न सुटलेली कोडी!

किल्लेदार's picture
किल्लेदार in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

न सुटलेली कोडी!

विचार करा की तुम्ही पुण्याहून मुंबईला निघाला आहात. लोणावळ्याला छान नाश्ता करून तुम्ही खंडाळ्याचा घाट उतरू लागता आणि काय आश्चर्य!!! घाट उतरल्यावर समोर काय तर... कोल्हापूर...किंवा तुम्हाला ठासून सांगण्यात येतं की हेच कोल्हापूर. बरं, तुम्ही एकवेळ मान्य केलं की आहे बुवा हे कोल्हापूर. आता आलोच आहोत तर अंबाबाईचं दर्शन तरी घेऊ, म्हणून देवळात जाता तर दिसते मुंबईची महालक्ष्मी... चमत्कारच...

20191018_160625

काय म्हणता? शक्य नाही? अशी बुचकळ्यात टाकणारी कितीतरी उदाहरणं देता येतील. सर्वसामान्यांना कळावं म्हणून पुणं-मुंबईचं सोपं उदाहरण दिलं. आता आपल्या बॉलीवूडमधले काही प्रसंग बघू या ...

थ्री इडियट हा सुपर-डुपर हिट चित्रपट सगळ्यांनीच बघितला असेल. राजू , फरहान आणि चतुर हे तिघेही रँछोला भेटायला निघालेले असतात. रँछो तेव्हा सिमल्यात असतो. चतुरची लालचुटुक कार निसर्गरम्य घाटातून वळणं घेत घेत 'बेहती हवा सा' गाणं म्हणत दिल्लीहून सिमल्याला निघालेली असते. कधी ती सिमल्याच्या पार पुढे अडीचशे कि.मी. असलेल्या मनालीजवळ दिसते किंवा त्याच्या आणखी पल्याड असलेला रोहतांग पास चढताना दिसते, मात्र शेवटी यू टर्न मारून इष्ट स्थळी, म्हणजेच सिमल्याला पोहोचते (एकदाची). आपल्याला कोडं... हे नक्की मित्राला शोधायला निघाले की हिंडायला...???

'लक्ष्य' चित्रपटात, अतिशय कन्फ्यूज्ड आणि दिशाहीन असलेल्या पण लष्करात रुजू झाल्यावर मात्र जरा दिशा सापडलेल्या करनचं (हृतिकचं) विमान लेहला उतरतं आणि एक जीप त्याला घेऊन कारगिलला निघते. तिने घेतलेली वळणं खरंच बुचकळ्यात टाकणारी असतात. आपण म्हणतो जाऊ द्या. हृतिकची पहिलीच लडाख भेट असेल, म्हणून एखादी मॉनेस्ट्री बघायला जीप हाय-वेवरून थोडी आत-बाहेर घेतली असेल. पण जेव्हा ती जीप लेह-कारगिल हायवे पूर्णपणे सोडून हायवेला काटकोनात असलेल्या झंस्कार व्हॅली रस्त्याला लागते, तेव्हा मात्र जीव कासावीस होतो आणि म्हणावसं वाटतं की बाकीचं जाऊ दे रे बाबा, निदान रस्त्याकडे तरी नीट 'लक्ष' दे की. आता हे कुठे जाणार, पुढे ऑलमोस्ट डेड-एन्ड असल्याने यांना आता परत उलटा फेरा पडणार या विवंचनेत आपण असताना त्याच रस्त्याने लेफ्टनंट साहेब कारगिलला पोहोचतातदेखील. नवल करावं तितकं थोडं.

ही-मॅन सनी पाजींना तर काहीच अशक्य नाही. विश्वास बसत नसेल तर त्यांचा 'द हिरो (लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय)' जरूर बघा. मेजर बत्रा म्हणजे आपले सनी पाजी श्रीनगरला निघालेले असतात. ते आणि त्यांचा ताफा रोहतांग पास चढत असतात. पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे चांगला रस्ता सोडून भलत्याच मार्गाने हे श्रीनगरला का निघाले बुवा? थोडा घाट चढून गेल्यावर मढी ह्या गावातलं मंदिर दिसतं आणि तिथेच श्रीनगरचा बोर्डसुद्धा (तात्पुरता लावलेला). या रस्त्याने नकाशात श्रीनगर जवळ दिसत असलं, तरी फौजफाटा घेऊन उगाच इथून कुणी जात नाही म्हणूनच कदाचित त्या बोर्डखाली अंतर - अमुकअमुक कि.मी. हे लिहायची तसदी घेतली नसावी. मग एक गाणं ... "जन्नत है !!! जन्नत है !!!. तेही काश्मिरी पेहरावातल्या लोकांबरोबर. आता काश्मिरी मंडळी आली असतील रोहतांग पासच्या सहलीला, त्यात आश्चर्य करण्याजोगं काही नाही. पण जेव्हा हा ताफा गाणं म्हणत म्हणत परत खाली मनालीला उतरताना दिसतो तेव्हा वाटतं अरेच्च्या... रस्ता बघून श्रीनगर चा प्लॅन कॅन्सल केला वाटतं. आता मंडळी रोहतांग पास उतरून मनालीला पोहोचणार असं वाटत असतानाच सर्व जण श्रीनगरला पोहोचतात. (म्हणजे आपल्याला तसं सांगण्यात येतं...) आपण परत कोड्यात.... पण सनी पाजींना कोण विचारणार!

'रोजा' चित्रपटात अरविंदाची पाठवणी काश्मीरमध्ये होते. नववधू मधूला घेऊन तो फिरायला किंवा देवदर्शनाला निघतो. आता मंदिरं काश्मिरात कमीच. आपल्याला वाटतं की जाईल बापडा जवळच्या डोंगरावर शंकराचार्य मंदिरात. पण नाही. दोघे बाहेर पडतात आणि थेट साडेसहाशे कि.मी. दूर मनालीमधल्या हिडिंबा मंदिरात उगवून सगळ्यांना कोड्यात टाकतात. एकीकडे आश्चर्य वाटलं तरी दुसरीकडे हायसंही वाटतं की निदान इथे या जोडप्याला धोका नाही. पण इथेही आपला अंदाज चुकतो. काश्मिरी दहशतवाद्यांना मात्र हे मंदीर मनालीत आहे हे कदाचित माहीत नसतं, त्यामुळे इतक्या दूरच्या हिडिंबादेवी मंदिरातूनही ते अरविंदाला उचलतात. जोडपं भयचकित, तर आपण परत आश्चर्यचकित.

images_(17)

'पलटन' नावाचा चित्रपट नुकताच बघितला. चित्रपटाच्या सुरुवातीलाच एका नदीपात्रावरून कॅमेरा फिरतो. सिंधू आणि झंस्कार या दोन नद्यांचा संगम असलेलं लेहजवळचंच हे ठिकाण सुप्रसिद्ध आहे. पण पडद्यावर नाव दिसतं नामका-चू रिव्हर, अरुणाचल प्रदेश. झाली असेल टायपो मिस्टेक म्हणून आपण दुर्लक्ष करतो. तो कॅमेरा झंस्कारच्या नदीपात्रातून आपल्याला आणखी पुढे घेऊन जातो. आपल्या लष्कराचा तळ नदीपात्राच्या बाजूलाच पडलेला असतो. आपल्याच हद्दीत असलेलं, सीमारेषेपासून खूप दूर असलेलं पूर्ण सुरक्षित ठिकाण. आपले जवान आरामात पहुडलेले असतात आणि अचानक या तळावर चिन्यांचा हल्ला होतो. तोही कुठून तर आपल्याच हद्दीतल्या आणखी आतल्या गावातून. जवान आणि आपण दोघेही अचंबित.

आता पूर्णपणे गोंधळून जायचं आहे का? 'जब तक है जान' नावाचा चित्रपट बघा. शाहरुख म्हणजेच मेजर समर आनंद बाँब डिफ्यूज करण्यात एक्स्पर्ट. सुरवातीलाच तो लेह मार्केटमध्ये एक बाँब डिफ्यूज करतो आणि प्रवासाला निघतो. मेजरसाहेब हे फक्त बाँब डिफ्यूज करण्यात एक्स्पर्ट नसून प्रेक्षकांचं लॉजिकसुद्धा डिफ्यूज करू शकतात, याची प्रचिती आपल्याला त्यांच्या 'जब तक है जान' गाणं चालू असतानाच्या प्रवासात येते. प्रथम मेजरसाहेब दिसतात कारगिलकडे जाताना, मग अचानक त्यांची बुलेट पूर्णपणे विरुद्ध दिशेने असलेल्या मनालीकडे धावताना दिसते, मधूनच ती कारगिल-मनाली हायवेला काटकोनात असलेल्या खारडुंगलावर धापा टाकते आणि पलीकडे उतरल्यावर समोर काय, तर तिथून पार दोनशे कि.मी. दूर असलेलं निळंशार पँगाँग तळं! मेजरसाहेब प्रेमभंगात सैरभैर झालेले असतात हे मान्य, पण इतके??? या वेड्या-वाकड्या प्रवासात मेजरसाहेबांपेक्षा आपलीच जास्त दमछाक होते. आपण हुश्श करून सुटकेचा निःश्वास सोडतो. (असा इतका अघोरी प्रवास करून मेजरसाहेब मात्र एवढे फ्रेश कसे काय दिसतात, हे एक वेगळंच कोडं.) पांगाँगच्या काठावरच लष्कराचा मोठा तळ (खराखुरा) आहे. मेजरसाहेब आता तिथेच दोन घास खातील आणि चार क्षण विश्रांती घेतील, हा आपला अंदाज चुकतो. मेजरसाहेब आपला तंबू जवळच कुठेतरी ठोकतात आणि मॅगी करून खातात. या अतिशय वैराण आणि खुरट्या झुडपांशिवाय काहीही नसलेल्या प्रदेशात त्यांना शेकोटीसाठी लाकडं मिळतात इथपर्यंत ठीक आहे, पण टेकायला भला मोठा लाकडी ओंडकासुद्धा तळ्याशेजारीच मिळतो. मेजरसाहेबांना एकांत आवडत असेल किंवा आर्मीतल्या सहकाऱ्यांशी पटत नसेल हा आपला अंदाजही पुढच्या पाच मिनिटांत चुकतो. त्यांना बिकीनीतल्या अनुष्काबाईंना तळ्यातून एकट्याने बाहेर काढायचं असतं, हे ते वेगळा तंबू ठोकायचं कारण असतं.. (चला, एक कोडं तरी सुटलं). जाऊ दे, एकेकाचं नशीब.

अशी किती उदाहरणं देऊ .. अगदी जुना 'हीना' बघा. ऋषी कपूरच्या जिप्सीला अपघात होतो आणि नदीमध्ये वाहत जाऊन तो पोहोचतो थेट पाकिस्तानात. म्हणजे नदीत वाहत जाणारा ऋषी कपूर आणि भारत-पाकिस्तानचा नकाशा यांना सुपरइम्पोज करून चित्रपटाच्या निर्देशकाने हे पडद्यावर दाखवायची किमया साधायचा 'स्तुत्य' प्रयत्न केला आहे. सर्व जण काळजीत... आता काय होणार??? मग कुठलासा कबिला दिसतो, ज्यांना ऋषी कपूर बेशुद्धावस्थेत सापडतो. आणि मग...??? मग दिसते चक्क मनालीमधली सोलांग व्हॅली. आपण म्हणतो - हात्तीच्या!!! हा इथेच तर आहे. आपण उगाच टेन्शन घेतलं. पण हे इतक्या आधीच माहीत झाल्यामुळे पुढे पूर्ण चित्रपट संपेपर्यंत आपल्याला कोडी पडत राहतात.

images_(19)

अगदी अलीकडच्या वेब सिरीज बघा. 'फॅमिली मॅन' किंवा 'बार्ड ऑफ ब्लड'. सगळीकडे उल्लेख बलुचिस्तानचा. समव्हेअर इन बलुचिस्तान/क्वेट्टा किंवा असले आणखी काही ऑन स्क्रीन उल्लेख येत राहतात. आपले हेर पाकिस्तानात आहेत, कधीही पाकिस्तानी लष्कर किंवा आयएसआय यांच्या मुसक्या आवळेल अशी भीती वाटत असतानाच कधी लेह पॅलेस दिसतो, कधी सिंधू-झंस्कारचा संगम तर कधी लडाखमधलंच लामायुरू आणि आणखी काही काही.

भूगोलाच्या कुठल्याही जुलमी मर्यादांना न जुमानणारी ही सिनेमॅटिक लिबर्टी बघितली की भूगोलच काय, आपलंही डोकं ठिकाणावर राहणं कठीण होतं. डेव्हिड धवनच्या चित्रपटात मुंबईत असलेला गोविंदा पुढच्या क्षणाला स्वित्झर्लंडमध्ये दिसतो त्याचं आश्चर्य वाटत नाही, कारण असले चित्रपट डोकं बाजूला ठेवून बघायचे असतात. परंतु लक्ष्य, थ्री इडियट्स किंवा रोजा यासारखे 'कमाल' चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांकडून भौगोलिक भान असण्याची 'किमान' अपॆक्षा आहे. तीही जेव्हा पूर्ण होत नाही, तेव्हा मग मीही थोडी लिबर्टी घेऊन निमूटपणे नॅशनल जिओग्राफिक वा डिस्कव्हरीवर साधे सोपे कार्यक्रम बघायला सुरुवात करतो, नाहीतर सरळ टीव्ही बंद तरी करतो!

श्रेयनिर्देश: चित्रं आंतरजालावरून साभार.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 4:17 pm | यशोधरा

खुसखुशीत.
हिंदी सिनेमा बघत राहू तोवर असल्या गडबड प्रकारांना मरण नाही!

उत्तम जमलाय लेख किल्लेदार! डेव्हिड धवन च्या चित्रपटात मुंबईत असलेला गोविंदा पुढच्या क्षणाला स्वित्झर्लंड मध्ये दिसतो त्याचं आश्चर्य वाटत नाही कारण असले चित्रपट डोकं बाजूला ठेऊन बघायचे असतात. परंतु लक्ष्य, थ्री इडियट्स किंवा रोजा सारखे "कमाल" चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांकडून भौगोलिक भान असण्याची "किमान" अपॆक्षा असते. एकूणच काय, भूगोलाचे (वाजवीपेक्षा जास्त) ज्ञान आणि चिकित्सक वृत्ती असल्यास अश्या खटकणाऱ्या अनेक गोष्टी सापडतात.

चाणक्य's picture

28 Oct 2019 - 8:55 am | चाणक्य

तुमचं हिमालयाचं भाैगोलिक द्न्यान (द्न्य कसा लिहायचा राव एनीसाॅफ्टमधे) भन्नाट आहे.

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 11:06 am | किल्लेदार

गूगल मराठी इनपुट वापरून बघा... :)

गामा पैलवान's picture

28 Oct 2019 - 7:03 pm | गामा पैलवान

किल्लेदार,

मस्त मजेदार लेख. हिंदी सिनेमातलं तर्कशास्त्र पाहता भलेभले तर्कतीर्थ घोर तर्कसंभ्रमी पडतील! :-)

आमच्या वेळेस हिंदी चित्रपटाचा सर्वात फेमस इंजिनियर यश चोपडा होता. कारण त्याने स्वित्झर्लंड मध्ये समुद्र बांधला. डर पिच्चरात शेवटची मारामारी नौकेवर आहे. जेव्हा खरंच स्वित्झर्लंडात गेलो तेव्हा तिथली सरोवरं बघितली. आणि हा सीन सरोवरातल्या नौकेवरचाही असू शकतो असं वाटायला लागलं. तरीपण एकदा दिलेलं पारितोषिक परत काढून घेता नाही म्हणून बॉलीवूडचा आद्य इंजिनियर यश चोपडाच आहे. बॉलीवूडला बॉलीवूड हे नाव नव्हतं तेव्हापासून तो विख्यात आहे.

आ.न.,
-गा.पै.

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 11:05 am | किल्लेदार

हा हा !!

पद्मावति's picture

28 Oct 2019 - 11:20 pm | पद्मावति

भन्नाट लेख.
अजून एक उदाहरण म्हणजे हम दिल दे चुके सनममधे इटली म्हणून जे काही दाखवलंय ते बुडापेस्ट आहे =))

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 11:17 am | किल्लेदार

बॉलिवूड कव्हर केलं लेखात. पण तुम्ही म्हणता तशी हॉलिवूड मध्ये सुद्धा खूप उदाहरणं आहेत.
उदा. आत्ता आलेला "मिशन इम्पॉसिबल". त्यात म्हणे त्यांना तुर्तुक मध्ये जाऊन सियाचीन ग्लेशिअर मध्ये स्फोट करायचा असतो. पण प्रत्यक्षात चित्रीकरण युरोपात कुठेतरी झाले आहे.

मुंबईतील मॉल पाट्या दक्षिणेतील जिल्ब्यांच्या

त्या दाक्षिणात्य जिलब्या तरी कोणत्या भाषेत आहेत आणि बरोबर आहेत की नाहीत कुणास ठाऊक!! (कदाचित भाषिक अस्मिता जाज्वल्य असलेल्या एखाद्या अण्णाने प्रोडक्शन डिझाईनर म्हणून केलं असेल)

मुंबईच्या रस्त्यांवर फिरणारी यच्चयावत व्यक्ती भरजरी साडी आणि शेरवानी किंवा कुर्ता घालून फिरते.

त्याच पार्किंगमध्ये स्विफ्ट, सुमो, इंडिका, स्कॉर्पिओ न दिसता BMW, ऑड्या, convertible, दिसत राहतात.

दसरा असल्यागत सगळीकडे झेंडूच्या माळा लावलेल्या असतात..

जॉनविक्क's picture

29 Oct 2019 - 12:04 am | जॉनविक्क

कितीतरी हिंदी पिकचरात यूपी बिहात म्हणून वाई दाखवतात. पण कमाल म्हणजे अजय देवगणचा अपहरण चित्रपट हा चित्रपट बिहारच्या पार्श्वभूमीवर त्याचे शूटिंग साताऱ्यात झाले, पण एका सिन मधे सातारा सहकारी बँक असे ठसठशीत दिसते पण म्हटलं असेल बुआ तिकडे एखादी ब्रँच उघडलेली... कोणी जाऊन बघितलंय ?

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 11:36 am | किल्लेदार

एक अजून गमतीदार उदाहरण म्हणजे स्वदेस चं. शाहरुख दिल्लीहून चरणपूरला निघालेला असतो. पण प्रत्यक्षात पुण्याहून वाईला पोहोचतो. एकदा त्याची कॅरॅवन मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेलाही दिसते... ;)

पद्मावति's picture

29 Oct 2019 - 4:30 am | पद्मावति

कितीतरी हिंदी पिकचरात यूपी बिहात म्हणून वाई दाखवतात.

खरंय अगदी.

एका सिन मधे सातारा सहकारी बँक असे ठसठशीत दिसते पण म्हटलं असेल बुआ तिकडे एखादी ब्रँच उघडलेली... कोणी जाऊन बघितलंय

=))

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 11:05 am | किल्लेदार

गूगल मराठी इनपुट वापरून बघा... :)

गामा पैलवान's picture

29 Oct 2019 - 6:29 pm | गामा पैलवान

दिदुलेजातली शेवटची मारामारी आपटा स्थानकात (पनवेलजवळच्या) चित्रित केली होती. बाजूला मोठा डोंगर दिसतो. म्हंटलं पंजाबात इतके भलेथोरले डोंगर कोणी बांधले?

-गा.पै.

किल्लेदार's picture

30 Oct 2019 - 5:23 pm | किल्लेदार

हा हा हा !!!

मार्गी's picture

30 Oct 2019 - 12:04 pm | मार्गी

फारच जबरदस्त!!! हा दृष्टीकोनच खूप आवडला. Other side of the counter perspective!! :)

किल्लेदार's picture

30 Oct 2019 - 5:25 pm | किल्लेदार

:)

मराठी कथालेखक's picture

30 Oct 2019 - 1:06 pm | मराठी कथालेखक

पण हे ठीकच आहे ना... जे ठिकाण कथेत दाखवायचं आहे त्या ठिकाणी जावून खरंच शूटिंग करणं शक्य नसेल तर तसा "फील" देणारं दुसरं कुठलं तरी ठिकाण निवडावं लागेलच ना.

सगळीकडे उल्लेख बलुचिस्तानचा. समव्हेअर इन बलुचिस्तान/क्वेट्टा किंवा असले आणखी काही ऑन स्क्रीन उल्लेख येत राहतात

पाकिस्तान तर तिकडे येवून शूट करायची परवानगी देणार नाही , मग काय करणार ?

ते बरोबरच आहे. पण कमीत कमी खूप प्रसिद्ध ठिकाणी असं शूट करत असतांना काही काळजी घेणं आवश्यकच नाही का?
जसं वर गा.पै. म्हणतात.. पंजाबात इतके भले थोरले डोंगर कुणी बांधले.. हा प्रश्न पडणार नाही इतपत तरी काळजी घेणं क्रमप्राप्तच नाही का? :-)

टर्मीनेटर's picture

30 Oct 2019 - 5:09 pm | टर्मीनेटर

झकास लेख! मजा आली वाचायला.
'द हिरो (लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय)' मध्यंतरी पुन्हा पाहण्यात आल्याने त्यातल्या प्रसंगांशी जास्ती रिलेट करू शकलो. विविध रूपांमधल्या सनी पाजींना बघण्यापेक्षा प्रीटी झिंटा आणि ह्या चित्रपटाद्वारे पदार्पण करणाऱ्या प्रियांका चोप्राला बघणे नक्कीच नेत्रसुखद होते 😀

बाकी अगदी अलीकडच्या वेब सिरीजचं म्हणाल तर 'फॅमिली मॅन' आणि 'बार्ड ऑफ ब्लड' दोघींनी साफ निराश केले. फॅमिली मॅन' च्या पहिल्याच एपिसोड मध्ये एक गुप्तहेर (कुठल्या का संघटनेचा असो) किती बिनडोक आचरटपणा करू शकतो हे कथा लिहिणाऱ्यांनी, दिग्दर्शकांनी आणि पडद्यावर मनोज वाजपेयी सारख्या पट्टीच्या कलाकाराने सिद्ध करून दाखवल्याने पुढचे एपिसोड्स बघायची इछाच मेली. 'बार्ड ऑफ ब्लड' ची ही तीच गत, बलुचिस्तानच्या नावाखाली काय वाट्टेल ते! अरेबिक लिपीचा प्रामुख्याने वापर करणाऱ्या अफगाणिस्तान मधील कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळाचा साईन बोर्ड फक्त इंग्रजीत?

असो, फार अवांतर टाळतो. गमतीशीर लेख आवडला.
धन्यवाद.

किल्लेदार's picture

30 Oct 2019 - 5:21 pm | किल्लेदार

बाय द वे तो एअरपोर्ट सुद्धा लेह चाच आहे :) :) :)

नाखु's picture

30 Oct 2019 - 5:56 pm | नाखु

इतक्या बारकाईने निरीक्षण करुन चित्रपट पाहिला नाही, कारण जर वेन्सडे सारखा सशक्त कथानक किंवा प्रकाश आमटे यांच्या सारखा माहिती घेउन केलेला नसेल आणि निव्वळ उरकवणूक प्रकारातील असेल तर मी दिग्दर्शक काय त्यातील नट बोलटांना पण गांभीर्याने घेत नाही।
तसंही चित्रपट सृष्टी भौतिकशास्त्र आणि भूमिती यांच्या मूलभूत नियमांना फाट्यावर मारते तर इतिहास भूगोल किस झाडकी पत्ती !!

लेख आवडला

पिटातला प्रेक्षक नाखु पांढरपेशा

किल्लेदार's picture

30 Oct 2019 - 6:29 pm | किल्लेदार

:)

मीअपर्णा's picture

31 Oct 2019 - 3:17 am | मीअपर्णा

तुमचं वर उल्लेखलेले रस्ते आणि स्थळांचं ज्ञान चांगलं आहे. हाॅलिवुडमध्येही असे अनेक प्रसंग असतील. मला तर युनिवर्सल स्टुडिओला गेल्यापाासून कित्येक प्रसंगात त्याच गल्ल्या/फेक इमारती असतात असं वाटतं.

किल्लेदार's picture

31 Oct 2019 - 5:05 pm | किल्लेदार

खरय...

मंजूताई's picture

31 Oct 2019 - 2:26 pm | मंजूताई

मजेशीर लेख आवडला.

किल्लेदार's picture

31 Oct 2019 - 5:05 pm | किल्लेदार

:)

श्वेता२४'s picture

6 Nov 2019 - 1:32 pm | श्वेता२४

लेख आवडला.

किल्लेदार's picture

7 Nov 2019 - 5:42 pm | किल्लेदार

:)

जुइ's picture

16 Nov 2019 - 8:17 pm | जुइ

लेख आवडला.

किल्लेदार's picture

18 Nov 2019 - 5:47 pm | किल्लेदार

धन्यवाद....:)

सस्नेह's picture

17 Nov 2019 - 10:12 pm | सस्नेह

झकास खुसखुशीत लेख !
चित्रपट डोके बाजूला ठेवले तरच एंजॉय करता येतात हे बरीक खरं हो.

किल्लेदार's picture

18 Nov 2019 - 5:48 pm | किल्लेदार

खरंय !!!

विजुभाऊ's picture

6 Dec 2019 - 8:33 am | विजुभाऊ

बॉम्बे टू गोवा ( मेहमूद , अमिताभ, अरुणा इराणी , शत्रुघ्न सिन्हा ) हा चित्रपट पाहिला तर त्यातली बस मधूनच मुंबईत असते मधेच एकदा ती पुण्यातल्या जम्गली महाराज रस्त्यावर येते अचानक ती कोल्हापूर रस्त्याला लागते. मधेच उलटी फिरून सातरचा शिवाजी महाराजांचा पुतळा दाखवते

गामा पैलवान's picture

6 Dec 2019 - 1:33 pm | गामा पैलवान

विजुभाऊ,

मुकद्दरका सिकंदरमधला अमिताभ 'रोते हुए आते है सब हसता हुवा जो जायेगा....' हे गाणं म्हणतांना मुंबईत मरीन ड्राईव्हवर फटफटी चालवतांना दाखवलाय. ती दक्षिणोत्तर व उत्तरदक्षिण दोन्ही दिशांनी जातांना दाखवलीये. एकदा समुद्र उजवीकडे तर दुसऱ्या दृश्यात डावीकडे. तो कुठून कुठे चाललाय तेच कळंत नाही! :-)

आ.न.,
-गा.पै.

किल्लेदार's picture

9 Dec 2019 - 5:33 pm | किल्लेदार

गाणं संपेस्तोवर फटफटी चालवायला सांगितली ना डायरेक्टर ने. त्यावेळचा ट्राफिक बघितला तर एका कडव्यातच संपून जात असेल मरिनड्राइव्ह म्हणून परत निघाला :) :) :)

किल्लेदार's picture

9 Dec 2019 - 5:34 pm | किल्लेदार

हा! हा! बघावा लागेल ...

तुषार काळभोर's picture

6 Dec 2019 - 1:36 pm | तुषार काळभोर

सिद्धार्थ जाधव सचिन खेडेकर च्‍या मुलाचा पाठलाग करताना दादासाहेब फाळके चित्रनगरी ते म मगरपट्टा असा विस्तृत प्रवास घडतो.

किल्लेदार's picture

9 Dec 2019 - 5:30 pm | किल्लेदार

हा हा!!! खरंय... आठवलं मलाही