.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
प्रतिक्रिया
5 Mar 2019 - 12:35 am | थॉर माणूस
>>>भारताचा पहीला भारत रत्न नेहरुंना मिळालेला होता
याला काही आधार? कारण माझ्या माहितीत तरी पहिले भारतरत्न १९५४ साली सर्वपल्लि राधाकृष्णन, सी व्ही रामन आणि सी राजगोपालाचारी यांना दिले गेले होते. नेहरुंना भारतरत्न १९५५ साली मिळाले.
>>>नव्हे तो त्यांनी स्वतःच स्वतःला दिलेला होता.
हे आपले मत कि आपला दावा? दोन्ही परिस्थीतींमधे काही सबळ कारण गरजेचे असावे. खास करून तत्कालिन राष्ट्रपतींचे या विषयी अधिकृत मत उपलब्ध असताना त्याविरोधातल्या मताला मजबूत कारणाची गरज असावी.
>>>भारत रत्न पंत प्रधानांकडुन प्रस्तावित होत असतो.
याचाही कायदा किंवा नियमाची लिंक दिलीत तर फार बरे होईल. नाही म्हणजे एखाद्या प्रक्रियेची प्रथा आणि प्रक्रियेचा नियम/कायदा या दोन वेगळ्या गोष्टी असतात.
5 Mar 2019 - 4:38 am | ट्रेड मार्क
म्हणजे भारतरत्न देण्याच्या प्रक्रियेत अजिबात हस्तक्षेप करता येत नाही तर!
मग मोदींना भारतरत्न जर मिळालेच तर कोणाला वाईट वाटायला नको आणि त्यांनी हस्तक्षेप करून स्वतःला घेतलं असा आरोपही नको. काय म्हणता?
5 Mar 2019 - 11:20 pm | थॉर माणूस
हरकत नाही... राष्ट्रपती स्वतः प्रोसीजर ओव्हरराईड करून एखादे नाव सुचवू शकतात. तसे झाल्यास मोदीजींना देखील आत्ता भारतरत्न मिळू शकतो, आणि त्यात नियमांची पायमल्ली सुद्धा होणार नाही. पुर्वी दिलेल्या भारतरत्न पुरस्कारांविषयी खोटी माहिती पसरवण्यापेक्षा चांगले आहे.
6 Mar 2019 - 1:29 am | डँबिस००७
नेहरुंना भारत रत्न कस मिळाल हे तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला सांगुन आमच्या गैरसमजुती काढुन टाकाच !!
राष्ट्रपतीकडुन वाट वाकडी करुन भारत रत्न घेण्याचा प्रयत्न मोदीजीं करणार नाहीत ह्याची खात्री आम्हाला आहे !!
तुमच्या मते, पं नेहरु ईतके भारत रत्न पुरस्काराला योग्य व्यक्तीमत्व ईतर कोणीही नसाव कदाचीत !!
6 Mar 2019 - 1:20 am | डँबिस००७
भारत रत्न :
The Bharat Ratna award was established in the year 1954.The recommendations for the Bharat Ratna are made by the Prime Minister to the President, with a maximum of three nominees being awarded per year.
भारत रत्न पुरस्कार हा पंत प्रधानांकडुन प्रस्तावित केला जातो राष्ट्रपतीकडुन नाही , जरी तत्कालीन राष्ट्रपतीकडुन पं नेहरुंना भारत रत्न पुरस्कार प्रस्तावित केला गेला होता तर त्या मागे नेहरुंच प्रेशर होत कारण ते काम राष्ट्रपतीच नव्हतच !!
6 Mar 2019 - 2:36 am | ट्रेड मार्क
थॉर माणसांना असं डायरेक्ट कोणी खोडून काढतं का? तरी बरं त्यांना तुम्ही सरदार पटेलना भारत रत्न द्यायला १९९१ साल का उजाडायला लागलं? स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांना भारत रत्न का दिलं नाही किंवा उशिरा दिलं गेलं? असे प्रश्न विचारले नाहीत.
बघू आता काय उत्तर देतात.
6 Mar 2019 - 9:35 am | शलभ
त्यांनी काही शंका विचारल्या भंकस यांच्या पोस्ट वर तर ते चुकीचं नव्हतं. कारण भंकस यांच्या पोस्ट मध्ये जे दावे केलेत ते शंकास्पद वाटतात. त्याच्या काही लिंक दिल्या तर बरं होईल, उगाच त्यांना टार्गेट करणं बरोबर नाही. प्रूफ देऊन तोंड बंद करायचं टार्गेट करून नाही. ट्रेड मार्क तुमच्या पोस्ट चांगल्या असतात, तुमच्याकडून हे अपेक्षित नाही.
6 Mar 2019 - 10:24 am | ट्रेड मार्क
कधीकधी या फक्त विरोधासाठी विरोध किंवा फक्त मोदींना विरोध करणाऱ्यांना समजवायचा कंटाळा येतो. तरीही तुम्ही म्हणालात तसं अगदी वस्तुनिष्ठपाने बघायचं झालं तर - थोर माणूस यांच्या प्रतिसादातील मुद्दे/ प्रश्न बघू.
पहिले भारतरत्न १९५४ साली सर्वपल्लि राधाकृष्णन, सी व्ही रामन आणि सी राजगोपालाचारी यांना दिले गेले होते. नेहरुंना भारतरत्न १९५५ साली मिळाले.
हा मुद्दा बरोबर आहे.
नेहरूंनी स्वतःलाच दिला का?
तर याचे उत्तर डॅम्बीस००७ यांनी दिलेले आहे. पंतप्रधान कोणाला भारत रत्न द्यायचे याची शिफारस राष्ट्रपतींकडे करतात आणि मग ते दिले जाते. तसेही पारंपारिकरित्या भारतात राष्ट्रपतीपद हे नामधारी आहे. काही पॉवर्स आहेत पण एकूण पंतप्रधानपद हे जास्त पॉवरफुल वाटते. पवार सुद्धा राष्ट्रपती बनण्याऐवजी पंतप्रधान बनायचे प्रयत्न करतात यावरून काय ते समजून जा.
नाही म्हणजे एखाद्या प्रक्रियेची प्रथा आणि प्रक्रियेचा नियम/कायदा या दोन वेगळ्या गोष्टी असतात.
भारत रत्न देण्यासाठी काही कायदा आहे असं वाटत नाही. त्यात वेळोवेळी बदलही करण्यात आले आहेत उदा. सुरुवातीच्या काळात मृत्यूनंतर देत नव्हते, पण शास्त्रीजींना १९६६ साली मृत्यूनंतर देण्यात आला. तसेच खेळाडूंना देत नव्हते पण कालांतराने त्यात बदल करून सचिन तेंडुलकरला देण्यात आला. पण निदान या चर्चेपुरता कळीचा मुद्दा हा आहे की नेहरू पंतप्रधान असताना त्यांनीच स्वतःच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आणि मग नेहरूंना का पुरस्कार देण्यात आला. माझ्या मते त्यांना देण्यातही काही अडचण नसावी फक्त वादाचा मुद्दा हा आहे की त्यांनी स्वतःच स्वतःची शिफारस का करावी? कुठलाही पुरस्कार अथवा सन्मान दुसर्याने आपणहून देणे जास्त महत्वाचे आणि मानाचे असते. आपणच आपल्याला गौरवून घेण्यात काय गंमत आहे?
अजून एक म्हणजे नगरीनिरंजन यांनी मोदींना भारत रत्न देण्यासंबंधी खोचक टिपण्णी केली आहे. ज्यांची फारशी नावे पण ऐकली नाहीयेत किंवा ज्यांचे भरीव कार्य पटकन सांगता पण येणार नाही अश्यांना पण हा पुरस्कार दिला आहे. मग समर्थक आणि विरोधक ज्यांचा सतत जप करत आहेत अश्या मोदींना दिला गेला तर का वाईट वाटावे? आणि ते पण देण्याच्या आधीच?
11 Mar 2019 - 12:58 pm | भंकस बाबा
मी कोणते दावे केले ते जरा दाखवून देता का?
नाही जरा आजकाल स्मरणशक्ति कमी झालेली आहे
3 Mar 2019 - 6:43 am | ट्रेड मार्क
माझ्या मते जळालेली प्रेतं घटनास्थळावरुन केवळ द्वेषाचे राजकारण करण्यासाठी आपल्या शहरात* वाहून नेणार्या व्यक्तीची बाजू घेऊन वर दुसर्याला द्वेष करतो असे म्हणणारे खरे दुटप्पी.
ज्या कारसेवकांचा त्यात मृत्यू झाला ते काही गोध्र्याचे स्थानिक नव्हते तर त्यातले बहुतांशी अहमदाबाद व आसपासच्या भागातले होते. या मृतांचे नातेवाईक अहमदाबाद मध्येच होते आणि आधीच दंगल पेटलेल्या गोध्र्याला या नातेवाईकांना आणणे कितपत शहाणपणाचे होते? गोध्र्यात आधीच दंगल चालू झाल्याने ही जळालेली प्रेते तिथे ठेवणे पण शक्य नव्हते. मग यांचं काय करायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं? तशीच घटनास्थळी ठेऊन द्यायची?
तसेच हे मृतदेह पहाटे ३.३० ला पश्चिम अहमदाबाद मधील एका सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणले गेले. पश्चिम अहमदाबाद मध्ये मुस्लिम लोकसंख्या नगण्य आहे. त्यामुळे सगळे झोपलेले असताना अजिबात गाजावाजा न करता दूरच्या एका सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मृतदेह आणणे हे योग्य होते. जर मोदींना दंगल भडकवायचीच असती तर दिवस उजेडी गाजवाजा करत हे मृतदेह आणले असते.
दुसरी गोष्ट म्हणजे "आपल्या शहरात" याचा अर्थ काय? गुजराथची राजधानी गांधीनगर असून मुख्यमंत्र्यांचे ऑफिस व निवासस्थान गांधीनगरमध्येच आहे. मोदींचे जन्मस्थान वडनगर हे मेहसाणा जिल्ह्यात असून ते अहमदाबादपासून १०० किमी दूर आहे. म्हणजेच अहमदाबाद मोदींचे आपले शहर कसे काय होऊ शकते? याचे स्पष्टीकरण द्याल का?
पण प्रेते इकडून तिकडे नेणे गुन्हा नाहीय ना; त्यामुळे त्याचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन आहे.
असणारच ना? जर मनात काळेबेरे असते तर लपूनछपून केलं असतं.
बाकी तुम्हाला मोदी द्वेषाचे राजकारण करतात हे पुराव्यासहित सिद्ध करता येईल का?
11 Mar 2019 - 2:34 am | नगरीनिरंजन
वा बाप्पू वा!
स्वत: मोदीभक्त म्हणतात तेव्हा जग डोळे मिटून बसलेलं असतं असं नाही.
ह्या व्हिडिओत पाहा. गुजरातचा “किस्सा” परत एकदा घडवा म्हणताहेत भक्त लोक. तेही लंडनमधले “शिकलेले”. हे तुम्हाला चिंताजानक वाटणार नाही कारण तुमच्या डोक्यात काय आहे तेही उघड गुपित आहे.
https://www.facebook.com/2481865895172491/posts/3044861948872880?sfns=mo
11 Mar 2019 - 5:35 am | ट्रेड मार्क
ह्या व्हिडिओमध्ये असलेली व्यक्ती ही मोदीभक्तच याचा काय पुरावा आहे?
11 Mar 2019 - 6:15 am | नगरीनिरंजन
बरं, तिथल्या देशभक्तांपैकी कोणीही त्या वाक्यावर आश्चर्य किंवा आक्षेप व्यक्त केला नाही म्हणजे लोकांना काय आहे ते माहित आहे इतकाच त्याचा अर्थ.
तुम्ही पुरावा मागायची आणि कोणी तो द्यायची गरज नाही.
11 Mar 2019 - 7:25 am | ट्रेड मार्क
दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्याने पटकन एक वाक्य म्हणले आणि त्यावर कोणीच काहीच बोलले नाहीये. म्हणजे ना कोणी समर्थन केले ना कोणी विरोध केला. तर तुम्हाला म्हणायचं आहे की कोणी विरोध केला नाही म्हणजे बाकीच्यांना ते मान्य आहे? किती पटकन तुम्ही निष्कर्ष काढून मोकळे झालात. कदाचित रॅपिड फायर सारखं होत असल्याने कोणाला रिऍक्ट करायला वेळ मिळाला नसेल.
बाकी गुजराथ मध्ये २००२ पूर्वी सारख्या धार्मिक दंगली व्हायच्या पण २००२ नंतर मात्र एकही झाली नाही हे विचार करण्यासारखं आहे ना? असं होण्याचं काय कारण असावं बरं? बरं २००२ नंतर सगळे मुसलमान गुजराथ मधून पळाले असं पण नाहीये, मग एकदम काय झालं असावं बरं?
11 Mar 2019 - 7:57 am | आजानुकर्ण
अहो ते फक्त दुसर्याला पुरावे मागतात. निव्वळ थापेबाजी आणि खोटेपणाचा ट्रेडमार्क.
11 Mar 2019 - 7:56 am | आजानुकर्ण
अरे मित्रा ते उर्दू भाषा पाकिस्तानला कधी दिली याचे पुरावे मिळाले की नाही? तैमूरचे गोडवे कुठे गायलेत हे कधी सांगणार आहेस? दुसऱ्यांना पुरावे विचारण्यापूर्वी तुझ्या थापेबाजी आणि खोटेपणाचा ट्रेडमार्क कधी बंद करणार?
12 Mar 2019 - 7:52 am | ट्रेड मार्क
मी इथे तुम्हाला काही प्रश्न विचारलेत त्यापैकी एकाचेही उत्तर दिले नाहीयेत. एवढंच नव्हे तर तुमचा एकही प्रतिसाद मुद्देसूद सुद्धा नाहीये आणि तुम्ही मला कसले पुरावे मागताय.
तुम्हाला माझे पुराव्यांसकट दिलेले प्रतिसाद हास्यास्पद वाटतात यावरूनच काय ते समजून जा. तुमची आकलनशक्तीच नव्हे तर एखादा विषय घेऊन त्यावर संशोधन करण्याची आणि तो नीट मुद्देसूद मांडण्याची शक्ती जरा कमी आहे हे वारंवार सिद्ध कशाला करताय?
उर्दू भाषा
उर्दू ही पूर्वीच्या हिंदुस्थानमधील एक भाषा होती. जरी ६ ते १३ व्या शतकादरम्यान ही भाषा संस्कृत आणि प्राकृत पासून डेव्हलप झाली असली तरी नंतर त्यात बरेच पर्शियन आणि अरेबिक शब्द आले. त्यामुळे आता बहुतेक उर्दू शब्द पर्शियन आणि अरेबिक आहेत. अरेबिक प्रभावामुळे ही भाषा मुख्यत्वे हिंदुस्थानातील मुसलमान लोकांनी आपली मानली. नंतर जेव्हा फाळणी झाली तेव्हा खरं तर मुस्लिमांसाठी दुसरा देश पाहिजे अशी मुख्य मागणी होती. पण त्यावेळेसच्या काही महत्वाच्या नेत्यांच्या बोटचेपेपणामुळे फाळणीमध्ये बराच गोंधळ झाला आणि त्यामुळे झालेले परिणाम आपल्या समोर आहेत. उर्दू ही पाकिस्तानची पण राष्ट्रीय भाषा आहे. म्हणजेच पाकिस्तानने ती त्यांची भाषा म्हणून स्वीकारली आहे. परंतु अजूनही भारतात ही वापरली जाते कारण भारतात मुस्लिम लोकसंख्या बऱ्यापैकी आहे. माझा प्रश्न आहे की जर फाळणी मुसलमानांसाठी एक वेगळं राष्ट्र हवं म्हणून झाली तर मुस्लिमांसकट ती भाषा पण का दिली नाही?
परत एक प्रयोग करून बघा -
तुम्हाला आणि तुमच्या नात्यातल्या व ओळखीतल्या किती लोकांना उर्दू भाषा चांगली लिहितावाचता येते? किती हिंदूंना हिंदीइतकीच चांगली उर्दू लिहितावाचता येते? लिहिण्यावाचण्याचं जाऊद्या निदान समजते तरी? हे प्रश्न विचारा.
मी काही दिवसांपूर्वी एका प्रतिसादात हिंदी चित्रपटसृष्टीमधील उर्दू आक्रमणाबद्दल लिहिलं होतं. जी उर्दूमिश्रित गाणी असतात त्यातल्या किती शब्दांचा अर्थ किती हिंदू प्रेक्षकांना कळतो? आफरीन, रशक-ए-कमर, बा-दस्तूर, शिद्दत, हयात, मायस्सार, पेहलू असे शब्द किंवा इब्देताये इष्क मे (१९६२), जिहाल-ए-मिस्कीन (१९८५) पासून ते जेहानसीब (२०१४) अशी कितीतरी हिंदी चित्रपटांतील गाणी आहेत ज्यांचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? हे प्रश्न विचारा.
13 Mar 2019 - 3:32 pm | आजानुकर्ण
अरे बाबा, तू दावा केला होतास की तैमूर आणि औरंगजेब यांचे गोडवे गातात, त्याला तू काय पुरावा दिला आहेस? तू खोटे बोलून काहीही प्रश्न विचारशील. त्यांची काय उत्तरं द्यायची? आधी तू जे दावे करतोय ते खरे आहेत ते तर दिसू दे.
आता इथे हसू की रडू? एक भाषा अनेक ठिकाणी वापरता येत नाही ही नवी कुजबूज आहे की काय? बांग्लादेशाची निर्मिती खास बंगाली भाषेसाठी झाली. मग आता बंगाली सोडून द्यायची का? काश्मीरमध्ये मुस्लीम लोकसंख्या बर्यापैकी आहे, ते देऊया का?
अरे बाबा, हिंदूंना ऊर्दू यायला पाहिजे हे कोणी सांगितले? बहुतेक हिंदूंना तमिळ येत नाही, तेलुगू येत नाही, मराठी येत नाही, माझ्या ओळखीतल्या एकाही हिंदूला संस्कृत येत नाही. तुला किती चांगली संस्कृत येते रे? भारताच्या राज्यघटनेतील उर्दू ही एक शेड्यूल्ड भाषा आहे. राजकीय स्वार्थासाठी निदान राज्यघटनेचा अपमान करण्याचे देशद्रोही पाप करू नकोस.
?? मग काय झालं? मराठी भाषेत अनेक शब्द अरबी-फारशी आहेत.
तुझा दावा उर्दू भाषा पाकिस्तानला दिली हा होता. ती कधी दिली तेवढे सांग नाहीतर थापेबाजी आणि खोटेपणाचा ट्रेडमार्क बंद कर.
अफवा पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणार्या तुझ्यासारख्या देशद्रोही लोकांना जसा वेळ मिळेल तसे उत्तर दिले जाईल.
ही गाणी तुला कळत नाही हा तुझ्या आकलनशक्तीच्या मर्यादेचे प्रश्न आहे. तुझ्यासारख्यांसाठी 'सी ए टी कॅट, कॅट माने बिल्ली', 'मी बाबूराव बोलतोय' वगैरे सोपी गाणीही आहेत. ती एेक.
13 Mar 2019 - 7:35 pm | ट्रेड मार्क
स्वतःला कोण समजतोस? आपली काही ओळख नसताना, मी कोण आहे ते माहित नसताना अरेतुरे का करतोस? आणि मला देशद्रोही म्हणणारा तू कोण? मी उर्दू आपली भाषा नाही म्हणलं, मुघल, टिपू, तैमूर ई वर टीका केली म्हणल्यावर शेपटीवर पाय पडल्यासारखा का केकाटतो आहेस? हिंदूंचा द्वेष करणाऱ्या या मुस्लिम आक्रमकांचे तुला एवढे प्रेम आहे म्हणजेच तू स्वतःच देशद्रोही आहेस हे सिद्ध केलंस.
तसंही तुझ्यासारख्यांकडून मुद्देसूद चर्चेची व प्रतिसादांची अपेक्षा नव्हतीच. पण असले प्रतिसाद देऊन स्वतःची लायकी आणि पातळी काय आहे हे दाखवून दिलंस. असो. मला तुझ्याइतकी पातळी सोडून विचार करता येत नाही आणि खुल्या संस्थळावम, संस्थळाच्या एका सभासदांबद्दल तर असे अजिबात लिहिता येत नाही. अगदी इस्लामी आक्रमक तुला प्रचंड आवडत असले तर मी त्यांची वाईट बाजू पुराव्यांसहीत मांडत असताना त्यांची चांगली बाजू तुला का मांडता आली नाही? मी समाजात फूट पाडण्याचा काय प्रयत्न केला हे सिद्ध कर नाहीतर आपले शब्द मागे घे.
स्वतःचे प्रतिसाद एकदा तरी नीट वाचून बघावेत.
बांगलादेशची निर्मिती खास बंगाली भाषेसाठी झाली
हा तुझा दावा सिद्ध कर.काश्मीरमध्ये मुस्लीम लोकसंख्या बर्यापैकी आहे, ते देऊया का?
अच्छा आता कुठे तुझ्या मनात खरं काय आहे ते बाहेर येतंय. काश्मीरमध्ये मुस्लीम लोकसंख्या बर्यापैकी आहे याचे कारण काय आहे? काश्मिरी हिंदूंना तिथून हुसकून लावण्यात आले त्यामुळे मुस्लिमांची संख्या वाढली आहे.
अरे बाबा, हिंदूंना ऊर्दू यायला पाहिजे हे कोणी सांगितले? बहुतेक हिंदूंना तमिळ येत नाही, तेलुगू येत नाही, मराठी येत नाही, माझ्या ओळखीतल्या एकाही हिंदूला संस्कृत येत नाही. तुला किती चांगली संस्कृत येते रे? भारताच्या राज्यघटनेतील उर्दू ही एक शेड्यूल्ड भाषा आहे.
अरे मूढा, एवढ्या वेळा सांगूनही समजलं नाही? मराठी भाषा मराठी लोकांची आहे, तामिळ भाषा तामिळींची आहे तशी उर्दू कोणाची आहे? मुसलमानांची ना? मग त्यांच्यासाठी जर हिंदुस्थानचा तुकडा करून वेगळे राष्ट्र केले गेले तर लोकांसकट त्यांच्याशी निगडित सगळं दिलं पाहिजे ना? उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे तशी मराठी, तामिळ, तेलगू कोणत्या राष्ट्राची राष्ट्रभाषा आहे का? जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे उर्दू पाकिस्तानला दिली नाही तर तो अजूनच मोठा प्रॉब्लेम आहे, कारण आता सध्या लोकांना आपल्या मातृभाषेपेक्षा उर्दू शब्द जास्त माहित आहेत.
भारताच्या राज्यघटनेतील उर्दू ही एक शेड्यूल्ड भाषा आहे.
अरे बाबा मग तोच तर प्रॉब्लेम आहे ना. संस्कृत ही पण एक भारताच्या राज्यघटनेतील शेड्यूल्ड भाषा आहे. हिंदू संस्कृतीची पारंपरिक भाषा असूनही त्याला महत्व दिले जात नाही, नीट शिकवली जात नाही.
मराठी भाषेत अनेक शब्द अरबी-फारशी आहेत.
हे मान्य आहे ना? मराठीत पहिल्यापासून अरबी आणि फारसी शब्द होते का? म्हणजेच हे सिद्ध होतंय की या लोकांचे/ भाषांचे आपल्या भाषेवर आक्रमण झाले.
राजकीय स्वार्थासाठी निदान राज्यघटनेचा अपमान करण्याचे देशद्रोही पाप करू नकोस.
कुठला राजकीय स्वार्थ? इथे राजकारणाची चर्चा चाललीच नाहीये. माझ्या यासंबंधीच्या प्रतिसादात कुठेही भाजप, काँग्रेस वगैरे आलेत का? तुझ्या डोक्यात जर ते असेल तर ते तुझ्याकडे ठेव. माझे इथले प्रतिसाद फक्त मुस्लिम आक्रमकांनी पूर्वीपासून हिंदूंवर कसे अत्याचार केले आणि आता सुद्धा मुस्लिम लोक हिंदूंना (नव्हे इतर सर्व धर्मियांना) कसे वागवत आहेत यावर आहेत. राज्यघटनेचा अपमान मी कुठे केला? पण उर्दू भाषा जी पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे अश्या भाषेला भारतात शेड्यूल्ड भाषेचा दर्जा का दिला गेला हा प्रश्न उरतोच.
तैमूरबद्दल म्हणायचं झालं तर मला शाळेत एक धडा होता ज्यात तैमूर किती शूर होता वगैरे होतं. बाकी मी जी पुस्तकं वाचली त्यातही तैमुरचे वर्णन शरीराची एक बाजू अधू असूनही कसा शूर योद्धा होता असेच होते. त्याने हिंदूंवर केलेल्या अत्याचाराचे वर्णन असलेले पुस्तक दाखव.
औरंगजेबाचे गोडवे भारतात गायले जात नाहीत? यावरूनच सिद्ध होतंय की किती झापडं लावली आहेस. परत हिटलरचं उदाहरण घेऊ. त्याने ज्यूंवर अत्याचार केले त्यामुळे ज्यू लोकांसमोर त्याचे नाव सुद्धा घेतलेलं चालत नाही. एवढंच नव्हे तर हिटलर ज्या देशाचा होता त्या जर्मनीत सुद्धा हिटलरचं नाव चांगल्या अर्थानं घेतलं जात नाही. पण भारतात मात्र ज्या औरंगजेबाने हिंदूंवर इतके अत्याचार केले त्याच्या नावाने देशाच्या राजधानीत मुख्य रस्ता आहे. महाराष्ट्रात त्याचे नाव असलेले एक शहर आहे तसेच त्याचे थडगे पण खुलताबाद येथे आहे आणि लोक तिथे जाऊन माथा पण टेकून येतात. औरंगजेब किती चांगला होता हे शिकवले जाते. का त्याने हिंदूंवर किती अत्याचार केले हे शिकवले जात नाही? मुस्लिम आक्रमकांनी आपली देवळे नेस्तनाबूत केली, सांस्कृतिक हानी केली हे का शिकवलं जात नाही?
ही गाणी तुला कळत नाही हा तुझ्या आकलनशक्तीच्या मर्यादेचे प्रश्न आहे
.मी मदरशात शिकलो नसल्याने मला नाही कळत या शब्दांचे अर्थ, तुला कळतात तर सांग ना.
एकूण तुझ्या सर्व प्रतिसादांमधून हेच अधोरेखित होतंय की तुला फक्त इतरांना नावं ठेवता येतात. कुठल्याच प्रतिसादात मुद्देसूद प्रतिवाद, उदाहरणे वा पुरावे नाहीयेत कारण एकूण अभ्यास कमी आहे. त्यामुळे मग इतरांना लेबलं लावतोस कारण स्वतःचे अज्ञान झाकायचे आहे. मी काय खोटेपणा केला हे सिद्ध कर नाहीतर गप्प बस. माझ्या सर्व प्रतिसादांमधून मी बरेच मुद्दे मांडलेले आहेत आणि प्रश्नही विचारले आहेत. तू फक्त तैमूर आणि उर्दूला चिकटून बसला आहेस. त्यावरूनच सिद्ध होतंय की तुला प्रतिवाद करता येत नाहीये.
14 Mar 2019 - 8:05 pm | डँबिस००७
उर्दु ही पाकिस्तानची राज्य भाषा आहे. तिथल्या ३/४ जनतेची भाषा ही सिंधी व पंजाबी आहे.
पाकिस्तान मध्ये हिंदु द्वेष हा लहान पणा पासुन शिकवला जातो, संस्काराचाच तो एक भाग आहे. ईथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे.
पाकिस्तान निर्माण कोणी केला ? पाकिस्तान निर्माण केला मुस्लिम लिगच्या लोकांनी . जेंव्हा १९४६ -४७ साली निवडणुका झाल्या त्यावेळेला दोन पक्ष होते. काँग्रेस व दुसरा मुस्लिम लीग . मुस्लिम लीगला सपोर्ट करणारे जास्तीत जास्त लोक हे उत्तर प्रदेश, बिहार मधले नवाब व त्यांचे नोकरदार लोक होते. त्यांना देशावर रा ज्य कराय चे डोहाळे लागलेले होते. भारतावर सुशिक्षीत हिदु राज्य करणार आणी अश्या काफिर हिंदुच्या हाताखाली रहायच पचनी पडत नव्हत म्हणुन त्यांनी वेगळ्या देशाची मागणी केली व देशाची फाळणी झाली.
मुळात पाकिस्तान बनला सिंध, पंजाब व बलुचीस्तानच्या भाग घेऊन. ह्या बलुचीस्तान हा वेगळा देश होता. सिंधु प्रदेश व पंजा ब मध्ये मुस्लिम जन संख्या विषेश नव्हती व मुस्लिम लीगला जनाधार नव्हता. सिंध मध्ये सिधी तर पंजाब मध्ये पंजाबी बोलली जायची. उर्दुला त्यावेळच्या समाजात स्थान नव्हत. जेंव्हा पाकिस्तान बनला तेंव्हा ईथले उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व बिहार मधले मुसलमान भारत देश सोडुन पाकिस्तानात जाऊन राहीले. मुळात पाकिस्तानच्या हिंदु द्वेषाच मुळ ईथे आहे. ह्या स्थलांतरीत लोकांनी पाकिस्तानात प्रवेशच सरकार स्थापन करायच्या महत्वाकांक्षेने केलेला असल्याने भराभर ह्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व बिहारच्या उर्दु भाषीक लोकांनी
सरकारातल्या महत्वाच्या जागा भरल्या व महत्च्वाचे निर्णय घेतले. पाकिस्तानची राज्य भाषा ही उर्दु का झाली हे त्याच महत्वाच कारण आहे. पण पंजाब मधल्या दणकट लोकांचे मनोधर्य खचण्यासाठी पंजाबी व सिंधी भाषेला बँन करण्यात आले. पंजाबी व सिंधी लोकांनी त्याच्या मायबोलीत बोलण मुश्किल झाल.
11 Mar 2019 - 4:41 pm | डँबिस००७
अरे व्वा भारतात चींता करण्यासारख वातावरण आहे हे प्रुव्ह करण्यासाठी तुम्ही आता लंडन मधले व्हीडीयो दाखवणार का ?
मग आम्ही तुम्हाला ईथलेच भारतातले व्हीडीयो दाखवतो की !
तुम्हाला गुजरातचा “किस्सा” परत एकदा घडवा ह्या बद्दल चींता वाटत असेल तर अकबरुद्दीन ओवेसीने
१ बिलीयन हिंदु लोकांनाच कत्तले आम करुन टाकु म्हणालेल दिसल नाही ? ह्या १ बिलियन हिंदु मध्ये तुम्ही नाहीत असा गैरसमज वैगेरे
करुन घेऊ नका बर का !! अकबरुद्दीन ओवेसी हा निवडुन आलेला निवडुन आलेला आमदार आहे !!
https://www.youtube.com/watch?v=krdym7gFVvA
Akbaruddin Owaisi wants 15 minutes to eliminate 1 billion Hindus with ENGLISH
तुम्ही हिंदुना दोष देत खुषाल बसा पण जेंव्हा जझवा ऐ हिंद होईल तेंव्हा सगळे जण गाजर मुली सारखे कापले जातील तेंव्हा ते तुम्हाला तुमची जात धर्म विचारणार नाहीत. त्यांना मुस्लिमेतर लोकांशी वैर आहे. जिंवत रहायच असेल तर खुषाल इस्ल्माम स्विकारा !!
2 Mar 2019 - 5:50 am | नगरीनिरंजन
मुस्लिमद्वेष्टे हा शब्द तुम्ही वापरलात. मी फक्त द्वेषाचे राजकारण करतात इतकेच म्हणालो.
त्यांनी दंगली आटोक्यात आणल्या, मुस्लिमांना व इतर अल्पसंख्यकांना संरक्षण वगैरे दिले असेलच; पण स्वतःची प्रतिमा कशी काळजीपूर्वक घडवली हे राजकारणात महत्त्वाचं असतं. मोदी त्याबाबतीत सजग आहेत. ते कधी बोलतात, कधी गप्प बसतात, प्रेतं कुठे नेतात, शहीदांचे फोटो कुठे लावतात त्याचं निरीक्षण केले तर कळेल.
2 Mar 2019 - 11:09 am | बाप्पू
इतकेच जर मोदी वाईट आहेत तर कदाचित ते आज पंतप्रधान नसते.
बाकी तुमच्याकडे मोदी द्वेषाचे राजकारण करतात याचे जर काही पुरावे असतील तर इथे स्पष्ट सांगा ना. आणि जर अगदीच भक्कम पुरावे असतील तर कोर्टात केस का नाही दाखल करत??
2 Mar 2019 - 1:29 pm | डँबिस००७
मुस्लिमद्वेष्टे हा शब्द तुम्ही वापरलात. मी फक्त द्वेषाचे राजकारण करतात इतकेच म्हणालो.
काँग्रेस आता पर्यंत हिंदु द्वेषाचे राजकारणच करत होते. त्याचाच परिणाम आहे हा कि मुस्लिम लोक प्रत्येक राज्यात अश्या वस्त्या बनवुन आहेत जेथे हिंदु म्हणुन पाय ठेवायला तुम्हाला हिंम्मत होणार नाही ईतकच नाही तर पोलिसही तिथे एकटे दुकटे शिरत नाहीत !
नेहमी प्रमाणे तुम्हाला श्री मोदीजींचा २००२ सालचा गुजरात दिसला पण त्या दंग्याच मुळ कारण असलेले गोध्रा प्रकरणात ६० - ७० लोकांना जिवंत जाळणारे लोक दिसले नाहीत.
5 Mar 2019 - 11:34 am | सुबोध खरे
नेहमी प्रमाणे तुम्हाला श्री मोदीजींचा २००२ सालचा गुजरात दिसला पण त्या दंग्याच मुळ कारण असलेले गोध्रा प्रकरणात ६० - ७० लोकांना जिवंत जाळणारे लोक दिसले नाहीत.
असं कसं असं कसं
पुरोगामी, बुद्धिवादी, सेक्युलर म्हणवून घ्यायचं असला कि हे असं सगळं करावंच लागतं.
6 Mar 2019 - 3:17 am | ट्रेड मार्क
यासाठीचे पुरीमागी उत्तर तयार असते. बाबरी मशीद पाडली म्हणून पुढचे सगळे घडले.
यांचा इतिहास २००२ आणि त्यांनतर फार तर १९९२ पर्यंत जाऊन थांबतो. १९९२ आणि २००२ मधल्या पण कुठल्याही घटना आठवत नाहीत. त्यानंतर फार तर समझोता एक्सप्रेस मधला बॉम्बस्फोट आठवेल, पण तो पण फक्त कर्नल पुरोहित आणि स्वामी असीमानंद यांचे नाव गोवले गेले म्हणून. त्यानंतर २००८ चे मालेगाव बॉम्बस्फोट आठवतील ते पण फक्त साध्वी प्रज्ञा यांचे नाव गोवले गेले म्हणून.
त्यापलीकडे जे काही भारतात झाले ते फक्त वाट चुकलेल्या काही निष्पाप तरुणांमुळे झाले. ते पण त्यांना त्या वाटेवर जायला कट्टर हिंदूंनी लावले किंवा त्या बिचाऱ्यांवर पोलीस व सैन्याने काही अत्याचार केले म्हणून झाले. उदा. आदिल दार याला सैनिकांनी चांगली वागणूक दिली नाही म्हणून त्याने पुलवामाचा हल्ला केला. १९९२ ची मुंबई दंगल आणि १९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट १९९२ मध्ये बाबरी पाडली म्हणून झाले. थोडक्यात १९९२ नंतर जे दंगे, हल्ले आणि बॉम्बस्फोट झाले त्याला बाबरी मशीद आणि १९९२ च्या आधीचे सगळे फाळणीच्या वेळेला त्यांच्यावर किती अत्याचार झाले म्हणून, अशी कारणे ठरवून दिलेली आहेत.
11 Mar 2019 - 6:19 am | नगरीनिरंजन
पुरोगामी, बुद्धीवादी, सेक्युलर हे शब्द हेटाळणीसारखे वापरुन डॉक्टरसाहेबांनी ते धर्मांध असल्याचे कबूल केले म्हणायचे.
11 Mar 2019 - 7:35 am | ट्रेड मार्क
जरी धर्म आहेत असं म्हणलं तरी ही परिस्थिती यायला सुद्धा पुरोगामी, बुद्धीवादी, सेक्युलर स्वतःच जबाबदार आहेत. आता या पुलवामा हल्ला आणि त्यावर भारताची ऍक्शन यावर सुद्धा हे पुरोगामी, बुद्धीवादी, सेक्युलर लोकच शंका घेत आहेत ना? सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही, बालाकोट मध्ये जाऊन नक्की हल्ला केला का नाही, केलाच तर किती अतिरेकी मेले याचा आकडा द्या आणि त्याचा पुरावा द्या यापासून ते पुलवामाचा हल्ला मोदींनीच घडवून आणला अश्या कॉन्स्पिरसी थिअरीज हेच पुरोगामी, बुद्धीवादी, सेक्युलर लोक मांडत आहेत ना?
या लोकांनी हिंदूंच्या बाजूने काय बोललंय याचा पुरावा देता येईल का?
11 Mar 2019 - 10:28 am | सुबोध खरे
पुरोगामी, बुद्धीवादी, सेक्युलर म्हणवणारे हे केवळ एकांगीच बोलत असतात आणि दुटप्पी वागत असतात.
तीन तलाक, समान नागरी कायदा ( फौजदारी कायदा समान आहे हे ते सोयीस्करपणे विसरतात) याबद्दल कायम यांचे तोंड शिवलेले असते.
जे खरे सेक्युलर आहेत ते स्वच्छ पणे म्हणतील कि भारतीय असलेल्या सर्वाना एकच कायदा, एकच न्याय.
साधे --सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे सांगून तीन तलाक बद्दल कायदा नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार आणि भारतीय घटनेनुसार बनवावा हे सांगितले असून अजूनही सगळेच्या सगळे पुरोगामी बुद्धिवादी सेक्युलर म्हणवणारे त्यात खोड घालून राज्यसभेत कायदा पास होऊ देत नाहीत
त्याबद्दल एक अवाक्षर नाही
आणि एवढे असून आम्ही धर्मांध?
इतका दांभिकपणा फक्त आपल्यासारख्या लोकांकडूनच अपेक्षित आहे.
2 Mar 2019 - 3:44 pm | गामा पैलवान
नगरीनिरंजन,
मोदी नक्की कोणाचा द्वेष करतात, हा प्रश्नं उरतोच. राजकारण सगळेच करतात. मग मोदींनी केलं तर काय बिघडलं?
आ.न.,
-गा.पै.
2 Mar 2019 - 3:47 pm | गामा पैलवान
बाप्पू,
असहमत. मोदींची बदनामी आजीबात चिंताजनक नाही. उलट त्यामुळे मोदींची मतं वाढतात.
आ.न.,
-गा.पै.
3 Mar 2019 - 11:30 pm | शाम भागवत
संपूर्णपणे सहमत.
11 Mar 2019 - 11:32 am | गोंधळी
मोदी जर का चांगल काम करत असतील तर खोटी मार्केटिंग का करावी लागते त्यांना.
दुवा:- https://www.youtube.com/watch?v=wfF5Q17lYy4