मुलासाठी माध्यम मराठी की इंग्रजी निवडावं? हा प्रश्न पडला होता. मायमराठीत प्राथमिक शिक्षण उत्तम हे तज्ञांचं मत योग्य वाटत होतं.
इंग्रजी माध्यमातली मुलं स्पर्धेत पुढे जातात. तिथेच मुलाचं कल्याण होईल असं जनमत होतं.
मराठी माध्यमात प्रवेश घेऊन आपण मुलाच्या कल्याणात बाधा आणली असं नको व्हायला म्हणून निमूटपणे इंग्रजी नर्सरीसाठी प्रवेश घेतला.
शाळा जूनमधे चालू होण्यापूर्वीचा एक रविवार मुलाला चित्रातून ओळख करून देण्यासाठी निवडला. पुस्तकातल्या "अॅपलच्या" चित्रावर बोट ठेवून "अॅपल" म्हणायला सांगितलं.
पण मुलगा म्हणाला "सफरचंद".
मी पुन्हापुन्हा सांगूनही तो मलाच त्या चित्रासाठी त्याने अलिकडेच शिकलेला शब्दोच्चार शिकवत राहिला.
"स-फ-र-चं-द".
त्याचं कल्याण कशात ते त्याच्याकडूनच कळालं. मराठी माध्यम निवडलं. कल्याण झालं.
प्रतिक्रिया
5 Feb 2019 - 3:24 pm | ज्ञानोबाचे पैजार
ए - फॉर सेब
बी - फॉर गेंद
सी - फॉर बिल्ली
डी- फॉर कुत्ता
असे म्हणणार्या मुलांचा व्हीडीओ आठवला
पैजारबुवा,
5 Feb 2019 - 3:27 pm | श्वेता२४
अगदी माझा मुलगा पण F फॉर माशा आणि E फॉर हत्ती असे बरेच म्हणतो. प्रसंगोचित कथा
5 Feb 2019 - 3:59 pm | विनिता००२
छान :)
+१
6 Feb 2019 - 3:57 pm | जव्हेरगंज
चांगली.
+१
6 Feb 2019 - 4:53 pm | किल्ली
+१
6 Feb 2019 - 6:31 pm | बबन ताम्बे
छान!
7 Feb 2019 - 1:33 pm | ज्योति अळवणी
उत्तम
7 Feb 2019 - 1:35 pm | सिद्धार्थ ४
7 Feb 2019 - 7:38 pm | खिलजि
मस्तय शशक . आवडली
7 Feb 2019 - 8:23 pm | सुधीर कांदळकर
वास्तव .....
8 Feb 2019 - 10:56 am | राजाभाउ
+१
16 Feb 2019 - 4:34 pm | भीमराव
१