h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
} h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
ओरिगामी मोदक
।। श्री गुरवे नम : ।।
मंडळी, श्रीगणेश हा चौदा विद्यांचा आणि चौसष्ट कलांचा अधिपती. या चौसष्ट कलांपैकी पाककला ही आपल्या सर्वांच्या जीवनात रोजच संबंध येणारी कला - अहो, त्यामुळेच तर उदरभरण होतं, जिभेचे चोचले पुरवले जातात (खरं तर अन्न ही माणसाची मूलभूत गरज भागवली जाते). म्हणूनच आपल्या प्रत्येक सण-उत्सवाशी कोणता ना कोणता खाद्यपदार्थ निगडित असतो - उदा., गुढीपाडवा आणि श्रीखंड, होळी आणि पुरणपोळी, दसरा आणि जिलबी, लक्ष्मीपूजन आणि अनारसे इ. अर्थातच, श्रीगणेशोत्सवाशी अतूटपणे जोडलेला पदार्थ म्हणजे बाप्पाला आवडणारा मोदक.
आणि या मोदकांचे प्रकार तरी किती! उकडीचा, तळलेला, पुरण भरलेला... मात्र हे सगळे प्रकार बनवायला जरा अवघडच. म्हणूनच, अगदी सोपी कृती असलेला मोदक बनवू या. हां, हा मोदक खायचा नाहीये, तर सजावटीचा - 'ओरिगामी' मोदक आहे. ओरिगामी हीसुद्धा एक कलाच आहे, म्हणून ओरिगामी मोदकाचा 'आरासरूपी नैवेद्य' कलेचा अधिपती श्रीगणेशाला अर्पण.
ऋणनिर्देश - डहाणूच्या ओरिगामी कलाकार सौ. शुभांगी करंदीकर या मोदकाच्या मूळ अभिकल्पक (Designer). मोदक तयार करण्याच्या कृतीचं चित्रीकरण करण्याची आणि ते प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
आपण दोन टप्प्यांमध्ये ओरिगामी मोदक बनवू. पहिला टप्पा आहे 'प्रिलिमिनरी' हा मूलभूत आकार बनवणं. यासाठी आपण 'कामी' (एका बाजूने रंगीत, दुसऱ्या बाजूने पांढऱ्या रंगाचा चौरस कागद) वापरू.
तर, आता 'प्रिलिमिनरी' हा मूलभूत आकार तयार आहे. यापासून मोदक तयार करू.
'कामी'ऐवजी 'ड्युओ' (दोन्ही बाजूंना एकाच रंग असलेला कागद) किंवा दुरंगी ('बायकलर' - दोन्ही बाजूंना वेगळे रंग असलेला कागद) वापरूनही मोदक तयार करता येतील.
चला तर मग, आपल्या लाडक्या गणपतीबाप्पाला रंगीबेरंगी ओरिगामी मोदकांचा 'आरासरूपी नैवेद्य' दाखवू.
प्रतिक्रिया
2 Sep 2019 - 6:24 am | यशोधरा
ही आरास आवडली!
2 Sep 2019 - 7:09 am | गवि
छान.
कागद बाप्पाच्या मोदकांसाठी म्हणजे चांगल्या कार्यासाठी 'कामी' आला..
2 Sep 2019 - 10:04 am | नाखु
आणि विलक्षणच.
आपली शिष्या दोनेक दिवसात हा मोदक घरी करणार.
नूलकर सरांच्या शिष्येचा पालक पांढरपेशा मिपाकर नाखु
2 Sep 2019 - 10:28 am | महासंग्राम
https://twitter.com/misalpav/status/1168387348054167552
2 Sep 2019 - 12:43 pm | पद्मावति
वाह..मस्तंच.
2 Sep 2019 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
नूलकर साहेब म्हटले की काही भन्नाट ओरिगामी कलाकुसर बघायला मिळेल असा विचार येतो... आणि तो नेहमीच सार्थ ठरतो !
2 Sep 2019 - 1:29 pm | टर्मीनेटर
ओरिगामी मोदकाचा 'आरासरूपी नैवेद्य' खूप आवडला! फोटोही छान आहे.
ही सुंदर कलाकृती मिपाकरांसाठी उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद _/\_
2 Sep 2019 - 2:23 pm | प्रशांत
बाकि तुम्हि सकाळी सकाळी कामाला लावलं
प्रयोग करुन बघितला १० पैकि किति गुण द्याल
2 Sep 2019 - 5:32 pm | मदनबाण
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रांजण गावाला, गावाला, महागणपती नांदला... :- Kartiki Barge | Unplugged |
3 Sep 2019 - 8:24 pm | स्वाती दिनेश
फार सुंदर दिसत आहे,
स्वाती
4 Sep 2019 - 8:25 am | ज्ञानोबाचे पैजार
सुरेख आणि समयोचित
करुन पहातो
पैजारबुवा,
4 Sep 2019 - 3:44 pm | अलकनंदा
अरे वा, ओरिगामी प्रात्यक्षिक!
मोदक करून पाहीन आणि इथे फोटो टाकेन. ( असं निदान आत्ता ठरवलंय)
पण, खरंच भारी वाटतात ह्या ओरिगामी कलाकृती बघायला. नाजूक आणि सुंदर. फुलपाखराच्या पंखांसारख्या.
5 Sep 2019 - 2:39 pm | वर्षा
अरे वा खूपच सुंदर
माझ्या मुलगा खूप छान ओरिगामी करतो. त्याला नक्की दाखवते.
7 Sep 2019 - 6:25 pm | तुषार काळभोर
ओरिगामी म्हणजे फार क्लिष्ट काही तरी, त्यामुळे होडी आणि विमान या पलीकडे काही कधी बनवलंच नाही.
असं काही पाहिलं की किती सोपं आहे असं वाटतं आणि करून बघावसं वाटतं.
7 Sep 2019 - 7:38 pm | जुइ
अतिशय सुरेख दिसत आहेत मोदक. नक्कीच करून बघणार!
7 Sep 2019 - 7:51 pm | सुधांशुनूलकर
यशोधरा, गवि, नाखु, महासंग्राम, पद्मावति, डॉ सुहास म्हात्रे, टर्मीनेटर, प्रशांत, मदनबाण, स्वाती दिनेश, ज्ञानोबाचे पैजार, अलकनंदा, वर्षा, पैलवान, जुइ
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
मोदक स्वतः नक्की करून बघा. अगदी सोपे आहेत.
व्हिडिओ बघून सहज करता आले, तर मी परीक्षेत पास!
7 Sep 2019 - 8:01 pm | प्रचेतस
तपशीलवार व्हिडीओमुळे कलाकृती करणे एकदम सुलभ वाटते आहे. धन्यवाद काका.
9 Sep 2019 - 12:09 pm | वर्षा
नूलकर सर, तुमचा व्हिडीओ बघून माझ्या मुलाने (ओंकार वय ११) केलेले ओरिगामी मोदक. सगळ्यांना खूपच आवडले. तुमचे खूप खूप आभार.
9 Sep 2019 - 6:35 pm | तुषार काळभोर
खूप छान!!
13 Sep 2019 - 1:11 pm | वर्षा
धन्यवाद! :)
10 Sep 2019 - 5:26 pm | सुधांशुनूलकर
खूपच छान बनवलेत. त्याचं अभिनंदन आणि त्याला शुभेच्छा.
खरं म्हणजे मी परीक्षेत पास झालो, असं वाटतंय - व्हिडिओ बघून एक लहान मुलगाही हे तयार करू शकला. या मोदकांच्या मूळ डिझायनर शुभांगीताई करंदीकर यांनाही हे कळवतो.
13 Sep 2019 - 1:12 pm | वर्षा
थँक्यू !! शुभांगीताई आणि तुमच्या कलाकृती कुठे बघायला मिळतील? फेसबुक/इन्स्टाग्रामवर पेज वगैरे आहे का?
30 Oct 2019 - 9:23 pm | ऋतु हिरवा
वा..मस्त ..मी दोन ओरिगामी गणपती तयार केले होते. आता मोदक पण करून बघेन