वासुदेव सोमण कोकणातून दहा वर्षा पूर्वीच पुण्याला स्थायिक झाले होते
सोमणांचा मुख्य व्यवसाय भिक्षुकी
लग्न -नामकरण मुंज आदी कार्ये ते करत असत
अल्पसंतोषी स्वभाव होता
यजमानांना व्यवस्थित सेवा देवे प्रसंगाचे पावित्र्य सांभाळणे हि त्यांची खासियत होती
यजमान पण त्यांच्या ह्या वागण्यावर खुश असायचे
ठरलेल्या बिदागी शिवाय त्यांना आणखीन पैसे पण मिळत असत
पुण्यात वन रूम किचन चा ब्लॉक होता
एक राजकारणी यजमान होते त्यांच्या कृपे मुळे त्यांना हा ब्लॉक सरकारी कोट्यातून अल्प दरात मिळाला होता
*
भार्या सुनंदा गृहिणी होती
प्रिया नावाची एक गोड चेहे-याची मुलगी होती
ती कॉलेज च्या दुस-या वर्षाला होती
सौंदर्य व संस्कार यानाचा मिलाप म्हणजे प्रिया
*
त्या दिवशी प्रिया घरी आली
प्रिया हातपाय धुवून घे मी तुझ्यासाठी सांजोपहार म्हणून पोहे केले आहेत
मला नको आई-आज मी हॉटेल मध्ये पाव भाजी खाल्ली आहे
काय हे -तुला माहीत आहे मला हॉटेलींग पसंत नाही
आग कॉलेजच्या मित्रा नी आग्रह केला म्हणून गेले
त्यांचे मन नाही मोडू शकले
सुंदर ने प्रिया कडे पाहिले
तिच्या डोळ्यात वेगळीच चमक तिला दिसली
रात्री प्रियाला कामुक स्वप्न पडले
स्वप्न बघता तिच्या अंगावर रोमांच उठले
जागी झाली तेव्हा तिला एक नवी अनुभूती मिळाली होती
तिचे शरीर मोहरून गेले होते
चेहे-या वर एक निराळी चमक आली होती
*
सकाळी उठल्यावर ती आरशात आपाला चेहेरा न्याहाळत होती
क्षणा क्षणाला चेहेरा बदलत होता
चेहे-यावर सुदंरता राज्य करत होती
आपण इतके सुंदर दिसतो याचे तिला नवीनच भान आले
शरीरावरील उभार बघून ती आंनदीत होत होती
हा तिला नवा अनुभव होता
*
रात्रीचे दहा वाजत आले होते पण प्रियाचा पत्ता नव्हता
सुनंदा वाट पाहात होती प्रिया घरात आली नव्हती
अधून मधून खिडकी तुन डोकावत असे
ती खूप अस्वस्थ होती
आग येईल ती किती अस्वस्थ होत आहेस -वासुदेव म्हणाला
तुमच्या लक्षात आले का ? हल्ली प्रियाचं वागणं खूप बेताल झालं आहे
काही धरबंध राहिला नाही वागण्यात
बोलत असतानाच प्रिया प्रवेशली
तिच्या दोन्ही हातात शॉपिंग बॅग्ज होत्या
आग किती उशीर ? दहा वाजून गेलेत
कुल डाऊन ममा प्रिया हसत म्हणाली
बाबा तुमचे यजमान देशमुख आहेत ना त्याचा मुलगा संग्राम यांच्या बरोबर गप्पा मारत बसले होते-
आणि हे काय नवीन कुल डाऊन ममा सुंनदा म्हणाली
आणि हि खरेदी कुठून केली अन पैसे कुणी दिले
संग्राम शी गप्पा मारता तो म्हणाला मला तुला गिफ़्ट द्यायचे आहे -आपण मॉल मध्ये जाऊ
तिथे गेल्यावर म्हणाला तुला आवडेल ते खरेदी कर
मग मी पण मनसोक्त शॉपिंग केले
ठीक आहे -बाबा म्हणाले
*
मग कधी शॉपिंग कधी सिनेमे -कधी हॉटेलिंग -पब याचे सत्र सुरु झाले
हा सारा प्रकार सुनंदा ला अस्वस्थ करत होता
प्रिया सुनंदाला जुमानत नव्हती
-
त्या दिवशी प्रिया आठ वाजता घरी आली
तिच्या तोंडाला विचित्र वास येत होता
प्रिया हा कसला वास येत आहे ? आई म्हणाली
आई मी बियर घेतली आहे -हल्ली सारेच घेतात
असे म्हणत तिने कपाटावरची ब्याग खाली काढली अन त्यात ती कपडे ड्रेस भरू लागली
आग कुठे निघाली आहेस ?
आमचा आठ नऊ मित्र मैत्रिणीचा ग्रुप आहे आम्ही चार दिवस गोव्याला जाणार आहोत
तिने वासुदेवाला बोलावले
अहो ऐकलंत का हि गोव्याला जायला निघाली आहे
प्रिया हा काय सारा प्रकार आहे ?
असे बोलत असतानाच आठ नऊ मित्र मैत्रिणी चा घोळका घरात घुसला
बाबा ना पहाताच तो काका नमस्कार असे म्हणाल
आम्ही मित्र चार दिवस गोव्याला जाणार आहोत -तुम्ही प्रिया ला अनुमती द्या --तुमच्या होकारा शिवाय आंही तिला नेऊ शकत नाही
वासुदेवाला काय बोलावे ते सुचेना सुनंदा कडे पाहात तो म्हणाला -ठीक आहे जपून जा सांभाळून राहा
बाबा थ्यांक्यू -असे म्हणत प्रियाने बाबा ना मिठी मारली
*
प्रिया पूर्णपणे तोल सुटल्यागत वागत होती
रात्री अपरात्री उशिरा घरात येणे
कॉलेज ला दांड्या
क्लब पब मध्ये वेळ घालवणे
मित्रा सोबत रात्र घालवणे
-
तिचे असे वागणे बघून वासुदेव सुनंदा पण अस्वस्थ
होत होते
सुनंदाच्या डोळ्याचे पाणी खळत नव्हते
काय झाले तिचे असे -किती शांत अन संस्कारी होती प्रिया -कुणाही नजर लागली असावी ? का कुणी करणी केली असेल तिच्यावर
असेच जर चालू राहिले तर पुढे कसे होणार तिचे
बाबा तिचे बोलणे ऐकत होते
-
पुरोहित महासंघाचे आप्पा राशिनकार अध्यक्ष होते
शिवाय त्यांनी वासुदेवशास्त्री नेने महाराजांचा अनुग्रह पण प्राप्त केला होता
वास्तुशास्रे -पत्रिका -उदक शांती वेद पुराण आदिवर त्याची हुकमत होती
वासुदेव त्यांच्या कसे आला त्याने आपली सारे व्यथा त्यांना सांगितली -
आप्पा नी प्रिया चे पत्रिका व ग्रहमान पाहिले
व म्हणाले पत्रिका दूषित आहे -तिला लागण झाली आहे बाहेरची बाधा झाली आहे
आपण असे करू वासुदेव ओंकारेश्वरा च्या बाजूला संख्ये गुरुजी राहातात -ते त्रिकाल ज्ञानी आहेत
त्रिपिंडी श्राद्ध करण्यात ते विख्यात आहे
भूत प्रेत बाधा करणी यावर त्यांच्या कडे उपाय आहेत
-
आप्पा व वासुदेवाने गुरुजींना सारे सांगितले
तुमच्या घराण्यात कुणी कुलटा स्त्री होती का ? म्हणजे व्यभिचारी ??
नाही हो माझे व हिचे घराणे पहिल्या पासून पौरोहित्य व्यवसायात आहे -आमचा पिढ्यान पिढ्याचा तो वारसा आहे -
मान्य आहे *तू असे कर आपल्या मूळ गावी जा घारी व सासुर वाडीला चौकशी कर
घरातल्या वडिलधा-या माणसाशी वार्तालाप कर
नक्की काहीतरी माहिती हाती लागेल
*
वासुदेव कोकणात आला
सख्खे मावस चूलत सा-याकडे विचार पूस केली पण हाती काही लागले नाही
तो सासुर वाडी ला आला
तिथे त्याने सारी हाकिगत सांगितली
खाटेवर बसलेल्या ८० वर्षाच्या गोदाक्का सारे ऐकत होत्या -त्याने वासुदेवाला जवळ बोलावले
हे केव्हा घडले मला आठवत नाही
पण आहे सासू वा पणजी सासू ला गोपाळ नावाचा मुलगा होता
तो पण पुरोहित होता शांत स्वभावाचा मुलगा होता
त्याचा विवाह बाजूच्या गावातील गोगट्या च्या दुर्गी शी झाला
दुर्गी दिसायला सुंदर होती -बांधा उफाड्याचा होता
सणाच्या दिवशी नवी साडी व अलन्कार घातले की
कामदेवाचे रती शोभत असे
लग्न झालल्यावर काही दिवस बरे गेले
बाजरी हाट च्या निमित्ताने ती बाहेर पडू लागली
तीच देखणं रूप गावातल्या टोळभैरवाना वेड लावू लागले
नजरांनजरी झाली अन दुर्गेचे पाऊल घसरले
आधी चोरट्या गाठी भेटी चालू झाल्या
नंतर ती उघड पणे वाड्यावर जाऊ लागली
काही वेळा रात्र पण ती ति रंगवत असे
१००-२०० उम्ब-याच गाव
हिचे चाळे डोळ्यावर आले
आधी लोक दबक्या आवाजात बोलत असत
आता उघड पणे बोलू लागले
बाजार बसावी कुलटा -रंग ढन्ग करणारी अशी शेलकी विशेषणे लावत महिला तिचा उद्धार करत असत
गोपाळ च्या परिवाराला ते सारे असह्य होत असे
सासूने एकदा तिला बोलावले अन खडसावले
आग काय वागतेस असे तू तुला काही लज्जा शरम ?
आपले घराणं पुरोहिताच मान आहे आपल्या घराण्यास
शोभते का तूला ?दुर्गा व गोपाळ ऐकत होते
दुर्गा म्हणाली -सासूबाई सांगणार होते पण राहून गेले माझ्या उदरात आपल्या घराण्याचा वंश वाढत आहे
हे ऐकताच सासूबाई कडाडल्या -निर्लज्य लाज नाही वाटत असे बोलायला
गावभर उनाडक्या करते -त्याचा परिणाम पोटात वाढत आहे -अन हे पाप तू गोपालच्या शिरी फोडत आहेस
लाज नाही वाटत -दुसरी एखादी असती तर गळ्यात धोंडा बांधून परसदारी विहीर आहे त्यात जीव दिला असता
दुर्गा रडत म्हणाली सासूबाई मला क्षमा करा
तुला ? अन क्षमा -ते शक्य नाही जा तोंड काळे कर
-
दुर्गा रात्र भर विचार करत होती आपल्या मुळे सासर महेर दोन्ही नावाला बट्टा लागला याचे तिला वाईट वाटले
साधारण एक चा सुमार होता
ती उठली व विहिरीवर गेली
बाजूचा दगड तिने कास-याने गळ्यात बांधला
सर्वांची क्षमा मागत तिने विहिरीत उडी मारून जीवन यात्रा संपवली
सकाळी गावात बभ्रा झाला गाव विहिरी जवळ लोटला
गोपाळ नाचक्की सहन नाही झाली त्याने जागेच प्राण सोडला
पुत्र शोकाने हृदय फाटलेल्या माउलीं न पण जीवन यात्रा संपवले
घर उदास झाले
गावक-यांनी परसदारीची विहीर बुजवून टाकली
दुर्गी चा आत्मा क्रिया कर्म न झाल्याने आताच घुटमळत राहिला
आज्जीने वासुदेवाला सारे सांगितले
*
वासुदेव पुण्यास परतला सुनंदा ला त्याने सारी कहाणे ऐकीवाली
तो आप्पाच्या घरी आला त्यांना पण सारे सविस्तर सांगितले
वासुदेव व आप्पा संखे गुरुजींच्या कडे आहे त्यांनी सारी कथा सांगितली
गुरुजी म्हणाले आपल्याला सुगीच्या आत्मयास मुक्त केले पाहिजे
अमावास्यांच्या रात्री आपणनदी किनारी पूजा घालू त्रिपिंडी श्राद्ध व उदक शांती करू अन दुर्गीच्या आत्म्यास मुक्त करू
-
पूजा सम्पन्न झाली
बारा वाजता यज्ञातून एक ज्योत प्रकट झाली दुर्गेच्या आकाराची
तिने गुरुजींशी नामना केले व पंच तत्वात विलीन झाली
*
त्या नंतर प्रिया च्या वागण्यात लक्षणीय बदल झाला
चेहे-यावर नैसर्गिक सात्विक भाव नांदू लागले
*
हरतालिकेचा सण होता
साड़ी नेसून प्रिया तयार होती
खुप सुंदर दिसत होती
आईच्या डोळ्यात समाधानाचे भाव दिसत होते
आई मी पूजा व उपवास करणार आहे
कर ग छान नवरा मिळेल हो तुला --
*
गंगाधर जोशी चा नातू अमेरिकेतून सुटी साठी घरी आला होता -अविनाश जोशी
प्रियाला दाखवण्या चा कार्यक्रम होता
प्रिया घरात सर्वाना पसंत पडली
विवाह सपंन्न झाला
-
विमान तळाव्रर सर्वांचा निरोप ते जोडपे विमानात बसले
प्रियाच्या बाजूच्या सीट वर एक तरुणी बसली होती
हाय प्रिया म्हणाली मी प्रिया जोशी
मी दुर्गा गोगटे--
दुर्गा -नाव ऐकल्या सारखे वाटत आहे
शक्य आहे इतक्या दिवस तर मी तुझ्या शरीरात राहात होते -
आता तू अमेरिकेत म्हणून आले
असे म्हणत तिने प्रियाच्या शरीरात प्रवेश केला
बाजूची सीट रिकामी झाली
प्रतिक्रिया
9 Jul 2019 - 10:26 am | उगा काहितरीच
"भूत गेले हाम्रिकेला" असे नाव सुचवतो.
9 Jul 2019 - 10:32 am | प्रसाद_१९८२
जबरी, खतरनाक भयकथा.
कथा वाचताना, घाबतुन बोबडी वळायची वेळ आली.
--
अजून लिहा.
9 Jul 2019 - 10:43 am | इरामयी
+१
9 Jul 2019 - 10:51 am | कंजूस
जबरी कथा.
-----
अगोदरच्या कथानकाऐवजी
" एर होस्टेसने मास्क खसा लावायचा ते दाखवले " इथून चालेल. दुर्गा झाली प्रिया.
9 Jul 2019 - 10:52 am | गड्डा झब्बू
तुमची अद्वितीय लेखनशैली- बेमिसाल वाक्यरचना- नावांची अलटापालट करण्याची विलक्षण कला आणी भाषेवरील प्रभुत्व थक्क करणारे आहे. तुमच्या कथा वाचून मलादेखील आता लेखन करायची सुरसुरी आली आहे. आशीर्वाद द्यावा गुरुवर्य __/\__
9 Jul 2019 - 11:16 am | महासंग्राम
हिच दुर्गी झपाटलेला २ मध्ये होती
वाचवा वाचवा.... महेश महेश
9 Jul 2019 - 11:20 am | Rajesh188
एकाच कथेत शृंगार रस,भय रस,गूढ रस
आणि असे बरेच रस भरले आहेत .
आणि असे अस समजल जाते की अशी अद्वितीय लेखन शैली त लिखाण करणारे लेखक जगात दुर्मिळ आहेत.
मिपकरां न चे भाग्य थोर त्यांना असा लेखक लाभला
9 Jul 2019 - 11:25 am | अमर विश्वास
किती घाबरलो माहिताय ? भयकथा होती ना
भुताला विमानाचे तिकीट काढावे लागते का हो ?
9 Jul 2019 - 11:26 am | mrcoolguynice
ही द्वीरूक्ती आहेआहे.... फ़क्त
“ओंकारेश्वराच्या बाजूला राहातात” एवढाच उल्लेख आपेक्षित असतो....
9 Jul 2019 - 11:36 am | डॉ सुहास म्हात्रे
आग कॉलेजच्या मित्रा नी आग्रह केला म्हणून गेले
आग येईल ती किती अस्वस्थ होत आहेस -वासुदेव म्हणाला
आग किती उशीर ? दहा वाजून गेलेत
आग काय वागतेस असे तू तुला काही लज्जा शरम ?
कथेला जागोजागी आग लागली आहे. त्यामुळेच बहुदा दुर्गेने प्रियाच्या शरीरात प्रवेश करून अमेरिकेला प्रयाण केलेले दिसत आहे.
तसेच भारतात केलेल्या विधीचा परिणाम उंच हवेत उडणार्या विमानात होत नसावा. त्यामुळे, पंच तत्वात विलीन होण्यासाठी वर जाणारी दुर्गा, मधूनच वळून, विमानाच्या खिडकीतून आत येऊन प्रियाच्या शरीरात प्रवेश करू शकली.
एक अतिउच्च मेटॅफिजिकल कथा वाचल्याचे समाधान मिळाले. :)
9 Jul 2019 - 11:44 am | गवि
पण कथेची भयानकता पाहता, हृदयरोग, उच्च रक्तदाब, कमकुवत हृदय असलेले रुग्ण, गर्भवती महिला आणि वृद्धांनी ही कथा वाचू नये अशी सूचना टाकायला हवी होती असं नाही वाटत?
9 Jul 2019 - 11:47 am | विनिता००२
कथा वाचून आधीच खपले होते...:हाहा:
त्यात 'कथेला जागोजागी आग लागली आहे..." हे वाचून ऑफीसमधेच जोरात हसले. :हाहा:
9 Jul 2019 - 11:46 am | ज्ञानोबाचे पैजार
बाकी गोष्टी बद्दल जाउ दे पण...
दुर्गेची ज्योत पंचतत्वात विलीन झाली होती ना? का ती फक्त भारताच्या बॉर्डरवर दबा धरुन बसली होती. प्रिया अमेरीके ऐवजी सौदी अरेबिया किंवा कतार ला गेली असती तर दुर्गेने तिला पकडले असते का?
अकु कथेचा फॉर्म्युला म्हणजे स्त्रीयांच्या शरीराचे तपशीलवार वर्णन, श्रुंगाराचा मसाला, आणि स्वैराचाराची फोडणी दिली की झाली अकुकथा तयार. बाकी कथेला ना आगा ना पिछा.
अर्थात न वाचण्याचा पर्याय उपलब्ध आहे, पण मिपा वर येउन एखादा धागा न वाचता पुढे जाणे शक्य होत नाही.
पैजारबुवा,
9 Jul 2019 - 11:51 am | गवि
भलत्या शंका तुम्हाला.
स्पष्टीकरण: ओंकारेश्वराशेजारचे श्री. रा. रा. पू. संख्ये गुरुजी यांचे प्रभावक्षेत्र भारतीय सीमारेषेच्या आतच मर्यादित असावे.
9 Jul 2019 - 11:53 am | डॉ सुहास म्हात्रे
दुर्गेची ज्योत पंचतत्वात विलीन झाली होती ना? का ती फक्त भारताच्या बॉर्डरवर दबा धरुन बसली होती. प्रिया अमेरीके ऐवजी सौदी अरेबिया किंवा कतार ला गेली असती तर दुर्गेने तिला पकडले असते का?
भारतिय माणसांचे पंचतत्व (अ) जमिनीवर भारतीय सीमा, (आ) समुद्रात exclusive economic zone (EEZ) म्हणजे २०० नॉटिक माईल्स आणि (इ) हवेत भारतिय Airspace, यांच्या पलिकडे जात नाही... कारण तसे केले तर ते इतर सार्वभौम राष्ट्रांच्या हक्कांवर अतिक्रमण होईल. भारतिय पंचतत्व एकदम सभ्य असल्याने ते असभ्य व्यवहार करत नाही.
ले खिक्क लिहा यला विस रला मग मला लिहा यला लागले.
9 Jul 2019 - 12:22 pm | ज्ञानोबाचे पैजार
भारतिय पंचतत्व एकदम सभ्य असल्याने ते असभ्य व्यवहार करत नाही.
जाउदे...हा धागा आणि त्यावरची चर्चा वाचताना माझ्या छोट्या मेंदुवर सुध्दा पुरळ यायला लागले आहे. यावर उतारा म्हणून पुढची बारा वर्षे मला फक्त आणि फक्त मोजींचे जुने धागे काढुन वाचत बसावे लागणार आहेत. त्या शिवाय मेंदुवरचे पुरळ जाणार नाही.
पैजारबुवा,
9 Jul 2019 - 12:27 pm | नाखु
आंतरराष्ट्रीय मांत्रिक (मंदार कात्रे) यांना पाचारण केले असते तर ही पंचतत्वात विलिन होणारी ज्योत आकाशगंगेच्या बाहेर पिटाळून लावली असती आणि पुढील अडीचशे वर्षे मिपा दुर्गामुक्त राहिले असते.
10 Jul 2019 - 2:42 pm | हस्तर
POK वाला काश्मीर ?
9 Jul 2019 - 11:58 am | गवि
मॉल खरेदी फेम संग्राम देशमुखचा पत्ता कट झालेला दिसतो.
-एक निरीक्षण.
9 Jul 2019 - 12:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काका कोणी काय पण म्हटलं तरी थांबू नका. लिहित राहा.
भयकथा मस्त जमली. अजुन जरा मसाला पाहिजे होता.
गोव्याला ट्रिप गेली.. तिथे पुढे रंगायला पाहिजे होती हो कथा.
-दिलीप बिरुटे
9 Jul 2019 - 12:25 pm | कंजूस
अकु कथा इकडे फक्त टाकून फेकून जातात पुढची टाकण्यासाठी परत येतात मग अजून एक.
9 Jul 2019 - 12:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काका कोणी काय पण म्हटलं तरी थांबू नका. लिहित राहा.
भयकथा मस्त जमली. अजुन जरा मसाला पाहिजे होता.
गोव्याला ट्रिप गेली.. तिथे पुढे रंगायला पाहिजे होती हो कथा.
-दिलीप बिरुटे
9 Jul 2019 - 12:27 pm | सस्नेह
कथा वाचून एक जीनीयस एक्स-(?) मिपाकर मोजी यांची आठवण झाली.
अकुकाका विमानात भौत्तेक मोजींच्या शेजारच्या शीटवर बसले होते की काय अशी शंका आली !
9 Jul 2019 - 12:40 pm | प्रलयनाथ गेंडास...
टूम शब मिडलक्लास वाचक पब्लिक ..
श्या ...
कथेतील खरे "सुंदर" नामक भूत ... लोकांच्या नजरेतून लपवून ठेवण्यात , अकुनी सहज साध्य केलंय ... वाचकांचे लक्ष आगीकडे वेधून ...
याला म्हणतात डिसेप्शन ...
9 Jul 2019 - 12:45 pm | गामा पैलवान
अकुकाका,
साधारणत: नव्या नवऱ्या खिडकीशेजारी बसतात आणि त्यांच्या बाजूला त्यांचे नवरे बसतात. मग बाजूची शिटेवर तरुणी आलीच मुळी कशीकाय? तुम्हांस काही वेगळंच सुचवायचंय का यातनं? गंगाधर जोश्याचा नातूच दुर्गा गोगटे आहे की काय? पुभालटा.
आ.न.,
-गा.पै.
9 Jul 2019 - 12:46 pm | गामा पैलवान
अकुकाका,
साधारणत: नव्या नवऱ्या खिडकीशेजारी बसतात आणि त्यांच्या बाजूला त्यांचे नवरे बसतात. मग बाजूची शिटेवर तरुणी आलीच मुळी कशीकाय? तुम्हांस काही वेगळंच सुचवायचंय का यातनं? गंगाधर जोश्याचा नातूच दुर्गा गोगटे आहे की काय? पुभालटा.
आ.न.,
-गा.पै.
9 Jul 2019 - 1:07 pm | जालिम लोशन
_१
9 Jul 2019 - 1:16 pm | जॉनविक्क
एंजॉय द मोमेंट अँड किप रायटिंग
9 Jul 2019 - 1:43 pm | खिलजि
काही प्रश्न पडले आहेत गुरुदेव .. तातडीने निरसन करण्यात यावे .. आम्हाला शंकेच्या इमानात बसवावे आणि गपगुडुप व्हावे .. हे मान्य नाही
१) सुंदर ने प्रिया कडे पाहिले .. हि सुंदर कोण ?
२) जागी झाली तेव्हा तिला एक नवी अनुभूती मिळाली होती.. कुठली अनुभूती ते समजलं नाही ? आपल्याला विभूती म्हणायचं होत का ?
३) चेहे-या वर एक निराळी चमक आली होती.. इथे निळी चमक असायला हवं होत ..
४) बांधा उफाड्याचा होता.. उफाड्याचा बांधा म्हणजे काय , गुरुदेव ?
५) मी दुर्गा गोगटे--
दुर्गा -नाव ऐकल्या सारखे वाटत आहे
शक्य आहे इतक्या दिवस तर मी तुझ्या शरीरात राहात होते -
आता तू अमेरिकेत म्हणून आले
असे म्हणत तिने प्रियाच्या शरीरात प्रवेश केला
बाजूची सीट रिकामी झाली======
या क्लायमॅक्सला खुपसाऱ्या शिट्ट्या ... खरंच .. आज म्या गुरु पहिला .. राउळी नाही , मंदिरात नाही तर थेट इमानात पाहिला .. आज म्या गुरु पहिला,,, आज म्या गुरु पहिला
9 Jul 2019 - 1:52 pm | चाणक्य
ते राहून गेलं वाटतं गडबडीत
9 Jul 2019 - 2:00 pm | ज्ञानोबाचे पैजार
लैच गडबडीत लिहिली आहे कथा
या कथेत काकांनी, वाचक सोडून, इतर कोणाला अनावृत्तही केले नाही.
पैजारबुवा,
9 Jul 2019 - 2:41 pm | जॉनविक्क
चक्क बलात्काराचा प्रसंग चुंबनांच्या वर्षावाने रंगवणाऱ्या अकूनी नेमका याच कथेत का हात आखडता घेतला ते कळेना...
9 Jul 2019 - 2:53 pm | विजुभाऊ
ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर वेताळाचे काय होईल?
9 Jul 2019 - 3:27 pm | खिलजि
वेताळाच्या अंगात पण भूत येईल
9 Jul 2019 - 3:06 pm | श्वेता२४
विचार करुन करुन वेताळाच्या मेंदूला पूरळ येईल. :D:D:D
9 Jul 2019 - 3:19 pm | Rajesh188
तुम्ही सर्व खूप शंका व्यक्त करता त्या मुळे लेखकाला असे वाटत की आपल्या वाचक वर्गाची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता खूपच कमी आहे .
मग आपल्याच भल्यासाठी ते दुसरी कथा मिपा वर फेकतात त्यात त्यांचा काय दोष .
शंका घेणे जसे कमी होईल व आपली त्यांची लेखन समजण्याची पात्रता जेव्हा वाढेल तेव्हाच त्यांचे हे समाजकार्य तडीस जाईल
9 Jul 2019 - 3:37 pm | खिलजि
गुरुदेव कुणी काहीही म्हणो
आम्ही तुमच्यावानी बनो
खबर जावो कानोकानो
वाचक येवो मारून मनो
संख्या वाढत जावो दिनो
फक्त माझीच कथा सुनो
कितीही करा तुम्ही नोनो
गुरुदेव तुम्हीच दुसरे कोन्हो
9 Jul 2019 - 3:49 pm | गड्डा झब्बू
सुभानल्ला :-))
9 Jul 2019 - 4:02 pm | तेजस आठवले
खी खी खी.
प्रतिक्रिया भारी आहेत.
मुळात लेखकाने शीर्षकातच सांगितले आहे कि दुर्गा प्रियाच्या शरीरात शीरली. म्हणजे प्रियाला कालच्या त्या मेंदूच्या डॉक्टरने सलाईन दिलंय हे उघड आहे. त्याच शिरेतून दुर्गा प्रियाच्या शरीरात घुसली असणार.
रात्री प्रियाला कामुक स्वप्न पडले.स्वप्न बघता तिच्या अंगावर रोमांच उठले.जागी झाली तेव्हा तिला एक नवी अनुभूती मिळाली होती.तिचे शरीर मोहरून गेले होते.चेहे-या वर एक निराळी चमक आली होती -- हे वर्णन तुम्हाला कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय ना...? लब्बाड कुठले.
लेखकाचा प्रतिभेचा वारू असा उधळलाय कि ज्याचं नाव ते... पार सगळ्या आकाशगंगा, दीर्घिका, श्वेतबटू, कृष्णविवर हलवून टाकलं आहे.
शरीरावरील उभार बघून ती आंनदीत होत होती.हा तिला नवा अनुभव होता -- हा काय चावटपणा आहे?
ठीक आहे -बाबा म्हणाले आपली मुलगी दुसऱ्याच्या पैशाने खरेदी करते हे बघून वासुदेवबाबा फक्त ठीक आहे असं म्हणाले? कठीण आहे.
बियर पिणारे मित्र मैत्रिणी अनुमती मागतात म्हणजे भारीच संस्कारी आहेत की हो ती गॅंग. नक्कीच गोवा-रवळनाथ दर्शन ट्रिप असणार. उगाचच गैरसमज करून घेतला तुम्ही.
वास्तुशास्रे -पत्रिका -उदक शांती वेद पुराण आदिवर त्याची हुकमत होती -- अहो ही सगळी धार्मिक कृत्ये आहेत. तांत्रिक नाहीत. त्यावर हुकमत असायला मंत्रतंत्र, जादूटोणा, सौतन से छुटकारा ,वशीकरण,मुठकरणी अशी पत्रके छापणार बंगालीबाबा शोधा. राशिनकारना हे काय झेपेल असे वाटत नाही. असो.
संख्ये गुरुजी राहातात -ते त्रिकाल ज्ञानी आहेत -- सध्या आपल्या आकाशगंगेत फक्त एकाच त्रिकाल ज्ञानी आहेत. आणि ते हा धागा काढून गायबलेत.
खाटेवर बसलेल्या ८० वर्षाच्या गोदाक्का सारे ऐकत होत्या -त्याने वासुदेवाला जवळ बोलावले -- हे वाक्य ह्या कथेतला सगळ्यात मोठा गौप्यस्फोट आहे. गोदाक्का "तो" होत्या? ८० वर्ष कोणालाच कळले नाही? क्षणभर अभिनेत्री झालेला वैभव मांगले डोळ्यासमोर आला.
सर्वांची क्षमा मागत तिने विहिरीत उडी मारून जीवन यात्रा संपवली
गोपाळ नाचक्की सहन नाही झाली त्याने जागेच प्राण सोडला
पुत्र शोकाने हृदय फाटलेल्या माउलीं न पण जीवन यात्रा संपवले खरं कारण वेगळंच असणार. त्या तिघांना कळले होते की काही वर्षांनी अकु आपल्यावर एक भयकथा लिहिणार आहेत. त्यामुळे त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा.
गावक-यांनी परसदारीची विहीर बुजवून टाकली.दुर्गी चा आत्मा क्रिया कर्म न झाल्याने आताच घुटमळत राहिलाइथेच चुकलं बघा तुमचं. विहीर चालू असती तर सरकारने दिलेला अनुदानित सौरपंप वापरून दुर्गीचा आत्मा बाहेर काढता आला असता. असो. हे आत्मायुक्त पाणी भूजलस्तर वाढल्याने दुसऱ्या विहिरीत थोडेसे गेले असणार आणि तिकडून ऊर्ध्वपातित - वाफ- ढग- पाऊस असे चक्र पूर्ण करून सलाईनसाठी वापरले गेले असणार. हेच आत्मायुक्त सलाईन प्रियाला लावल्याने दुर्गा शीरेतुन प्रियाच्या शरीरात शिरली.(सॉरी शीरली),
त्या नंतर प्रिया च्या वागण्यात लक्षणीय बदल झाला.चेहे-यावर नैसर्गिक सात्विक भाव नांदू लागले -- हे कामुक ते सात्विक रूपांतरण भारीच आहे.संख्ये गुर्जी एकदम पॉवरबाज दिसतायत.
गंगाधर जोशी चा नातू अमेरिकेतून सुटी साठी घरी आला होता -अविनाश जोशी हे वाक्य काही विशेष नाही पण जोश्यांच्या नातवाचे आडनाव तुम्ही जोशीच ठेवलेत ह्याबद्दल तुमचे कौतुकच केले पाहिजे.
बाकी दुर्गीला अनायसे फुकट अमेरिकावारी घडली बरं का.व्हिसावगैरे काही भानगड नसेलच. विमानात प्रियाच्या शरीरात परत शिरली.परत सात्विक ते कामुक कॉन्व्हर्जन सुरु.
आता प्रियाने अमेरिकेत जाऊन काय रंगढंग उधळले ह्यावर पुढची कथा लिहू नका प्लिज. आम्हाला इतरही कामं आहेत.कालच्या कथेतली खोब्रागडे-तेंडुलकर-ताम्हणकर इ.इ. मंडळी अजून अमेरिकेत पोहोचली पण नाहीत की इकडे तुमची पात्रं दुसऱ्या विमानात बसून उडायला तयार.
तुमचा आवाका जबरदस्त आहे.
17 Jul 2019 - 5:44 pm | श्वेता व्यास
पंच तत्वात फक्त दुर्गेच्या आकाराची ज्योत विलीन झाली दुर्गी नै कै.
क्रियाकर्म करूनही दुर्गीचा आत्मा प्रियातच होता, फक्त तो कामुकचा सात्विक झाला होता आणि त्याने (सात्विक आत्म्यानेच) प्रियाला इमानात दर्शन दिले.
छे बै इथे कथा कोणाला कळलीच नाही :D
9 Jul 2019 - 4:13 pm | ज्ञानोबाचे पैजार
सौंदर्य व संस्कार यानाचा मिलाप म्हणजे प्रिया
बाजरी हाट च्या निमित्ताने ती बाहेर पडू लागली
नजरांनजरी झाली अन दुर्गेचे पाऊल घसरले
गुरुजी म्हणाले आपल्याला सुगीच्या आत्मयास मुक्त केले पाहिजे
तिने गुरुजींशी नामना केले व पंच तत्वात विलीन झाली
विमान तळाव्रर सर्वांचा निरोप ते जोडपे विमानात बसले
वरील ठळक शब्दांचे अर्थ सांगा...विजेत्यांना अकुकाका फॅन फाउंडेशन तर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.
पैजारबुवा,
9 Jul 2019 - 4:26 pm | यशोधरा
बक्षिसे काय असतील ते सांगा आधी!! =))
9 Jul 2019 - 4:34 pm | ज्ञानोबाचे पैजार
फॅन फाउंडेशनच्या चेअरवुमनने असा प्रश्र्ण विचारावा हे काही पटले नाही.
पैजारबुवा,
9 Jul 2019 - 4:58 pm | यशोधरा
Lol! =))
9 Jul 2019 - 4:33 pm | नाखु
लांब दांड्याचे एक डझन झाडू,सहा बेगॉनचे पंप,आणी एकवीस डांबरगोळ्या पाकिटे व अकरा काळ्या बाहुल्या विथ लिंबू मिरची असाव्यात ही नम्र विनंती.
अखिल मिपा मोजी अकुनिसो मंका लिखाण सहनशील महासंघाचे " मिपावर साथीचे आजार आणि घरगुती उपचार" या पत्रकातून साभार
9 Jul 2019 - 4:45 pm | खिलजि
खत्तर्णनाक बक्षीस समारंभ कि वधस्तंभ ,,,
20 Jul 2019 - 2:32 pm | अत्रुप्त आत्मा
@अखिल मिपा मोजी अकुनिसो मंका लिखाण सहनशील महासंघाचे " मिपावर साथीचे आजार आणि घरगुती उपचार" या पत्रकातून साभार ---
9 Jul 2019 - 4:14 pm | खिलजि
भन्नात आय्दिया
9 Jul 2019 - 4:33 pm | प्रमोद पानसे
हैदोस चा अंक कुठे मिळेल ?
20 Jul 2019 - 2:36 pm | अत्रुप्त आत्मा
10 Jul 2019 - 3:05 pm | उपयोजक
बैठे बैठे क्या करें? करना है कुछ काम,
शुरु करो भयकथा लेके मिपाका नाम।
17 Jul 2019 - 2:06 pm | हस्तर
खिलजी साहेब विमानात आहेत सध्या
18 Jul 2019 - 5:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
त्यांना इमानात शेजारी दुर्गी बसली नाहीयेना चेक करायला सांगा.
असली तर झपाटून टाका म्हणावं दुर्गीला
पैजारबुवा,
18 Jul 2019 - 6:02 pm | हस्तर
हैदराबाद पूर्ण उफाळून येईल मग