विद्युतीय उपकरण आणि त्याचे मेंटेनेंस महत्व

Primary tabs

मिलिंद दि.भिड़े भिलाई's picture
मिलिंद दि.भिड़े भिलाई in तंत्रजगत
18 Jun 2019 - 2:10 pm

मिलिंद भिड़े, भिलाई नगर, छत्तीसगढ़

वीज बिल कमी करण्या साठी योग्य दर्ज्याची वायरिंग, प्रॉपर अर्थिंग,स्टार रेटिंग उपकरणांचा वापर जेव्हड़ा महत्वाच्या आहे, तेव्हड़ेच महत्व घरात असलेल्या उपकरणांच्या रेगुलर सर्विसिंग चे ही आहे ।

घरात असलेला प्रत्येक उपकरण, तो पर्यन्त बिनधास्त वापरला जातो, जो पर्यन्त तो काम करणे बन्द करीत नाही।

घरात असलेल्या प्रत्येक उपकरणाला रेगुलर सर्विसिंग गरजेची असते । घरोघरी आणलेले मिक्सर, ग्राइंडर, वाशिंग मशीन, गीजर, इंडक्शन स्टोव, माइक्रोवेव,फ्रीज़ सुरुवातीला मस्त सर्विस देतात । आपल्या पैकी 95%लोक उपकरणांच्या बरोबर मिळालेले इंस्ट्रक्शन मैन्युअल कधीच वाचत नाही ।त्यामुळे आपल्याला साध्या गोष्टी ही माहित नसतात । आपण सगळे उपकरण "फक्त प्रत्युत्पन्न मति" ने वापरतो ।

उपकरणाचे रेगुलर मेंटेनेंस काय, आणि कसे ह्यांची माहिती सोबत मिळालेल्या माहिती पत्रकात दिलेली असते, पण न वाचल्या मुळे आपण चार आण्याचे काम चार शे रूपयाला करून घेतो , कारण आपण मैजोरिटी ने penny wise, pound foolish आहोत ही सत्य आणि सद्य परिस्थिति आहे ।

मिक्सर सुरुवातीला एकदम शांत चालत असतो, मग त्यात हलकुण्ड, खोबरे, साखर, असल्या गोष्टी ग्राइंड केल्या जातात । ह्यांनी मिक्सर ब्लेड खराब होतो, खालच्या मोटर चे बुशिंग खराब होतात, आवाज़ वाढतो, हळू हळू घरात रेलवे इंजिन आल्या सारखे आवाज़ मिक्सर, ग्राइंडर,फ़ूड प्रोसेसर, मुळे कॉमन होत जातात।

वाशिंग मशीन मध्ये कपड़े स्वच्छ धुतले जात नाहीत,
साबण पाउडर ज्यास्त घालून आपण कपड़े धुतो, पण वॉशर किंवा ड्रायर चे बेल्ट आम्ही बदलत नाही ।

5 मिनिटात गीजर मध्ये तापणारे पाणी 25 मिनिटात तापते, तरी आम्ही लक्ष देत नाही । मग ही वेळ 1 तास होते,तरी आम्हाला सवड नसते । जेव्हा कि गीजर चे हीटिंग एलिमेंट त्यावर कैल्शियम डिपाजिट मुळे आपली एफिशिएंसी गमावतो । पण आम्ही तो डिपाजिट स्वच्छ करण्यास ततपर नसतो ।

सतत वापराने फ्रीज़ चे डोर लाइनर कड़क होतात,त्यामुळे फ्रीज़ चे दार एयरटाइट राहात नाही, आणि त्या मुळे गारवा कमी होत जातो, आतिल वस्तु खराब होतात, फ्रीज़ मध्ये झुरळ सर्रास फिरतात । कुठल्या ही मेडिकल प्रोफेशनल कड़े है दृश्य कॉमन आहे, पण तरी ही आम्ही 450 रूपयाचे डोर लाइनर रेगुलर गरम पाण्याने पुसत सुद्धा नाही, पण महिन्याला 1000 रूपयाचे वीज बिल देत रहातो ।

ह्या सवयिन मुळे वाढत असलेल्या वीज देयका करिता वीज सप्लायर च कसा जवाबदार आहे, हे शोधन्यास सर्व ग्राहक वीज मंडळाच्या कारभारावर शोधपत्र लिहितात, पण आपली चूक शोधत नाही ।

जेव्हा कि मिक्सर चे 10 ते 30 रूपयाचे बुश बदलून, वाशिंग मशीन चे लूज बेल्ट बदलून, गीजर चे हीटिंग एलिमेंट वेळो वेळी डिपाजिट फ्री करवून,फ्रीज़ चे डोर लाइनर नियमित पुसून किंवा बदलून आपला वीज खर्च कमी करता येतो । शेवटी आम्ही काटकसर कुठे करितो, फेसबुक वर येऊन आम्ही अत्यंत साध्या प्रोब्लेम्स चे उत्तर लोकांना विचारतो, पण "आत्म निरीक्षण " करीत नाही, आणि सवयी तर मुळीच बदलत नाही ।

कटु सत्य आहे कि ह्या वाईट सवयिनमुळेच समाजात "संवाद जीवंत" आहे ।

धन्यवाद,

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

18 Jun 2019 - 2:26 pm | पद्मावति

माहितीपूर्ण लेख.
आपण मिसळपाववर नवीन आहात. लेखामध्ये हिंदीचा प्रभाव खूप जाणवतो. लेख लिहितांना आपण गूगल हिंदी टायपिंग किंवा इझी हिंदी टायपिंग वापरता का? पुढील वेळी हिंदी ऐवजी मराठी असा पर्याय टाकून बघाल का प्लीज? गूगल किंवा इझी टायपिंग किंवा कुठेही सगळ्या भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.
मिपावर आपले स्वागत आहे. लिहित रहा. काही मदत लागली तर साहित्य संपादक या आयडीला संदेश करा.

मिलिंद दि.भिड़े भिलाई's picture

18 Jun 2019 - 2:34 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई

मी मराठी भाषिक असलो तरी अमराठी भाषिक प्रान्त निवासी आहे। त्यामुळे माझ्या लेखनात हिंदी ची छाप स्वाभाविक आहे, कारण जन्म, शिक्षण, नोकरी कुठे ही मराठी चा लवलेश नव्हता । निव्वळ वाचनाची आवड़ होती म्हणून इतपतच मराठी लेखन शक्य आहे । म्हणून लेखा च्या शेवटी लिहिले आहे कि वर्तनी च्या चुका निदर्शनास आणून दिल्या तर नक्की सुधारावयचा प्रयत्न करेन ।

मी गूगल इंडिक की बोर्ड वापरतो ।

मराठी मुलुखात स्थायिक नसूनही मराठी लिहिण्याचा प्रयत्न स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. आपण या ठिकाणी महत्वाची उपयुक्त माहिती दिली आहे, त्यात भाषेबद्दल फार चिकित्सा केली जाऊ नये असं माझं मत आहे.

धन्यवाद आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jun 2019 - 3:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही हरकत नाही. उत्तम माहितीपूर्ण लेख लिहिला आहात.

तुम्ही छान सुरुवात केली आहे. असेच मराठीत लिहित आणि वाचत राहिलात तर नक्कीच उत्तम मराठी लिहू व बोलू शकाल.

मिपावर स्वागत !

प्रसाद_१९८२'s picture

18 Jun 2019 - 2:36 pm | प्रसाद_१९८२

माहितीपूर्ण लेख !
शिवाय या लेखात मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत अश्या चार भाषांचा समावेश केल्याने लेख अगदी परिपूर्ण झाला आहे.
--
आणखी लिहा.

महासंग्राम's picture

18 Jun 2019 - 3:26 pm | महासंग्राम

पुलेश

चौथा कोनाडा's picture

19 Jun 2019 - 1:25 pm | चौथा कोनाडा

अमराठी भाषिक प्रान्त निवासी असून सुद्धा आपण मायबोलीतून लेखन करता आहात ही फार आनंदाची बाब आहे !

लेखननातली कळकळ, आशय ही उत्तम आहे !

सातत्यपुर्ण लेखनासाठी मनापासून शुभेच्छा !

मिलिंद दि.भिड़े भिलाई's picture

20 Jun 2019 - 1:05 am | मिलिंद दि.भिड़े भिलाई

धन्यवाद आणि आभार.

जालिम लोशन's picture

19 Jun 2019 - 2:37 pm | जालिम लोशन

एक नंबर लिहले आहे.

जालिम लोशन's picture

19 Jun 2019 - 2:38 pm | जालिम लोशन

एक नंबर लिहले आहे.

मिलिंद दि.भिड़े भिलाई's picture

20 Jun 2019 - 1:05 am | मिलिंद दि.भिड़े भिलाई

धन्यवाद .

कंजूस's picture

19 Jun 2019 - 3:47 pm | कंजूस

उत्तम माहिती.

मिलिंद दि.भिड़े भिलाई's picture

20 Jun 2019 - 1:06 am | मिलिंद दि.भिड़े भिलाई

आभारी आहे.

श्वेता२४'s picture

25 Jun 2019 - 2:37 pm | श्वेता२४

लिहीत राहा

सुबोध खरे's picture

27 Jun 2019 - 12:23 pm | सुबोध खरे

आपल्या यादीत अजून एक महत्त्वाची वाढ म्हणजे वातानुकूलन यंत्राचे फिल्टर साफ न करणे.

जर दर महिन्याला एकदा फिल्टर नुसते काढून स्वच्छ पाण्याने धुवून वाळवून परत लावले तर आपल्या विजेची फार मोठी बचत होते शिवाय कॉम्प्रेसरवर ताण कमी होऊन त्याचे आयुष्य दुप्पट तरी वाढते.