रिलेशनशिप कट करणे कितपत योग्य अयोग्य?

फुंटी's picture
फुंटी in काथ्याकूट
10 Nov 2018 - 2:24 pm
गाभा: 

माझ्या आयुष्यात अनेक लोक आहेत ज्यांच्याशी दैनंदिन संबंध येत असतो ,गेले काही वर्षांचा ट्रेंड पाहता माझ्या बाबतीत असं सातत्याने होतंय की जवळ असलेल्या काही माणसांशी माझे संबंध दुरावत आहेत.उदा. मित्र,अतिशय जवळीक असणारी मैत्रीण , एखाद्या क्षेत्रातील जवळीक असलेला सहकारी .असे लोक माझा गैरफायदा घेत आहेत असे लक्षात येताच किंवा व्यवहारिक मतभेद झाल्यामुळे या लोकांशी संबंध मी पूर्णपणे तोडलेले आहेत.त्याबद्दल मला काही खंत नाही कारण तसे तोडणे हे आवश्यक होते.मात्र असे सातत्याने होणे हे कितपत योग्य आहे?माझा स्वभाव बदलतोय का? वागण्यात माझी काही चूक होतेय का ? गरजेपेक्षा जास्त काळजी घेणं ,मदत करणं असा माझा स्वभाव आहे.

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

11 Nov 2018 - 11:22 am | प्रकाश घाटपांडे

स्पष्टवक्तेपणामुळे माणसे तुटतात. त्याला इलाज नाही. फार थोडे समजून घेतात.

झेन's picture

11 Nov 2018 - 1:16 pm | झेन

मला वाटतं तुमच्या शेवटच्या वाक्यात उत्तर आहे.
जास्त संवेदनशील लोक इतरांशी व्यवहारीक राहण्याच्या पेक्षा पुढे जाउन जास्त मदत करत असतील तर काही काळानंतर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर नाराज होतात. सुरवातीपासून यूजरफ्रेंडली न राहील्यास लोक ग्रूहीत धरत नाहीत, आणि आपल्यालाही कुणी वापरून घेतल्याचा फिल येत नाही.

ट्रम्प's picture

12 Nov 2018 - 7:31 am | ट्रम्प

गैरफायदा घेणाऱ्यां बरोबर आर्थिक व्यवहार करताना आपली बाजू थोडी वरचढ ठेवून रिलेशनशिप कट करावी , म्हणजे आयुष्यभर तो माणूस आपल्या समोर मान वर करून बोलू शकत नाही . आणि आपल्याला त्याच्या मूळे 50 हजार रु चा फटका बसण्या अगोदर दोन तीन हजार रु मध्ये त्याला आपण कुत्रा बनविले हे समाधान = )

तृतीय स्थानात पापग्रह असेल.

सौ में से ९९ बेईमान, फिर भी इन्सान है महान.

त्यामुळे, तुम्ही करता ते योग्यच आहे.

माहितगार's picture

12 Nov 2018 - 11:42 am | माहितगार

..गरजेपेक्षा जास्त काळजी घेणं ,मदत करणं असा माझा स्वभाव आहे.

या सोबत काही अधिक पैलू अभ्यासावे लागतील का ? असे वाटते.

१) बर्‍याच जणांना "नाही म्हणण्याचे कौशल्य" नैसर्गिक पणे अवगत नसते. वेळीच कौशल्यपुर्ण नकार देणे अथवा स्वतःचे अधिकार कौशल्यपुर्णपणे जपणे वेळीच न केल्यास याचा मानसिक त्रास नंतर होत राहु शकतो. हि समस्या असल्यास समस्या स्विकारुन नाही म्हणण्या संबंधी कौशल्य विकसित करणे गरजेचे असावे .

२) काही वेळा काही व्यक्ति मैत्रि आणि जवळीकच त्यांच्या स्वतःच्या अपेक्षा पुर्ण करुन घेण्याच्या दृष्टीने करतात हे लक्षात आलेले असते. अशा मंडळींच्या जवळीक वाढवण्या मागे अपेक्षा असण्याचे वावगे वाटत नाही. पण माणसाला आपेक्षा विरहीत शुद्ध मैत्रि संबंधांचीही गरज कुठे तरी वाटत असते आणि असे संबंध स्वतंत्रपणे तयार करता येऊ शकतात पण अपेक्षेसहीत जवळीक साधणारी मंडळी त्यांच्या पझेसिव्हनेस साधण्याच्या कौशल्याने इतर शुद्ध मैत्रि संबंधात अडथळा निर्माण करतात, त्यांच्या अपेक्षाही पुर्ण करुन घेतात आणि या सर्वात 'अपेक्षाधिष्ठीत पझेसिव्ह मंडळी' विरुद्ध "नाही म्हणण्याचे कौशल्य" अभाव हे समिकरण विषम होते. असे असेल तर 'अपेक्षाधिष्ठीत पझेसिव्ह मंडळी' ंना कुठेतरी दूर सारावे वाटू लागते . "नाही म्हणण्याचे कौशल्य" विकसित करण्याचे सॉफ्ट स्कील काही प्रमाणात विकसित करुन घेता येते .

पण 'अपेक्षाधिष्ठीत पझेसिव्ह मंडळी' ंना नेमके कसे डिल करावे या बाबत मलाही कल्पना नाही या बाबत इतर मिपाकरांचे मत समजून घेणे आवडेल

३) गरजेपेक्षा जास्त काळजी घेणं ,मदत करणं या सोबत बर्‍याचदा मदत करताना आपल्या मनातही अपेक्षा निर्माण होतात आणि मदत घेतलेल्यांनी आपल्याला आपल्या गरजेच्या वेळी मदत केली नाही की अपेक्षाभंगाचे दु:ख्ख येऊ शकते. या अपेक्षाभंगाच्या दुख्खाला पाश्चात्य मानसशास्त्र क्लोजर कसे उपलब्ध करु शकते माहित नाही. कदाचित मदत घेणार्‍या पण परतफेड करणार्‍या व्यक्तिस काही जेनुआईन अडचण आहे आणि म्हणून आपण क्षमाशील असले पाहीजे असा विचार उपयुक्त ठरावा.

पण जरासे परंपरागत भारतीय विचार , मदत सहसा अपेक्षा विरहीत करावी, जरासे अंधश्रद्ध होऊन मागच्या जन्मी त्या व्यक्तीने आपल्याला काही तरी मदत केली या वेळी आपण त्यांना मदत केली तेव्हा आपण ऋणमुक्त झालो अशी भावना अधिक उत्तम.

मात्र यात वेगळ्या निव्वळ विधी- लिखीताच्या पारंपारीक भावना बाळगण्याशी सहमत व्हावे वाटत नाही, विधी- लिखिताच्या भावनेने माणूस स्वतःचा आधिकार जपण्यापासून दूर जातो आणि विधी- लिखीत नामे डिप्रेशनच्या आहारी जातो ते मात्र टाळावे असे वाटते.

४) अमुक एक गोष्ट खुपली / खुपतीए हे संबंधीत व्यक्तीस संयतपणे जेव्हाचे तेव्हा सांगता येण्याच्या कौशल्याचा अभाव मनातील वेदनाकोष जागता ठेवत असू शकते. संबंधीत व्यक्तीना सांगण्याची संधी पुर्णतः हुकली असेल तर अशा संबंधीतांचे नाव न घेता अशा चर्चा किंवा अनुभव किंवा कथा लेखनातून मांडणी केल्यानेही मन मोकळे होऊ शकावे असे वाटते.

५) अजून एक सर्रास वापरला जाणारा मार्ग त्रयस्थांसमोर मनमोकळे करणे , हा बर्‍यापैकी चोखाळला जाणारा मार्ग मानसिक क्लोजर देण्यास बर्‍याचदा अपुरा असतो.

वस्तुतः इथे त्रयस्थ व्यक्तिने तुम्ही मनमोकळे केल्या नंतर दोन्ही बाजूच्या व्यक्तिंना विश्वासात घेऊन खुपलेल्या बाजूंची संबंधीतांची समोरासमोर चर्चा होऊन मनेमोकळी होणे शक्य झाल्यास मार्ग काढण्यात मदत करणे मानसिक क्लोजर मिळवून देऊ शकते. पण बहुसंख्य त्रयस्थांना दोन्ही बाजूच्या व्यक्तिंना विश्वासात घेऊन खुपलेल्या बाजूंची संबंधीतांची समोरासमोर चर्चा घडवण्याची गरज असते याची कल्पना नसते . ( लोकांनी माझ्यापाशी मनेमोकळी केल्या नंतर समोरासमोर बसवून चर्चा घडवण्याची संधी असूनही, असे काही करण्याची गरज असू शकते हे माहित नसल्यामुळे मी स्वतः अशा अनेक संधी अनेक वेळा वाया जाऊ दिल्या हे मला स्वतःला फार उशिरा समजले)

प्रत्यक्षात जे घडते त्यात बहुसंख्य त्रयस्थ तुम्हालाच त्या वितुष्टाची आठवण पुन्हा पुन्हा देऊन किंवा अजून असंबंधीतांना सांगून असंबंधीतांकरवी ती चर्चा पुन्हा तुमच्या पुढ्यात येऊन ती जखम भळभळती रहाण्याची शक्यता असते.

सरते शेवटी तुकाराम महाराजांचा एक मार्गदर्शक अभंग आहे

तेलणीशी रुसला वेडा | रागेँ कोरडें खातो भिडा || 1 ||
आपुले चित्त आपण पाही | संकोच तो न धरी कांही || 2 ||
-संत तुकाराम (गाथा क्र. ५६)

* या निमित्ताने एका अनुषंगिक मिपा लेखाची धागा जाहीरात करुन घेतो :)
** तेलणीशी रुसला वेडा - मानवी स्वभावाची सामुहीक असहकार चळवळ

** संदर्भ : मिपाकर जयंत नाईक यांनी त्यांच्या लेखातून मांडलेली वेदनाकोष ही संकल्पना

सुबोध खरे's picture

12 Nov 2018 - 11:55 am | सुबोध खरे

लोक माझा गैरफायदा घेत आहेत
जे लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत ते तुमचे खरे मित्र नाहीतच. त्यांची काळजी सोडा.

खरे मित्र फारच थोडे असतात. बाकी बहुसंख्य हे "ओळखीचे" असतात. त्यातले बरेचसें ओळखीचा गैरफायदा घेऊ पाहतात.
लक्षात ठेवा

वरं एको गुणी मित्रो नच मूर्ख: शतान्यपी
एक: चंद्र तमोहन्ती नच तारा गणोपि च

शंभर मूर्ख मित्रांपेक्षा एकच गुणी मित्र पुरे आहे.
एकच चंद्र अंधाराचा नाश करतो. असंख्य तारका असतील तरी त्यांचा काहीही उपयोग नाही.

माहितगार's picture

12 Nov 2018 - 11:58 am | माहितगार

धागा लेखकाच्या या पुर्वीच्या दोन कविता -दोन्ही कविता कविता म्हणून स्वतंत्र दखल घेण्या जोग्या आहेतच - पण तरीही माझ्या मनाचे कपाट.... आणि मनाचं प्लॉटिंग यां कवितांचा आणि या धागा लेखात व्यक्त भावनांचा काही संबंध आहे का ? हे धागा लेखकास स्वतःच्या भावना अधिक नेमकेपणाने व्यक्त होण्यास मदत व्हावी म्हणून विचारावा वाटतोय.

चौथा कोनाडा's picture

12 Nov 2018 - 2:33 pm | चौथा कोनाडा

प्रत्येक केसचा वेगवेगळा अ‍ॅनालिसिस करा, झाले त्याबद्दल न्यूनगंड न बाळगता, योग्य त्या तज्ञांचे मार्गदर्शन घेवून नवि फ्रेश सुरुवात करा !

एक अंधेरा, लाख सितारे

बीते हुए कलकी खातीर
तू आनेवाला कल मत खोना,
जाने कौन कहांसे आ कर
राहें तेरी फिरसे सवांरें,

एक अंधेरा, लाख सितारे
एक निराशा, लाख सहारे ||

मुळात संबंध ठेवायचे असतील तर आधी एक प्रोटोकॉल पण बनवून घ्या . तो प्रोटोकॉल तुम्हाला हवा असेल असा बनवा . नीट घोकून घ्या . नैतिक संबंधासाठी एक प्रोटोकॉल आणि अनैतिक साठी दुसरा .. नैतिकतेमध्ये तुम्ही स्वतःला काही मिळेल याची अपेक्षा बिलकुल ठेवू नका आणि अनैतिक प्रोटोकॉल मध्ये फक्त स्वतःलाच आणि तेही स्वतःच्या गरजेनुसार कसं मिळेल एव्हढंच बघा . दुसऱ्याचा विचार करण्याची गरज नाही .. मग ती भलेही स्वप्नसुंदरी का असेना ? तिची जागा आपल्या गरजेपुरतीच हवी , घरात नाही .. आणि हे गॉड शब्द जसे कि " मैत्रीण " वगैरे स्वतःच्या संग्रहातून काढून टाका आणि इथे मैत्रीण वगैरे कुणीही नसतं .. जमलं तरच करा अन्यथा या मार्गावर जाऊच नका . धोकादायक आणि तापदायक ठरू शकतो ...

सर्व मित्रांना मनापासून धन्यवाद.