रसलिंबू कोंबडी !
पाककृती १: भरपूर रसलिंबू ( बेडेकरांची किंवा इतरही त्यासारखे) + चांगलं देशी मध यात कोंबडी १२ तास तरी भिजवून ठेवावी आणि भाजावी किंवा हलकेसे परतावी
पाककृती २:
साहित्य : लिंबाचा रस, चांगला देशी मध , लसणीचा अख्खा कांदा , मीठ, तांबड्या कोरड्या मिरची चे फ्लेक्स , साथ संगती साठी पातीचा कांदा , काकडी चे वेगवेगळे काप ,,
भरपूर लिबूरस+ मध + मीठ याचे मिश्रण करून घयावे , त्यात कोंबडी चे तुकडे १२ तास भिजवून ठेवावे ,
बनवण्याआधी थोडे तास त्यावर लसणीचा कांदा चित्रात दाखवल्याप्रमाणे यातील रसायनात कापून भिजवावा त्याचे तुकडे कोंबडी तुकड्यात चीर करून मध्ये खुपसून ठेवावे
शिजवणे:
आधी गरम लोखंडी तव्यावर लसूण तुकडे परतून घयावे , मग कोंबडी चे तुकडे परतावे
तवा अजून गरम करून त्यावर वरील रसायन एकदम ओतावे म्हणजे ते थोडे कॅरॅमलाईस होईल ...
ओव्हन च्या ट्रे मध्ये खाली थोडं पाणी घालून , नंतर जाळी वर् कोंबडी तुकडे ठेवावे आणि अलुमिनियम फॉईल ने झाकावे व १८०° वर साधारण ४० मिनिटे ओव्हन मध्ये ठेवावे
शिजल्यावर , अलुमिनियम फॉईल काढून अजून थोड्यवेल थोडे कोरडे होई पर्यंत ठवावे , त्याआधी ट्रे मधील जो घट्ट रस असेल तो वरून चमच्याने घालावा
![IMG_7432[1]](https://live.staticflickr.com/65535/49654049548_fbb4a5db38.jpg)
![IMG_7425[1]](https://live.staticflickr.com/65535/49654593221_dc6b34cde1.jpg)
![IMG_7434[1]](https://live.staticflickr.com/65535/49654589626_23127070b0.jpg)
![IMG_7436[1]](https://live.staticflickr.com/65535/49654867752_e651523f70.jpg)
![IMG_7438[1]](https://live.staticflickr.com/65535/49654914367_7be45f13f0.jpg)
![IMG_7440[1]](https://live.staticflickr.com/65535/49654871362_c561589979.jpg)
![IMG_7445[1]](https://live.staticflickr.com/65535/49654595426_3906d28e8c.jpg)
साथ सांगत पेय:
लिंबानी सुरवात मॅरीनेट ची म्हणून मग अश्या ७ बोटॅनिकल मधून झिरपून तयार केलेलं अपेय ... ज्याचे नावात महाराष्ट्राच्या राजधानीला इंग्रजाने ठेवलेले जुने नाव आहे !
![IMG_7441[1]](https://live.staticflickr.com/65535/49654596506_82b7a3ae47.jpg)
प्रतिक्रिया
13 Mar 2020 - 4:36 pm | चौकस२१२
सांगायचे राहिले लिंबू रसाबरोबरच , लिंबाची साल किसून ( लेमन झेस्ट ) मॅरीनेट मध्ये घालावी
13 Mar 2020 - 7:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो आवडले. पाकृ जबरा. अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
13 Mar 2020 - 8:13 pm | गवि
हेच म्हणतो.
14 Mar 2020 - 7:10 am | चौकस२१२
धन्यवाद, आपण आणि इतरांनी पण करून बघावे ...साधं तंत्र, कि खारट, गोड आणि थोडे आंबट असे कधी हि केले कि साधारण पणे चांगले लागते ..हुकत नाही
अर्थात मिपाकर कोणी व्यवसायाने स्वयंपाकी असतील तर यातील गुण/ दोष जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील
13 Mar 2020 - 8:02 pm | किल्लेदार
ही माझी आवडती रेसिपी आहे. मी फक्त यात मध घालत नाही.
बाकी बॉंबे सैफायर जीन सोबतीला असेल तर छानच !!!
15 Mar 2020 - 2:50 am | रीडर
रसलिंबू म्हणजे काय असते?
लिंबू चे फळ की त्यापासून बनवलेले काही?
15 Mar 2020 - 2:50 am | रीडर
रसलिंबू म्हणजे काय असते?
लिंबू चे फळ की त्यापासून बनवलेले काही?
15 Mar 2020 - 5:13 am | चौकस२१२
http://vpbedekar.com/raslimbu-catalog.asp
17 Mar 2020 - 7:30 pm | चित्रगुप्त
कोंबडीचे प्रेत बारा तास तरी भिजवून ठेवायचे ....
.... या कल्पनेनेच मळमळू लागले.
(समस्त अभक्षभक्षणकर्त्यांची क्षमा मागून सदर प्रतिसाद लिहीत आहे)
27 Mar 2020 - 8:19 pm | रॉजरमूर
तुमची मळ्मळ जळ्जळ तुमच्या पर्यन्तच मर्यादीत ठेवायची ना ........
इथे ओकायची काही गरज होती का ?
7 Apr 2020 - 12:24 pm | वामन देशमुख
हे वाचून, माहितगारांच्या या प्रतिसादाची आठवण झाली.
"जेवण्यास बसल्यानंतर बरीच मंडळी एखादा पदार्थ आवडत नाही असे सांगून थांबत नाहीत तर सोबत 'ईई..' इत्यादी सारखा एखादा किळसवाणा उच्चार करतात, माझ्या सारखा सर्व पदार्थ चालणार्या किंवा नेमका तोच पदार्थ आवडणार्या व्यक्तिचा विरस होतो"
18 Mar 2020 - 7:09 am | चौकस२१२
लिहून मग क्षमा मागण्यापेक्षा ना लिहिलेलं बरे ना! मांसाहाराची आपल्याला शिसारी आहे या भा . पो. पण त्यासाठी सारखे प्रेत प्रेत कशाला लिहायला पाहिजे !
19 Mar 2020 - 1:27 am | किल्लेदार
अहो त्यांनी निदान कोंबडीचे प्रेत म्हंटले. साराभाई वर्सेस साराभाई या सीरिअल मध्ये सामोस्याचा काय उल्लेख आहे माहित्येय ?
"तेल की नदी मे डुबी हुई कार्बोहायड्रेड की लाश !!!"....
आता बोला ....