हातावर बसलेले झुरळ उडवले तेव्हा उसासे सोडत त्याने माझ्याकडे बघितले. पांढरा धूर सोडत मी सिगारेट त्याच्याकडे सोपवली.
बाजूलाच एक चौकोनी बकेट ठेवली होती. रुंद काळपट टेबलावर विखुरलेले तुकडे तिच्यात भरून ठेवले.
शुभ्र पांढरा धूर सोडत तो दुसऱ्या हाताकडे सरसावला. सिगारेट ओढली की त्याच्यातला कलाकार जागा होतो. अगदी नवयौवनेला स्पर्शावे इतक्या अलगद त्याने मनगट कापून काढले. थक्क होऊन मी बघतच राहिलो. खांद्यावर जेव्हा त्याने आलटून पालटून हत्यार चालवले तेव्हा त्याच्या हळव्या हृदयाला एक सलाम ठोकला.
"आता गळा" मी बोललो.
"आधी ह्या मनगटाला इस्तरी कर. मी आलोच" भर उन्हाळ्यात इस्तरीचं काम माझ्यावर सोपवून टेलर चहा प्यायला निघून गेला. शुभ्र पांढरा धूर सोडत.
प्रतिक्रिया
4 Feb 2019 - 11:05 pm | गामा पैलवान
+१
-गा.पै.
4 Feb 2019 - 11:17 pm | बबन ताम्बे
भारीय !
5 Feb 2019 - 12:10 am | डॉ सुहास म्हात्रे
+१
5 Feb 2019 - 2:24 am | पद्मावति
+१
5 Feb 2019 - 4:51 am | निशाचर
+१
5 Feb 2019 - 6:48 am | एमी
:D :D आवडली.
+१
5 Feb 2019 - 7:41 am | किसन शिंदे
+१
5 Feb 2019 - 8:30 am | प्रचेतस
खूप प्रेडिक्टेबल.
5 Feb 2019 - 8:58 am | यशोधरा
कथा म्हणून नाही आवडली.
5 Feb 2019 - 9:05 am | शित्रेउमेश
+१
5 Feb 2019 - 9:23 am | ज्ञानोबाचे पैजार
प्रेडीक्टेबल असली तरी आवडली
पैजारबुवा,
5 Feb 2019 - 11:16 am | समीरसूर
आवडली. गुरुचं पात्र अगदी जिवंत उभं केलंत. आवाजात आणि चालण्या-बोलण्यात एक मस्त स्टाईल आहे असं वाटलं. सिगारेटच्या धुराने त्या टेलरचं पात्र अधिक जिवंत केलं.
5 Feb 2019 - 3:09 pm | चिगो
+१..
5 Feb 2019 - 4:58 pm | नावातकायआहे
:-) भारी....
6 Feb 2019 - 1:23 pm | जव्हेरगंज
+१
मस्त आहे!
=)))
6 Feb 2019 - 2:09 pm | मोहन
+१
6 Feb 2019 - 6:15 pm | मित्रहो
+१ मस्त
13 Feb 2019 - 5:11 pm | निओ
.
13 Feb 2019 - 5:59 pm | असहकार
+1
16 Feb 2019 - 4:42 pm | भीमराव
टेबल वाचलं न टेलर आठवला
16 Feb 2019 - 5:27 pm | दादा कोंडके
छान!
19 Feb 2019 - 9:48 pm | रांचो
+१
21 Feb 2019 - 4:30 am | रुपी
+१
21 Feb 2019 - 8:39 am | बोलघेवडा
+१
:))
21 Feb 2019 - 9:22 am | नाखु
आणि खूप चांगली
+१
21 Feb 2019 - 11:02 am | पियुशा
हे हे आधी वाट्ल खुन होतोय की काय ;)
23 Feb 2019 - 1:09 pm | चौथा कोनाडा
+१
हा हा हा .
उसासे आणि सिगारेटच्या धुराने शशक किती गुढ केली !
25 Feb 2019 - 6:16 pm | ज्योति अळवणी
सुंदर