आठवडाभर बेंगलोर मध्येच तळ ठोकून होतो, पूर्ण टीमला कामाला लावलं पण कॉन्ट्रॅक्ट मिळवलंच.
मुबंईत उतरल्यावर फोन सुरु करताक्षणी वाजला "सर, सकाळी अख्या टीमला टर्मिनेशन लेटर मिळाली" रडवेल्या आवाजात सुबोध. "काय? काहीतरी घोटाळा झालाय, मी बघतो". साहेबाना फोन लावला, त्यांनी उचलाच नाही. टॅक्सी करून थेट ऑफिसला. मधेच टीम मधल्या दोघं तिघांचे फोन तेच सांगायला, बायकोचा फोन तर घेतलाच नाही. संताप संताप नुसता. मला न सांगता विचारता टीमला टर्मिनेट केलं. तिरमिरीतच साहेबांच्या ऑफिसत घुसलो जाब विचारायला
साहेबानी बसायची खूण केली पाणी पुढं केलं. "निर्णय पार वरून झालाय" साहेब म्हणाले "तू आज ऑफिस मध्ये येणार नसशील म्हणून तुझं टर्मिनेशन लेटर घरी पाठवले आहे"
प्रतिक्रिया
11 Feb 2019 - 12:36 pm | विनिता००२
कळली नाही नीटशी :(
11 Feb 2019 - 8:32 pm | जव्हेरगंज
कडक!!!
=)))
अश्या केसेस बघितल्या आहेत.
+१
11 Feb 2019 - 9:26 pm | तुषार काळभोर
खरं!!???
औघडे राव!
11 Feb 2019 - 9:26 pm | तुषार काळभोर
+१
11 Feb 2019 - 10:14 pm | नावातकायआहे
+१
12 Feb 2019 - 10:35 am | अमेयसा
+१
12 Feb 2019 - 5:07 pm | ज्योति अळवणी
कोणीतरी समजावा तर मतदान करता येईल
12 Feb 2019 - 6:18 pm | राजाभाउ
कथानायक कुठलं तरी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी बेंगलोर गेलेले असतो, तो परत आल्यावर त्याला कळते कि त्याच्या पूर्ण टीमला नोकरीवरून काढून टाकले आहे म्हणून तो जाब विचारायला जातो तर साहेब म्हणतो टीमच सोड तुलाच काढून टाकलंय
12 Feb 2019 - 6:18 pm | राजाभाउ
+१
13 Feb 2019 - 3:57 pm | निओ
.
13 Feb 2019 - 7:53 pm | सुधीर कांदळकर
आजच्या घडीचे करकरीत वास्तव. आवडली.
13 Feb 2019 - 10:52 pm | सही रे सई
कटू वास्तव
14 Feb 2019 - 2:58 am | प्रफुल्ल
+१
14 Feb 2019 - 7:29 am | आनन्दा
+1
14 Feb 2019 - 10:24 am | नाखु
चाबूक, काहींना पचणार नाही,आणि पटणार तर नक्कीच नाही
14 Feb 2019 - 7:52 pm | बोरु
+१
16 Feb 2019 - 5:31 pm | नँक्स
+१
17 Feb 2019 - 8:31 am | भीमराव
१
19 Feb 2019 - 9:26 pm | रांचो
+१
21 Feb 2019 - 4:58 am | रुपी
वास्तवाच्या अगदी जवळ जाणारी कथा.
21 Feb 2019 - 12:17 pm | पियुशा
+१
28 Feb 2019 - 9:44 am | राजाभाउ
अनेक वर्षे वाचनमात्र होतो. लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न. प्रतिसाद हुरूप वाढवणारा होता. सर्वांचे मनापासून आभार