h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:600px;
margin: auto;
}
div.chitra1 {
max-width:400px;
margin: auto;
}
div.chitra2 {
max-width:300px;
margin: auto;
}
टायकलवाडी आणि मोकळ
"आमचा, म्हणजे माझा माहेरचा गणपती आधी - म्हणजे आजी-आजोबा असेपर्यंत गावाला येत असे. पण आजी आधी गेली आणि आजोबाही काही वर्षात गेले. ते होते, तोपर्यंत गणपती गावच्या घरातच येत असत. इथे वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय असल्याने एका वेळी आई-पप्पांना जाता येत नसे. मग आजोबा गेल्यावर आई-पप्पांनी निर्णय घेतला की गणपती मुंबईच्या घरात आणायचा, म्हणजे आम्हालाही गणपतीची मजा घेता येईल."
मग १९७१पासून गणपती आणि गौरी मुंबईत यायला लागले. आम्ही टायकलवाडीत राहत असू, तिथे गणपती आला तो आख्खा वाडीचाच झाला. गणपतीचा पायगुण असा की, पुढच्या वर्षी आम्ही बिल्डिंगमध्ये राहायला गेलो. पण बिल्डिंगमध्ये गेले, तरी सगळे मनाने वाडीकरच आहेत अजून. मग काय? आमचा गणपती बिल्डिंगमधल्या सर्व घरांतल्या मुलांचा गणपती असल्याप्रमाणेच सगळे मिळून सजावट, आगमन, पूजा, दोन्ही वेळच्या आरत्या, गमन गाजवत असत.
आरत्या तर इतक्या वेगवेगळ्या असत. टाळ-ढोलकीच्या तालावर तासभर आरत्या चालत. गणपती जाण्याच्या आदल्या दिवशी तर दीड-दोन तास आरत्या चालत. या मुलांची तयारी पाहून त्यांना हळूहळू आरतीच्या सुपाऱ्या मिळू लागल्या आणि आता तिसर्या पिढीतली मुलंही या आरत्यांच्या सुपाऱ्या स्वीकारून मुंबईभर आरत्या करायला जातात. सगळ्यांच्याच आरत्या आणि श्लोक पाठ असल्याने खूप मजा यायची. आरतीची सांगता करताना, "गणपतीबापा मोरया, मंगलमूर्ती मोरया" म्हणता म्हणता "पप्पा मोरया हो, माई मोरया हो" असा आई-पप्पांचा गजरही कौतुकाने होत असे, कारण माहेरचे आडनाव मोरे आहे.
आईही गणपतीची हौस करता करता या मुलांचेही कौतुक मनमोकळेपणे करत असे. कोणताही नैवेद्य भरपूर प्रमाणात करून प्रसाद सढळ हाताने देत असे. गणपतीला नैवेद्य दाखवून त्यांच्यासाठी नवस बोलत असे, ते फेडतही असे. हात जोडत म्हणत असे, "माझी पोरं दमली रे बाबा तुझं कौतुक करताना. त्यांचं कौतुक करायला माझा हात देता ठेव हो."
दोन्ही वेळच्या पूजा-आरतीच्या वेळी वेगवेगळा नैवेद्य केला जात असतोे. त्यात मोदक तर पहिल्या आणि शेवटच्या दिवशी असायचेच. शिवाय काजू+रवा वड्या, खीर, शेवयाच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या, शिरा, बेसन लाडू, मोतीचूर लाडू, रव्याचे लाडू, जिलेबी, म्हैसूरपाक, काकडीचे धोंडस, काकडीचे वडे, केळ्याचे उंबर, दुधीहलवा, गाजरहलवा, बटाट्याच्या वड्या चकल्या, चिवडा, खव्याचेे पेढे, मोदक असे निरनिराळ्या पदार्थांपैकी असत.
हे खव्याचे मोदक करायला उल्हास दुग्धालयातले एक आचारी काका हौसेने गणपतीबाप्पाची सेवा करायची, म्हणून मुद्दाम ज्या दिवशी रजा असेल तेव्हा येत असत. शिवाय तिथली मोठी लोखंडी कढई आणि मोठा लोखंडी कलथा घेऊन येत असत. त्यांचे ते गरमगरम खव्याचे पेढे वळणेही पाहण्यासारखे असे. हा हा म्हणता परात भरून पांढऱ्याशुभ्र, वर एक वेलचीचा दाणा चिकटवलेल्या पेढ्यांचा पसारा आवरता घेत आणि लगेच मोदकाला लागणारा खवा भाजायला घेत. खव्यात केशर घालून केशरी मोदक बनत.
शिवाय आलेल्या दर्शनार्थीचेही प्रमाण खूप असे. त्यांनी जो काही नैवेद्य आणला असेल, त्यातला थोडासा ठेवून आई बाकीचा परत करत असे. तरीही भपूर केळी आणि इतर फळेही असत. केळी तर आमच्याकडे कधीच कापून वाटली गेली नाहीत. प्रत्येकाला आख्खे केळे प्रसाद म्हणून मिळे, शिवाय गणपती जाण्याच्या दिवशी मोठा गंज भरून फ्रूट सॅलड बनवले जाई. गणपती बोळवून आल्यावरची छोटी आरती झाली की सगळे मिळून ते फ्रूट सॅलड संपवून श्रमपरिहार व्हायचा.
त्यात आमचा गणपती गौरीबरोबर जात असल्याने पाच ते आठ दिवसांपर्यंत असायचा. म्हणजे या दिवसात दहा, बारा, चौदा किंवा सोळा वेगवेगळे नैवेद्य बनवले जाऊन त्याचा प्रसाद बनवला जाई.
त्या नैवेद्याच्या पदार्थत एक खास पदार्थ असेच, तो माझ्या आजोळचा. आईच्या आईकडे केला जायचा, तो म्हणजे मोकळ. त्याचे नाव मोकळ का होते ते माहीत नाही. मोकळ म्हणजे तांदळाच्या रव्याचा शिरा. पूर्वी चुलीवर, खालीवर निखारे ठेवून केला जाई. कमी तूप घालून.
आता आपल्या नेहमीच्या शिऱ्यासारखा, थोडेसे जास्त तूप घालून. पण बाकी साहित्य आणि कृती तीच. थोडासा बदल - या पदार्थाचा खरपूसपणा शेवटच्या टप्प्यात, मोकळचा टोप तव्यावर ठेवून आणि झाकणावर निखारे ठेवून खमंगपणा टिकवायचा प्रयत्न आई करत असे. त्यासाठी दोन करवंट्या गॅसवर पेटवून निखाऱ्याचे काम भागवले जात असे. (करवंट्या भरपूर असतातच या दिवसांत.)
चला तर, घ्या साहित्य जमवायला.
साहित्य :-
१. दोन वाट्या तांदूळ जाड रवा (आधी हा गावठी लाल तांदळाचा असे.)
२. दोन वाट्या गूळ, बारीक चिरून,
३. दोन वाट्या खवलेले ओले खोबरे,
४. पाऊण वाटी साजूक तूप,
५. चार लवंगा,
६. आल्याचा एक इंच तुकडा किसून,
७. अर्धी वाटी चारोळी किंवा काजू तुकडा
८. जायफळ पूड.
कृती:-
१. दोन चमचे तूप वगळून बाकीचे तूप गरम करून त्यात रवा खमंग भाजून घ्या.
२. दुसऱ्या गॅसवर टोपात चार वाट्या पाणी घालून उकळा.
३. त्यात गूळ, लवंगा, आले आणि एक वाटी खोबरे घाला.
४. गूळ विरघळला की उकळलेल्या पाण्यात भाजलेला रवा घालून सतत ढवळा. गुठळी होऊ देऊ नका.
५. आच मंद करून, चारोळी /काजूतुकडा आणि जायफळ पूड घालून झाकण 'मारा'. (हा आईचा खास शब्द!)
६. पाच मिनिटांनी गॅस बंद करा.
७. मोठ्या ताटाला वगळलेलं तूप लावा.
८. मोकळ ताटात थापून वरून उरलेले खोबरे पसरून वाटीने दाबून घ्या.
९. गरम असतानाच वड्या कापा.
१०. गार झाल्यावर तुपाबरोबर आस्वाद घ्या.
प्रतिक्रिया
8 Sep 2019 - 8:09 am | यशोधरा
गोड आठवणी. :)
मोकळ खूप दिवसांनी बघितलं. आता करायला पाहिजे एकदा.
8 Sep 2019 - 9:24 am | कंजूस
छान!
10 Sep 2019 - 7:39 am | यशोधरा
... आणि लगेच मोकळ करून बघण्यात आलेले आहे. ज्येना म्हणाले, "ही तर खांटोळी!" :)
10 Sep 2019 - 7:50 am | तुषार काळभोर
घरी दाखवतो. आजच्या आरतीचा प्रसाद करण्यासाठी.
10 Sep 2019 - 8:23 am | ज्ञानोबाचे पैजार
याला मोकळ ही म्हणतात हे माहित नव्हते. साधारण अशीच खांडवी बनवतात, खांडवी हा नागपंचमीला बनवायचा खास कोकणातला पदार्थ.
आमच्या घरी मोकळ थालिपीठाच्या भाजणीची करतात.
पैजारबुवा,
11 Sep 2019 - 11:45 pm | स्वाती दिनेश
ह्याला खांडवी म्हणतात आमच्या कडे, याला मोकळ ही म्हणतात हे माहित नव्हते. आमच्या घरी मोकळ थालिपीठाच्या भाजणीची करतात किवा मग त्याला मोकळी भाजणी असेही म्हणतात.
सुरंगी, आठवणी आणि पाकृ, फोटो सगळेच भारी, :)
स्वाती
15 Sep 2019 - 10:11 am | पर्णिका
आमच्याकडेही खांडवीच म्हणतात. मस्त वाटलं लेख वाचुन... गौरी-गणपतीतील वातावरण एकदम अनुभवलं.
10 Sep 2019 - 11:25 am | पद्मावति
सुंदर आठवणी.
10 Sep 2019 - 11:26 am | रविकिरण फडके
"दुसऱ्या गॅसवर टोपात चार वाट्या पाणी घालून उकळा"
एकदम मालवणला गेल्यासारखं वाटलं!
(टोप = पातेलं)
10 Sep 2019 - 1:56 pm | उपेक्षित
क्लासिक पदार्थ. आणि त्यापेक्षा हि क्लासिक लेख अतिशय सुंदर.
आवर्जून करून बघण्यात येईल.
10 Sep 2019 - 3:11 pm | जॉनविक्क
10 Sep 2019 - 4:24 pm | स्मिता दत्ता
सुंदर ... पारंपरिक पदार्थ हल्ली कमीच होतात.. हा छान वाटला..
10 Sep 2019 - 7:17 pm | सुधीर कांदळकर
पप्पा मोरया आवडले. धन्यवाद.
10 Sep 2019 - 11:29 pm | जालिम लोशन
लिखाण आवडले.
11 Sep 2019 - 5:39 pm | मित्रहो
आठवणी छान आहे. मोकळ कधी खाल्ल नाही
13 Sep 2019 - 1:53 pm | श्वेता२४
माझी आजी अशाचप्रकारे संकष्टीचा उपवास सोडताना हा गोड पदार्थ करायची. त्याला खांतोळी म्हणायचे. माझा अतिशय आवडता पदार्थ होता हा. आता मीच करुन बघेन एकेदिवशी.
13 Sep 2019 - 1:58 pm | यशोधरा
आम्हांकडेही खांटोळी म्हणतात.