झटपट आणि चवीला मस्त असे दोन प्रकारचे टोस्ट
- पावावर चेदार किंवा टेस्टी जातीचे चीज पसरावे + हिरवी मिरची / कोथम्बीर चटणी, आणि ग्रिल खाली भाजावे, चीज तांबूस होऊन त्याला कडक पापुद्रा येईपर्यंत असे भाजलेले चीज मस्त लागते
- वरील प्रमाणेच परंतु भारतीय हिरव्या चटणी ऐवजी पेस्तो नावाची इटालियन चटणी घालता येईल ( खायची तुळस , काजू , मीठ, ऑलिव्ह तेल यांची चटणी )
![IMG_6001[1]](https://live.staticflickr.com/65535/49573071887_8ff903b5a1.jpg)
प्रतिक्रिया
10 Mar 2020 - 11:44 am | ज्ञानोबाचे पैजार
ही पाकृ अंडे घालून करता येईल का?
पैजारबुवा,
10 Mar 2020 - 11:50 am | असंका
लै दिसांनी लै हस्लो...!!!
आणि चिज चिली टोस्ट च्या या वरायटीबद्दल धन्यवाद ...!
12 Mar 2020 - 11:02 am | चौकस२१२
लै हस्लो.
का हो? कारण?
मला बरेचदा कळत नाही, मिपावर लोक असा काही प्रतिसाद देतात कि१) उगाचच वेळ जात नाही म्हणून फालतू काहीतरी लिहिलंय, २) कोपरखळी मारलीय कि ३) तुसडे पण?
कौतुक वैगरे राहूद्या त्याची अपेक्षा नाही , टीका पण चालेल, उलट सकारात्मक टीका हवी पण हे काय?
म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. अगदीच फालतू नेहमीची पाकक्रिया लिहिली आणि वेळ घालवला असे म्हणायचे तर सरळ तसे म्हणा ना ?
12 Mar 2020 - 10:56 am | चौकस२१२
यात अंडे नको कारण
१) खुसखुशीत पणा जाईल , मऊ होऊन जाईल
२) भाजके पणाची खास करून त्या चीज च्या खरपूस पापुद्र्याची जी चव राहणार नाही
करून बघा पाहिजे तर