सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


उलुवाटू

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in भटकंती
12 Mar 2020 - 2:59 pm

बाली , मुस्लिम बहुल असलेल्या इंडोनेशियातील एक हिंदू बहुसंख्यानक जनता असलेले मनोहरी बेट.. या मुळे सर्वसाधारण भारतीय मनाला या बद्दल कुतूहल असते ...असावे !
पण मी जेव्हा जेव्हा बाली बेटाला भेट दिली तेव्हा जे भावले ते असते धार्मिक असण्यापेक्षा काहीतरी स्थापत्य, कला , सामाजिक , जेवण याची सगळ्यांची मिसळ होती... कुठेतरी कोकणा सारखे वातावरण एखाद्या चांदोबा मासिकातल्या कथेत फेर फटका मारल्यासारखे ( वर्षभराचं हिरवे पणा ) वातावरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अजूनही टिकून असलेली आणि दिसणारी तेथील संस्कृती...ती सुद्धा आज जिथे तिथे फ्लेक्स चे राज्य आणि हजार वर्षांच्या दगडी मंदिराला रंगबिरंगी ऑइल पेंट लावलेले आपण सर्वत्र बघत असताना ...रोजच्या जीवनात तिथे कलाकुसर अजून टिकून आहे, गाव गावात अगदी सण नसताना सुद्धा कुटुंबे ठेवणीतला पेहराव करून , डोकयावर प्रसादाचं कोरीव टोपल्या घेऊन गावदेवाला जाताना दिसतात, दुकाने आणि घराबाहेर तुळशीवृन्दवना सारखे चबुतरे तिथे ठेवलेली इलुस्य प्रसादाच्या टोपल्या, कानात चाफ्याचे फुल रोवून फारच कलात्मक पद्धतीने केलीली पूजा.... आणि यात निसर्गाची मोहक रूपे, टेकडयांवर / उतरंडीवर केलेली भात शेती , पंचमहाभूतानबद्दल दाखवलेला आदर , खेड्यात पारंपरिक नृत्य करण्यासाठी बांधलेले सार्वजनिक सभागृहे ... बाली हिंदू , बाली बुद्ध ( चिनी वंश ) यांची एकत्रित देवळे ...असा खूप काही आहे
कालमानाप्रमाणे अर्थात तिथे हि अतिक्रमण आणि काँकर्ते आणि काचेचे जंगल हे रक्षण आहेतच पण अजून बरेच टिकून आहे .. आणि भारतीय नागरिकांना व्हिसा आधी काढावा लागत नाही त्यामुळे जाणे सोप्पे झाले आहे ... शिव्या जेवण हे भारतीय जेवणसारखे मसालेदार + विविध फळफळावळ याची रेलचेल

असो त्यातील काही शब्दचित्रे : ( काही मी काढलेली अंतर्जालावरची )

१) उलुवातु मंदिर येथील पारपारंपारिक नृत्य
सीताहरण कथा या नृत्यातून दाखवली जाते ,, खास म्हणजे २ गोष्टी , एक म्हणजे यात कोठेही वाद्य वापरले जात नाही फक्त तोंडी आवाज .. आणि दुसरे म्हणजे हे एखाद्या बंदिस्त सभागृहात ना होता समुद्रकाठील उंचीवरच्या पाथरवरील उघड्या अँफिथिएटर मध्ये सादर केले जाते
वर्तुळ करून हनुमानाचे वानर एका धीम्या तालात चाक चाक चकाक असं काही स आवाज काढीत हे नाट्य साजरे केले जाते , रावण सुद्धा नुसता खर्जातील आवाज काढतो . संवाद असे नाहीत .. आणि हावभाव यातून त्याचा दरारा दाखवतो . विशेष म्हणजे पात्रांचे कपडे हे दर्जेदार आणि स्थानिक कापड / नैसर्गिक वस्तू वापरून केलेले दिसतात ... उगाच प्लास्टिक चा मुगुट असले बेगडी नाही ...तसेच या सर्व पात्रांचे जे हावभाव लकबी आहेत ते त्या त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव दाखवून जातो .. हनुमानाचे प्रेक्षातुन उड्या घेत फिरणारे, टोप्या उडवणे आणि सारखे अंग खाजवणे ...रावणाची धीमी पण हल्ला केल्यासारखी पावले टाकण्याची पद्धत .. इत्यादी
सूर्यास्त होण्यसुमारास हे सगळे आपल्याला एका वेगळ्याच वातवरणात घेऊन जाते .. शेवट लंका दहन सादर करिताना मध्ये वर्तुळाकार नारळाच्या गाठायचे तुकडे पेटवून फारच सुंदर रित्या सादर केले आहे ...
IMG_2539

IMG_2543

IMG_2533

IMG_2532

IMG_2587

IMG_2569

IMG_2590

IMG_2564

घटोत्कच
IMG_2515

२) मंदिर स्थापत्य:
देव देव्हाऱ्यात नाही ,, हे इथे सत्य आहे , गाभाऱ्यात मूर्ती नसते,
पताका ( नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेल्या ,, लावण्याची प्रथा सर्वत्र आहे
पुजारी हा लुंगी आणि डोक्यवरील रंगीत रुमाल घालतो पण शिवाय लॅब कोट सारखा कोट घालतो! गम्मत वाटते
IMG_2846

प्रवेशद्वारे अशी दोन भाग केलेली असतात बहुतेकदा.. कारण काय कोण जाणे , बाकी धर्मांमध्ये आपण पहातो ती कमान असते !
IMG_2708

IMG_2851

IMG_2709

IMG_2866

देवळात जातांना लुंगी सारखे काहीतरी वस्त्र नसावेत लागते ( मूर्त्यांना पण नेसवलेले असते )

IMG_2874

३) उबूद ... हे डोंगरमाथ्यावरील थोडेसे थंड हवेचे ठिकाण ( जणू जुने खंडाळा)
स्थानिक स्थापत्य पुरेपूर वापरलेले हे हॉटेल ( सकाळी सकाळी हॉटेल च्या मुदपाकखान्यात नारळाच्या झावळ्या पेटवून केलेल्या शगडी वरील न्याहारी .. अगदी कोकणात घेऊन गेली )
IMG_2722

IMG_2748

खोलीचा दरवाजा
IMG_2746

गावातील सभामंडप
IMG_2606

ती पाहताच बाला......
IMG_2839

गरम पाण्याचे झरे आणि तलाव
IMG_2802

IMG_2807

IMG_2883

सकाळ चा समुद्र
IMG_2876

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

12 Mar 2020 - 6:11 pm | श्वेता२४

आवडलं

कंजूस's picture

12 Mar 2020 - 6:13 pm | कंजूस

किती छान!!

जालिम लोशन's picture

12 Mar 2020 - 7:17 pm | जालिम लोशन

छान

चौकस२१२'s picture

13 Mar 2020 - 7:13 am | चौकस२१२

- डासांची उदबत्ती ठेवण्यासाठी
IMG_2744

IMG_2742

IMG_2522

- न्याहारी साठी पाव वैगरे ठेवण्यासाठी झाकणाच्या टोपल्या
IMG_2466

IMG_2467

- पांडव बीच येथील डोंगराच्या कडेच्या बाजूला खोदून बसवलेल्या एक पांडवाची मूर्ती
IMG_2477

रोजची पूजा
IMG_2512

nanaba's picture

13 Mar 2020 - 11:15 am | nanaba

Balila javese vatale

सुधीर कांदळकर's picture

13 Mar 2020 - 3:57 pm | सुधीर कांदळकर

चित्रे, वर्णन सारे सुंदर. नवे ठिकाण दाखवलेत. धन्यवाद.

ज्योति अळवणी's picture

17 Mar 2020 - 8:42 pm | ज्योति अळवणी

बालीबद्दल बरंच ऐकलं आहे. तुम्ही टाकलेले फोटो बघून जायची इच्छा झाली आहे.

हा करोना अटपला की बघू जमतंय का!

शेखरमोघे's picture

18 Mar 2020 - 8:30 pm | शेखरमोघे

छान माहितीपूर्ण लेख.

मी इन्डोनेशियात सुमारे १८ वर्षे नोकरी केली आणि त्यामुळे जो बराच फिरलो, त्यातल्या बालीच्या काही आठवणी. बाली बेट इतर इन्डोनेशियापेक्षा वेगळेच असल्याने आणि विदेशी प्रवान्शाकरता बर्‍याच सोयी, विचारपूर्वक तयार केलेल्या असल्यामुळे बहुतेक प्रतेक प्रवासी बालीला भेट देतोच.

उलुवाटूला देवळाच्या वाटेवर अनेक माकडे अतिशय धूर्तपणे, प्रवाशान्कडचे हाताला लागेल ते पळवतात आणि जर काही खायला मिळाले तर पळवलेल्या वस्तू परतही देतात.

एकदा बाली बेटाच्या अन्तर्भागात, आमच्या (बालीच्या हिन्दू) चालकाने एका, प्रवासी मार्गात नसलेल्या आणि म्हणून शुकशुकाट असलेल्या, परन्तु बालीच्या हिन्दून्च्या दृष्टीने महत्वाच्या अशा एका मन्दिरात नेले कारण चालकाला तिथे काही उपासना करायची होती. मी हिन्दू असल्याचे माहीत असल्याने त्याने मलाही बरोबर घेतले. मी आपला काही वेळ डोळे मिटून माहीत असलेले दोन चार श्लोक म्हणून काही मिनिटात "उपासना" आटपून मो़कळा झालो पण चालकाने त्याची "उपासना" बराच काळ
(सन्स्कृत मधीलच पण वेगळ्याच तर्‍हेचे हेल काढून म्ह्टल्याने, अनाकलनीय "मन्त्र" म्हणत) चालू ठेवली होती. त्यानन्तरच्या त्याच्या बोलण्यातून मी (फारच लौकर "आटपल्यामुळे") खरोखरच हिन्दू असल्याबद्दलची त्याची शन्का डोकावत होती पण रामायण, महाभारत, ब्रम्ह, भगवद्गीता इ.इ. मला माहीत असल्याची मी बोलण्यातून खात्री करून दिल्यामुळे बहुतेक ही शन्का फिटली असावी.

इतर माहिती: जावा बेटावर "दिएन्ग" पठार या भागात काही शतकान्पूर्वी बान्धलेली आणि आता भग्नावस्थेत असलेली पाचही पान्डवान्ची मन्दिरेही एकदा पाहिली होती.

चौकस२१२'s picture

21 Apr 2020 - 12:10 pm | चौकस२१२

मोघे साहेब मग तुम्ही लिहा अजून .. तुम्हाला अजून माहिती असेल... इतर इंडोनेशिया बद्दल पण
जकार्ता च्या संग्रहालयात इत्यका गणेश मुर्त्यापहिल्या होत्या कि गणपतीतल्या मूर्ती विकणाऱ्या दुकानात आलो असे वाटले होते

Rajesh188's picture

18 Mar 2020 - 9:05 pm | Rajesh188

फोटो आणि माहिती दोन्ही मस्त.
अजुन त्या लोकांनी संस्कृती आणि परंपरा सोडल्या नाहीत कौतुकाची बाब आहे.
सर्वात सुखी लोकांच्या यादीत नक्कीच इंडनिशियन लोकांचे नाव असेल.

एकूण इंडोनेशिया सुखी आहे कि नाही माहित नाही .. कारण गरिबी, लोकसंख्येचा ताण, भ्रष्टचार हे सर्व आहे ...
बालीतील लोक वाटली सुखी आणि परिपूर्ण .. पर्यटन हा मोठा वयवसाय आणि रोजच्या जीवनाशी संस्कृतीची नाळ यात रममाण दिसतात
इंडोनेशिया हा मुस्लिम बहुसंख्यांक असला तरी त्यांनी जुनी हिंदू संस्कृती सोडली नाहीये... राजधानी जकार्ता मध्ये मुख्य चौकात कृष्ण -अर्जुन सारथ्य असा प्रचंड मोठा पुतळा आहे ...त्यांच्या चलनावर गणपती चे चित्र आहे ,, हे जर भारतातील "उदारमतवाद्यांना" दाखवले तर त्यांना फेफरे येईल ... हे झाले सरकारी पातळीवरचे त्यात बाली तर काय हिंदूच आहे ( पण वंशाने बघायला गेला तर भारतीय वंशाशी तसा संबंध दिसत नाही )
तरी पण तिथे इस्लामिक धर्मांधता पण वाढत आहे .. सुन्नी वहाबी प्रथा आणि त्यांचा जोर वाढत आहे , इसिस साठी पैसा गोळा करणे वगैरे ... जकार्ता च्या ख्रिस्ती/ चिनी वंशाचं गव्हर्नर ला इस्लाम चा अपमान केलं म्हणून काढणे इत्यादी ...बाली तील दहशतवादी घटना ( तिथे हि झाकीर नाईक सारखा अबुल बाकर बशीर आहे !)
बांडुंग शहरातील काही लोक जेव्हा भेटले त्यातील काही धार्मिक मुसलमान वाटले पण त्यांचीही अदब आणि हस्तांदोलन करताना हस्तांदोलन करीत असलेल्या हाताला आपला दुसरा हात लावून मग हस्तांदोलन करणे हा सूक्ष्म फरक हे बहुतेक जुन्या संस्कृतीचे प्रतीक असावे
असं म्हणतात कि इंडोनेशिया च्या एका माजी राष्ट्राध्यक्षाला एका अरब देशातील अधिकाऱ्याने कि राजाने विचारले होते कि "हे काय तुमचं कडे या काफिर गोष्टी कश्या" तर त्याने म्हणे उत्तर दिले होते कि "आमच्या पूर्वजांनी धर्म बदलला परंतु संस्कृती बदलली नाही..."
असो .. मिपाचे सभासद श्री सुधीर जोशी आणि इतर हि काही मंडळी तिथे खूप वर्षे राहिलेली आहेत त्यामुळे त्यांचयकडे या पेक्षा जास्त चांगली माहिती असू शकेल

Rajesh188's picture

18 Mar 2020 - 9:06 pm | Rajesh188

फोटो आणि माहिती दोन्ही मस्त.
अजुन त्या लोकांनी संस्कृती आणि परंपरा सोडल्या नाहीत कौतुकाची बाब आहे.
सर्वात सुखी लोकांच्या यादीत नक्कीच इंडनिशियन लोकांचे नाव असेल.

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2020 - 11:49 am | चौथा कोनाडा

उलुवाटूची सुंदर सफर ! फोटो, वर्णन सारे झकास.
नवे ठिकाण पाहायला मिळाले !
धन्यवाद चौकस२१२ !