[शशक' १९] - भूक

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
4 Feb 2019 - 7:36 pm

जंगलापासून जवळच काही डोंगर होते. त्यापलीकडे माणसांची वस्ती होती. तो त्या बाजूला फारसा फिरकत नसे. जंगल त्याच्या गरजांसाठी पुरेसे होते.

एकदा तो पलीकडे गेला. माणसांच्या वस्तीत फिरून आला.

फिरून फिरून तो दमला.

त्याला भूक लागली. फार करकचून भूक लागली. पण ही नेहमीसारखी साध्यासुध्या मांसाची भूक नव्हती तर ही होती 'माणसाच्या' मांसाची भूक !

ते कसे मिळवावे? तो विचारात पडला.

कोल्हा हुशार होता, लोक त्याच्या हुशारीला लबाडी म्हणत. पण लोकांच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचे?

तर कोल्ह्याने युक्ती केली. एका रात्रीत एक गाय आणि एक डुक्कर मारले आणि त्या माणसांच्या वस्तीत टाकून दिले.

त्यानंतर अनेक दिवस कोल्ह्याला माणसाच्या मांसाची ददात राहिली नाही.

प्रतिक्रिया

सिद्धार्थ ४'s picture

4 Feb 2019 - 8:00 pm | सिद्धार्थ ४

+१

यशोधरा's picture

4 Feb 2019 - 8:11 pm | यशोधरा

+१

पलाश's picture

4 Feb 2019 - 9:28 pm | पलाश

+१.

जव्हेरगंज's picture

4 Feb 2019 - 10:35 pm | जव्हेरगंज

कडक आणि कल्पक !!

+१

पद्मावति's picture

5 Feb 2019 - 2:26 am | पद्मावति

+१

तुषार काळभोर's picture

5 Feb 2019 - 5:38 am | तुषार काळभोर

.

चांदणे संदीप's picture

5 Feb 2019 - 8:53 am | चांदणे संदीप

+१

Sandy

शित्रेउमेश's picture

5 Feb 2019 - 9:02 am | शित्रेउमेश

मस्त

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Feb 2019 - 9:25 am | ज्ञानोबाचे पैजार

पहिल्यांदा काही कळलेच नाही, उशीरा ट्युब पेटली
पैजारबुवा,

ज्योति अळवणी's picture

5 Feb 2019 - 9:26 am | ज्योति अळवणी

उत्तम

राजाभाउ's picture

5 Feb 2019 - 9:46 am | राजाभाउ

+१

समीरसूर's picture

5 Feb 2019 - 11:13 am | समीरसूर

आवडली. वास्तवदर्शी.

श्वेता२४'s picture

5 Feb 2019 - 3:40 pm | श्वेता२४

निव्वळ अप्रतिम

विनिता००२'s picture

5 Feb 2019 - 3:55 pm | विनिता००२

+१

विनिता००२'s picture

5 Feb 2019 - 3:55 pm | विनिता००२
विनिता००२'s picture

5 Feb 2019 - 3:55 pm | विनिता००२

+१

खिलजि's picture

5 Feb 2019 - 8:16 pm | खिलजि

हा कोल्हा चिनी म्हणायचा कि पाकिस्तानी का आपला नेता , हिंदुस्थानी ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Feb 2019 - 8:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

-दिलीप बिरुटे

नावातकायआहे's picture

5 Feb 2019 - 8:34 pm | नावातकायआहे

+१

मित्रहो's picture

5 Feb 2019 - 8:48 pm | मित्रहो

+१

असहकार's picture

5 Feb 2019 - 9:18 pm | असहकार

-1
कोल्ह्याच्या ऐवजी कावळ्याच्या नावाने हि कथा कायप्पावर ढकलपत्रात वाचली असल्याचे स्मरते .

कोल्हा, कावळा की लांडगा आठवत नाही पण ही कथा कायप्पावर ढकलपत्रात वाचली आहे.

किसन शिंदे's picture

6 Feb 2019 - 1:39 pm | किसन शिंदे

तसं असेल तर या कथेला बाद ठरवायला हवं का?

स्पर्धेमधे जिंकणाऱ्यात वगैरे यायची शक्यता निर्माण झाली तर 'बाद ठरवायचे का' यावर विचार चालू करावा. तोपर्यंत विचार करायची गरज नाही. हे म वै म.

चित्रपट, मालिका, साहित्य यामध्ये सारख्याच कल्पना बऱ्याचदा रिपीट होत रहातात. त्यांचं एक्सिक्युशन कसं केलं आहे हेदेखील महत्वाचं असतं.

पुंबा's picture

20 Feb 2019 - 1:41 am | पुंबा

सहमत.
चोप्य पस्ते कथा ठोकून दिलीये इथे.

सही रे सई's picture

6 Feb 2019 - 1:33 am | सही रे सई

+१
बापरे !!! कल्पना भयानक आहे

स्मिता.'s picture

6 Feb 2019 - 3:57 am | स्मिता.

+1

टर्मीनेटर's picture

6 Feb 2019 - 1:34 pm | टर्मीनेटर

आवडली!

संजय पाटिल's picture

7 Feb 2019 - 10:01 am | संजय पाटिल

+१

नरेश माने's picture

7 Feb 2019 - 10:56 am | नरेश माने

छान कथा +१

कुमार१'s picture

8 Feb 2019 - 3:27 pm | कुमार१

+१

दादा कोंडके's picture

9 Feb 2019 - 11:18 pm | दादा कोंडके

पण एक छिद्रान्वेष. गाईचं ठिक आहे पण नुसतच डुक्कर मारल्यावर विशिष्ठ धर्मातली लोकं काही करणार नाहीत हो. हां, मटणाच्या दुकानात (जवळ) टाकलं असतं तर शक्यता होती. पण मग शब्दसंख्या वाढायची भीती आहेच.

उपेक्षित's picture

11 Feb 2019 - 6:26 pm | उपेक्षित

जबरि

रांचो's picture

19 Feb 2019 - 9:54 pm | रांचो

+१

पुंबा's picture

20 Feb 2019 - 1:41 am | पुंबा

-१

उपाशी बोका's picture

23 Feb 2019 - 7:33 am | उपाशी बोका

+१

पियुशा's picture

24 Feb 2019 - 2:02 pm | पियुशा

+१

अनिंद्य's picture

7 Mar 2019 - 1:44 pm | अनिंद्य

माझ्यासारख्या पाल्हाळ-वेल्हाळ माणसाला १०० शब्दात काही लिहिणे म्हणजे शिक्षाच. तरीही कथा आवडून घेतलेल्या सर्व वाचकांचे आभार. _/\_

काहींना 'भूक' ही कथा अन्यत्र वाचली असल्यासारखे वाटले, त्याबद्दल:

एमी यांच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे चित्रपट, मालिका, साहित्य यामध्ये सारख्याच कल्पना बऱ्याचदा रिपीट होतात. कथा कल्पना नाविन्यपूर्ण नाही हे मान्य आहे.

मला ही कथा बराकपूर छावणी येथे मंगल पांडे स्मारकाला दिलेल्या भेटीवरून सुचली - दीड शतकापूर्वी गाय आणि डुकराची चरबी वापरलेली काडतुसे ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांना दिल्याचा प्रसंग आठवून.

पिताश्रींना कथा वाचायला दिली तर त्यांना माझ्या जन्मापूर्वीचा लेख टंडन चा 'जहाँ प्यार मिले' (शशी कपूर - हेमा मालिनी) चित्रपट आठवला, पण तो चित्रपट मी आजवर बघितलेला नाही. मी कथा कोठूनही 'कॉपी पेस्ट' केली नाही एव्हढेच सांगू शकतो.

लोभ असावा,

अनिंद्य