अतृप्त आत्मा 11

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
9 Dec 2018 - 10:23 pm

खुप कंटाळुन आम्ही टेबलवरुन उडी मारली .आणी खुर्ची शेजारी उभं राहुन एक हात नान्याच्या खांद्यावर ठेवत दुसऱ्या सहाताने टेबलवरचं रजिस्टर उचललं.

"नान्या हरामखोर ! मुडद्याच्या टाळुवरचं पण चाटतोस ? साल्या लाज वाटली पाहिजे तुला ." त्याचं मानगुट पकडत आम्ही ओरडलो.
दचकलेला नाना एकदम भयभीत नजरेने बघु लागला. डायरी ,कॕलेंडर सगळं बंद करुन त्याने ड्रॉवर उघडुन 100/- च्या नोटांच बंडलच काढुन टेबलवर ठेवलं.

"हे घे बाबा ! आणी सोड मला .तुझा तीन महिन्याचा पगार घे आणी जा एकदाचा इथुन " नान्या गयावाया करु लागला.

" हे मी घेउन काय करु ? सकाळी माझ्या घरी पोहचव .आणी सरळ बोल तीथे .उपकाराची भाषा वापरलीस तर गाठ माझ्याशी आहे " आम्ही दमच दिला

"अजुन एक ,इथुन पुढे कामगारांची पगारातली असली काटछाट बंद कर.लक्षात ठेव आम्ही आहोत तर तु आहेस ,नाहीतर गावात कुत्रही विचारणार नाही तुला " आमच्या या वाक्यावर नानाला पुरता घाम फुटलेला.

दोन्ही पाय खुर्चीत वर घेउन बसलेल्या नानाला आता नैसर्गिक विधींची तिव्र जाणीव झाली होती.पण घराबाहेर मागील बाजुस पन्नास मिटरवरच्या संडासात रात्रीच्या अंधारात एकटं कसं जाणार या विवंचनेत नाना पडला होता,

"बापु ! मला परसाकडं जायचय रे.मला सोबत कर ना " नान्या केविलवाण्या स्वरात बोलला .

घाबरल्याने नानाला आम्हीच भुत आहोत याचाही विसर पडला होता.साला खजुर आमचीच सोबत मागत होता.

आलेलं हसु दाबत आम्ही त्याला खुर्चीतुन उठवलं.आणी त्याच्या खांद्यावर हात ठेउन त्याला परसाकडे नेउ लागलो.

एका हातात पाण्याची बादली ,दुसऱ्या हातात कंदील आणी खांद्यावर हात ठेवलेले आम्ही .अशी नानाची वरात परसाकडं चाललेली.लटलट कापत अंधारलेल्या पायवाटेवरुन घाबरलेला नान्या प्रायश्चित भोगायला चालल्यासारखं थोबाड करुन मार्गाक्रमण करत होता.

वाडीत चारही बाजुला असलेली आंबा फणसांची झाडं मध्यरात्रीच्या वार्यामुळे सळसळत भयानक वातावरणात भर घालत होती.नान्याची थोडी मजा घ्यावी म्हणुन आम्ही मागेच थांबलो.आणी खांद्यावर आमचा हात घेउन नाना दहा पंधरा पावले चालत पुढे गेला.

चालताना तो आमच्याशी काहीतरी माफीदर्शक बोलत होता.आणी प्रतिक्रिया जाणुन घेण्यासाठी म्हणुन त्याने बाजुला बघितले .पण आम्ही न दिसल्याने हादरलेला नाना खांद्यावरचा आमचा हात पकडुन मागे वळला.

आम्ही सहज म्हणुन केलेली गंमत नानाच्या धोतरात आली होती.

"बाप्या रांडच्या ! हि कसली रे चेष्टा ?दिले ना तुला पैसे .तु एक महिन्याचा मागितला मी तीन महिन्याचा दिला .कसलीही काटछाट न करता दिला " नान्या ढसढसा रडत बोलु लागला.

त्याचं लहान पोरासारखं रडणं बघुन दयाही येत होती. पण मिळालेली मुदत कधी संपेल आणी आम्हाला कधी भुतयोनी सोडुन पुढच्या मार्गाला लागावं लागेल हे माहित नसल्याने दयेला जागा नव्हती.मुक्ती मिळण्याआधी बर्याच गोष्टी साधुन घ्यायच्या होत्या.आणी नानाकडुनच जास्त साध्य अपेक्षित होतं.

कसंबसं त्याला सावरुन आणी धोतर धुवायला आडाचं पाणी काढुन दिलं.ओल्या धोतरात लपेटलेला नानु आता जास्तच रोमॕंटिक दिसत होता.

एव्हाना माडीवरच्या घराच्या खिडकीतून नानीने नानाला बघितलं होतं.आणी आडावरच्या रहाटाच्या आवाजाने जागी झालेली नानी दुसरा कंदिल घेउन वाडीत परसाकडं हजर झाली.

ओल्या धोतरात आपली लाज झाकलेला आणी रडवेला नाना बघुन नानीलाही हसु फुटलं.कसंबसं हसु आवरत ती नानाला संभाळुन नेउ लागली आणी मागुन दुसरा कंदील अधांतरी सोबत करु लागला.

मृतात्म्यांची एक असहाय्यता असते.दशक्रिया विधी होईपर्यंत त्यांना मुक्तीचे मार्ग बंदच असतात.आणी या काळात त्यांना आपल्या नातेवाईक, आप्त ,जिवलगांच्या खर्या खोट्या शोकाकुल वातावरणातच काढावे लागतात.इच्छा असुनही कुणाचं सांत्वन करता येत नाही किंवा कुणावर रागही व्यक्त करता येत नाही.

आम्ही काल दुपारपासुनच हे सहन करत होतो.आणी संध्याकाळी जर त्या काळधोंड्यावर रम ची काटाकांडी करु शकलो नसतो तर आत्ताही आम्ही तीच असहाय्यता अनुभवत असतो.

पण मुळातच हुशार असल्याने त्यावर मात करुन आम्ही मरणोत्तर अपेक्षित साद्ध्य करमणुकीतुन करुन घेत होतो.

नाट्यआस्वाद

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

10 Dec 2018 - 7:11 am | आनन्दा

1 नंबर

प्रमोद देर्देकर's picture

10 Dec 2018 - 8:02 am | प्रमोद देर्देकर

मस्त.

खुप वेळ लागला हा भाग यायला. आम्हाला वाटले तुमचा अतृप्त आत्मा मुक्त झाला की काय?

प्रमोद पानसे's picture

10 Dec 2018 - 4:23 pm | प्रमोद पानसे

हा हा !!

दुर्गविहारी's picture

11 Dec 2018 - 8:07 pm | दुर्गविहारी

जबरी लिहीताय पानसे साहेब. आता थांबु नका. पुढचा भाग लवकर आणि मोठा लिहा. एक धमाल चित्रपट होईल या कथेवर.

नावातकायआहे's picture

11 Dec 2018 - 9:34 pm | नावातकायआहे

हाय्ला ... हे कस काय मिसल मी?

एक नंबर...

पु भा प्र

प्रचेतस's picture

12 Dec 2018 - 8:28 am | प्रचेतस

भन्नाट लिहिताय पकपकशेठ.

ज्योति अळवणी's picture

12 Dec 2018 - 2:23 pm | ज्योति अळवणी

एकदम झक्कास! लवकर टाका पुढचा भाग

पद्मावति's picture

12 Dec 2018 - 9:46 pm | पद्मावति

भन्नाटच लिहिताय हो :)

नावातकायआहे's picture

12 Dec 2018 - 9:48 pm | नावातकायआहे

पु भा प्र