घटस्फोटाच प्रमाण

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
10 Nov 2019 - 9:41 am
गाभा: 

हल्ली घटस्फोटाच प्रमाण वाढलं आहे
त्यात लक्षणीय वाढ होण्यात अनेक कारण असतील हि
पण मुलीची आहि हिचा मुलीच्या संसारात जास्त लक्ष घालणे काय चालले याची बारीक चौकशी हे कारण पण मुख्यते करून कारणी भूत आहे का ?
मुलगी व जावयाला त्याचे प्रश्न सोडावयास भाग पाडणे गरजेचे आहे का ?
सासूची लुडबुड परिस्थिती विस्फोटक ठरते
आपले काय मत आहे ?

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

10 Nov 2019 - 10:42 am | श्री गावसेना प्रमुख

प्रत्येक नवर्याने जर बायकोला ह्यापासुन परावृत्त केले तर हा प्रश्न सुटु शकतो...

सोत्रि's picture

10 Nov 2019 - 10:50 am | सोत्रि

अकुकाका इज बँक विथ बँग!

- (मत नसलेला) सोकाजी

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Nov 2019 - 11:12 am | माईसाहेब कुरसूंदीकर

लुडबुड पुर्वीच्याकाळी पण असायची रे अवी. स्वतःबद्दलचे गैर्समज आणि प्रमाणाबाहेर वाढलेल्या अपेक्षा ही प्रमुख कारणे आहेत असे आमचे मत. दरवर्षी फिरायला जायचेच,तिशी ओलांडायच्या आत फ्लॅट घेतलाच पाहिजे.. अमुक वयात प्रमोशन झालेच पाहिजे.. ह्यामुळे तणाव वाढतात.

खूप कारणे आहेत या प्रश्नासाठी.
आई आणि मुलगी यांचे विवाहानंतर खूप सारे संभाषण होते. अगदी दोन दोन तास मुली माहेरच्यांशी बोलत असतात. जुनी नाळ तोडल्या जात नाही. नवीन नाळ जुळवली जात नाही. नको तितके माहेरच्यांचे आपल्या मुलीकडे विवाहोत्तर लक्ष असणे हे मुख्य कारण आहे. थोडी धरसोड करावीच.

इतर भरपूर कारणं आहे. एक प्रबंध होवू शकतो इतके. सामाजिक दुष्परीणाम जास्त गडद करणारा हा प्रश्न आहे.

धर्मराजमुटके's picture

10 Nov 2019 - 11:41 am | धर्मराजमुटके

चालायचचं ! बायकांनी तरी एक मोबाईल किती दिवस वापरायचा :)

तर त्यात हळूच विषप्रयोगाचा प्रयत्न करणे कसे वाटते? नाही असे अजिबात करायचे नाही पण उपाय योग्य वाटतो का ?

कारण पण मुख्यते करून कारणी भूत आहे का ?

हो हो याला करणी व भूते खेतेच जबाबदार आहेत याबाबत माझी खात्री आहे. :D

सुबोध खरे's picture

11 Nov 2019 - 12:14 pm | सुबोध खरे

हल्ली घटस्फोटाच प्रमाण वाढलं आहे

याचं एक महत्त्वाचं कारण आपली लोकसंख्या चौपट झाली आहे.

नाखु's picture

11 Nov 2019 - 1:53 pm | नाखु

लग्न कारणीभूत आहे आणि एकदा लग्नाच्या ऐवजी समांतर व्वस्थेला समाजमान्यता मिळाली की हा प्रश्न आपोआपच निकाली निघेल.

वाचकांचीच पत्रेवाला संसारी नाखु

सुमो's picture

11 Nov 2019 - 2:01 pm | सुमो

जाऊ द्या हो बारा गडगड्याच्या व्हिरित...

Divorce ला मराठीत घटस्फोट हा शब्द कुठून आला म्हणतो मी ....

काडीमोड पण म्हणत्यात की !!!

घटस्फोटाला कारणीभूत , विभक्त कुटुंब पद्धती आहे . सध्या विभक्त कुटुंब पद्धतीबरोबरच हे जे नोकरीधंद्यामंध्ये पुढे जायची चढाओढ आहे त्यामुळे भरपूर ओढाताण होत असणार .. पण गुरुदेव एवढे हळवे विषय का काढताय चर्चेला ? आम्हाला आपल्याला वेगळ्या रूपात बघायचंय .. सांगा ना .. दाखवाल ना पुन्हा ते रूप ? गुरुदेव हा अर्जुन कम खिलजी आपला निस्सीम चाहता झालेला आहे .. आपण लवकरात लवकर ते चिंधड्या चिंधडया उडवणारे सुदर्शन चक्रधारी लिखाण करावे ,, हि नम्र विनन्ती .. हा पामर , तुमच्या चतुरस्त्र लिहानाकडे डोळे लावून बसलेला आहे ..

पाषाणभेद's picture

11 Nov 2019 - 4:10 pm | पाषाणभेद

हळवा विषय?
ते धागे उघडा. बघा बघा. तेथे अनेक शंभर प्रतिसादी धागे दिसतील.
त्यातलाच हा विषय आहे.

धागाकाढू माणूस!

श्वेता२४'s picture

11 Nov 2019 - 3:24 pm | श्वेता२४

तुमच्या चतुरस्त्र लिहानाकडे

शिष्यत्व जमतंय :)

चाणक्य's picture

16 Nov 2019 - 7:42 am | चाणक्य

अहो चुंबनांचा वर्षाव न होणे हे एक महत्त्वाचं कारण आहे घटस्फोट होण्याचं.

सनईचौघडा's picture

23 Jan 2021 - 8:25 pm | सनईचौघडा

अहो लग्नच नाही केले तर का बरे घटस्फोट होतील हो की नाही अकु काका?

Rajesh188's picture

23 Jan 2021 - 9:06 pm | Rajesh188

आता आहेत का?

सनईचौघडा's picture

23 Jan 2021 - 9:21 pm | सनईचौघडा

नाही