गाभा:
बाबुराव अर्नाळकर हे प्रसिद्ध मराठी रहस्यकथाकार होते.
एके काळी खूप मोठा चाहता वर्ग असणाऱ्या अर्नाळकरांनी हजारावर रहस्य कथा लिहील्या होत्या.
झुंजार
काळा पहाड
डिटेक्टीव्ह रामराव
ई. धनंजय
सुदर्शन
फु मांचू
छोटु..
विजया..
हि त्यांची खास पात्रे..
आजच्या पिढीला हा लेखक माहित असण्याची शक्यता कमीच..
पण आमच्या पौगंडावस्थेत या लेखकाला खुप महत्वाचे स्थान होते जिवनात.
एका बाजुला साने गुरुजिंची डोळे पाणवणारी पुस्तके तर एका बाजुला झुंजार,,विजया छोटु
हातात पुस्त्क घेतले कि संपविल्या शिवाय खाली ठेववत नसे..अशी जादु होति..
आचार्य अत्रे यांनी या लेखकावर खास अग्र लेख लिहिला होता.
अन वैशिश्ठ म्हणजे कथेला अजिबात श्रुंगाराची फोडणी नसायची.
खुप मजा यायची वाचन करताना
प्रतिक्रिया
4 Jun 2019 - 3:29 pm | प्रसाद_१९८२
आचार्य अत्रे यांनी या लेखकावर खास अग्र लेख लिहिला होता.
--
@अविनाशकुलकर्णी,
हा अग्रलेख कुठे वाचायला मिळेल ?
4 Jun 2019 - 8:54 pm | शेखरमोघे
रम्य आठवणी.
बाबुराव अर्नाळकर यान्चे बन्धु मधुकर अर्नाळकर हे देखील मराठी रहस्यकथा लिहीत. पण त्यान्ची निर्मिती बाबुरावान्च्या इतकी नव्हती.
या सगळ्या कथा वाचताना मला अनेक वेळा वाटे - का इतक्या वेळा त्यात "अरे देवा" यायचे?
इन्ग्रजी वाचू लागल्यावर लक्षात आले - या बर्याच कथा इन्ग्रजी कथानकावरून मुम्बईकेन्द्रित स्थळे वापरून customise केलेल्या असत.