जावे फेरोंच्या देशा - भाग ११ : देन्देरा आणि हुरघडा

कोमल's picture
कोमल in भटकंती
13 Nov 2019 - 9:38 pm

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४

.anch {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #fff !important;
background-color: #2196F3 !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
.anch-crr {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #000 !important;
background-color: #ccc !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}

२७ सप्टेंबर २०१८

सकाळी ६ च्या आसपास नवऱ्याने गदागदा हलवून जागं केलं. पटकन बाल्कनी मध्ये ये असं म्हणाला. जाऊन पाहिलं तर टमटमीत फुगलेले बलून आकाशात उंच चढत होते. आजच्या बलून राईडला सुरवात झाली होती. रूम मधल्या कॉम्पलिमेन्टरी कॉफीचा आस्वाद घेत, गप्पा मारत, नीलला न्याहाळतांना तास सहज निघून गेला. आज देन्देरा नंतर हॉटेल मधून चेक आऊट पण करायचं असल्याने मुख्य सामानाची बांधाबांध करून झाली आणि तयारी करून आम्ही बफे ब्रेकफास्ट करायला पोहोचलो. कॉन्टिनेन्टल आणि इजिप्ती दोन्ही पद्धतीचा नाश्ता होता. उदरभरण करून रिसेप्शनला पोहोचतो तोवर इमादचा फोन आला कि तो ५ मिनिटात पोहोचतोय म्हणून.

5 Terre

नील आणि बलून

 

ठरल्या प्रमाणे ८:३० वाजता निघालो. हा प्रवासही नदीच्या कडेने पण हिरव्यागार रस्तावरुन सुरु होता. दीड तासात क्वेना आलं. मंदिर जरी देन्देरा म्हणून ओळखले जात असले तरी शहराचे नाव क्वेना आहे. इमाद तिकिटे घेऊन आला आणि आम्ही मंदिराच्या आवारात आलो. देन्देराचं मंदिर हा फारसा प्रचलित टुरिस्ट स्पॉट नाही. त्यामुळे इथे गर्दी अजिबात नव्हती. क्रूझ टूर आस्वान-लक्सॉर पर्यंतच असतात म्हणून त्या पर्यटकांची गर्दी इथे नसते. कोणी आवड असणारा पर्यटक इकडे वळतो किंवा संशोधक, आर्किओलॉजिस्ट वगैरे. हे मंदिर बऱ्यापैकी निवांत पहायला मिळालं. 

इमाद सुरवातीपासून सांगू लागला, "हॅथोर देवतेचं हे मंदिर आहे. असं म्हणतात कि पेपी पहिला याने ख्रिस्त पूर्व २२०० च्या शतकात इथे मंदिर आणि मरुद्यान बनवलेलं. जशी वर्षं गेली तशी मंदिरात बदल होत गेले. सध्या जे बांधकाम उभं आहे ते टॉलेमी काळातील असून इदफु, इस्ना येथील मंदिरांच्या धाटणीचं आहे. मंदिराच्या सभोवताली संरक्षणासाठी मातीच्या विटांची भिंत उभारली होती. पुढे नाईलला आलेल्या पुरात ती पडली पण काही ठिकाणी ती अजूनही उभी आहे. या भिंतीच्या आत मंदिर परिसरात मुख्य मंदिर, पवित्र तलाव वगैरे आहेच पण टॉलेमी नंतर आलेल्या रोमन राज्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने मंदिरात भर टाकली आणि मँमिसि अर्थात जन्माची खोली उभारली. आपण आता मुख्य मंदिरात जाऊया."

"इथे हे उंच मोठे खांब दिसत आहेत, तसे या दालनात १८ खांब आहेत. प्रत्येक खांबावर फेरो हॅथोरची पूजा करतांनाचे प्रसंग कोरलेले आहेत. सर्वात वर हॅथोरचे मुखवटे लावलेले आहेत. त्यावरचे रंग अजूनही दिसत आहेत बघा. या दालनाच्या खांबांच्या मधल्या छतावर जीवनप्रवास दाखवणारे रिलिफ्स दिसतील. त्यातले रंग सुद्धा अजून टिकून आहेत. सर्वांत शेवटी न्यूट या देवतेचा रिलीफ पाहायला मिळेल. आकाशाची आणि रात्रीची देवता म्हणून न्यूटला ओळखले जाते. फेरोंची मृत्यूनंतर रक्षा करावी म्हणूनही तिची पूजा होते. रिलिफ्स मधून ती सूर्यदेव 'रा' याचं रक्षण करतांना दाखवली जाते. संध्याकाळी सूर्य तिच्या मुखातून प्रवेश करतो, तिच्या शरीरातून रात्रभराचा प्रवास करून सकाळी न्यूट नव्या सूर्याला प्रसवते असा याचा अर्थ. न्यूट च्या आजूबाजूला असलेले तारे आणि निळा रंग रात्र असल्याचं दर्शवतात."

5 Terre

हॅथोरचा मुखवटा

 

5 Terre

छतावरील इतर प्रसंग (झूम केल्यास रंग ठळक दिसतील)

 

5 Terre

छतावरील इतर प्रसंग

 

5 Terre

छतावरील इतर प्रसंग

 

5 Terre

न्युट सूर्याला गिळतांना

 

5 Terre

नंतर प्रसवतांना

 

5 Terre

पूर्वी येथे पवित्र तलाव होता.

 

5 Terre

मंदिराभोवतीची मातीची भिंत

 

मंदिराच्या आवारातील काही प्रचि

इमाद सांगत होता आणि आम्ही शक्य तेवढं साठवत होतो. काय अप्रतिम कलाकृती. छतांवरील रंग इतके देखणे कि काही दशकांपूर्वीचे वाटावे. हॅथोरचा चेहरा इतका सुंदर कि बघत राहावं.

"आता आपण आत जाऊया. तुम्हाला एका खास ठिकाणी नेतो." त्याच्या पाठोपाठ आम्ही काही दालने पार करून गेलो.
एका ठिकाणी एक सुरक्षारक्षक तळघरात उतरणाऱ्या एका दरवाजाजवळ बसून होता. इमादची ओळख होती त्याच्याशी. अरेबिक मध्ये त्याने काहीतरी संभाषण केले आणि त्या गार्डने आम्हाला हसून अभिवादन केले. 
"हिंदी?"
"येस" आम्ही म्हणालो. 
"वेलकम, वेलकम. गो इन साईड."
आम्ही इमादकडे पाहिलं, "चला आत उतरा. समजावतो."

सात आठ पायऱ्या उतरून खाली गेलो. आधी उजवीकडे मग डावीकडे वळत शेवटी एका अगदी अरुंद पॅसेज मध्ये पोहोचलो.
"हा भुयारी मार्ग कोठारे जोडतो. देवासाठी आलेल्या भेटवस्तू, धान्य, अत्तरे, दागिने वगैरे यांचे साठे इथे ठेवले जात. मुख्यत्वे सगळं पुजारीच वापरत असत. कोणत्या कोठारात काय ठेवलं आहे हे त्याच्या भिंतीवर कोरलेलं असे. जसं इथे अत्तराच्या कुप्या आहेत."
आम्ही कॅमेरा सरसावला. पण अंधारामूळे फोटो काही नीट आला नाही.
"इथे पर्यटकांना यायची परवानगी नाहीये. आज ओळखीच्या गार्डची ड्युटी होती त्यामुळे आपण आलो आत. जाऊया परत वर मग?"
आम्ही होकार भरून त्याच्या मागे परत गार्डच्या खोलीत आलो आणि १० पौंडची नोट त्याच्या हातात दिली. 

5 Terre

भुयार

 

आता मंदिराच्या मुख्यदालनात आलो. इथून दोन छोट्या खोल्यांचे रस्ते होते. पहिलीत गेलो. "हि पूजेची खोली. फेरो हॅथोरची पूजा करतांनाचे रिलिफ्स तुम्हाला इथे दिसतील. हे चार टप्यात आहेत. पहिल्यांदा फेरो गाभाऱ्याचा दरवाजा ठोठवत आहे, नंतर दरवाजा ढकलतोय, तिसऱ्या ठिकाणी फेरो आणि देवता समोरासमोर असून फेरो तिचं दर्शन घेत आहे आणि सगळ्यात शेवटी धूप/उद जाळून तिची पूजा करत आहे. असेच रिलीफ बाकी देवांच्या बाबतीत पण बाहेरील भिंतीवर आहेत. आपण आता दुसऱ्या खोलीत जाऊया."

5 Terre

फेरो गाभाऱ्याचा दरवाजा ठोठवत आहे

 

5 Terre

दरवाजा ढकलतोय

 

5 Terre

फेरो आणि देवता समोरासमोर

 

5 Terre

धूप/उद जाळून तिची पूजा करतांना

 

"हि उत्सवाची खोली. तुम्ही इदफु येथील होरसचं मंदिर पाहिलं असेल ना. तिथे पण अशा पद्धतीचे रिलिफ्स तुम्ही बघितले असतील. होरस आणि हॅथोर यांच्या लग्नाचा विधी दरवर्षी केला जात असे. तेव्हा हॅथोर इथून छोट्या बोटीमधून नाईल मार्गे इदफु पर्यंत प्रवास करत असे आणि इदफु येथे त्यांचं लग्न होई. इथे फेरो हॅथोरच्या बोटीची पूजा करून तिला निरोप देतांना दाखवला आहे. "

5 Terre

हॅथोरची बोट

 

5 Terre

हॅथोरला निरोप देतांना

 

"आता पुढच्या खोलीत जाऊया. हि जन्माची खोली, मॅमिसी, जी रोमन राज्यकर्त्यांनी उभारली. याच्या छतावर सुद्धा तुम्हाला न्यूट दिसेल. इथे सुद्धा न्यूट सूर्याला गिळतांना आणि प्रसवतांना दाखवली आहे, फक्त हॅथोरचा चेहरा तितकासा साधला नाही रोमन लोकांना. हो ना?"

5 Terre

मॅमिसी मधील छत

 

"इथून डाव्या बाजूने एक रस्ता मंदिराच्या छताकडे जातो. तिकडे जाऊया." मंदिरात खोल्या आणि भिंतींच्या भुलभुलैय्या मधून फिरतांना इजिप्शीयन वास्तूकौशल्याचं फार कौतुक वाटत होतं. इमाद ने सांगितलेल्या त्या पॅसेजपाशी पोहोचलो, "हा रस्ता थेट छतावर जातो. इथून फेरो आणि पाठोपाठ पुजारी देवाला घेऊन छतावर पूजेसाठी घेऊन जात. या पॅसेज मधील रिफील बघून लक्षात येईल कि रोज सकाळी करण्याचा हा एक रिवाज होता. असाच दुसऱ्या बाजूचा पॅसेज आहे पण त्यावर देवाला घेऊन उतरतांनाचे क्षण दाखवले रिलिफ मधून दाखवले आहेत."

आम्ही तिथून छतावर पोहोचलो. छान ऊन आणि वारा होता वर. काही खोल्या होत्या ज्यातील एक उघडी असून बाकी कुलूपबंद होत्या.
"हि ओसायरिसची खोली. या खोलीच्या छतावर वृषभ आणि तूळ राशींच्या द्वारे आकाशाची स्थिती दाखवणारे कॅलेंडर कोरलेले आहे ज्याला देन्देरा झोडियॅक म्हणून ओळखले जाते. सध्या इथे त्याची नक्कल लावलेली आहे पण मूळ कॅलेंडर लुवर म्युसिअम मध्ये पाहायला मिळू शकत. या खोलीच्या भिंतींवर ओसायरिसच्या आयुष्यातील एक गोष्ट चित्रित केली आहे. ओसायरिस सुबत्तेचा देव आणि इसिस हि बऱ्याच शक्ती अंगी असलेली देवता हे इजिप्तचे राज्यकर्ते होते. सेत हा ओसायरिसचा भाऊ. इजिप्तचा राज्यकर्ता होण्यासाठी याने धोक्याने ओसायरिसला मारले आणि त्याचे तुकडे करून वाळवंटात फेकून दिले. इसिसने पक्षाचे रूप घेऊन सगळे तुकडे गोळा करून ओसायरिसला परत जिवंत केले. सेतने अशा विविध मार्गाने ओसायरिसला मारण्याचा प्रयत्न केला आणि इसिसने त्याला पुनर्जीवन दिले. एकदा मात्र त्याला परत जिवंत करणे शक्य नसल्याने इसिस अनुबिस( मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या विधींच्या) देवाकडे मदत मागते आणि ओरायसिस कडून पुत्रप्राती करून घेते. होरस हा त्यांचा मुलगा पुढे जाऊन वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतो. या कथेमध्ये थोडाफार बदल करून गॉड्स ऑफ इजिप्त हा हॉलिवूडपट बनवला आहे." आम्ही हा चित्रपट पाहिला होताच त्यामुळे सारे संदर्भ सापडत गेले. तिथल्या या काही रिलिफ्स. 

5 Terre

देन्देरा झोडियॅक

 

5 Terre

विकि वरुन साभार इसिस पक्षीरुपात बिजारोपण करुन घेतांना

 

आम्ही मंदिरातून बाहेर पडू लागलो. एका दालनातून जातांना वरचे संपूर्ण छत काळ्या रंगात दिसले. त्या दालनातील रिलीफ सुद्धा फार विद्रुप करून टाकले होते. 
"इमाद माझा एक प्रश्न आहे" मी म्हणले. 
"विचार ना" इमाद म्हणाला. 
"हे असं छत काळं कसं पडलं? कि मुद्दाम केलं आहे? आणि दुसरं आम्ही सगळ्या मंदिरातून पाहत आलोय खूपसे रिलिफ्स असे विद्रुप केले आहेत. त्या मागचं काय कारण?" मी विचारलं. 
"इजिप्त मधून रोमन गेल्यावर इंग्रज धर्मगुरू येऊन पोहोचले. त्यांनी सर्वसामान्य लोकांचे धर्मांतर करायला सुरुवात केली. आणि इतक्या सुंदर कामाला अश्लील सांगू लागले. शक्य असेल आणि पोहोच जाईल ती ती रिलिफ्स त्यांनी खरडून खराब केली. अशा एक धर्मांतराच्या वेळी काही लोक इथे लपून बसले होते. त्यांच्या चुलीतून निघालेल्या धुराने छते काळवंडली असं काही लोक सांगतात. आणि काही लोक असंही सांगतात कि धर्मांतर होऊ नये म्हणून इथे लपायला आलेल्या लोकांना इथे जिवंत जाळण्यात आलं, त्यामुळे छतांवर काळ्या धुराचा रंग चढला. नक्की काय झालं कोणास ठाऊक. मी स्वतः ख्रिश्चन आहे पण मलाही त्या धर्मगुरूंचा तितकाच तिटकारा येतो जेवढा बाकीच्यांना. असो जेवढी तोंडे तेवढ्या गोष्टी. त्यामुळे तुम्ही या बाबत अजून वेगळी गोष्ट ऐकली तरी नवल नाही."

5 Terre

काळे पडलेले छत

 

5 Terre

होरस बाल्यावस्थेत असून विविध देवता त्यास खेळवतांना. असे मातृत्वाच्या रिलिफ्सना खराब केलेले आढळते.

 

5 Terre

 

5 Terre

 

११ च्या सुमारास देन्देराहून निघालो. २००० वर्षांपूर्वीचे रंग मनात साठवून, अजून एका कलाकृतीचा निरोप घेतला. १२:३० ला परत लक्सॉर गाठलं. इमादला पुढच्या टूर साठी जायचं होतं त्यामुळे आम्हाला सोडून तो लगेच निघाला. 

आजचा आमचा अप्पर इजिप्तमधील शेवटचा दिवस. निळ्याशार नीलचा तात्पुरता निरोप घ्यायची वेळ आली होती आणि आता हुरघडा या तांबड्या समुद्राजवळील गावी जायचे होते. इजिप्त मधील सर्वांग सुंदर अशा अनेक वास्तू पाहून झाल्या होत्या. काही गोष्टी वेळेअभावी राहून गेल्या होत्या. जसं ऍबीदोस शहर जे देन्देरा पासून अजून पुढे ३ तासाच्या रस्त्यावर आहे आणि इजिप्तच्या इतिहासातील एक महत्त्वाचे ठिकाण. लक्सॉर मधील काही म्युसिअम, कर्नाक मंदिरातील लाईट अँड साउंड शो वगैरे. पण जे पाहिलं होतं तेही थोडकं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे काहीही अडचण न येता इजिप्तचा हा टप्पा पूर्ण झाला होता.

थोडं सेलिब्रेशन करावं म्हणून ओमर खय्याम यांच्या नावाने बनवलेली वाईन आणि रेमन नूडल्स मागवून निवांत जेवण करत बसलो. खय्याम साहेब म्हणाले आहेतच, “Drink wine. This is life eternal. This is all that youth will give you. It is the season for wine, roses and drunken friends. Be happy for this moment. This moment is your life.”

5 Terre

ओमर खय्याम यांच्या नावाने बनवलेली वाईन

 

हुरघडाला जाणारी बस ३ वाजता होती. २:३० वाजता टॅक्सीने बस स्टॅन्डवर पोहोचलो. 'गो बस' इजिप्त मधील मुख्य शहरांना जोडणारी अग्रेसर बस सेवा प्रवाशांना फार चांगल्या सुविधा सुद्धा देते. बरोबर ३ वाजता लक्सॉर सोडलं. तासभर देन्देराच्या रस्त्यावरून प्रवास केल्यावर गाडी उजवीकडे वळाली आणि अगणित वाळवंटाला सुरवात झाली.

अजून तीन तास प्रवास करून गाडी हुरघडाच्या बस स्टॅन्डवर पोहोचलो आणि पुढच्या १० मिनिटात इथल्या रिसॉर्टवर. Sun Rise Holiday Resort (Adults only) हे हुरघडा मधील एक पंचतारांकित हॉटेल. Adults only याचा अर्थ लहान मुलांची किरकिर कुठेच ऐकू येणार नाही. हुरघडामध्ये असे बरेच रिसॉर्ट्स आहेत. आमच्या रिसॉर्टच्या खर्चात तीन वेळचे जेवण आणि अमर्यादीत स्थानिक मद्य समाविष्ट होते. पण प्रत्येक जेवणाच्या वेळी ड्रेस कोड पाळावा असा नियम होता. चेक इन केल्या केल्या कपडे बदलून खादाडी करायला गेलो. Unlimited सोयींचा चवी चवी ने आस्वाद घेत कॉन्टिनेन्टल जेवण केलं. आमच्या रूम मधून थेट बीच वर जायचा मार्ग होता. थोडा वेळ तिकडे जाऊन खाऱ्या हवेचा आस्वाद घेतला. तांबड्या समुद्राला उद्या भेटूया असं ठरवून झोपी गेलो. 

क्रमश: 

.polaroid {
width: 80%;
background-color: white;
box-shadow: 0 4px 8px 0 rgba(0, 0, 0, 0.2), 0 6px 20px 0 rgba(0, 0, 0, 0.19);
margin-bottom: 25px;
}

.container-p {
text-align: center;
}

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

13 Nov 2019 - 11:12 pm | पद्मावति

वाह..मस्तंच.

प्रचेतस's picture

14 Nov 2019 - 8:08 am | प्रचेतस

हा भागही छान.
भरपूर शिल्पं असलेलं देन्देराचं मंदिर फारसं प्रसिद्ध नाही ह्याचं नवल वाटलं.

जॉनविक्क's picture

14 Nov 2019 - 8:26 am | जॉनविक्क

अफलातून शिल्प आहेत. अत्यन्त नाजूक कलाकुसर दिसते आहे.

जेम्स वांड's picture

14 Nov 2019 - 10:30 am | जेम्स वांड

कायम एक हळहळ जाणवते, अमुक रिलीफ लुवर मध्ये तमुक मुखवटा ब्रिटिश म्युझियममध्ये, मोरल राईट काय हो ह्या लोकांना इजिप्तचा ठेवा चोरून नेऊन ते नेऊन वर प्रदर्शने भरवायचा?? कॉलॉनिअल लूट हा एक प्रचंड क्लेशकारक प्रकार असतो खासकरून अँटिक आणि आर्किओलॉजिकल वस्तूंच्या बाबतीत समजणारा.

कॉलॉनिअल लूट हा एक प्रचंड क्लेशकारक प्रकार असतो खासकरून अँटिक आणि आर्किओलॉजिकल वस्तूंच्या बाबतीत समजणारा

सहमत. पण इजिप्तमध्ये काहीवेळा सरकारतर्फे असे आर्टिफॅक्ट दुसऱ्या देशांना भेट म्हणून दिले आहेत. अर्थात तसं कमी आणि लूट जास्त वेळा झाली आहे.

अनिंद्य's picture

14 Nov 2019 - 3:51 pm | अनिंद्य

बहुत खूब !
हा भागही छान

धन्यवाद पद्मावती, वल्ली, जॉनविक्क, अनिंद्य, जेम्स वांड

जालिम लोशन's picture

15 Nov 2019 - 5:23 pm | जालिम लोशन

छान