गुरुजी - "मुलाच्या कुंडलीत राजलक्षण आहेत, फक्त पाण्यापासुन जपा, खुप जपा"
...
...
"आज्जी, सगळेजण जातात सोसायटीच्या पुलमध्ये पोहायला, दहा फुटावरुन उडीपण टाकतात. मीच का नाही जायचे?"
"नको रे बाळा, जाउदे त्यांना, तु हा लाडु खा"
"जाउदेना आई त्याला, पोहायला शिकला तर कसला धोका रहाणार नाही. मी पुर्णवेळ जवळ थांबेन."
"नवसाने झालेले एकुलते पोर, खबरदार पाण्याजवळ नेलेस तर"
...
...
'छे, आता घरी विचारण्यात अर्थ नाही. आजी उगीचच घाबरते. सगळे मित्र हसतात मला. दिवसा शक्य नाही, पण रात्री पुलाजवळचे लाईट बंद झाल्यावर चांगली दहा फुटावरुनच उडी टाकतो, बंटीचे लाईफजॅकेट घालुन.'
...
...
'ठपप..'
वॉचमन - "काय पडलं टँकमधे आता? तळाचे प्लास्टरींग रिपेअर करायला आजच तर रीकामा केला होता
प्रतिक्रिया
11 Feb 2019 - 12:23 pm | राजाभाउ
+१
11 Feb 2019 - 12:31 pm | विनिता००२
आई गं :(
+१
11 Feb 2019 - 12:50 pm | यशोधरा
आई गं. भविष्य खोटेच ठरले म्हणायचे.
11 Feb 2019 - 1:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
11 Feb 2019 - 1:10 pm | प्रशांत
सुन्न
11 Feb 2019 - 1:37 pm | विजुभाऊ
-१ लॉजिकली बरोबर वाटत नाही.
कोणी कितीही अंधारात उडी टाकली तरी तलावात पाणी आहे की नाही हे समजतेच की
11 Feb 2019 - 3:48 pm | एमी
> कोणी कितीही अंधारात उडी टाकली तरी तलावात पाणी आहे की नाही हे समजतेच की > बऱ्यापैकी सहमत.
पण तरी +१
11 Feb 2019 - 5:58 pm | मनुष्य
+१
11 Feb 2019 - 8:06 pm | मित्रहो
+१
11 Feb 2019 - 8:31 pm | जव्हेरगंज
:(
+१
11 Feb 2019 - 9:31 pm | तुषार काळभोर
दहाच्या पूढे वय असेल तर पाय मुरगळला असेल. (माझा पाचवीला मुरगळला होता. आठ फूट उंच टाकीवरून उडी मारली होती.)
पण सूर मारल्यावर काय होईल, कल्पना नाही.
12 Feb 2019 - 10:35 am | अमेयसा
+१
12 Feb 2019 - 5:17 pm | ज्योति अळवणी
एक सत्य घटना. मुलाला पाण्यापासून धोका आहे म्हणून आई वडिलांनी पोहायला शिकवले नाही. पिकनिकला गेला असताना चुकून तलावात पडून 16 वर्षांचा मुलगा पोहोता येत नाही म्हणून गेला.
दुर्दैवी!
13 Feb 2019 - 4:07 pm | निओ
.
13 Feb 2019 - 11:53 pm | समर्पक
.
14 Feb 2019 - 12:05 am | डाम्बिस बोका
ज्योतिष्यावर विश्वास नाही, म्हणून अश्या अंधविश्वास पसरवणाऱ्या कथा साठी
-१
19 Feb 2019 - 9:29 pm | रांचो
+१
23 Feb 2019 - 7:03 am | उपाशी बोका
-१