[शशक' १९] - सत्य कटू ते जहर वाटते

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
6 Feb 2019 - 12:55 pm

"मी आई होणार हे समजल्यावर तुला आनंद नाही झाला? मख्खासारखा जेवणावरुन उठून गेलास? किती विचित्र वाटले? आई बघ किती आनंदात आहेत, त्यांचे प्लॅनही सुरु झाले"

“ भोळी आहे बिचारी, अज्ञानात सुखी आहे . पण माझे काय? तुझ्या सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आहेत हे माहीत असूनही मी आनंदाचे नाटक करू? तू आई होऊच शकत नाहीस हे माहीत असताना खोटे बोलून काय मिळाले तूला? त्यापेक्षा दत्तक घेण्याचा पर्याय का स्विकारत नाहीस?”

“मी मुल दत्तक घेणार नाही कारण माझे नाही तर तुझे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. पण स्वत:चे न्यून लपवण्यासाठी तू दोष माझ्यावर ढकललास.... आणि ज्यावेळी हे मला समजले त्याचवेळी मी आई होण्याचा निर्णय घेतला.”

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

6 Feb 2019 - 2:54 pm | पद्मावति

+१

यशोधरा's picture

6 Feb 2019 - 3:04 pm | यशोधरा

+१

श्वेता२४'s picture

6 Feb 2019 - 3:20 pm | श्वेता२४

+1

विनिता००२'s picture

6 Feb 2019 - 3:59 pm | विनिता००२

वा वा :)

+१

एमी's picture

6 Feb 2019 - 6:36 pm | एमी

+१

तुषार काळभोर's picture

6 Feb 2019 - 10:40 pm | तुषार काळभोर

रोखठोक!

स्मिता.'s picture

7 Feb 2019 - 1:34 am | स्मिता.

+1

सिद्धार्थ ४'s picture

7 Feb 2019 - 11:03 am | सिद्धार्थ ४

+१

नाखु's picture

7 Feb 2019 - 12:44 pm | नाखु

संभावित ढोंगीपणा चेहरा टरटरा पाडणारी कथा.
आपण सहचारिणी ची फसवणूक करीत असू तर तिकडूनही होऊ शकते हे लक्षात ठेवा हाच संदेश भावला.

+११

टवाळ कार्टा's picture

7 Feb 2019 - 4:41 pm | टवाळ कार्टा

-1
अश्या परिस्थितीत रिपोर्ट सगळ्यांसमोर आणून खरी परिस्थिती उघड करणे की समोरच्याने आपल्याला बोल लावले म्हणून मी सुद्धा वाट्टेल ते करायला मोकळी असा पवित्रा घेऊन आणखी नवीन युद्ध पुकारणे योग्य? म्हणजे आधीच मूल कोणामुळे होत नाही हा गोंधळ निस्तारण्या आधीच दुसर्याबरोबर संबंध ठेऊन नवीन आणखी मोठा गोंधळ सुरू करणे

टवाळ कार्टा's picture

7 Feb 2019 - 4:41 pm | टवाळ कार्टा

-1
अश्या परिस्थितीत रिपोर्ट सगळ्यांसमोर आणून खरी परिस्थिती उघड करणे की समोरच्याने आपल्याला बोल लावले म्हणून मी सुद्धा वाट्टेल ते करायला मोकळी असा पवित्रा घेऊन आणखी नवीन युद्ध पुकारणे योग्य? म्हणजे आधीच मूल कोणामुळे होत नाही हा गोंधळ निस्तारण्या आधीच दुसर्याबरोबर संबंध ठेऊन नवीन आणखी मोठा गोंधळ सुरू करणे

संजय पाटिल's picture

8 Feb 2019 - 10:32 am | संजय पाटिल

दुसर्याबरोबर संबंध ठेवणे गरजेचे असते? क्रूत्रीम गर्भधारणा वगैरे उपाय नाहित?

संजय पाटिल's picture

8 Feb 2019 - 1:47 pm | संजय पाटिल

+१ हे राह्यलवतं...

विनिता००२'s picture

8 Feb 2019 - 3:53 pm | विनिता००२

तिच्या जागी तो असता तर त्याने लगेच दुसर्‍या लग्नाची तयारी सुरु केली असती किंवा आयुष्यभर मी कसा तुला समजून घेतोय ह्याची टिमकी वाजवत, तिला न्युनगंड देत राहिला असता.

अपवाद आहेत, पण बोटावर मोजण्याइतकेच!

तिने तरी फक्त आई होण्याची तिची नैसर्गिक इच्छा पुर्ण केली. वैगुण्य तर त्याचे अत्ता ही झाकलेलेच आहे. :) रिपोर्ट उघड करुन न तो सुखी झाला असता, ना ती!

विनिता००२'s picture

8 Feb 2019 - 3:55 pm | विनिता००२

आणी आई होण्यासाठी दुसरे संबंध असावे लागतात असेच नाही. वैद्यकिय तंत्रज्ञान आता तेवढे प्रगत नक्कीच झालेय....हे राहिले होते :)

प्रशांत's picture

11 Feb 2019 - 3:49 pm | प्रशांत

+१

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2019 - 5:41 pm | टवाळ कार्टा

आयोव....असेपण असू शकते...पण फार कमी वेळा

प्रमोद देर्देकर's picture

8 Feb 2019 - 2:36 pm | प्रमोद देर्देकर

आधीच दुसर्याबरोबर संबंध ठेऊन नवीन आणखी

यात तुला कुठे जाणवलं की ते मूल दुसऱ्या बरोबर संबंध ठेवून झाले ते .
ति खोटं पण बोलली असेल आईला खुश करण्यासाठी

नावातकायआहे's picture

8 Feb 2019 - 2:41 pm | नावातकायआहे

+१

नंदन's picture

8 Feb 2019 - 3:03 pm | नंदन

+१

पलाश's picture

8 Feb 2019 - 3:04 pm | पलाश

+१.
बातमी ऐकून सत्य लपवणार्‍याला "इकडे आड, तिकडे विहीर" असे झाले असेल. शशक आवडली.

नीलमोहर's picture

8 Feb 2019 - 3:12 pm | नीलमोहर

-१

किसन शिंदे's picture

8 Feb 2019 - 3:24 pm | किसन शिंदे

-१

नूतन's picture

10 Feb 2019 - 10:25 am | नूतन

+1

दादा कोंडके's picture

11 Feb 2019 - 12:15 am | दादा कोंडके

छान!

अमेयसा's picture

12 Feb 2019 - 10:35 am | अमेयसा

+१

विजुभाऊ's picture

12 Feb 2019 - 12:18 pm | विजुभाऊ

+१ असे न लिहिले नसेल तर तो प्रतिसाद स्पर्धेसाठी ग्रुहीत धरला जाईल का

आनन्दा's picture

14 Feb 2019 - 8:29 am | आनन्दा

+1

nanaba's picture

14 Feb 2019 - 4:15 pm | nanaba

.

बोरु's picture

14 Feb 2019 - 8:04 pm | बोरु

+१

असहकार's picture

15 Feb 2019 - 9:56 am | असहकार

+1

नँक्स's picture

16 Feb 2019 - 5:17 pm | नँक्स

+१

भीमराव's picture

16 Feb 2019 - 8:58 pm | भीमराव

ज्योति अळवणी's picture

18 Feb 2019 - 12:25 am | ज्योति अळवणी

खूप विचारपूर्वक लिहिलेली १०० शब्दात मांंणलेली कथा

ज्योति अळवणी's picture

18 Feb 2019 - 12:26 am | ज्योति अळवणी

खूप विचारपूर्वक लिहिलेली १०० शब्दात मांंणलेली कथा

ह्याबाबतीत डॉक्टरकडून ऐकलेला एक किस्सा..
पुत्रप्राप्ती आणि खानदान की इज्जत ह्या दोन्ही गोष्टींसाठी लोकं काय काय करू शकतात ह्याचे एक उदाहरण..
एका स्त्रीला दोन मुलं होती. दोघांचेही लग्न झाले. पण मोठ्या सुनेला मूल होत नव्हते. तपासण्या केल्यावर प्रॉब्लेम आपल्या मुलात आहे हे स्त्रीच्या लक्षात आले. तिने मोठ्या सुनेपासून ही गोष्ट लपवली. आणि तुझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे असे तिला पटवून कृत्रिम गर्भधारणा करून घेण्यासाठी सुनेला तयार केले (दुसऱ्या पुरुषाचे वीर्य वापरून करण्यात येते तशी गर्भधारणा)
आता आणखी एक खेळ सुरु झाला. परपुरुषाचे वीर्य वापरल्यास होणाऱ्या मुलात आपल्या "खानदानाचं खून" नसेल हे त्या बाईच्या लक्षात आले होते. तिने धाकट्या मुलाला वीर्य देण्यास सांगितले. पण "माझ्या ओळखीत एक स्त्री आहे. तिला मूल होत नाहीये त्यासाठी तू हे कर" असं सांगून ती स्त्री आपल्याच घरातील आहे ह्याचा पत्ता धाकट्या मुलाला लागू दिला नाही.
यथावकाश सगळ्या प्रक्रिया पार पडल्या आणि मोठ्या सुनेला मूल झाले.
पुत्रप्राप्ती, खानदान की इज्जत आणि खानदान का खून असे सगळे मनासारखे झाले.

विनिता००२'s picture

19 Feb 2019 - 12:31 pm | विनिता००२

तिने तिच्या परीने जे करायचे ते केले. मानसिक त्रास झाला / दिला असेच नाही.

नशीब, नियोग पध्दत वापरायला भाग पाडले नाही.

रुपी's picture

21 Feb 2019 - 4:41 am | रुपी

+१