काही वर्षांपुर्वी के एस ऑइल्स या कंपनीचे शेअर्स खरेदि केले होते . सध्या हि कंपनी व शेअर्स हे inactive स्थितीमधे दिसत आहे . भविष्यात या कंपनीला व शेअर्सला काय scope आहे ? मिपावरील जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
काही वर्षांपुर्वी के एस ऑइल्स या कंपनीचे शेअर्स खरेदि केले होते . सध्या हि कंपनी व शेअर्स हे inactive स्थितीमधे दिसत आहे . भविष्यात या कंपनीला व शेअर्सला काय scope आहे ? मिपावरील जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे .
प्रतिक्रिया
3 Mar 2020 - 8:05 pm | राजेंद्र मेहेंदळे
मी ही एक दोन शेअरमध्ये असा फसलो आहे. एक जय माता ग्लास आणि दुसरा अनु लॅब.
जय माता ग्लास जेव्हा लाँच झाला तेव्हापासुन रोज १० ते १०.०५ या वेळात त्याला अपर सर्कीट लागायचे. शेवटी एक दिवस मला थोडे शेअर्स मिळाले. आणि तेव्हापासुन तो खाली खाली घसरुन शेवटी कंपनी शुन्य झाला.
शेअर मार्केट्मध्ये असे फटके बसतच असतात. फार पैसे अडकले नसतील तर विसरुन जा आणि पुढच्या वेळी चांगले शेअर्स घेउन तोटा भरुन काढा.
5 Mar 2020 - 10:42 am | Jayant Naik
काही साईट्स च्या माहिती नुसार हा शेयर २०१३ नन्तर ट्रेड झाला नाही . त्या मुळे हा तोटा अक्कल खाती घालून पुढे जावे हे उत्तम.
5 Mar 2020 - 3:37 pm | विजुभाऊ
के एस ऑइल्स म्हणजे खाद्य तेल वाली की इंजीन ऑईल वाली
6 Mar 2020 - 8:16 am | तुषार काळभोर
दुर्दैवाने अशा व्यवहारांमुळे लोकांच्यात "शेअर्समध्ये जॅकपॉट लागतो किंवा कंगाल होतो," असे जुगार टाईप विचार असतात.
मी चौदा वर्षापासून ट्रेडिंग करत होतो, तरी मी मागील दहा वर्षात ट्रेडिंग केलेले नाही. फक्त गुंतवणूक केलीय. CNBC वर मी कधीही शेअर्स चे रेकमेंडशन बघत नाही. नावाजलेल्या आणि मला आजूबाजूला दिसणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स मी विकत घेऊन ठेवतो आणि विसरून जातो. कधी कधी पाच दहा टक्के करेक्शन आले की घेऊन ठेवतो. सहा- आठ महिन्यातून एकदा फक्त नजर टाकतो, की सगळं व्यवस्थित चाललय की नाही.
माझीच पद्धत सर्वोत्तम असा माझा दावा नाही. पण तुम्हाला दूषणे देण्याचा दोष पत्करून सांगतो, की तुमची पद्धत (जी काही असेल ती) नक्की चुकीची आहे. के एस ऑइल या कंपनीचे नाव गुगल ना करता किती मिपाकरांना ठाऊक असेल? तुम्ही कुणाच्या तरी सुचवण्यावरून (कदाचित एंजल ब्रोकिंग च्या एजंटच्या) हा शेअर घेतला. एक तर हा अनोळखी स्टॉक. त्यात दोन तीन रुपये किंमत. (अरे दोन दिवसात बघ दुप्पट झालाय. एक महिन्यात हा दहा रुपया पर्यंत जातो बघ!)
कृपया वैयक्तिक घेऊ नका. याच्यातून काही शिकणार असाल तर त्या शेअर्स मध्ये गेलेले पैसे हे त्या शिक्षणाची / धड्याची किंमत म्हणून सोडून द्या. ते मिळणार नाहीत.
6 Mar 2020 - 1:35 pm | सुचिता१
+१००
6 Mar 2020 - 12:12 pm | नावातकायआहे
सुरनळी .. :-)
7 Mar 2020 - 4:50 pm | चौथा कोनाडा
आता ही कोणती कंपनी ? ही पण डुबली का ?
23 Mar 2020 - 5:30 pm | नमकिन
आज लागले एकाच महिन्यात दुसऱ्या वेळेस लोअर सर्कीट मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात.
३९३४ अंक घसरणीवर बंद दिवस अखेरीस २५९८१ अंक.
23 Mar 2020 - 6:09 pm | चौथा कोनाडा
अरेरे .... जोरदार अधोगतीची लक्षणे .... !
23 Mar 2020 - 7:19 pm | राजेंद्र मेहेंदळे
एक सल्ला हवा आहे. आयशर मोटर्स हा शेअर कसा आहे? कधीकाळी २००१ मध्ये १७ -१८ रु. ला मिळणारा हा शेअर ३० हजार पर्यंत गेला होता (२०१८ मध्ये). आणि आता १३-१४ हजाराला आहे.
ऑटो सेक्टरची सध्या लागलेली आहे. हा पुन्हा वर जाउ शकेल काय? टाटा मोटर्स, महिन्द्रा, हिरो कॉर्प वगैरे बद्दल सुद्धा ऐकायला आवडेल.
जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत---