एक महाराष्ट्रीय स्त्री जेव्हा देशाची लाज काढते ? :(

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
12 Aug 2019 - 9:04 pm

पाकीस्तान कडून भारतीय पत्रकारांना इनफ्ल्युएन्स करण्याचे प्रयत्न कसे केले जातात याचा पाकीस्तानच्या माजी राजदुत अब्दुल बासीत याने उघड गौप्य स्फोट केला आहे. बरे कुणि नवखी लेखिका आहे असेही नाही

खालील व्हिडीओ पुरेसा बोलका आहे.

संबंधीत लेखिकेने पाकीस्तानी राजदुताच्या सांगण्यावरून लिहिले याचा इन्कार केला असला तरी देशाचे तुकडे तुकडे करण्याचे अप्रत्य़क्ष समर्थन करणारी देशाच्या अधिकृत भूमिके विरुद्ध २०१६ च्या लेखातील भूमिका लपत नाहीच. भारतातील अग्रगण्य वृत्तपत्रातून असे ठरवलेले देश विरोधी लेख छापून आणता येतात शिवाय वरून भारत सरकार असहिष्णू असल्याचे दावे ही करता येतात ?

संताप जनक आहे

* ओपीइंडीयावरील या प्रकारा बद्दल विश्लेषण लेख

* उत्तरदायीकत्वास नकार लागू

डावी बाजू

प्रतिक्रिया

'जनमत घेऊन कायमचं ठरवा' हे बऱ्याच कान्ग्रेसी नेत्यांचंही मत आहे अजून. पवारसाहेबांनी आताच म्हटलं होतं " लोकांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवायला हवा होता. पण कान्ग्रेसने त्यांचे सरकार असताना हे असे जनमत घेण्याचे का अंगावर घेतले नाही?
आणि जनमतावर एवढा विश्वास होता तर पाकने युद्ध कशाला केले?
शोभा डे ही निर्भिडपणे कुणालाही बोलू शकते, मत नोंदवते. कुणा पाक पत्रकाराने तिच्या मताचे श्रेय उपटण्याचे कारण नाही.

माहितगार's picture

13 Aug 2019 - 9:25 am | माहितगार

आतंकवादाला शरण जाण्यास सांगणार्‍या भूमिकेस निर्भीडपणा कसे म्हणता येईल हे उमगले नाही. उद्या त्यांच्या गल्लीत कुणि कायदा हातात घेतला म्हणून गल्ली देशापासून वेगळे करण्यासाठी जनमत घेण्याची मागणी करणार का तुकडे तुकडे गँग.

नेहरूंनाही प्लेबीसाईट अभिप्रेत नव्हते आणि भाजपानी ज्या मार्गाने ३७० बंद केले त्याचमार्गाने बंद करणे हि स्वतः नेहरुंची अपेक्षा होती या बद्दल एक अभ्यासपुर्ण लेख आलेला आहे.

बाकी युट्यूबवरून व्हिडीओ उडवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शंका वाटत होती आणि कॉपीराईटचे कारण देऊन प्रकरण अंगावर आल्यामुळे लपवालपवी झालेली दिसते. क्रेडीट घेणारा पाकीस्तानी राजदूत बासित भारत प्रेम असलेला पाकीस्तानी नव्हे तर सातत्याने भारत विरोध करणारे प्रकरण आहे त्याचा शब्द प्रमाण मानला पाहिजे असे नाही पण आपल्या देशाच्या एकसंघतेचे महत्व स्वतः भारतीयांना कळावयास नको का? भारताच्या शत्रुंना अशी संधी तरी का द्यावी ?

सुबोध खरे's picture

13 Aug 2019 - 11:03 am | सुबोध खरे

शोभा डे हि एक श्रीमंतीचा माज असलेली दक्षिण मुंबईतील आढ्यताखोर स्त्री आहे.

अनेक वेळेस ते तिच्या लिखाणातून दिसून येते.

उदाहरणादाखल एकदा लिहिताना तिने लिहिले होते कि SOMEWHERE IN NORTH BOMBAY IN OSHIWARA WHEREVER IT IS.

पुरोगामी डाव्या विचारसरणीची हि लेखिका प्रसिद्धीत राहण्यासाठी काहीही करू शकते त्यामुळे बेताल वक्तव्ये करणाऱ्या अशा दीड शहाण्या लोकांना अनुल्लेखाने मारणे हेच बरोबर आहे.

सुबोध खरे's picture

13 Aug 2019 - 11:08 am | सुबोध खरे

"Dear Amit Shah,
now that you have solved the Kashmir problem can you please take some time out and also resolve the Saki Naka traffic problem which is going on also since 1947"

Shobhaa De Gets Trolled Again For Asking Amit Shah To Solve Saki Naka's Traffic Woes Next

https://in.mashable.com/culture/5497/shobhaa-de-gets-trolled-again-for-a...

अकलेचे तारे तोडणाऱ्या असल्या पत्रकारांना जोड्यानेच मारले पाहिजे.

देशाच्या गृह मंत्र्यांना रस्त्यावरील खड्डे आणि वाहतुकीचे प्रश्न सोडवायला बोलावणे ( ज्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही) यावरून या बाईची अक्कल दिसून येते.

देशाच्या गृह मंत्र्यांना एकेरी नावाने संबोधित करताना यांनी आपल्या अकलेची दिवाळखोरी दाखवून दिली आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Aug 2019 - 12:25 pm | प्रकाश घाटपांडे

देशाच्या गृह मंत्र्यांना एकेरी नावाने संबोधित करताना यांनी आपल्या अकलेची दिवाळखोरी दाखवून दिली आहे. >>> इंग्रजी मजकूरात एकेरी ?

रविकिरण फडके's picture

14 Aug 2019 - 3:11 pm | रविकिरण फडके

माझ्या मित्राला, खूप परिचित/ जवळच्या अशा व्यक्तीला मी नुसते 'अमित', 'शुभांगी', असे म्हणू शकतो. पण मोठ्या किंवा अपरिचित माणसाला संबोधताना, ज्याला honorific म्हणतात असे, Mr , Ms , Dr , Prof , इ. इ., जसे Mr . Amit , Ms . Shubhangi , असेच म्हटले पाहिजे.
अशा अर्थाने एकेरी.

सुबोध खरे's picture

14 Aug 2019 - 6:50 pm | सुबोध खरे

Dear Amit Shah,

हे संबोधन भारताच्या लोकनियुक्त गृहमंत्र्यांना सार्वजनिक न्यासावर योग्य आहे?

असे आपले मत असले तर बोलणेच संपले.

वैयक्तिक पत्रव्यवहारात ओळखीच्या माणसाला एक वेळ ठीक आहे.

सामान्यनागरिक's picture

19 Aug 2019 - 5:19 pm | सामान्यनागरिक

अश्या लोकांना अनुल्लेखनेच मारले पाहिजे.
उद्या टाइम्स ~ओफ ईन्डीयाने आणी ईतर सर्वांनी त्यांचे लेख प्रकाशित करणे बंद केले हीच

आपण चर्चा करुन राळ उडवली आणी कितीही वाईट लिहीले तरी या बाईला आनंदाच्या ऊकळ्या फुटतील. कारण निगेटीव्ह का होइना आपली दखल घेतली गेली.

एक वर्षांनंतर जेंव्हा लोक 'कोण शोभा डे?' असं विचारतील तेंव्हा शिक्षा पूर्ण होईल.

सुबोधजी
वर तुम्हीच म्हणताय
शोभा डे हि एक श्रीमंतीचा माज असलेली दक्षिण मुंबईतील आढ्यताखोर स्त्री आहे.

डाव्या विचारसरणीची आणी श्रीमंतीचा माज ?
शोभा डे यांचा आणि डाय्वा विचारसरणीचा संबंध तुम्हास कुठे आढळला ? म्हणजे किमान त्यांचे एखादे तरी स्टेटमेंट एखादा तरी लेख एखादे तरी पुस्तक एखादी का होइना मुलाखत ज्यातुन कळते की शोभा डे या डाव्या विचारसरणीच्या आहेत वा त्याच्या समर्थक आहेत हे तुम्ही दाखवाल तर कळेल तरी इतकी नवी बाब जनतेला
की शोभा डे या डाव्या विचारसरणीच्या आहेत.
कारण आजपर्यंत जी माहीती आहे त्यांच्य्याविषयी ती पुर्णपणे वेगळीच आहे.
शोभा डे या मुंबईच्या एकुण उच्च नव्हे तर अति उच्च वर्तुळात कायम वावरत असलेल्या आहेत त्यांच्या अनेक लेखांतुन दक्षिण मुंबई विषयीचा तिच्या श्रीमंती विषयीचे कौतुक त्यांच्या लिखाणात वारंवार आढळते. त्या मुंबईच्या अतीउच्च सोशलाईट वर्गातील पार्टीज मध्ये बॉलिवुड इ. मध्ये पेज थ्री पर्स्ननॅलीटीज इ. त नेहमी दिसुन येतात तशी त्यांची उघड उघड ओळख आहे. अप्रत्यक्षपणे त्या मुंबईच्या उच्चतम कॅपिटलीस्ट क्लास च्या प्रतिनीधी च जणू असल्यासारख्या वाटतात
या विरोधात जर त्या डाव्या विचारसरणीच्या असतील ( तुमच्या म्हणण्याप्रमाणे ) तर हे फारच रोचक प्रकरण असेल
कृपया द्या ना एखादी त्यांच्या संबंधातील डावी लिंक
किमान एखादा लेख
किमान एखादे स्टेटमेंट

नेत्रेश's picture

13 Aug 2019 - 8:58 am | नेत्रेश

This video is no longer available due to a copyright claim by Dr Farhan Virk.

महासंग्राम's picture

13 Aug 2019 - 9:01 am | महासंग्राम

गल्ली चुकली काय

गवि's picture

13 Aug 2019 - 10:24 am | गवि

एक प्रश्न:

तो माजी राजदूत जर असं म्हणत असेल की "आमच्या (पाकिस्तान) म्हणण्यावरुन भारतीय लेखिकेने भारतविरोधी लेख लिहिला" तर असं म्हणण्यात त्याला काय फायदा? अगदी असं खोटं बोलण्यात तरी पाकिस्तानचा काय फायदा?

उलट भारतीय लेखिकेने स्वतःच्या मनाने, उत्स्फूर्तपणे, कोणत्याही बाह्य सूचनेशिवाय असा लेख लिहिला असं पसरवणं त्यांना फायद्याचं नाही काय?

अगदी खरेच पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार डे यांनी भारताच्या भूमिकेविरोधात लेख लिहिला असता तरी उलट तो डे यांनी उत्स्फूर्तपणे लिहिला आहे आणि त्यात पाकिस्तानचा हात नाही असं त्या राजदूताने सांगणं जास्त तर्कात बसणारं वाटलं असतं का?

त्यामुळे तो खोटं बोलत असेल याला आधार मिळत नाही. एकच शक्यता की तात्कालिक काही व्यक्तिगत खटक्यामुळे डे यांना उघड पाडणे असा हेतू.

आनन्दा's picture

13 Aug 2019 - 10:34 am | आनन्दा

बर्याच वेळेस अश्या मोहर्‍यांना माहीत नसते की ते वापरले जातायत.
आता तरी डोळे उघडावेत अशी अपेक्षा आहे.

Rajesh188's picture

13 Aug 2019 - 11:14 am | Rajesh188

शोभा डे चा आतापर्यंत चा इतिहास बघितला तर ह्या बातमीत सत्यता आहे असेच वाटते .
टाइम्स सारख्या प्रसिद्ध वृत्तपत्रात हिला का लीहण्या ची संधी का दिली जाते हे पण तपासावे लागेल .

भंकस बाबा's picture

13 Aug 2019 - 11:30 am | भंकस बाबा

हे दोन शब्द पुरेसे आहेत.
दोघासाठी

भंकस बाबा's picture

13 Aug 2019 - 11:31 am | भंकस बाबा

हे दोन शब्द पुरेसे आहेत.
दोघासाठी

प्रकाश घाटपांडे's picture

13 Aug 2019 - 12:01 pm | प्रकाश घाटपांडे

हिला म्हणतात अभिजनांची राखी सावंत- भाउ तोरसेकर
http://jagatapahara.blogspot.com/2015/04/blog-post_9.html?fbclid=IwAR1m_...

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2019 - 1:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

शोभा डे ही निर्भिडपणे कुणालाही बोलू शकते, मत नोंदवते. खरेच ?!

आपल्या बेजबादार आणि बेताल वक्तव्यांमुळे जर आपल्यावर कारवाई झाली तर आपल्या जातकुळीचे लोक आपल्या पाठीशी उभे राहून गदारोळ माजवतील. अर्थातच कायदेशीर कारवाई होणार नाही, अशी खात्री असल्यावर असे बोलणे याला 'निर्भिडपणा' नाही तर 'क्षुद्र बनेलपणा' म्हणता येईल.

अनेक वर्षांपूर्वी एक-दोन वादग्रस्त पुस्तके लिहून ही बाई प्रसिद्धीच्या झोतात आली आणि तथाकथित सिक्युलर विचारजंतांच्या कळपात सामील झाली. गेली अनेक वर्षे, अनेक सलग महिने, ती माध्यमांतील प्रसिद्धीबाहेर असते, कारण तिच्याकडे बोलण्याजोगे फारसे काही महत्वाचे नसते. पण, प्रसिद्धीचा हव्यास असल्याने, ती मधून मधून उगाच विचित्रे वादग्रस्त विधाने करून टुकार माध्यमांत दोन मिनिटांची प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते. 'सैन्य गोळी मारणार नाही याची खात्री असल्यावर दगफेक करणारे' आणि 'अश्या व्यक्ती' यांच्यात अर्थाअर्थी काहीच फरक नाही. :)

"घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् | येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत् || (पक्षी : मडकी फोडा, कपडे फाडा, गाढवावर बसून (गावभर) हिंडा, काही करा पण प्रसिद्धी मिळवा)" किंवा "making one's presence felt by nuisance" ही वचन अश्या बनेल लोकांना चपखल बसतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2019 - 1:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

* ३७०/३५अ ला हात लावला तर काश्मिर पेटून उठेल.

* ३५अ ला लागणारा हात नाही तर त्याचे सर्व शरीर जळून राख होईल.

* काश्मिर कोणाच्या बापाचा नाही.

अशी आणि इतर बरीच विधाने उच्चस्वरात, छाती ठोकत राष्ट्रिय वाहिन्यांवर, अनेक वर्षे वल्गना करणारे, आता केवळ एकमेकाला दुषणे देत बसलेले आहेत किंवा "मला कैदेत टाकले" असे ५स्टार हॉटेलमध्ये बसून रडत रडत सांगत आहेत. यावरून काय ते ओळखा.

जरा कातडी खरवडली की वैयक्तिक फायद्यासाठी काहीपण (स्वत्वही) विकायले बसलेल्या लोकांचे पितळ उघडे पडते. मात्र, आपण डोळे उघडे ठेवून ते पहायला शिकले पाहिजे.

शोभा डे यांंनी एक दिर्घ कालीन प्रवास केलेला आहे. त्यांनी मॉडेलींग च्या क्षेत्रापासुन यशस्वी सुरुवात केलेली आहे
शोभा डे या स्टारडस्ट सोसायटी सारख्या अनेक लोकप्रिय मासिकांच्या यशस्वी संपादक होत्या.
शोभा यांनी इंग्रजीतुन लिहीणार्‍या भारतीय लेखकांमध्ये एक वैशिष्ट्य्पुर्ण स्थान मिळवले आहे. त्यांनी पहील्यांदाच आधुनिक भारतीय स्त्रीच्या लैंगिकतेचे अंतरंग पदर उलगडवुन दाखवणार्‍या कादंबर्यांचे लेखन केलेले आहे. एक नवे दालन त्यांनी उघडले. त्यांच्या अनेक कादंबर्यांनी बेस्ट सेलर्स च्या यादीत स्थान मिळवलेले आहे.
शोभा डे या नेहमीच आपल्या स्तंभातुन एक निर्भिडतेने आपले जे काय मत असेल ते व्यक्त करत असतात. ते मत व्यक्त करतांना त्या कुठल्याही प्रकारचा आडपडदा ठेवत नाहीत.
त्यांनी इंग्रजीतुन लिहीतांना ( एरवी अनेक भारतीयांच्या मध्ये इंग्रजी लिखाणातुन वा बोलण्यातुन जो एक गंड इंग्रजीच्या अचुकते विषयी उच्चाराविषयी जाणवत असतो ) तसा न बाळगता त्या अगदी बिनधास्त त्यांच्या लिखाणात हिन्दी व इंग्लीश मिळुन जी एक हिंग्लीश म्हणवली जाणारी व प्रत्यक्ष बोली भाषेत अस्तित्वात असलेली शहरी भाषा तिचा मुक्तपणे वापर त्या आपल्या स्तंभ लेखनात ( ते ही टाइम्स सारख्या ब्रिटीश वारसा जपणार्‍या ब्रिटीश अंमल असलेल्या वर्तमानपत्रात) करतात यावरुन त्यांची धाडसी वृत्ती व अपारंपारीक शैली दिसुन येते.
त्यांचे वेगळ्या शैलीतले वेगळ्या विषयावरचे रोचक लिखाण त्यांच्या
Speedpost: Letters to My Children about Living, Loving, Caring and Coping with the World
Spouse: The Truth about Marriage
या दोन पुस्तकात आढळुन येते.

सर्वात गमतीची बाब अशी की "शेजारुन" आलेले कुठल्याही नेत्याचे वा पत्रकाराचे कुठलेही विधान असो ते किती खोटे असत्य आहे असा विरोध नेहमी होत असतो
याला छेद देत यावेळी "शेजारुन" आलेले विधान कुठलीही चाळणी न लावता " डायरेक्ट " कसे अ‍ॅक्सेप्ट करण्यात आले हे अनाकलनीय आहे
म्हणजे यावेळेस तो खोट बोलत आहे असे असुच शकत नाही आमची शोभा अशी नाही असे कसे म्हणण्यात आले नाही
असो

पाकिस्तानातील ‘द डॉन’ने नचिकेत जोशी या सध्या फ्रान्समध्ये पीएच.डी. करणाऱ्या मुंबईकर विद्यार्थ्यांचा लेख पुनप्र्रसिद्ध केला आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणारा भारत कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे, हे त्याने अरुण कोलटकर यांच्या ‘सर्पसत्र’ या कवितेचा संदर्भ देऊन स्पष्ट केले आहे. बाबरी मशिदीचा विध्वंस आणि गुजरात दंगलीच्या पाश्र्वभूमीवर कोलटकरांनी ती रचली होती. सर्पसत्र ही महाभारतातील त्याग व संहार याची कथा आहे.

https://www.dawn.com/news/1467781/in-india-a-poem-composed-after-babri-m...

श्रीमान मारवाराव,

पाकधार्जीण्या बेगम शोभाबाईंनी पाकीस्तानी राजदूताच्या सांगण्यावरून रावळपिडींतील गुप्तचर संस्थेने पैसे दिलेली अजमल कसाबने आणि बुर्‍हाण वाणीने मिळून बनवलेली बिर्‍याणी किती चविष्ट असते याचे रसभरीत वर्णन
देशप्रेमाची बोली लावू इच्छित आपणासारख्यांना लाख आस्वादक वाटले तरी, भारत देशाचे तुकडे करु इच्छित असलेल्या दहशतवादास बळीपडलेल्या भारतीयांच्या रक्ता मांसाने बनलेल्या बिर्‍याणीची, तडजोड विना एकसंघ भारताचे स्वप्न पहाणार्‍यांना केवळ शिसारीच येऊ शकते.

समुह द्वेष कोणत्याही बाजूने असोत ते चुकिचेच हे वेगळे सांगण्याची का गरज असते. त्या पाकधार्जीण्या बेगम शोभाबाई असोत की आपल्यासारखी तथाकथित धर्म निरपेक्ष मंडळी असोत स्वकीयांच्या चुका काढताना केवळ एकाच बाजूच्या चुका काढताना दुसर्‍या बाजूंच्या निसटत्या बाजूंकडे दुर्लक्ष करताना -इंग्रजीत चेरी पिकिंग करताना - समस्त तथाकथित धर्म निरपेक्षांना लाजा कशा वाटत नाहीत?

आपल्या प्रिय पाकधार्जीण्या बेगम शोभा बाईंनी ते त्या तथाकथित धर्म निरपेक्ष नचिकेतरावांनी किंवा त्यांचे गुरु कोलटकर का कोणते त्यांच्या लेखनातून पर्सनल लॉवादी , ते कलम ३७० ते द्विराष्ट्रवादी ते त्यांचे उत्पातमुल्य ते त्यांचा दहशतवाद - धर्मनिरपेक्ष कसे असते? आणि धर्म निरपेक्ष नसेल तर त्या बद्दलची नेमकी कोणती टिका त्यांच्या लेखातून केली आहे हे कृपया दाखवून द्याल काय?

ज्या मिथॉलॉजीत केवळ सर्पसत्रांची आणि वनदहनाची वर्णन केली त्यावरून तुम्ही आजच्या काळातले जेनोसाईडचे अर्थ काढता, ते नेऊन चेरी पिकिंग निवडक भारतीय विरोधकांना नेऊन सरसकटीकरण करून देशाबाहेर बदनामीचे पोस्टर चिटकवता ? जाब जरूर विचारावेत पण नाण्याच्या एकाच बाजूला ? हि निश्चितपणे व्हॉट अबाऊटगिरी आहे पण व्हॉटाबाऊटगिरीकडे बोट दाखवण्याने, एकाच बाजूबद्दल प्रश्न विचारण्याचा पक्षपातीपणा केल्यानंतर, प्रश्न उपस्थित करण्याचे नैतीक अधिकार संपलेले नसतात किंवा कसे?

किमान तुम्ही हिंदूधर्म ग्रंथांना अशा पद्धतीने लक्ष्य करण्याचे स्वातंत्र्य बीट बोभाटपणे उपभोगता - जरुर उपभोगा प्रस्तुत प्रतिसादक कोणत्याही पुस्तकपुजेच्या बाजूने नाही - पण ज्या शत्रुंच्या हाती स्वकीयांच्या बदनामीची शस्त्र सामग्री उपलब्ध करून देण्याचा तुम्ही चंग बांधला आहे त्यांनी त्यांच्या धर्म ग्रंथातून केलेल्या मुर्तीपुजक काफीर पागान आणि काफीरेतर हे द्विभाजन लादून मुर्तीपुजक काफीर पागान यांच्या बद्दलच्या द्वेष निर्मिती बद्दल त्यांच्या घडवल्या गेलेल्या जेनोसाईडस बद्दल त्यांच्या मिथॉलॉजीतील मर्यादांबद्दल नेमके कोणकोणते प्रश्न आणि किती तीव्रतेने उपस्थित केलेत याचे हिशेब नेमके केव्हा देणार ?

त्याही पेक्षा महत्वाचे खाल्ल्या ताटात छेद करणारे देशविरोधी लोकहो, देशाचे तुकडे तुकडे तत्वज्ञानाच्या प्रसाराने जे देशाचे नुकसान होते त्याचा जाब केव्हा देणार ?

एका मुलाखतीत शिवसेनेलाही परखड बोलली आहे.
-----
ते ओशिवरा, किंवा दुसरी काही जागा, कुठे असेल ते वगैरे अशा पद्धतीने दक्षिण मुंबईत बोललेही जाते. ते फक्त तिने लेखी केले एवढेच. खड्डे काढायला अमक्यला बोलवा वगैरे छापही बोलतात लोक.
-----
टाइम्समधले लेख - तिच्या ब्लॉगवर असतात लेख.
लोकांनीही ब्लॉगवरून उत्तर द्यावे.
-------
सरकारी धोरणावर टीका करावी का हासुद्धा वादाचा विषय अलीकडेच झाला. पुन्हा ती योग्य का अयोग्य हे ठरवणार कोण?

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2019 - 7:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुन्हा ती योग्य का अयोग्य हे ठरवणार कोण? खरेच ?!

शोभा डे ला जसे हवे ते बोलण्याचा अधिकार मानला जातोय, पण, इतरांना तिच्या बोलण्यातला खरे-खोटेपणा आणि/किंवा चलाखी आणि/किंवा ढोंग उघड करण्याचा अधिकार नाही का ???!!!

अश्या मानसिकतेमुळेच, "तथाकथित भारतिय विचारवंत, फक्त आम्हालाच बुद्धीचे आंदण मिळाले आहे, आम्ही म्हणू तेच खरे आणि इतर कोणालाही आमच्यावर टीका करण्याचा (किंवा आमचे पितळ उघडे पाडण्याचा) अधिकार नाही" असा अहंकार बाळगून आहेत.

भारतात लोकशाही आहे, तथाकथित विचारवंतांची हुकुमशाही नव्हे, असे माझे मत आहे. अर्थातच, कोणत्याही दाव्याचा प्रतिवाद करण्याचा हक्क सर्वांनाच आहे. ज्याला तेच तथाकथित विचारवंत "विचारस्वातंत्र्य" म्हणतात आणि ज्याच्या नावाने ते सतत गळे काढत असतात, तोच हा हक्क आहे. तो हक्क इतर सर्व भारतियांनाही आहे.

तेव्हा, जिला स्वतःची बुद्धी आहे व तिचा वापर करून पुरावे व तर्क यांच्या बळावर तथाकथित विचारवंतांच्या बोलण्यातला फोलपणा समजू शकते, त्या प्रत्येक व्यक्तीलाही आपले विरोधी मत नोंदविण्याचा अधिकार आहे.

पूर्वीही, तथाकथित विचारवंतांच्या चलाखीने किंवा प्रोपागँडाने सगळ्याचे डोळे त्यांच्या दिपून जात नसत. तेव्हाही, थोडीशी बुद्धी असलेल्या आणि ती वापरणार्‍यांना, त्यांच्या बोलणे-लिहिणे-मतांतील खोटेपणा-चलाखी-फोलपणा सहज लक्षात येत असे. परंतु, तथाकथित विचारवंतांनी कंपू करून सर्व माध्यमे हातात ठेवली होती व आपल्याविरोधी मत असल्याचा संशयही असलेल्यांच्या मतांची ते गळचेपी करत असत... त्यांची प्रसिद्धी होऊ देत नसत. हल्ली, आंतरजालावरची अनेक माध्यमे सर्वसामान्यांसाठी खुली आहेत. त्यामुळे, कोणाच्याही मतांतील सहज दिसणार्‍या ढोंगावर आणि/अथवा चलाखीवर इतर लोक सहजपणे टीका करू शकतात... अर्थातच, तथाकथित विचारवंतांचे मातीचे पाय सतत उघडे पदत आहेत. त्यामुळे, लोकांची दिशाभूल करून स्वतःची तुंबडी भरण्याची त्यांची दुकाने बंद झाली आहेत. हल्ली जास्तच दिसणार्‍या, तथाकथित विचारवंतांच्या, जळजळीचे हेच मुख्य कारण आहे.

Rajesh188's picture

13 Aug 2019 - 2:40 pm | Rajesh188

टीका करावी पण फक्त ठराविक गोष्टीवर नाही तर सर्वच चुकीच्या गोष्टीवर टीका केली पाहिजे .
ते स्वीकारु शकतो .
पण शोभा डे आणि त्या जातकुळी तील लेखक चष्मा लावून फिरत आहेत .
आणि त्यांची टीका सुद्धा जे त्यांच्या चष्म्यातून आणि द्वेषातून करतात ते एकदम अयोग्य आहे .ती बाई अशीच द्वेषाने पिवळी झालेली आहे

द्वेष असेल असं मला वाटत नाही ... बाईंना प्रसिद्धीच्या झोतात राहायचं आहे एवढंच .. सामान्य माणसाने अशी वक्तव्यं केली तर कुणीही सिरियसली घेत नाही .. ह्या सेलिब्रिटी लोकांचं बोलणं मात्र एखाद्या तज्ज्ञाच्या मतासारखं अचूक असलं पाहिजे नाहीतर बोलूच नये असा आग्रह असतो ... ह्या बाई भारताच्या रिप्रेझेंटिटीव्ह नाहीत हे बहुधा सर्व प्रमुख देशांना माहीत असेल , भारताबाहेर कोणीही ह्यांच्या मताला कवडी एवढी किंमत देत असण्याची सुतराम शक्यता नाही ... इथेच ह्यांच्या बिनबुडाच्या वक्तव्यांनी जो धुरळा उधळतो त्यातून बाईंचा काहीतरी लाभ होत असणारच ... वादग्रस्त का होईना प्रसिद्धीमुळे त्या ज्या श्रीमंत सेलिब्रिटी वर्तुळात वावरतात तिथे त्यांचा भाव वधारत असावा , चार लेख अधिक छापून येत असणार , चार पैसे ( म्हणजे हजारोच्या रकमेत ) अधिक मिळत असणार ... सेलिब्रिटी लाइफस्टाइल मेंटेन करायची तर ते गरजेचे आहेत .. आपला भाव जरा कमी होतो की काय वाटलं की असं काहीतरी विधान करून पुनः प्रसिद्धीचा झोत आपल्यावर पाडून घ्यायचा बाकी काही नाही ...

नाखु's picture

13 Aug 2019 - 3:52 pm | नाखु

नावाला जागतात हे नक्की!!!

शोभा करुन घेणे हे दिवसरात्र ( डे नाईट) कर्तव्य आहे आणि ते पार पाडण्यासाठी वागळे यांच्या कंपूत सामील झाले की बास.

बाकी त्या प्रणव रॉय बद्दल कुणी उमाळे उसासे काढले नाहीत मिपावर.

वाचकांची पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

कंजूस's picture

13 Aug 2019 - 6:21 pm | कंजूस

बरं.

शोभा डे यांच्या सिलेक्टिव्ह मेमरी या आत्मकथनाचं मराठी भाषांतर कोणी वाचलं आहे का ... लेखिकेच्या सध्याच्या बेजबाबदार वर्तनाचा विचार जरा बाजूला ठेवला तर मनोरंजन म्हणून वाचायला खूप छान आहे पुस्तक ... कर्मठ कुटुंब , मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं लहानपण , पुढे मॉडेलिंगचं करिअर , बहिणींनी दिलेली साथ , आईवडिलांचे स्वभाव , फिल्म इंडस्ट्रीतले किस्से , स्वतःचं मॅगझीन सुरू करणं , त्यात सुरुवातीला आलेलं अपयश , आर्थिक फटका , दिवाळं निघणं , नैराश्य , लग्न मोडणं , स्वतःच्या लहान मुलापासून दुरावणं , दुसरं लग्न , सावत्र मुलांशी कसे घट्ट बंध जुळले , 2 सावत्र मुलं , आधीच्या लग्नापासून झालेला एक मुलगा आणि दुसऱ्या लग्नानंतर झालेली 3 मुलं यांची आई होताना , सुपरवुमन बनण्याच्या नादात कशी वाईट हालत झाली , आईचं आजारपण .. सगळं खूप प्रांजळपणे लिहिलं आहे ... स्वतः केलेल्या चुका , घोडचूका , स्वार्थी - असंवेदनशील वागणंसुद्धा न लपवता सांगितलं आहे ....

आता लेखिका जे काही वागत आहेत ते त्यांच्या व्यवसायाला लाभदायक असणार म्हणूनच .. अभिनयकौशल्य नसलेल्या नटीने बेताल विधानं करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची धडपड करावी त्यातलाच प्रकार आहे ...

सध्या यू ट्यूब वर पाकिस्तानी न्यूज चैनल च्या बऱ्याच विडिओ मध्ये वृंदा करात , ममता , रागा , थरूर , दिग्गी आणि आता शोभा यांचे कौतुक करण्याची स्पर्धा चाललेली दिसत आहे .
राजकारणी नेते देश विरोधी वक्तव्ये
अल्पसंख्यक मते डोळ्यांसमोर ठेवून करतात तर उच्चभू !!! लोक पैसे आणि अंतरराष्ट्रीय अवॉर्ड .मग त्या साठी देशाची सुरक्षा प्रतिष्ठा पणाला लावायला त्यांना लाज वाटत नाही .

ट्रम्प's picture

14 Aug 2019 - 8:33 pm | ट्रम्प

पाकिस्तानी न्यूज चैनल वर डिबेट्स च्या वेळी सगळे च्या सगळे भारता विरोधात गरळ ओकत असतात , आणि आपल्या इथल्या चॅनेल वर चार पैकी दोन तरी भारताच्या विरोधात बोलत असतात !!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Aug 2019 - 8:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतात जयचंद आणि मिर जाफरांची कमी कधीच नव्हती. हल्ली तर, मुख्य धारेतील पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांपासून ते 'स्वयंघोषित' पत्रकार/विचारवंत/मानवी हक्कांचे पाठीराखे, इत्यादींच्या रुपात, त्यांचे मोठे पीक आले आहे. :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2019 - 6:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

याशिवाय, 'भारताच्या भूतकाळातील चांगल्या गोष्टींसंबंधी अज्ञान' आणि 'स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल न्यूनगंड' असणारे लोकही भारतात भरपूर प्रमाणात आहेत. "अश्या लोकांची दिशाभूल करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले की ते आपले वर्चस्व सहजपणे मानतात, हे धूर्त तथाकथित विचारवंत जाणून आहेत.

असे खच्चीकरण झालेल्या लोकांना, काही काळाने, हे स्वताडन व ब्रेन वॉशिंग, केवळ अंगवळणीच पडते असे नव्हे, तर मनापासून आवडूही लागते. एकप्रकारे हा मानसिक स्तरावरचा स्टॉकहोम सिंड्रोमच म्हणता येईल.

"भूतकाळ पुसून टाकला की मानवी मनात निर्माण झालेल्या पोकळीत आपली विचारसरणी रुजवणे एकदम सोपे होते" हे तत्वज्ञान या मागे आहे. अब्राहमीक धर्म आणि कम्युनिस्ट यांनी याच तत्वाचा उपयोग करून जगभर आपली वाढ केलेली आहे, करत आहेत.

हिंदू द्वेष मुळे देशाविरुद्ध सर्व लोक बोलत आहेत .
भारता विरूद्ध जे बोलत आहेत त्यांच्या मनात हिंदू विषयी खूप द्वेष आहे आणि तेच खरे कारण आहे गरळ ओकण्याचे .
भारताच हिंदुस्थान होईल अशी सुप्त भीती पण आहे ह्या लोकांना .
आणि आपण सर्व सामान आहेत,धर्म निरपेक्ष राहिले पाहिजे अशा फालतू गोष्टीत अडकून पडलो आहोत .
किंवा आपल्याला जाणूनबुजून धर्म निरपेक्ष च्या तत्व न्यानात गुंतवून बेसावध ठेवले जात आहे