पॅनडेमिक
एकामुळे चार आणि चार नंतर सोळाला बाधित करणाऱ्या त्या महामारीच्या पोस्ट कडे बघत त्याचा तिळपापड होत होता. संसर्ग किती भयंकर आहे याची तो कल्पना करत होता. आधीच घरात बसून ऑफिसचे काम, भांडे घासून आणि मुलांसोबत खेळून मेटाकुटीला आला होता. हे प्रकरण एका झटक्यात संपवावे असं मनोमन तीव्र इच्छा करत संताप सुरु होता, पण बोलू शकत नव्हता. हि वाढत जाणारी साखळी कोणी तोडत सुद्धा नाही, याची चिडचिड सुरु होती. आता तर संसर्ग आपल्या घरात पोचला आहे. बायकोने अजून काही मैत्रिणींना सुद्धा संसर्गित केले होते, हे विचार सुरु असतांनाच -
"अहो, नुसतेच काय बघत आहात त्या पोस्टला, लाईक करा लवकर माझ्या साडी चॅलेंजला !"
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
16 Apr 2020 - 11:55 am | धर्मराजमुटके
मस्त ! आवडली. कथा बरं !
17 Apr 2020 - 7:35 am | साहित्य संपादक
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.![](https://flyclipart.com/thumb2/sunglasses-emoji-clipart-smiley-face-848289.png)
16 Apr 2020 - 4:55 pm | स्वलिखित
साडी चॅलेंन्ज आणि महामारी
काही पण का
16 Apr 2020 - 10:55 pm | अर्धवटराव
मस्त :)
पहिला परिच्छेद म्हणजे नवरोबा कुठलीशी पोस्ट वाचत बसलाय
शेवटच्या ओळीत बायको त्याची वाचन समाधी भंग करुन साडी चेलेंजला लाईक करायला सांगते आहे.
असाच अर्थ आहे ना?
16 Apr 2020 - 11:30 pm | टीपीके
+१
17 Apr 2020 - 2:41 am | ज्योति अळवणी
+1
18 Apr 2020 - 9:21 pm | जव्हेरगंज
+१
मस्त आहे!
साडी चॅलेंज हीच महामारी आहे या कथेत!!
20 Apr 2020 - 10:13 am | शब्दानुज
+1
20 Apr 2020 - 10:46 am | सौंदाळा
+1
27 Apr 2020 - 10:58 am | टर्मीनेटर
+१
आवडली!
28 Apr 2020 - 5:51 pm | मनस्विता
+१