राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.
मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात.
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
प्रतिक्रिया
27 Feb 2020 - 7:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण सर्वांनी नास्तिक चळवळीचे महत्व अधोरेखित करतांना आस्तिकतेचे महत्वही
पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याबद्दलही सर्वांचे आभार.
येत्या काळात नास्तिक चळवळीला किती कठीण प्रवास असणार आहे,
वाचकांच्या लक्षात येतच असेल. सर्वांचे पून्हा एकदा आभार व्यक्त करतो.
पुढेही ही चर्चा अशीच संयमाने चालत राहील अशी अपेक्षा आहेच.
-दिलीप बिरुटे
28 Feb 2020 - 4:48 am | चौकस२१२
कोणाला त्रास ना देणारी आस्तिकता किंवा श्रद्धा असेल तर काहीच प्रश्न नसतो.. प्रश्न येतो जेव्हा समाजाचे आणि राष्ट्राचे नुकसान होऊ शकते...
जरी तिरुपती किंवा सिद्धिविनायक ( आणि याची मुस्लिम आणि ख्रिस्ती/ शीख उदाहरणे ) यातून कोट्यवधी जमा होऊन त्याचा चांगल्या समाजउपयोगी कामासाठी वापर केलं जातो तेव्हा त्यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नसते फारसे आणि तसा अक्षेप घेणे हि अवघड असते.
मी मागे म्हणल्याप्रमाणे एक धूसर रेषा असते कि जिच्यअ अल्याड पल्याड समाजाला उपयोग किंवा मदत होऊ शकते
( देवाचं दर्शनाला तास अन तास उभे राहणार एखादा शल्य चिकित्सक त्यातील काही तास त्यापेक्षा रुग्णसेवा म्हणून देऊ शकतो .. एखादा स्थापत्य विशारद सार्वजनिक रस्ते कसे चांगले कर्ता येतील यासाठी विनामूल्य काम करू शकतो पण मग अशी अपेक्षा केली कि लोक म्हणतात कि मग व्यक्ती स्वातंत्र्त्याचा काय !
आणि गुंतागुंत वाढते.
पण जेव्हा हीच भक्त मंडळी जेव्हा इतरांना "हे असं असतंच, जीवनात गुरु पाहिजेच" आणि यात "च" वर भर असे करू लागतात तेव्हा सद्सदसविवेक बुद्धी वापरणारा आस्तिक सुद्धा नास्तिकते कडे वळतो ... (ज्यला हिंदुराष्ट्र नको अस्ते .. पण तो भाजप ला मत देतो ते केवळ कोन्ग्रेस्स च्य नकर्ते पणआ मुळे)
खास करून एका प्रसिद्ध हवेतून जपमाळ निर्माण करणाऱ्या अन्ध्र मधील गुरु चे भक्त बघा.. अरे जर असे हवेतून निर्माण करता येत असेल तर मग हजारो नांगर करा ना निर्माण ! मग गप्प.. मग म्हणणार :तुम्ही श्रद्धा ठेवा मग समजेल आमच्या गुरु चे काम " तद्दन भंपक पणा
आणि देव ना, आहे ना ,आहे चला पटलं.. अरे पण ना तो तुम्ही पहिला ना मी मग असेना का बापडा आपलं काम काय चांगलं जगायचं .. ते करूयात कशाला पाहिजेत या कुबड्या आणि खास करून कशाला पाहिजेत हे गुरु नावाचे मधले दलाल.. आम्ही देवाशी थेट सम्पर्क साधू ना ...
नवरात्री दिवसात किंवा गणपती च्या १० दिवसात माश्याला हात ना लावणारे ( कारण तेव्हा पाप पुण्य श्रद्धा हा प्रश्न येतो ना ) जेव्हा ११ वय दिवशी कधी एकदा मासळी बाजारात जातो अशी दांभिकता दाखवतात तेव्हा हसू येत त्यापेक्षा एखादा नास्तिक सरळ म्हणतो कि हे बघा मी ३६५ दिवस खातो फक्त दोन कारणांसाठी खात नाही
१) स्वतःची तब्येत २) बाकी आस्तिकांचा मान राखण्यासाठी आणि ३) पुनरुत्पादन व्हावे म्हणून ( म्हणजे आपल्याच स्वार्थसाठी )
आहे मी नास्तिक पण मला सुद्धा एखद्या निसर्ग रम्य देवळात गेल्यावर प्रसन्न वाटतं याचा अर्थ मी आस्तिक झालो का? नाही .. केवळ लहानपणची सवय असेल + निसर्गचि आवड + शांत पणाची आवड म्हणून मी जात असेन!.. उद्या नाही गेलो तर माझ्या शुभकार्याला काह्ही फरक पडणार नाही .
आता नाण्याची दुसरी बाजू :
वरील जरी सर्व खरे असले ( म्हणजे माझ्यापुरते आणि ज्यांना पटतंय त्यांच्या पुरते ) तरी याचा अर्थ असा नाही कि भारतासारखाय देशात स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी (एक सामाजिक न्याय म्हणून, धार्मिक नव्हे) उठ सुठ हिंदूंची, त्यांच्या काही प्रथांची अवहेलना करावी .. चुकीचं प्रथा आणि अंधश्र्ध्दा बंद कार्याची ना तर सर्वच धर्मातील करा .. दाखवा हिंमत अगदी तुमचा चार्ली अब्दू ( का हबदू) व्हायची शक्यता असेल तरी ( हे खास करून तमाम अवॉर्ड वापसी ग्यांग मेधा पाटकर , अरुंधती रॉय ,अनुराग कश्यप , महेश भट , नासिर , अश्यांसाठी )
थोडक्यात काय टोकाला ना गेलेले बरे ...
28 Feb 2020 - 9:30 am | माहितगार
@ चौकस २१२, मी आपल्या 'नास्तिकता आणि सुधारणावादातील 'आग्रही' सर्वधर्मसमभावाचे' हार्दीक अभिनंदन करतो. न्हाऊचे पाणी फेकुन देण्यास तत्वतः बहुतांचा विरोध नसतो, पण बाळ वाहून जाणार नाही या बाबत मानव संवेदनशील असतो हे संवेदनशीलतेने समजून घेतले पाहीजे स्वॉट अॅनालिसीस करुन लॉजीकली चर्च्रीले पाहीजे.
अगदी प्राचीनतम काळापासून वेळोवेळी होणार्या सुधारणवाद चर्चा आणि चळवळी भारतीय हिंदूपणाचा कणा आहेत, भारतीय हिंदूपणा सातत्याने उत्क्रांत होत आला आहे -आणि पुढेही होईल विशेषतः मानवी जिवनातील विषमता दूर करणार्या प्रयत्नात सर्वेनः सुखिना हिंदूपणाही आपली जबाबदारी पार पाडत आला आहे पुढेही प्रगती करेल, अधिकतम सकारात्मकता आणि अधिकतम विवीधता हि सुद्धा हिंदूपणाची ठळक वैशीष्ट्ये आहेत. या अधिकतम सकारात्मकतेतूनच हिंदूपणीय अस्तिकता जन्म घेते - अधिकतम सकारात्मकता आणि अधिकतम विविधतेचे प्रसारण आणि संरक्षण ह्यासही पटलेल्या तर्काची नितीमत्तापूर्ण बाजू लावून धरणे हा हिंदूपणाचा आद्य पुरुषार्थ (कर्तव्य) आहे - जिथे स्वतःचे तसेच इतर तत्वज्ञान आणि समुहात सकारात्मकता आणि विवीधतेस मर्यादा येतात तेथे हिंदूपणा संघर्षरत होतो आणि अगदी याच कारणाने प्रत्येक हिंदू अगदी परस्पर विरोधी बाजूही लावून धरताना दिसतो, हे आस्तिक आणि नास्तिकांनी दोहोंनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
हिंदूपणीय जिवन हे सर्वच गोष्टीत सकारात्मक म्हणजे अधिकतम आस्तीक आहे, ते इश्वरीय अस्तीत्वात जेवढे आस्थीक आहे तेवढेच ते नास्तीकतेसही त्या अद्वैतात गोवून घेते. 'कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंद' हि प्रार्थना जेवढी आस्तीक असते तेवढीच नास्तिकही असते, आणि जेवढी नास्तीक असते तेवढी आस्तीकही असते. असा आस्तीक नास्तिकतेचा इंटरप्ले हिंदूपणात खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. अद्वैत आणि द्वैत दोन्हीचा तत्वज्ञानात स्वीकार एकमेकांकडून विषमता निर्माण होण्याच्या शक्यतांवर परिणामकारक उतारा ठरतो. जेव्हा प्रत्यक्ष जीवनातील माणसांना सकारात्मक तत्वांना निसर्गाला ईश्वर म्हणून स्विकारले जाते हि एक प्रकारची नास्तीकताही आहे आणि आस्तीकताही आहे, माणसे आणि शब्दांची पुजा बर्याचदा स्थलकालानुरुप रहात नाही त्यांचे मुर्तीत रुपांतरण हि प्रथमदर्शनी आस्तीकता वाटली तरी त्यात काम्य व्रत नसेल तर ती आडवळणी नास्तीकता असते जी केवळ व्यक्ती आणि शब्दांच्या आधीच्या योगदानाचा आदर करुन जेवढे योग्य तेवढे आदर्श घेते आणि मुर्तींची नुसतीच पुजा करुन नव्या आदर्शांच्या शोधात कार्यरत होते. मी काम्य व्रतांचा समर्थक नाही पण काम्य व्रते पुस्तकपुजेस गौणता आणून अप्रत्यक्षपणे नास्तीकते कडे घेऊन जातात.
बाकी इश्वराच्या नावाने प्राणी हत्यांच्या अंधश्रद्धेपेक्षा ईश्वराच्या नावे प्राणि हत्या होणार नाही हे अधिक सकारात्मक असावे. अहिंसेचा अतिरेक न करता विविध दिवशी विवीध गट समुह मांसाहार टाळतात हे शेतकी अर्थशास्त्रास पुरक वाटते.
अवैज्ञानिक चमत्काराचे दावे करणारे भंपक दाभिंकतेत गुरुपण शोधण्यापासून हिंदूपणा सावकाशपणे दूर जात आहे हे चांगलेच आहे, पण माणसे केवळ पुस्तकांनी चालत नाहीत त्यांना इनफ्लुएन्सर लागतात, प्रोत्साहन, विश्वास, मार्गदर्शन संस्कार इत्यादी कामे इनफ्लुएन्सर गुरु करु शकतात.
जसे वेलफेअर अॅक्टिव्हीटीत शासन यशस्वी होते , असुरक्षीतता कमी होतात, नव्या ज्ञान विज्ञानाचा तर्कपुर्णतेचा प्रसार होतो तशा अंधश्रद्धा कमी होतात. मानवी जिवनात सुयोग्य आणि डोळस श्रद्धा तसेच सबुरी यांचे स्वतःचे महत्व आहे.
28 Feb 2020 - 9:54 am | चौकस२१२
सुयोग्य आणि डोळस श्रद्धा !
साहेब तीच तर नसते ना , बरेचदा ..
साधं जीवन जगणाऱ्यांना जेव्हा अति धार्मिक लोक धारेवर धरतात तेव्हा वैतागून मग म्हणावेसे वाटते कि चल बाप दाखव नाही तर श्राद्ध कर.. दाखव तुझा देव देवी कुठाय ते ? आणि तू जर म्हणत असशील मला अमुक अमुक देव दिसला तर मी हि म्हणू शकतो मला हि दिसला ! आणि बोलला आपण दोघेही काहीच सिद्ध करू शकत नाही .. त्यामुळे कशाला त्या फंदात पडायच?... मी आज जिवंत आहे आणि माझ्य हाती प्रयत्न करणे आहे बस
28 Feb 2020 - 12:04 pm | Rajesh188
भारतात जे नास्तिक आहेत ते खरोखच नास्तिक आहेत की काही विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी तसे विचार मांडतात ज्या विचारातून त्यांना अपेक्षित फायदा होवू शकेल अशी शक्यता वाटते.
भारतीय नास्तिक समजणारे लोक ही selective nastik आहेत .
म्हणजे देव नाकारणे पण हिंदू चा.
बाकी देव चालतात त्यात काही गैर ह्यांना वाटत नाही
धर्म नाकारणे पण हिंदू धर्म बाकी धर्म त्यांना चालतात.
प्राचीन काळा पासून अनुभव मधून आलेलं ज्ञान नाकारणे किंवा त्याची चेष्टा कारण ते हिंदू धर्मीय साहित्यात लीहले आहे म्हणून अशी मनोवृत्ती ठेवणे .असे नास्तिक लोकांचे
वर्णन करता येईल.
आणि त्या मुळेच नास्तिक विचार नाकरण्य कडे लोकांचा कल असतो.
उलट नास्तिक देव नाही असे सांगायला लागले प्रचार करायला लागले की जर मंदिरात जात नाही ,धर्म स्वतः पुरता ठेवतात तो लोक सुधा धर्म घरातून बाहेर काढून रस्त्यावर सुद्धा पाळायला लागतात.
मंदिरात जास्त प्रमाणात जावून अजुन धार्मिक कट्टर होतात.
28 Feb 2020 - 1:09 pm | Rajesh188
महाराष्ट्राला संताची परंपरा आहे आणि त्यांनी कर्म कांडवर कठोर टीका सुधा केली आहे.
संत गाडगे महाराज असतील,तुकाराम महाराज असतील,नामदेव महाराज असतील असे किती तरी संत महात्मे होवून गेलेत.
आणि त्यांनी अत्यंत कठोर पने टीका केली आहे पण हिंदू नी त्यांच्या मताचा आदर केला त्यांचा कधीच द्वेष केला नाही .
एक सुढे हिंदू ह्या संताचा द्वेष ज
करत नाही उलट त्यांच्या वर प्रेम च करतो.
कारण ह्या सर्व संत मंडळी चा हेतू पवित्र होता त्या पाठी समाज सुधारणा हीच तळमळ होती.
पण आतचे नास्तिक पुरोगामी अगदी दाभोळकर ह्यांच्या पासून सर्व .
ह्यांच्या हेतू बद्भल ल च जनता संशक आहे.
समाज सुधारणा हा ह्यांचा प्रामाणिक हेतू नाही तर हिंदू धर्माचे खच्ची करण करणे हाच ह्यांचा हेतू आहे असे वाटण्या एवढं ह्यांचे विचार आणि कार्य संशयास्पद आहे .
म्हणून ते नाकारले जात आहे .
नाही तर हिंदू धर्मा एवढं दुसरा कोणताच धर्म सुधारणा वादी नाही.
28 Feb 2020 - 6:51 pm | चौकस२१२
समाज सुधारणा हा ह्यांचा प्रामाणिक हेतू नाही तर हिंदू धर्माचे खच्ची करण करणे हाच ह्यांचा हेतू आहे असे वाटण्या एवढं ह्यांचे विचार आणि कार्य संशयास्पद आहे .
म्हणून ते नाकारले जात आहे
सहमत ...
16 Mar 2020 - 2:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
''देवावरील श्रद्धा केवळ फावल्या वेळेतला टाईमपास आहे, गंभीर संकटकाळी मात्र डॉक्टर वगैरे मंडळीच कामी येतात हे अंगभूत शहाणपण शिल्लक असल्याचा पुरावा म्हणजे भवताल आणि सद्यस्थीती''
(देवावरील या शब्दाची भर माझी)
-दिलीप बिरुटे
16 Mar 2020 - 3:15 pm | चौकस२१२
प्राध्यापक साहेब, आपल्या मताशी १००% सहमत असलो तरी तेवढ्याच जोराने हे हि मुद्दे मांडावेसे वाटतात आणि रोख ठोक प्रश्न विचारावेसे वाटतात
- अंधश्रद्धा निर्मूलन हे झालेच पाहिजे आणि धर्म आणि राजकारण यात फारकत असलीच पाहिजे ..पण त्या साठी ज्या संस्था काम करतात त्यांना फक्त हिंदुधर्मातीलच का वाईट दिसते?
- या चालवली करताना इतर धर्माचे वाभाडे काढताना का ह्यांची शेपूट नको त्या ठिकाणी जाते?
- एकीकडे निधर्मीम्हणायचे आणि धर्मावर आधारित आणि जातीवर आधारित सोयीनला पाठिंबा कसा काय? एक देश एक कायदा याला का पाठिंबा नाही ? ना हज ला सुबसिडी ना कुठल्या हिंदू यात्रेला किंवा सगळ्यांना परवडले तशी द्या
- देशातील ८०% जनतेचे अस्तित्व / संस्कृती हि मान्यच करायची नाही आणि एकीकडे , ख्रिस्ती व्हॅटिकन ( हा एक स्वतंत्र देश आहे ) चालतो, इस्लामिक रिपब्लिक चालते , ख्रिस्ती धर्मवीर अदाहरित आयर्लंड मधील कायदे चालतात !
- धर्माच्या अवडंबराला विरोध असावं जरूर पण अस्तित्वाला नाकारून कसे चालेल? आणि तो विरोध करताना त्याची सांगड टोकाच्या डाव्या विचारसरणी शी घातली पाहिजेच का ?
- ज्या हिंदूंनी शेकडो वर्षे जगातील सर्व धर्माच्या निर्वासितांना आश्रय दिला त्यांनाच तुम्ही असहिष्णू आहेत हे कोणत्या तोंडाने बोलले जाते? आणि ते सुद्धा लाडके काँग्रेस सत्तेवरऊन गेल्याबरोबर ?
आणि जे हे बोलतात त्यांनी कट्टर इस्लामी देशात जाऊन सर्वधर्म काय साधी लोकशाही बद्दल बोलून दाखवावे! तेव्हा परत शेपूट ///
हरामखोर दावे, देश विकून खातील ... हलकटांना .. जाऊदे
आहे कोणी माई का लाल कि जो पळवाटीची उत्तरे ना देता या मुद्यांना खोडून काढेल?
आपला
एक निधर्मी (केवळ जन्माने हिंदू) ज्याला हिंदुराष्ट्र्र नकोय पण हिंदूंना त्यांच्यात देशात एक सामाजिक न्याय आणि सामान हवा आहे अनि ज्यच धर्म गय खल्य्य्ने भ्रश्त होत नहि अनि चन्गल कर्य सुरु कर्तन ज्याला पूजा सुद्धा घालावीशी वाटत नाही .. पन तरि तो हिन्दु आहे
16 Mar 2020 - 3:21 pm | ऋतुराज चित्रे
आणि गंभीर आजारातून बरे झाले की नवस फेडायला जाणारेही भरपूर आहेत.
16 Mar 2020 - 3:25 pm | चौकस२१२
सहमत पण दुर्दैव असे कि हि योग्य टीका कधी " येशू च्या पवित्र प्रार्थनेने रोग मुक्त व्हा "असल्या भोंदूपणावर होताना दिसत नाही... ओह कारण मग अल्पसंख्यांकांना दुखावले जाईल नाही का?
16 Mar 2020 - 6:03 pm | ऋतुराज चित्रे
असे कार्य चालू आहे जगभर चालू आहे, हमीद दलवाई ,अब्राहम कोवूर् ह्यांनी अशा अनिष्ट प्रथांना विरोध केला आहे.
16 Mar 2020 - 7:32 pm | चौकस२१२
किती टक्के ? आणि भारतात ?
हि दोन्ही नावे चांगली परिचयाची आहेत आणि दोघांनी हि यात आयुष्य वेचले परंतु त्यांचा सुद्धा एक प्रकारचा एकांगी "हिंदूंना डिवचा" असाच पवित्र दिसला असा कृतीला "वास "येतो असे खेदाने म्हणावे वाटते ... आणि मी बोलतोय ते आजकाळसाचे खालील ज्यात सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार आणि राजकारणी आले
- मेधा पाटकर, अरुंधती रॉय, दाभोलकरांची मुलगी, तमाम अवॉर्ड वापसी गॅंग
- पत्रकार, सरदेसाई, शेखर गुप्ता, बरखा , प्रणव रॉय , वागळे
- राजकारणी : कुमार सप्तर्षी, जिग्नेश, कान्हया. काश्मीर चा कोण तो ... आणि काँग्रेस चे असंख्य
- जातीवाद काड्या घालणारे शरद पवार , ब्रिगेडी ( यांना इटालियन मातीत जन्मलेली कॅथॉलिक चालते पण याच मातीत जन्मलेले बामन चालत नाहीत .. दुतोंडी ..सा.... )
मी अनिसच्या खांद्याला खांदा लावून धर्मांध हिंदूंनां विरोध करेन पण अनिसच्या लोकांना इतर धर्मातील प्रथांना विरोध करण्याची हिंमत असेल तर .. चार्ली हबदू होईल म्हणून शेपूट ...घालतात लेकाचे
मी देऊळ नको दवाखाना उगढ म्हणून संघाच्या माणसाशी भांडेन पण जर अनिस ची हेच भांडण दिब्रेटोनपर्यंत नेण्याची तयारी असेल तर विचार दिब्रेटोना कि त्यांना गर्भपात बद्दल काय वाटते ते? उद्या एखद्या ख्रिस्त्याला विचार गर्भपाताबद्दल तो त्याचा कडवेपणा सोडेल? जरी देशासाठी आणि मानवतेसाठी गर्भपात बंदी योग्य नसेल तरी?आणि मग त्याबद्दल हे सर्व अर्बन नक्साल चिडीचूप बसतील.. त्यांना फक्त फर्ग्युसन मधली पूजा दिसते पण ट्रिपल तलाक चालतो.
17 Mar 2020 - 1:28 pm | ऋतुराज चित्रे
अनिसला समांतर अशी संघटना काढून इतर धर्मातील अनिष्ट प्रथा निर्मुलनासाठी कोणी प्रयत्न का करत नाही ह्याचे आश्चर्य वाटते.
17 Mar 2020 - 4:58 pm | प्रकाश घाटपांडे
आपापल्या धर्मातील अनिष्ट गोष्टी जरी दूर केल्या तरी खूप झाले.आपल घर आपणच साफ करा. ते सोईचे जाते.
18 Mar 2020 - 7:20 am | चौकस२१२
हो ते हिंदू करीतच आहेत तसे नसते तर आज भारताचा "हिंदुस्थान" झाला असता..आणि दिल्ली ला शंकराचार्य बसले असते !
प्रश्न हा आहे कि सगळ्या समाजाचे उदबोधन करणारे हे खोटे "सर्वधर्मसमभावी " फक्त एकांगी काम करतात केवळ एकतर स्वतःचं स्वार्थसाठी किंवा अर्धशिक्षांमुळे ( अर्धशिक्षण , सर्वसामान्य हिंदू लोंकांबद्दल)
तळटीप:
मी सर्वधर्मसभावाच्या विरोधात अजिबात नाही तो असलाच पाहिजे पण इंग्रजीत म्हणायचे झाले तर "वन कान्ट बी सिलेक्टिव्ह "
18 Mar 2020 - 7:15 am | चौकस२१२
समान्तर कशाला?, अनिस ला जर एवढीं चाड असेल तर त्यांना पण करता येईल
मुस्लिम सत्यशोधक समाज काही काम करते हे खरे आहे ,, पण त्यांना त्यांचं समाजातूनच साथ नाही .. जेवढी अनिसला हिंदू समअजतून साथ आहे
पण अशी संस्था हिंदूइतर "प्रेमळ" धर्माच्या वाटेल का जात नाही या मागे दोन कारणे
- एका शार्ली हबदू होऊ शकतो किंवा व्हॅटिकन आणि मदिनेंतील पैसे आणि त्यांचा नियोजित कार्यक्रम एवढा जबरदस्त आहे त्यामानाने हिंदू हे "सॉफ्ट टार्गेट " त्यात मग जति / भाषिक वाद .. तोडा फोड आणि राज्य करा सोप्पे
18 Mar 2020 - 8:39 am | ऋतुराज चित्रे
तुमचा बराच वैचारिक गोंधळ झालेला दिसतोय. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या सतत येत असत, परंतु त्यांनी जीवाची पर्वा न करता आपले कार्य सतत चालू ठेवले. शेवटी त्यांची हत्या झालीच. हत्या कोणी केली हे माहित नाही. त्यामुळे अनिस वाले जिवाला घाबरून काम करतात हे पटले नाही.
समांतर यासाठी, की ज्यांना अनिसच्या पैशाच्या स्त्रोताबद्दल आणि हेतूबद्दल शंका असेल त्यांनी अशी समांतर चळवळ का चालू करू नये?
18 Mar 2020 - 3:00 pm | चौकस२१२
अजून एक खुलासा
अनिस च्या पैशाच्या स्त्रोताबद्दल सुद्धा शंका घेण्याची इच्छा नाही
हेतूबद्दल शंका... असेही मान्य कि हेतू सर्वसाधारण सर्व समाजातील अंधश्रेधला आणि त्यातून होणाऱ्या शोषण उघड करणे हा आहे ( मग ते गावातला गुरव असो कि कोट्यवधी ची उलाढाल करणारा बाबा असो )
मग शंका कसली तर शंकेपेक्षा जो मूळ हेतू आहे त्या प्रमानं वागताना अनिस आणि इतर संस्था सगळ्यांना सारखी वागणूक देताना दिसत नाहीत ... भेदभाव करतात .. असा कयास म्हणून मग वरील शंका "उपस्थित व्हायला जागा राहते "
आणि तिसरे असे वाटते कि अनिस च्या चान्गल्या कार्या बरोबर "वाहत्या गंगेत हात धुवून घयावे " या उक्ती प्रमाणे इतर ढोंगी सर्वार्धर्मवाले आपले कार्य साधतात ..असे वतते ...
18 Mar 2020 - 9:42 am | चौकस२१२
क्षमा करा पण मला नाही वाटत माझा काही वैचारिक गोंधळ आहे .. हा कदाचित मी एकाच धाग्यात अनिस चे कार्य आणि बाकी दावे आणि त्यांचे वागणे यांची गल्लत केली असेल ... त्यामुळे मिसळ झाली असेल.. मान्य
अनिस ला जीवाची भीती नाही या बद्दल दुमत नाही.. प्रश्न असा आहे कि अनिस सारखी संस्था हिंदूइतर धर्मात जे अप्रकार आहेत त्याबद्दल का पुढे दिसत नाही? म्हणावी तेवढीं ... आणि स्वतःला उगाच अति दाव्याच्या कळपात जाऊन रोष ओढवून घेतात . त्यामुळे त्यांचे चांगले कार्य झाकून जाते
दाभोलकरांची हत्या नक्कीच समर्थनीय नाही ..आणि ती कोणी अति टोकाच्या कर्मठ हिंदुत्ववाद्याने केली असे हि धरून चालू.. पण त्यामुळे माझा वरील मुद्दा / मुद्दे कसे खोटे ठरतात?
आज माझ्यासारखा निधर्मी अनिस ला मदतच करेल / त्या कान्हया किंवा जिग्नेश पेक्षा दाभोकारानच्य प्रामाणीक पण वर जास्त विश्वास ठेवेल... पण जर अनिस स्वतःला पुरोगामी म्हणताना फक्त एका धर्माला लक्ष्य करीत असतील तर मग मी कडवा हिंदू होऊन त्यांना अरे ला कारे विचारीन... त्यामुळे हा विरोधाभास नसून विचारांची स्पष्टता आहे ...
( उलट पूर्वी मी आणि वडिलांनी मराठी विन्यान परिषदेचे काम पण केले आहे... त्यांची पुस्तके पण वाचली आहेत आणि तेवढ्याच पोटतिडकीने मी अनिस सारख्यांच्या बाजूने इतर अंधश्रद्धाळू हिंदूंबरोबर bhanden)
दुसरे असे कि लाखो हिंदू आज जे जगात मुस्लिम आणि ख्रिस्ती बहुल देशात ( परंतु सर्वधर्मसमभावी घटना असलेल्या ) देशात राहून अल्पसंख्यांक म्हणून काय अनुभव असतो तो हि घेतलेला आहे त्यामुळे कदाचित बघण्याचा द्रीष्टीकोन हि थोडा व्यापक असेल ..कदाचित
18 Mar 2020 - 10:05 am | सुबोध खरे
बहुसंख्य फुरोगामी हे दांभिक आहेत.
त्यांना साधा समान नागरी कायदा आणि सक्तीचे कुटुंब नियोजन लागू करा म्हटलं तरी मूळव्याध उपटते. या गोष्टी आपल्या घटनेत अंतर्भूत असून सरकारने या गोष्टी अमलात आणाव्या यासाठी मार्गदर्शक तत्वे सुद्धा आहेत. (घटनेतील ४४ वे कलम हे याबद्दलच आहे)
घटनेची पायमल्ली होते म्हणून टाहो फोडणाऱ्या पुरोगाम्याची घटनेतील ४४ कलम बद्दल बोलले कि दातखीळ बसते.
तेथे लगेच मानवाधिकार अल्पसंख्याकांचे अधिकार वगैरे शाब्दिक हगवण चालू होते.
शरिया हवा तर पूर्णपणे लागू करा. चोरी केली तर हात तोडले जातील आणि व्यभिचार केला तर दगडांनी ठेचून मारले जाईल. तेथे त्यांना भारतीय दंड विधान संहिताच (क्रिमिनल कोड) हवी आहे. कारण न्यायालय आरोपी खेळ खेळता येतात.
एकच बायको आणि न्यायालयातच घटस्फोट आणि मुलगा मुलगी याना वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क म्हटलं कि पोटशूळ उठतो. (शरिया प्रमाणे मुलाला ६६ % आणि मुलीला ३३ % हक्क आहे)
धर्म आणि त्यात सुधारणा राहू द्या बाजूला या मूलभूत गोष्टी करा मग पुरोगामी पण दाखवा असे म्हटले कि त्यांना फेफरं येतं आणि वाचा बंद होते.
पुरोगामी = दांभिक हेच अंतिम सत्य आहे.
18 Mar 2020 - 10:14 am | चौकस२१२
अचुक निदान केलेत.... धर्म गेला चुलीत...आपण मांडलेल्या आणि लाखो करोडो लोकांच्या मनात खदखदणाऱ्या या "सामाजिक" प्रश्नाचे (धार्मिक नव्हे) उत्तर तथाकथित पुरोगामी कधीच देणार नाहीत... असो
18 Mar 2020 - 12:17 pm | प्रकाश घाटपांडे
अंतिम सत्याचा शोध अंतापर्यंत चालूच असतो. अंतिम सत्य कुणाला सापडलय म्हणल की मला धडकीच भरते :)
18 Mar 2020 - 2:10 pm | गामा पैलवान
प्रकाश घाटपांडे,
एव्हढे भयभीत नका होऊ बुवा! अहो, 'तत्त्वमसि' हे ब्रह्मवाक्य ऐकून आजवर कोणालाही धडकी भरली नाहीये. :-)
आ.न.,
-गा.पै.
18 Mar 2020 - 12:45 pm | ऋतुराज चित्रे
प्रतिगामी=अंतिम सत्य.
एखाद्याचा शेवट करणे त्यांच्याच हातात असते.
18 Mar 2020 - 8:26 pm | माहितगार
पुरोगामीत्वात अंधश्रद्धा निर्मुलनातही सर्वधर्म समभाव असलाच पाहीजे.
(असलाच मधील 'च' वर तडजोड विरहीत विशेष भर)
परत वाचा
18 Mar 2020 - 10:33 pm | संदीप-लेले
उत्क्रांती वर विश्वास असेल तर असे दिसते की मानवाच्या उत्क्रांतीमध्ये (gossip) 'कल्पितावर विश्वास' हा एक महत्वाचा घटक होता. याचे अतिशय प्रत्यकारी विवेचन 'Sapiens' या पुस्तकात लेखक युवल हरारी यांनी केले आहे. तेव्हा 'देव नाही' या गोष्टीवर बहुंजनांचा विश्वास बसेल हे होणे नाही. नास्तिक चळवळ करून वेळ आणि श्रम वाया जाण्यापलीकडे फारसे काही हाती लागण्याची शक्यता नाही.
एवढेच म्हणेन की -
भोगतो कर्माची फळे आयुष्यभरा रं
देवा का-हे माणसाले जल्मा घातला रं
आता भोग तूच फळे कर्माची तुझ्या रं
बघ तुले माणसाने जल्मा घातला रं
19 Mar 2020 - 4:33 am | चौकस२१२
नास्तिक चळवली पेक्षा अंधश्रद्धा निर्मूलन यावर वेळ आणि पैसे खर्च करणे जास्त समाजउपयोगी ठरेल
अर्थात हे हि खरे कि नास्तिक नागरिकांवर अन्याय आस्तिक बहुसंख्यानी करू नये
त्यासाठी हि चळवळ असेल तर हरकत नाही पण "चला सर्व देश नास्तिक बनवू" हा जर हेतू असेल तर त्यात काही अर्थ नाही
19 Mar 2020 - 9:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी खरं...! मूल जन्माला आल्यावर त्याच्यावर, त्याच्या मेंदुवर आजूबाजूंच्या घटनांचा डाटा जमा व्हायला लागतो. जन्माला आल्यानंतर मंदिरं, आजान, चर्च आणि तत्सम देवाळूंच्या परंपरांचा परिणाम त्याच्यावर व्हायला लागतो. आपल्या परिस्थितीला आपण जवाबदार आहोत हे तो विसरुन जातो. जीवन जगतांना पारंपरिक विचारांचा घरातल्या नित्यनियमित पुजा अर्चा, देवधर्म त्याच्यावरच्या कल्पनारम्य गोष्टींना भुलून रिस्क नको म्हणून तोही त्या गोष्टी करु लागतो. सदसद्विकेबुद्धी शिल्लकच राहात नाही. प्रत्येक गोष्टीत चमत्कार हात जोडणे, बुद्धीचा विचार संपला की देवाचं गाव सुरु होतं. महाराज सदेह वैकुंठाला गेले. पवित्र माणसाला क्रुसावर दिल्यानंतर तिसर्या दिवशी तो थडग्यातून उठून धर्मप्रचाराला गेला. अशा आणि भरमसाठ गोष्टी माणूस निर्माण करतो, म्हणून त्याचा विश्वास बसतो. मेंदूत चिकटलेल्या देव नावाच्या तंतूला वेगळं करणे अशक्यच होऊन जाते. आमच्या घरात घाण राहू देत, पण दुसर्याच्या घरात किती घाण आहे ती उचलली पाहिजे ना यावर आमचा फोकस असतो. आणि आमचं काय नुकसान व्हायचं ते होऊ देत, तुम्ही आम्हाला शिकवू नका असे म्हटले की विषयच संपतो.
शिक्षणाने माणासामधे एक समज निर्माण होते, एक नवी डोळस दृष्टी निर्माण होते म्हणून नास्तिक चळवळीचे श्रम वाया जाणार नाहीत असे वाटते. कोराना विषाणुचा देवाला संसर्ग होऊ नये म्हणून मंदिरं बंद ठेवली आहेत, अशी टीपन्नी वाचून मनोमन हसू आलं. देव आपल्या भक्ताच्या मदतीला धावून येत नाही, हा धडा देवाने माणसाला दिलाय आता त्याकडे कसे बघायचं हा ज्याचा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. बाकी नास्तिक चळवळ यशस्वी व्हायला अजून किती दशकं, शतकं, लागतील हे माहिती नाही. पण, नास्तिक चळवळीचं काम मोठं कठीण आहे हे मात्र नक्की. आपलं काम समाजाला सावचित करणे आहे.
तुका म्हणे संती
सावचित केले अंती,
नाही तरी होती
टाळी बैसोनि राहिली.
-दिलीप बिरुटे
22 Mar 2020 - 4:25 pm | चौकस२१२
"आमच्या घरात घाण राहू देत, पण दुसर्याच्या घरात किती घाण आहे ती उचलली पाहिजे ना यावर आमचा फोकस असतो. आणि आमचं काय नुकसान व्हायचं ते होऊ देत, तुम्ही आम्हाला शिकवू नका असे म्हटले की विषयच संपतो."
क्षमा करा आपण प्रत्येकजण काही असा विचार करीत नाही , आपण सर्वांना एकाच झोळीत टाकू नये
(मी येथे सामाजिक प्रश्न म्हणून म्हणतोय..)
आपल्याघरातील घाण हि साफ झालीच पाहिजे याबद्दल दुमत नाही. होतं काय कि "सगळ्या समजतील घाण नष्ट करण्याचा वसा" घेणाऱ्या संस्था jewha " आपल्याला सोयीचे असलेले लक्ष निवडते आणि आव मात्र आणते कि बघा आम्ही "सगळ्या" धर्मतील या प्रथा उघडकीस अण्अत आहोत तेवहा अनेक जण जे अनिस सारख्या संस्थेचं कार्याची जरुरी आहे असं मानणारे सुद्धा वैतागतात.. आपण हा मुद्दा लक्षात घेत नाही असे दिसतंय
पिके चित्रपटाचे दिग्दर्शकाचा मूळ हेतू जसा योग्यच होता.. पण सतत त्यात हिंदूच का? असेल हिम्मत तर "halalaa" च्या दिग्दर्शकासारखे मुस्लिम किंवा कॅथॉलिक धर्मातील अश्या प्रथनवर कधी ना चित्रपट?
19 Mar 2020 - 10:15 am | राघव
भगवंताची उपासना मुळात करायचीच कशासाठी यात बर्याच प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. समजून घेतलं तर खडे बाजूला करता येतात.
त्याकडे तटस्थ वृत्तीनं बघीतलं तर आस्तिक-नास्तिक हा प्रश्नच उरत नाही.
22 Mar 2020 - 12:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संजय राऊतांनी आजच्या दै. सामना मधे देवांनी मैदान सोडले हा सध्याच्या पार्श्वभूमीवर सडेतोड लेख लिहिलाय. प्रबोधनकारांची आठवण व्हावी असे लेखन. आवडले. लेखन सर्वानाचा आवडले पाहिजे असे काही नाही.
-दिलीप बिरुटे
22 Mar 2020 - 4:54 pm | धर्मराजमुटके
लेखनाबद्द्ल काही मत नाही पण धर्माधारीत प्रचाराचा फायदा करुन घेऊन सत्तेत आलेल्या पक्षाच्या माणसांनी देवा / धर्माच्या नावाने सडेतोड लेख लिहावा म्हणजे जरा विनोदच आहे.. बहुधा धर्मनिरपेक्ष पक्षांच्या साथीने राज्यशकट चालवायला लागत असल्यामुळे असा लेख लिहिण्याचे बळ प्राप्त होत असावे. असो.
आता सायन्स कसे देवापेक्षा मोठे सांगतील पण वेळ आली की देवाधर्माच्या नावावर मते मागतील. त्यामुळे काय लिहिले आणि कोणी लिहिले ह्या दोन्ही गोष्टी बघूनच कौतुक करायचे की अदखलपात्र ठरवायचे हे ठरवायचे आहे.
22 Mar 2020 - 7:05 pm | गामा पैलवान
प्राडॉ,
देवळांसोबत बाजार, विमानतळे व रेल्वेही बंद पडल्या आहेत. त्यांची बिलं विज्ञानाच्या नावावर फाडावीत का?
माणसाने मनसोक्त हा#त जावं आणि देवाने ते साफ करावं, अशी राऊतांची पेक्षा दिसतेय. पण मोदींनी तर भारतातली हागणदारी संपवलीये. एकंदरीत दोष शेवटी मोदींच्याच माथी येणार आहे. हा त्या लेखाचा खरा रोख आहे!
आ.न.,
-गा.पै.
22 Mar 2020 - 7:29 pm | धर्मराजमुटके
काही देव अजुनही भक्तांचे रक्षण करण्यास समर्थ आहेत बरं ! ही बातमी
28 Mar 2020 - 11:23 am | धर्मराजमुटके
मैदान सोडलेले देव कोट्यावधी रुपयाच्या देणग्या देताहेत आणि त्या स्विकारल्या जाताहेत. देवाच्या नावाने बोटे मोडायची पण त्यांच्या पैशांना नाही म्हणायचे नाही. मजा आहे !