- समाज प्रामुख्याने इंग्लिश आणि आयरिश ख्रिस्ती पण एकूण "स्थलांतरितांचा देश " इटालियन, ग्रीक, चिनी , भारतीय खूप त्यामुळे आंतराष्ट्रीय प्रवास हा त्यामानाने बराच ..
फारसा धार्मिक नाही आणि "गॉड अँड गन" हि संस्कृती फारच कमी
आता विचार केला कि लक्षात येईल कि याचा वेगवेगळ्या गोष्ट्न्वार कसा पपरिणाम झाला असेल..ते सध्या ( भांडी घासणे रोजचेच प्रत्येक घरी आपणच रामा मग घरबंदी असो कि नसो.. काय कवतिक न्हाय !)
आता कोविड कडे वळूयात
एका कोपऱ्यात असा जरी हा देश वाटत असला तरी वरील रचणे मुळे आणि खास करून चिनी नवीन वर्षाच्या वेळेस आणि अमरेइकेतील / इराण मधील प्रवासनच्य मुळे कोविड च्या लागणी ला सुरवात झाली , त्यात कहर म्हणून रुबी प्रिन्सेस हा "ऑस्ट्रेलियन तब्लिघी" प्रकार झाला ( त्यावर पुढे)
-प्रथम चीन वरील प्रवासावर बंदी आणि मग पुढे सर्वच आंतराष्ट्रीय प्रवासावर बंदी , यात कदाचित थोडा उशीर झाला अशी टीका सरकार वर होते पण सरकार पण "धरल तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय" अश्या परिस्थिती आहे हे सर्वसाधारण जनता आणि विरोधक जाणून आहेत आणि समजुतीदार पण दाखवता आहेत.
याचा उत्तम उदाहरण म्हणजे "उजव्या" विचारसरणी ला ना शोभणारे १३० डॉलर चे प्रत्यक्ष जॉबकीपर हे पॅकेज दिले गेले म्हणजे पुढील ६ महिने जो जो ऑस्ट्रेलियन कामात होता १ मार्च ला त्याला कामावर ठेवण्यासाठी सरकार पगार देणार महिना ३००० डॉलर आता याला दावे विरोध कसे करणार? हवाच गेली त्यांच्या फुग्यातली ..अर्थात हे करताना "उजव्या" सरकार ने हे हि नमूद केले कि हे तात्पुरते आहे "स्ट्रक्टरल चेंज " नाही ..कारण २००८ ला जेवहा अशीच पाळी अली होती तेव्हा "डाव्या" सरकारने जरा जास्तच सढळ हाताने खिरापत वाटली होती ! असो
- घरबंदी: पूर्ण नाहोये, जमावबंदी आहे, ऑस्ट्रेलियनना अत्यंत प्रिय असलेलं समुद्र किनारे काही ठिकाणी बंद केले आहेत, कॅम्पिंग च्या जागा बन्द
खेळ प्रिय देश असल्यामुळे भरपूर मैदाने आहेत तिथे फक्त कुटुंब म्हणून चालायला आणि व्यायामाला परवानगी आहे पण उगाच "पिकनिक" ल नाही.. अर्थात काही येडे इथेही असतात आणि धटिंगगिरी करतात मग आहे 1500 डॉलर चा पोकळ बांबू ...
नुकताच ईस्टर चा ४ दिवसांचा मोठ्ठा वीकेंड होऊन गेला .. लोकांनी शहाणपणा दाखवला .. सरकारला हायस वाटलं
- दुकाने उघडी आहेत पण इतर देशाप्रमाणे येथील "जीवनावश्यक" वस्तू गायब (धु. पु. का. सकट ),
25507070-8071359-image-a-4_1583283949319
त्यात गंमत वाटली म्हणजे मीठ पण सुरवातीला गायब! सर्वात स्वस्त गोष्ट पण गायब...मग खादडीसाठी हिमालयन दगडी मीठ पूड आणली होती ती कामी आली..
इतर "देशी" मंडळींप्रमाणे डाळी , कडधान्ये भरून ठेवली... ( भारतीय दुकानाची चाहूल बाकी जनतेला लागे पर्यंत आपण साठवलेले बरे ...हळू हळू बातमी पसरली असावी कि अरे भारतीय लोक जर कडधान्यवर जगतात तर आपण पण करू.. त्यामुळे तिथेही आता सामान कमी.."
ET3Jf9dUUAAcEk0
12089078-3x2-940x627
बरेच दिवस बाजारात गेलो नसल्यामुळे मांसाहार आपोआप कमी झाला आहे त्यामुळे सध्या तरी कल्पना नाही कि दुर्भिक्ष्य आहे का ते ? पण नसावे कारण असे कि भाडेकरूनि अजूनही भाडे देणे चालू ठेवले आहे आणि भाडेकरींन कोंबडी विक्रय करणाऱ्या उद्योगात आहे म्हणजे सगळे आलबेल असावे ( येथे इंडियन तर्क डोक्यालिटी वापरली आहे हे चाणाक्षांच्या लक्षात आले असेलच )
- वैद्यकीय : चाचण्यांचे चे प्रमाण टक्केवारी प्रमाणे खूप चान्गले आहे , यूरोप आणि यूएस सारखी परिस्थी झाली नाहीये... पण अजून हिवाळा खऱ्या अर्थाने सुरु झाला नाहोये त्यामुळे जुने जुलै मध्ये काय होईल याची चिंता आहेच आणि सध्या इतर देशांच्यमानाने परिस्थिती तशी बरी आहे म्हणून मग लोक आणि उद्योग हळू हळू "निर्बंध शिथिल करा "
- संसद जरूर आहे तेव्हाच भरते आहे आणि त्यात सुद्धा दोन्ही पाक्षहतील सभासद सम प्रमाणात कमी करून मग संसद भरवली जाते ( त्याचे गणित कसे काय हे पुढे कधीतरी "कोविड चा काळ " प्रकारच्या माहितीपटातून येईल ...(एकूणच वर्तमान नोदं करून इतिहासास चांगली नोंद करण्याची इन्वेस्टिगेटिव्ह जोर्न्लीसम ची चांगली प्रथा असल्या मुले पुढे भरपूर खाद्य असणार आहे ) शिवाय "संसद भरवता मग नमाज/ चर्च ला का बंदी " असा वांझोटा वाद कोणी घालताना दिसत नाही .

- " रुबी प्रिन्सेस" श्रीमंतांचा दुःख म्हणा हवे तर पण एक थोडी विचित्र परिस्थिती जगातील अनेक बंदरात आली ती म्हणजे मोठाल्ली क्रूझ शिप जयंवर २-३००० प्रवासी आणि ८००-१०० कामकरी. अनेक देशाचे नागरिक . बोट नोंदणीकरीण एका देशाचे , बोट मालक दुसऱ्या देशातील आणि बंदर तिसरे .. आणि व्हायरस साठी "पेट्री डिश " जणू सगळे एकाठिकाणी असल्यामुळे, सुरुवात या भागात मला वाटते जपान मध्ये झाली... आणि हळू हळू हा प्रश्न उपस्थित होऊ लागला त्यात रुबी प्रिन्सेस या अवाढव्य जहाजाला सिडने बंदरात थांबायला आणि परवाश्यांना फार ना तपासताना बाहेर पडू दिले आणि एकूण देशातील कोवीड रुग्णांपैकी १०% रुग्ण या जहाजावरचे प्रवासी अशी परिस्थी निर्माण झाली.. यात चूक कोणाची यावर वादळ उठलं आणि म्हणून मी याचा उल्लेख वरती "ऑस्ट्रेलिया चे तबलिग कांड" केला.. आता दखलपात्र गुन्हा आणि चौकशी चालू आहे
एका राज्यमंत्र्याला घर सोडून सुट्टीच्या फार्म हौस वर गेला हे उघडकीला आले त्यामुळे राजीनामा द्व्यावा लागला.
बाकी एकूण सर्व समाजचे राहणीमान फार वेगले नसल्या मुळे जे काही होतंय ते देशभर सारखेच होतंय, फार तफावत नाही ..सरकारचे लोकांशी बोलणे ( कम्युनिकेशन) सुसूत्रित आहे .प्रथम जास्त महत्वाच्या प्रश्नांबद्दल निर्णय ( बेकारी, वैद्यकीय , शिक्षण ) याबद्दल घेतले गेले आणि मग हळू हळू आता जसे कि मनोस्वास्थ्य . इत्यादी
त्यात कधी कधी जरा विचित्र निर्णय पण घेतले जातात , सुरवातीला फतवा होता कि केशकर्तन साठी फक्त ३० मिनिटे मिळतील... बाप्ये लोकांनां काही प्रश्न नवहता पण महिला मंडळ हातात लाटणं घेऊन मागे लागले .. मग सरकार चे डोके ठिकाणावर आले ! ( ऑस्ट्रेलियात लाटणं नाही... BARBEQ चा चिमटा घेऊन म्हणू हवा तर, नाहीतर मिपावर “लाटणं तिथे कुठे? अशी पतिक्रिया यायची! )
दुसरी विसंगती कि सोशल डिस्टंसिन्ग आहे मग ज्या काय आंतरदेशीय विमानसेवा चालू आहेत त्यात हे पाळले जात नाहीये!
- डुओपोली :एकूण बाजार फक्त २.७५ करोड चा आणि तो सुद्धा विखुरलेला त्यामुळे बऱ्याच क्षेत्रात १-२/ जास्तीत जास्त ३च उद्योग उदाहरणार्थ विमानसेवा , टेलिकॉम , किराणा माल पुरवणारे इत्यादी त्यामुळे त्यातील कोणी या परिस्थितीत अडचणीत ला तर सरकारला लक्ष घालावेच लागते... १० मधील २ बुडले तरी हरकत नाही असे धोरण परवडत नाही पण त्याच बरोबर उद्योगाचे सरकारीकरण करणे हे हि पटत नाही त्यामुळे सध्या वर्जिन एयरलाईन ची जेटरवेज होणार कि काय याबद्दल शंका आहे..
- अंतरे : बहुतेक मुख्य शहरात १०००, २००० किमी असे अंतर असल्यामुळे प्रवासी सेवा बहुतेक विमानमार्गेच ..इलुशी लोकसंख्ख्या असून सुद्धा जगातील २ क्रमांक आणि ८ क्रमांकाचं सर्वात "व्यस्त" विमान सेवेत ऑस्ट्रेलियातील आहेत (मेलबर्न ते सिडने ९०० किमी आणि सिडनी ते ब्रिस्बेन १००० किमी ) त्यामुळे हा प्रश्न गंभीर चर्चेत आहे
मालवाहतूक बहुतेक हि अजस्त्र ट्रक किंवा २-३ जोडलेले ४० फुटी ट्रेलर "रोड ट्रेन" ने होते आणि काही आगगाडीने त्यामुळे त्यावर फार परिणाम नाही
- फिफो : काही मित्र आणि अनेक ऑस्ट्रेलियन खाणी संदर्भात किंवा रस्तेबांधणी , ऊर्जा निर्मिती क्षेत्रात काम करतात ..येथे हजारो किमी दूर वॉर निर्जन ठिकाणी सुसज्ज कॅम्प असतो "फ्लाय इन फ्लाय आऊट" असे काम लोक करतात ८ दिवस काम ३ दिवस सुट्टी वैगरे ..त्यांना पूर्वी एवढया सहज पणे जाता येत नाही त्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे
- वृद्धाश्रम: एकूण लोकसंख्येत वयस्कर लोकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे आणि एकत्र कुटुंब पद्धतीने कमी असल्यामुळे काही दुर्दवी गोष्टी होत आहेत त्या म्हणजे वृद्धाश्रमांना नेहमीच्या भेटी देता येत नाहीयेत त्यामुळे लोक अस्वस्थ आहेत
- शाळा: साधारण या काळात २ आठवडे इस्टर ला जोडून सुटीया असतातच पण त्या आधी शाळा बंद करा असा साहजिक दबाव आला पण सरकारने शेतवपर्यंत ताणून धरले
आता परत निदान ४ आठवडे तरी “दुरांतो” शाळा चालवणार.. प्रगत देश असला तरी प्रत्येक जण काही लॅपटॉप / संगणक वापरीत नाही परत घरात २-३ मुले असतील तर काय? असे प्रश्न आहेतच .. बारावी ची मुलं आणि पालक जास्त चिंतेत आहेत ...वर्ष जानेवारी ते डिसेम्बर असते त्यामुळे ऐन परीक्षेचा काळ अजून नाही )
- चीन: संकट आली कि मनुष्य स्वभाव खरवडले जातात आणि त्यातून मूळ द्वेष उघड पडतो जगभर,, आधीच वर्णद्वेषी म्हणून कुप्रसिद्धी असेललाय ऑस्ट्रेलियात काही बिनडोक लोक स्थानिक चिनी वंशाच्या जनतेवर राग काढीत आहे, मान्य आह की चीन मधील काही प्रथेवर सध्या जगभर राग असणे हे स्वाभाविक आहे पण त्याचे असे वयक्तिक पातळीवर होणारे दर्शन फार वाईट दिसते.. एका चिडलेला माणूस डोकयावर खास आकुब्रा देशी टोपी घालून काऊबॉय सारखा वेष घालून हाती मोठा चाबूक घेऊन चिनी दूतावासापुढे जाऊन चाबूक फाटकावत ओरडत होता ...
https://www.youtube.com/watch?v=P0cYJkGk7gI

वयक्तिक म्हणाल तर
- काम / उद्योग : उत्पादन क्षेत्राशी संबंधित असून सुद्धा बराच काळ घरूनच काम असते आणि कमी वेळा कारखान्यात जावे लागते त्यामुळे त्यात काही फरक नाही...
- एका पुरवठा करणाऱ्या एनजीनीयर बरोबर नेहेमी ची झकाझकी व्हायची मी म्हणायचो कि लेका २०२० साली पण तुम्ही स्काईप किंवा झूम का नाही वापरत म्हणजे स्क्रीन बघता येईल एक्मेकांचाच.. आता बच्चमजीना कळले ..
- डिसेंबर जानेवारी मध्ये सिंगापोर, च्या जवळ होतो बरं झाला कि वेळेवर तिथून निघालो .. एप्रिल मध्ये अमेरिकेत जाण्यासाठी जवळ जवळ तिकट काढली होती ते हि वाचलो म्हणायचे .. पण जवळचा समुद्री कासवांची पिल्लं एबघण्याची सहल काढणार होतो आता ते पुढे ( तिथे रम पण चांगली मिळते )
Being a tourist! Is this your tipple?
Mon Repos
sea turtle in mon repos
Mon Repos
- खादाडी : काही महिन्यात पूर्वी जरा खादाडी ची रेलचेल असलेल्या उपनगरजवळ राहायला आलो आणि म्हणलं आता जरा मज्जा करू पण कसलं काय त्यात जखमेवर मीठ म्हणजे पर्वा सध्याच्या शांततेच्या ( आधीच इथे शांतता असते त्यात हि अजून ) जवळच्या चिनी उपहारगृह उघडलंय असं वाटलं आणि नेमकं दुपारी वॊक चा खडखडाट करतत आणि मस्त वास येत असतात .. म्हणून विचारायला गेलो तर एक म्हातारी किंचाळी "नो नो" करीत आली .. मला वाटलं कि मी काय सोशल दिष्टांसिंग चे नियम मोडले म्हणून कि काय पण तसे नवहते मग ती किंचाळली नो फूड हियल ( र) तिला बहुतेक वाटले कि जवळ असलेली ख्रिस्ती मिशनरी केंद्रता चकटफू खाऊ घायला येतात त्यातला मी कि काय... मी म्हणालो " नो नो,,, मनीं मनीं हियल" ( माझ्याकडे) तरी ती बधेना.. शेवटी चिनी कथा उलगडली .. तिथे फक्त ते घाऊक पद्धतीने बनवतात ..नो लिटेल ( रिटेल ) सेल .. मनात म्हणले मग सुक्काळीचांनो जरा ते दरवाजे तरी बन्द करा आणि साऊंड प्रूफ करा खिडक्या .. का असा मोहक त्रास देता!
- आळस झटकून बागेत गोष्टी लावल्या आहेत
रोझमेरी , लिंबू, वांगे ( प्रतीक्षेत )
IMG_7536[1]
IMG_7535[1]
IMG_7537[1]
आणि हा उलटेश्वर देखरेखीला
IMG_7539[1]
- घरातील पांढऱ्या कपड्यांवर प्रयोग चालू आहेत ...टाय डाय चे बघू पुढे ( हे असलं घालून गेला तर हिप्पी म्हणून कोणी "मेट चिलीम आहे का म्हणून " विचारतील कि काय वाटते )
IMG_7533[1]
- पाकृ मधील उत्साह ओसरला कारण खा खा वाढते मग .. नको रे बाबा
बाकी येथील म्हणीप्रमाणे "शी विल बी आल राईट मेट " असे म्हणूयात ..
लांबी बदल क्षमस्व

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

17 Apr 2020 - 12:30 pm | चांदणे संदीप

कोविडच्या निमित्ताने कांगांरूंचा देश फिरल्याचा फील आला. बाकी ते टाय डाय भारी!

सं - दी - प

सौंदाळा's picture

17 Apr 2020 - 8:36 pm | सौंदाळा

+१ आवडला

चौथा कोनाडा's picture

17 Apr 2020 - 12:37 pm | चौथा कोनाडा

लॉकडाऊनच्या निमिताने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा कोविड गोषवारा चांगला वाटला !
टंचाईची वर्णनं भारी ! बेसिनवरच्या टॉवेल ऐवजी पानं बघून फुस्सकिनी हसायला आलं.
बाकी, सगळेच फोटो मस्तच !

प्रशांत's picture

17 Apr 2020 - 2:56 pm | प्रशांत

+१

प्रचेतस's picture

17 Apr 2020 - 1:04 pm | प्रचेतस

अगदी हेच म्हणतोय. वेगळ्याच देशांतील गोषवारा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Apr 2020 - 1:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्तांत आवडला. बेसीन हँडलला पानं, रमत गमत चाललेला कासव, आणि आलेला तपशीलवार वृत्तांत आवडला. बाय द वे, लॉकडाऊच्या काळात तिकडे उजव्या विचारसरणीचं सरकार असल्यामुळे तिकडे मनोधैर्य वाढविणारी कृती तिकडच्या सरकारला सुचली नाही की ? जसं आमच्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या होत्या ? दिवे होते वगैरे. तिकडे चीन फार घुसखोरी करत असते असं वाचलं होतं व्यापार की अन्य कारणे मला माहिती नाहीत. पण, लिबरल सरकार असते तर किती प्रभाव पडतो त्याबद्दल काही माहिती वाचायला आवडली असती. सरकारांची तुलनात्मक कार्यशैली.

बाकी, झूम अ‍ॅपने डाटा लिक होतो हॅक करता येते अशी एक बातमी इकडे आज दैनिकात दिसली त्यामुळे आता झूम अ‍ॅपने यापुढे सरकारी संवाद व्हायचा तो आता इकडे बंद झाला आहे.

आज जरा कुलरची साफसफाई केली, मोटर बंद आहे. त्यामुळे दुकाना उघडल्याशिवाय दुरुस्तीची शक्यता नाही. आता उन्हाळा सुरु झाल्यामुळे जीवाची तगमग वाढली आहे.
मिपावर पडीक आहेच.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

17 Apr 2020 - 2:48 pm | चौकस२१२

खुलासा:
बेसिन वरचा टॉवेल नाही तर भेंडोळे ठेवणाची जागा ! हि कल्पना माझी नव्हे आंतरजालावरून घेतलेली ... संदर्भ एवढाच कि कोणातरी स्थानिक माणसाची कल्पना होती ..

"तिकडे चीन फार घुसखोरी करत असते असं वाचलं होतं व्यापार की अन्य कारणे मला माहिती नाहीत. पण, लिबरल सरकार असते तर किती प्रभाव पडतो त्याबद्दल काही माहिती वाचायला आवडली असती. " यावर नंतर सवडीने वेगळ्या धाग्यात लिहीन , अजून इतर लोकांनी पण स्वारस्य दाखवलं तर
खुलासा:आणि दुसरे असे कि येथे उजव्या सरकार ला लिबरल+ नॅशनल सरकार म्हणतात आणि डाव्याला लेबर + ग्रीन

बाकी टाळ्या , थाळ्या याबद्दल असे म्हणून शकतो कि
- स्थानिक पातळीवर "कौतकाच्या टाळ्या " झाल्या देश पातळीवर नाही पण जर असे आव्हान केले सरकारने तर कोणी त्याची चेष्टा उडवणार नाही ... कारण त्यामागचे कारण बहुतेकांना समजले असेल ..समजावून घ्यायची तयारी असेल...
- एकतर पंतप्रधान दर दिवसाआड राष्ट्राशी बोलतात,
- विरोधक सरकार च्या बरोबर आहेत , संधीचा फायदा घेऊन टीका असे धोरण फारसे नाही
तेव्हा यावर आपण हा विषय येथेच थांबवू...कारण भारतात अश्या कठीण ठिकाणी जो काय संधीसाधूपणा खास करून विरोधकांकडून केला जातोय त्यावर स्पष्टपणए बोलले तर अनेकांना पचणार नाही किंवा मला कोणाचं बंगल्यावर जायचे नाही मार खायला !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Apr 2020 - 3:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुलासा:आणि दुसरे असे कि येथे उजव्या सरकार ला लिबरल+ नॅशनल सरकार म्हणतात आणि डाव्याला लेबर + ग्रीन

हाहाहा ही माहिती खूप रोचक वाटली. म्हणजे उजवे लिबरल वगैरे. भारी.

असे आव्हान केले सरकारने तर कोणी त्याची चेष्टा उडवणार नाही

हाहाहा चेष्टेचा विषय असल्यावर लोक चेष्टा करतात, त्यामुळेच त्यांनी तसे केले नसेल असे वाटले.
उत्तम.

विरोधक सरकार च्या बरोबर आहेत

भारतातही विरोधक सरकारच्या बरोबर आहेत, भले केंद्र सरकारवर टीका करत असतील. आरोग्यसेवेंच्या विविध वस्तू सरकार विरोधक राज्यसरकारांनी मागितलेल्या संखेपेक्षा कमी येत असतील एकमेकांना सहकार्य चांगलंच आहे. आणि लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला ’हम करे सो कायदा' असे वागून चालत नाही. संसदीय शासन पद्धतीत विरोधी पक्षाची भूमिका नेहमीच महत्वाचीच असते.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

17 Apr 2020 - 4:10 pm | चौकस२१२

माफ करा बिरुटे साहेब आपल्याला "उजवे लिबरल वगैरे. " याबद्दल हसावेसे वाटत असेल पण त्यामागे ऑस्ट्रेलियातील उजवे सुद्धा किती समाजवादी आहेत/ त्यम्गच्च इतिहास काय आणि हा खरा समाजवाद याची आपल्याला कल्पना नसावी .. त्यावर एक सविस्तर लेख लिहीन पुढे...
भारतातील समाजवाद आणि इतर लोकशाही देशातील समाजवाद यात फरक आहे ...

चौकस२१२'s picture

17 Apr 2020 - 2:55 pm | चौकस२१२

अजून एक खुलासा ,, १३० डॉलर नाही तर एकूण १३० बिलियन डॉलर सरकार प्रत्यक्ष देणार ( ३००० डॉल रप्रत्येकी महिना ) या शिवाय ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यानं नेहमी मिळणार महिन्याचा साधारण बेकारी भत्ता ११०० काह २२०० डॉलर
न्यूझीलंड मध्ये येथील पेक्षा जास्त कडक घरबंदी आहे अर्थात त्यांची लोकसंख्या तर अजून कमी क्षेत्रफळ इंग्लंड एवढे इंग्लंड ६-७ कोटी तर न्यूझीलंड केवळ ५० लाख

कंजूस's picture

17 Apr 2020 - 5:08 pm | कंजूस

अतिशय वेगळा आणि वेगवान वृतान्त आवडला.
फोटो आणि विषय बरोबर ओवले आहेत. तुमच्याकडून वर्षाला चार लेख हवेतच. एकूण ओस्ट्रेलिअन लोकांची विचारसरणी आवडली.
आमच्या टिवी प्याकमधला ABC channel (australia broadcasting corporation) डिश टिवीने काढला मागेच. काही कार्यक्रम पाहात असे. Bondi Vet पाहात असे.

ढुंपु कागदाच्याऐवजी मऊ मलबेरी तुतीची पाने आइडिया चांगली आहे पण खाली बोळा बसेल ना. पातंजलीची पळसाची पाने आणेल बहुतेक

चौकस२१२'s picture

17 Apr 2020 - 5:56 pm | चौकस२१२

धन्यवाद .... ABC चॅनेल आणि हि दोन्ही चॅनेल सरकारी मालकीची परंतु स्वतत्र आहेत

जर कोणाला या भागातील आणि जागतिक "शोध पत्रकारिता" यात रस असेल तर हे तीन कार्यक्रम जरूर बघावे
१) https://www.abc.net.au/4corners/
आणि
२) https://www.sbs.com.au/ondemand/program/दातेलीने
३) https://www.abc.net.au/foreign/

वामन देशमुख's picture

17 Apr 2020 - 9:53 pm | वामन देशमुख

शब्द आणि चित्रे दोन्ही आवडले.

टॉइलेट पेपर् च्या ऐवजी झाडाची पाने ही कल्पना आवडली.

बाकी, मराठवाड्यात पाणी उपलब्ध नसल्यावर दगड, बेशरमाची / कानबहिरीची पाने हीदेखील या कामासाठी वापरली जायची!

गणेशा's picture

26 Apr 2020 - 6:46 pm | गणेशा

फोटो आवडले,
कोविड आणि त्यांमुळे असलेली तिथली परिस्तिथी वाचली.. जास्त कनेक्ट झालो नाही दुसऱ्या देशातील माहिती असल्याने, पण आवडले लिखाण