युवक मतदारकांचा दृष्टीकोण..

मुदखेडकर's picture
मुदखेडकर in राजकारण
7 Mar 2019 - 2:37 pm

आता काहीच दिवसात आगामी लोकसभा 2019 निवडणुका जाहिर होतील व सर्वत्र देशात राजकिय धुमाकुळीचे वातावरण निर्माण होईल यात शंकाच नाही. ही निवडुणक माझ्यासाठी महत्त्वाची कारण मतदान करण्याची ही माझी प्रथमच वेळ आणि घरामध्ये पहिले पासुनच राजकिय वातावरण व राजकीय चर्चा असल्यामुळे थोडी उत्सुकता. आता नव युवक पीढी मध्ये राजकारणा बद्धल थोडी जागरुक झाली हे म्हणणे
चूकीचे होणार नाही. पहिले मतदाना करतांना मदतार हे जात- पात, धर्म इ. गोष्टी मनात ठेवुन मतदान करायचे पण आता युवक विकास व राष्ट्रहित या मुद्यावर मतदान करतील असे चित्र दिसत आहे आणि मतदान करत असताना मतदार वयक्तीक विचार न करता सार्वजनीक विचार करातील हे माझे प्रामाणीक मत आहे. तसेच युवक योग्य देशप्रतिनिधि निवडून देश सुराक्षित हातात देतील अशी अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया

मुदखेडकर's picture

7 Mar 2019 - 3:14 pm | मुदखेडकर

माझा पाहिलाच
लेख

तुषार काळभोर's picture

7 Mar 2019 - 11:52 pm | तुषार काळभोर

अजून दोन तीन दशके तरी भारतीय राजकारण आणि निवडणुका जात, धर्म, पाकिस्तान यांच्याशिवाय पार पडणे शक्य नाही.

डँबिस००७'s picture

8 Mar 2019 - 12:58 am | डँबिस००७

योग्य देशप्रतिनिधि
कुठुन आणणार ? काही मोजके अपवाद सोडले तर गेल्या ७० वर्षांत कोणीही दिसले नाहीत !

आता नव युवक पीढी मध्ये राजकारणा बद्धल थोडी जागरुक झाली हे म्हणणे चूकीचे होणार नाही.

ग्वाड क्नोज ! माझी चाळीशी आली तरी मला प्रत्येक निवडणूकीत कोणाला मत द्यायचा याचा बर्‍याचदा संभ्रम पडतो. तरी बरयं, 'नोटा' च्या पर्यायाने कोणाला मत द्यायचे नाही हे मात्र ठरवता येते. पण अजुन अशा किती वांझोट्या डिलिव्हरीज कराव्या लागणार आहेत कोण जाणे !

जात आणि जातीयता या दोन्ही गोष्टी भारतातील निवडणूक प्रक्रियेत खूप महत्वाच्या आहेत. आणि त्यात नजीकच्या काळात काही बदल होने अशक्य वाटतेय.

परवाच एका कॉलेज मधील युवकांच्या प्रतिक्रिया न्यूज वर दाखवत होते. त्यामध्ये जवळपास 50% युवक आणि युवती ह्या आपल्या जातीला कोणत्या सुविधा मिळाल्या हेच पाहत होते. मराठा लोक आरक्षण मागत होते. धनगर ST मध्ये मागत होते. ओबीसी आरक्षण बंद होईल तर सरकार ला परिणाम भोगावे लागतील असे म्हणत होते. शेतकरी मुले कर्जमाफी मागत होते. आणि मुस्लिम डोळे झाकून राहुल सरकार च देशाला का हवे हे सांगत होते.. एकूणच प्रत्येकाची मते हि आपल्या जातीच्या आसपास घुटमळत होती.

पूर्ण कार्यक्रमात कोठेही रस्ते, वीज, पाणी, दवाखाने, संरक्षण, पोलीस, भ्रष्टाचार, परदेश नीती, व्यवसाय पोषक वातावरण या विषयांचा उल्लेख देखील आला नाही...

तुषार काळभोर's picture

9 Mar 2019 - 12:05 am | तुषार काळभोर

तरुणांची प्राथमिकता विकासाचे मापदंड सोडून जातीभोवती घुटमळत असेल तर....

Where the mind is without fear and the head held high;
Where knowledge is free;
Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls;
Where words come out from the depth of truth;
Where tireless striving stretches its arms towards perfection;
Where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit;
Where the mind is led forward by Thee into ever-widening thought and action;
Into that heaven of freedom, my Father, let my country awake.

Rabindranath Tagore

भयशून्य चित्त जेथ, उन्नत सदैव माथा
मम देशही जागृत होवो या मुक्त स्वर्गी आता
-भावानुवाद नरेंद्र जाधव

वामन देशमुख's picture

11 Mar 2019 - 5:01 pm | वामन देशमुख

मिपावर स्वागत, मुदखेडकर.

भरपूर वाचन करा म्हणजे अशुद्धलेखन टाळता येईल, पुलेशु.

तुमच्यासारखाच "युवक योग्य देशप्रतिनिधि निवडून देश सुराक्षित हातात देतील अशी अपेक्षा आहे" याबाबत मीपण आशावादी आहे.

बाकी, कालच निवडणुका जाहीर झाल्यात, बघुयात, २३ मेपर्यंत काय होतेय ते...

चौथा कोनाडा's picture

11 Mar 2019 - 5:46 pm | चौथा कोनाडा

पहिल्या लेखा बद्दल हार्दिक अभिनंअदन ! मिपावर स्वागत !

फार काही फरक पडणार नाही. युवक पिढी बहुतांशी त्याअंंच्या समोर सामाजिक माध्यमां कडून जी माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचते त्या वर विष्वास ठेअववतात, मत बनवतात. त्यामुळे माध्यमां मध्ये शक्तिशाली असतील ते जिंकतील ..... आव्णि अर्थातच जे धनशाली असतील ते माध्यमे विकत घेतीलच.

एबीपी माझा बघा, राजकिय मुलाखतींचा नुसता धडाका लावला आहे.