मराठी नाट्यसृष्टीतला पहिला नाही तर अखेरचा सुपरस्टार!
घाणेकरांच्या पत्नी कांचन घाणेकर यांच्या "नाथ हा माझा" वर आधारित हा biopic सिनेमा अक्षरशः लोकांना ओढू ओढू नेतोय सिनेमाघरात!
काय चुम्मा कामं केलीत सर्वांनी!!!
सुबोध बद्दल काय बोलावं? आपली पात्रताच नाही ती!
त्याने फक्त अशी सुंदर कामं करत राहावीत आणि आपण मंत्रमुग्ध होऊन ती पाहत राहावीत इतुकीच आपली पात्रता!!
मला दोन लोकांबद्दल विशेष बोलायचं आहे
सुमित राघवन ने त्याच्या अंदाजात डॉ लागू असे काही बेमालूम मिसळले आहेत की सुमित आणि डॉ लागू वेगळे असूनही कुठेही तुलना करावीशी वाटत नाही! प्रसाद ओक नुकतेच दिग्दर्शनात उतरले आहेत पण एक उत्तम अभिनेता निश्चित चांगला दिग्दर्शक होऊ शकतो यासाठी त्याचा हा अभिनय पाह्यलाच पाहिजे!
मित्र चुकतोय हे दिसत असताना त्याच्यावर विश्वास ठेवून सांभाळून घेणं हे वाटतं तितकं सोप्प नसतं पण खरंच काही प्रसंगात न बोलता नुसत्या डोळ्यांनी सुद्धा प्रसादने ते साधलं आहे
नंदिता धुरी आता रुळली सिनेमा व्यवसायात.
वैदेहीचं भविष्य उज्वल आहे तिला यानिमित्ताने अजून चांगल्या भूमिका मिळोत आणि तीने असंच मोहक काम करावं अशी सदिच्छा.
सुहास पळशीकर हे एक दर्जेदार अभिनेते आहेत परंतु त्यांना अजूनही म्हणावं तसं काम मिळत नाहीये ही खंत या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होतेय,जेवढं वाट्याला आलंय तेही उत्तम सफाईदार केलंय त्यांनी.
प्रदीप वेलणकर यांच्या वाट्याला आलेल्या छोट्याशा पण तितक्याच महत्वाच्या भूमिकेचं सोनं झालं आहे.
आनंद इंगळे यांनी अजून अशा चरित्र भूमिका करायलाच हव्यात,त्यांची संवादफेक आणि देहबोली उत्तम!
सोनाली ताई नेहमीप्रमाणे छान छान.मोहन काका नेहमीप्रमाणे बापमाणुस.
डॉ लागू आणि डॉ घाणेकर यांच्या नोक झोकीची झलक फार भेदक वाटली! वास्तववादी प्रायोगिक आणि टाळी घेणारे कलाकार यांच्यात डावं उजवं न करता जे आहे जसं आहे ते मांडायला खूप धाडस लागतं आणि ते दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी दाखवलं हे खरंच आश्चर्यकारक आहे!
पणशीकर नट म्हणून तर ग्रेट आहेतच पण मित्र म्हणून त्यांच्याविषयीचा आदर अगदी भरून आला!!
इरावती भिडे चं आयुष्य खरंतर दुर्लक्षितच झालं या झंझावातात!
नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा , आई न होता येणं याचं दुःख आणि डोळ्यासमोर नवरा दुसऱ्या बाईचा होताना पाहणं.. केवढी ही वादळं तिच्या आयुष्यात आली.
मास्टर दत्ताराम भालजीआप्पा वसंत कानेटकर सुलोचना बाई पुन्हा ताज्या झाल्यात या सिनेमाच्या निमित्ताने!
आले जणू इंद्रधनू आणि लाल्या ही दोन्ही गाणी नवी असली तरी जुन्या काळाला चपखल बसली आहेत.शरयू दाते आणि रोहन रोहन यांनी मन लावून ती केली आहेत.
बाकी गोमू संगतीनं , शूर आम्ही सरदार आणि तुम्हावर केली मर्जी बहाल ही जुनी अवीट गोडीची गाणी पुन्हा ऐकताना मजा आली.
अजित परब संगीतात गुपचूप पिकअप घेत आहे! दे धक्का,शिवाजीराजे भोसले बोलतोय,शिक्षणाच्या आईचा घो, कुटुंब,लालबाग परळ, नटसम्राट.... आणि आता घाणेकर.. विलक्षण प्रवास आहे हा!
काय लिहलंय गुरू ठाकूर ने जबराट अगदी!
थिएटर बदलतंय काश्या नवे विचार नवे प्रयोग आणि त्यात..
स्वतःची लाल केल्याशिवाय लाल्या होता येत नाही
नट होण्याकरता जे कसब अंगी असावं लागतं त्यापेक्ष जास्त त्या नटाला सांभाळून घेण्याकरता लागतं!
या विक्षिप्त नटाबरोबर काम करण्यापेक्षा भीक मागेल मी!
सगळेच जण इतिहास कुरवळायला लागले तर नवा इतिहास कोण घडवणार?
मला आणि त्यालाही कळून चुकलं होतं -मी होतो आणि आहे पण तो आहे आणि असणार आहे
"आणि " माझ्या नावाच्या आधी लागतं नंतर नाय ,या थिएटर चा लांडगा फक्त मी आहे मी!
मेकअप चा दादा माणूस पुन्हा एकदा विक्रम गायकवाड त्याची जादू पेरताना दिसला.सुबोध अगदी घाणेकर वाटला ही त्यांची सुद्धा कमाल आहे.
सुधीर पळसाने यांचा कॅमेरा संतोष फुटाणे यांनी जे जे उभारलं त्यावर अगदी ऐतिहासिक वाटावा असा फिरला आहे.
निखिल साने या सिनेमाच्या मागे अगदी ठाम उभे राहिलेत त्याबद्दल त्यांचे आणि viacom18 च्या सर्व टीम चे आभार.
उसमे क्या है? एकदम टॉप आणि केssss ड क
काळाच्या उदरात अगदी शिवाजी नाट्यगृहाच्या पायरीवर बसून रसिक प्रेक्षकांची गर्दी ओसंडून वाहत असताना अश्रूंची झाली फुले चा प्रयोग पाहून बाहेर पडावं आणि लाल्या ची स्वाक्षरी घ्यावी इतकी तीव्र अनिवार इच्छा यानिमित्ताने झाली हेच या सिनेमाचं यश.
©मकरंद घोडके.
प्रतिक्रिया
28 Nov 2018 - 2:17 pm | माझीही शॅम्पेन
एकदम टॉप आणि केssss ड क लेख
28 Nov 2018 - 4:34 pm | मकरंद घोडके
धन्यवाद
28 Nov 2018 - 2:29 pm | अभ्या..
बस कर पगले, रुलायगा क्या?
28 Nov 2018 - 4:01 pm | किसन शिंदे
खिक्क. लाल रंगाचा अख्खा डब्बाच ओतलाय.
28 Nov 2018 - 4:33 pm | मकरंद घोडके
उगाच नाही होत
28 Nov 2018 - 4:32 pm | मकरंद घोडके
काय बिशाद माझी
28 Nov 2018 - 4:10 pm | सिरुसेरि
छान ओळख . डॉ. घाणेकर आणी हाउसफुल्लचा बोर्ड यांचे अनोखे नाते . त्यामुळेच शिवाजी नाट्यगृहाच्या बुकिंग ऑफिसमधे केवळ डॉ. घाणेकर यांचाच फोटो आहे .
28 Nov 2018 - 4:35 pm | मकरंद घोडके
हो अगदी खरय