"माझं बाळ कुठे आहे ?" बाळांतपणानंतर शुद्धीवर आलेल्या प्रितीने तिचा पती रोहनकडे विचारणा केली.
"आलीस तू शुद्धीवर! वा देवच पावला. अग तो काय तुझ्या शेजारीच तर आहे पाळण्यात. कसा हसतोय बघ लबाड!"
"अगदी तुमच्यावर गेला की हो. नाक डोळे तुमचेच घेतलेत. बर मला सांगा याच्या सगळ्या टेस्ट झाल्या आहेत ना ? नाही तर मागच्या सारखं.."
रोहनने प्रितीच्या तोंडावर हात धरला. " तो भुतकाळ होता प्रिती! हा पाहूणा मात्र आपल्या सोबतच राहणार आहे. विश्वास ठेव."
एवढ्यात रोहनचा मित्र , सुनिल तेथे आला. रोहन त्याला घेऊन बाजूला आला.भरल्या आवाजात तो सुनिलला बोलू लागला ," मुल दत्तक घेण्याचं मोठं
काम तू फार कमी वेळात करून दाखवलस गड्या."
प्रतिक्रिया
6 Feb 2019 - 5:37 am | एमी
+१
6 Feb 2019 - 10:03 am | शब्दानुज
+1
6 Feb 2019 - 10:22 am | यशोधरा
आवडली.
6 Feb 2019 - 10:33 am | ज्ञानोबाचे पैजार
कथा म्हणून ठिक आहे, पण फारच फिल्मी वाटली.
पैजारबुवा,
7 Feb 2019 - 5:58 am | एमी
कोणती फिल्म? मलातर The Omen आठवला.
6 Feb 2019 - 3:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
6 Feb 2019 - 5:19 pm | विनिता००२
एव्हडे सोपे नाहीये बाळ दत्तक घेणे :(
6 Feb 2019 - 5:29 pm | किसन शिंदे
वास्तवाशी बरीच फारकत आहे या कथेची.
6 Feb 2019 - 6:32 pm | मराठी कथालेखक
अतिशयोक्ती असल्याने नाही आवडली
7 Feb 2019 - 9:09 pm | सुधीर कांदळकर
आमच्या मुंबईच्या सहनिवासातील एका दांपत्याने एका १-२ दिवसांच्या मुलीला दत्तक घेतले होते.
8 Feb 2019 - 9:43 am | विनिता००२
त्यासाठी किती काळ आधी प्रोसेस सुरु केली होती?
7 Feb 2019 - 10:31 pm | नाखु
पण फक्त कथाहेतुस्तव आवडली.
प्रतारणा विश्वासाचा पाया नसावा
+१
10 Feb 2019 - 12:16 am | ज्योति अळवणी
भावनात्मकता आवडली. पण इतक्या लगेच adoption होत नाही
10 Feb 2019 - 3:08 pm | जालिम लोशन
त्याचाच तो मुलगा आहे आई फक्त वेगळी आहें
14 Feb 2019 - 8:40 am | आनन्दा
:ड
14 Feb 2019 - 11:58 am | विनिता००२
असे कुठे ही वाटत नाही. आणि हे त्याच्या मित्राला माहीत आहे का?
दुसरे त्याच वेळी कसे काय ते बाळ झाले? दोघी एकाच दिवशी बाळंत झाल्या का? भीषण योगायोग :)
14 Feb 2019 - 8:40 am | आनन्दा
+१
14 Feb 2019 - 11:55 am | स्वधर्म
ईथे तर अाईला माहिती नसतानाच दत्तक घेतले असे वाटत अाहे. धक्का तंत्रासाठी अाणि १०० शब्दांच्या मर्यादेमुळे अनेक कथा कच्च्याच खायला लागत अाहेत असे वाटू लागले अाहे.
14 Feb 2019 - 11:46 pm | शब्दानुज
सुरवातीला प्रिती शुद्धीवर आल्याचे सांगितले आहे. कदाचित लेखकाला तिला काही दिवसांनी शुद्ध आली आणि या मधल्या दिवसात दत्तक घेतले गेले आहे असे म्हणायचे आहे
आणि शेवटी रोहन सुनिलला तू हे कमी वेळात करून दाखवल अस मुद्दाम म्हणत आहे त्याअर्थी हा सुनील त्या क्षेत्रातला ( वकील वा अनाथालय चालवणारा) असा कोणतरी असावा आणि प्रिती शुद्धीवर येईपर्यंत सुनिलने आपले त्या क्षेत्रातले वजन वापरून दत्तक घेण्याची प्रक्रीया पुर्ण केली असावी.
15 Feb 2019 - 10:48 am | विनिता००२
बाळांतपणानंतर शुद्धीवर आलेल्या प्रितीने >> हे स्पष्ट ल्लि लिहीलय हो त्यांनी!! मग आपण कसं समजायच बरं !!
23 Feb 2019 - 7:25 am | उपाशी बोका
+१
कथा म्हणून ठीक आहे, पण फिल्मी वाटते. ( "बेशुद्ध असताना बाळंतपण" म्हणजे C-section असा अंदाज)