पुण्यातील शाळानिवडीबाबत मदत हवी आहे

नेत्रांजन's picture
नेत्रांजन in काथ्याकूट
3 Oct 2018 - 10:06 am
गाभा: 

मी मिपाचा अनेक वर्ष वाचक आहे. इथे नेक क्षेत्रातले अनुभवी लोक लेखन करत असतात आणि त्यांचे अनुभव मांडत असतात. म्हणून मला मिपाकरांकडून एक मदत हवी आहे. मी बरेच वर्षांच्या परदेश वास्तव्यानंतर परत पुण्यात राहायला येत आहे. माझी मुलगी दोन वर्षांची आहे. त्यामुळे तिच्या शाळेचा (प्लेग्रुप वगैरे) विषय घरी चर्चिला जात आहे. हल्ली बऱ्याच आधी शाळेत ऍडमिशनसाठी नंबर लावावा लागतो असे समजले. बऱ्याच लोकांशी चर्चा केल्यानंतर शाळेबद्दलचा गुंता सुटण्याऐवजी जास्तच वाढत गेला. अनेक शाळांबद्दल अनेक मत मतांतर ऐकायला मिळाली. काही तर एकदम परस्पर विरोधी होती. शिवाय CBSE का SSC ह्याबद्दल कन्फ्युजन आहेच.
मी राहायला मॉडेल कॉलनी परिसरात असल्यामुळे मी ३-४ शाळा निवडल्या आहेत.

१) अभिनव विद्यालय, एरंडवणे
२) DES Primary & Pre - Primary School टिळकरोड़
३) Symbiosis Primary and Secondary स्कूल, प्रभातरोड
४) विखे पाटील मेमोरियल स्कुल, सेनापती बापट रोड

प्रत्येक शाळेचे पालक सापेक्ष गुणदोष ऐकायला मिळाले आहेत त्यामुळे निर्णय घेणे अवघड जात आहे. मूलभूत शिक्षणाबरोबर खेळ, अभ्यासेतर उपक्रम अश्या गोष्टींना उत्तेजन देणारी शाळा असेल तर उत्तमच आहे. CBSC चांगलं का SSC हा प्रश्न आहेच. कृपया अनुभवी मिपाकरांना ह्या बाबतीत योग्य मार्गदर्शन करण्याची विनंती करत आहे.

प्रतिक्रिया

या सगळ्यातून जाऊन शेवटी अभिनव ला admission घेतली (घेतली पेक्षा तीच मिळाली असं म्हणायला पाहिजे)

जर तुम्ही regular stream म्हणजे नोव्हेंबर डिसेम्बर मध्ये त्यांची वर्तमानपत्रात जाहिरात येते तेव्हा अर्ज केलात तर ते shortlist करुन interview ला बोलवतात. बर्यापैकी चांगली process आहे.
तुम्हाला Symbiosis Primary and Secondary स्कूल, प्रभातरोड आणि विखे पाटील मेमोरियल स्कुल, सेनापती बापट रोड पण जवळ असल्यानं चालतील.
अभिनव त्यामानानं बरीच लांब वाटते.
बाकी

CBSC चांगलं का SSC हा प्रश्न आहेच

हा मोठाच यक्षप्रश्न आहे.
माझं वैयक्तिक मत असं आहे की शाळा शक्यतो राहत्या घराजवळ असावी.

माहितगार's picture

4 Oct 2018 - 8:46 am | माहितगार

जवळचा विषय निघाला म्हणून, मॉडेल कॉलनी रहिवासींसाठी भारती विद्या भवनचा एक पर्याय आहे. अर्थात शाळे विषयी खूप अधिक कल्पना नाही.

व्यवसाया निमीत्त भारतात फिरस्ती असणार असेल, शाळा वेगवेगळ्या राज्यात बदलावयाच्या असतील तर सिबीएसई ला पर्याय नाही. बाकी सांस्कृतिक दृष्ट्या स्थानिक (एसएससी) बोर्ड , सेमी इंग्लिश या गोष्टी व्यक्तिशःअधिक श्रेयस्कर वाटतात.

शित्रेउमेश's picture

4 Oct 2018 - 8:34 am | शित्रेउमेश

शक्य असेल तर *आर्यन्स वर्ल्ड स्कूल * उत्तम पर्याय आहे.
वारजे ला पण आहे त्यांची शाळा

पिलीयन रायडर's picture

4 Oct 2018 - 10:50 am | पिलीयन रायडर

भारती विद्याभवनला माझा भाचा आहे. प्रगती उत्तम. त्याचे आई वडील शाळेवर खुश आहेत.

मराठी शाळा चालणार असतील तर अक्षरनंदन बेस्ट. पण तिथे ऍडमिशन मिळणं तितकं सोप्प नाही. आम्ही प्रयत्न केला होता, पण नाही मिळाली.

माझा मुलगा गोळवलकर गुरुजी शाळेत आहे (म्हणजे तुम्ही जी DES लिहिली आहे, त्याच्या शेजारची त्याच संस्थेची मराठी माध्यमाची शाळा) आम्ही आधी अमेरिकेत होतो, त्यामुळे माझ्या मुलाला मराठी फारसं जमत नव्हतं. पण आम्हाला मराठी शाळा हवी होती जिथे चांगले शिक्षक असतील. ह्याच वर्षी पासून शाळेत पहिलीला ऍडमिशन घेतलंय, आत्तापर्यंतचा अनुभव उत्तम आहे.

अभिनवचे रिव्ह्यूज उत्तम आहेत. मिळाली तर छानच.

मी सध्या तरी SSC ला प्रवेश घेऊन दिलाय मुलाला कारण मला CBSE चा ताण जास्त वाटला. माझा मुलगा इथे अगदी लहान असताना एक वर्ष ICSE मध्ये होता, मला तेव्हाही ते वयाच्या मानाने अति अभ्यास घेत आहेत असं वाटलं होतं. माझ्या मुलाच्या फिरतीमुळे खूप शाळा बदलल्या आहेत. त्यामुळे मला कोणताही ताण नको होता. तुम्ही अभ्यासक्रम पाहून निर्णय घ्या.

शाळा घराजवळ असावी ह्या मताशी 100% सहमत. सध्या माझ्या मुलाची तशी नाहीये, तर अगदी प्रचंड नाही पण थोडे फार तोटे जाणवतात. तुमची मुलगी तर खूप लहान आहे.

स्वधर्म's picture

4 Oct 2018 - 2:29 pm | स्वधर्म

ही एक उत्तम शाळा अाहे. मुलगा तिथेच शिकत अाहे. मुलीची नुकतीच दहावी झाली. जर मराठी माध्यम चालणार असेल तर, अवश्य प्रयत्न करा.
खास: तिचे इंग्रजी अनेक अाय सी एस सी, सीबीएसई मुलांपेक्षा चांगले अाहे, असे तिचे मत अाहे. अर्थात माध्यम इंग्रजी असणे व इंग्रजी चांगले असणे याचा काहीही संबंध नाही.

पिलीयन रायडर's picture

4 Oct 2018 - 2:57 pm | पिलीयन रायडर

>>>अर्थात माध्यम इंग्रजी असणे व इंग्रजी चांगले असणे याचा काहीही संबंध नाही.

सहमत! शाळा शोधताना शिक्षकांचा दर्जा बघणे मला जास्त महत्वाचे वाटते. कारण अभ्यासक्रम कितीही ग्रेट असला तरी शिकवणारा सक्षम नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही.

>>>खास: तिचे इंग्रजी अनेक अाय सी एस सी, सीबीएसई मुलांपेक्षा चांगले अाहे, असे तिचे मत अाहे.

ह्यासाठी आपण किंवा शाळेने काही खास प्रयत्न केलेत का?

स्वधर्म's picture

4 Oct 2018 - 5:37 pm | स्वधर्म

चांगले होण्यासाठी शाळेने नक्कीच प्रयत्न केले. म्हणजे चुका कुठे होतात, शिकवण्याची पध्दत, उपक्रम इ. तसेच अवांतर वाचन, सिनेमा परिक्षण, छोटे सेमिनार इ.
मुले इंग्रजी इतकं पाहतात अाणि वाचतातही, (हॅरी पॉटर) की अापोअापच लिखित भाषा चांगली होते. तसे वर्गमैत्रिणी, वातावरणही तिला मिळाले.

प्रथम सर्वांना प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद...
@ पिलियन रायडर: आम्हालासुद्धा मुलीला मराठी शाळेतच घालायचं आहे पण अक्षरनंदन शिवाय दुसरा उत्तम पर्याय दिसत नाही. आणि अक्षरनंदन मध्ये एकूण प्रवेशसंख्या बघता प्रवेश मिळणं कठीण दिसतंय. अर्थात प्रयत्न नक्की करणार आहोत. पुण्यातल्या जुन्या नावाजलेल्या शाळांची स्थिती खूपच चिंताजनक आहे. मला गोळवलकर मराठी माध्यमाची शाळा माहित नव्हती. त्याची अधिक माहिती काढायचा प्रयत्न करतो.

@माहितगार : मॉडेल कॉलोनीमध्ये असणारी विद्या भवन शाळा एकेकाळी उत्तम होती पण सध्या काय परिस्थिती आहे त्याबद्दल माहित नाही. आणि मी अनावधानाने ह्या पर्यायाचा विचार केलाच नाही. ह्याबद्दलसुद्धा थोडी अधिक माहिती काढायचा प्रयत्न करतो.

SSC आणि CBSE बद्दल बोलायचं तर सेवासदन सारख्या काही नावाजलेल्या शाळा SSC वरून CBSE वर शिफ्ट झाल्याचं बघितलं त्यामुळे CBSE आणि SSC ह्याचा भविष्याच्या दृष्टीने किंबहुना पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या दृष्टीने काय फरक पडू शकतो ह्याबद्दल कोणी प्रकाश टाकू शकेल काय?

पिलीयन रायडर's picture

4 Oct 2018 - 4:33 pm | पिलीयन रायडर

गोळवलकर गुरुजी ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीची कायम विनाअनुदानित मराठी शाळा आहे. माझी आई शिक्षिका आहे, ती मॉडरेटर असताना ह्या शाळेचे एक शिक्षक तिच्या हाताखाली होते. त्यांनी एक शिक्षक म्हणून संस्थेची बरीच स्तुती केली होती आणि पगार व्यवस्थित आहेत म्हणून चांगले शिक्षक सोडून जात नाहीत हे ही सांगितलं. मी बऱ्याच पालकांशी बोलून ह्या शाळेत प्रवेश घेतला. फिस 24 हजार आहे. शाळेत नेहमीचे विषय सोडून संस्कृत बोलीभाषा आणि स्पोकन इंग्लिश शिकवले जाते. इतरही अनेक चांगले उपक्रम आहेत. मला स्वतःला माझ्या लहानपणी शाळेत जसं वाटायचं तसंच इथं गेल्यावर वाटलं. CBSE / ICSE शाळांमध्ये मलाच बुजल्यासारखं व्हायचं. त्यात दाक्षिणात्य मुख्यध्यापिका आणि हिंदी बोलणाऱ्या शिक्षिका मला कधीच आपलं काही ऐकून घेतील असं वाटलं नाही. शिवाय आमच्याकडूनच वह्या पुस्तकं शूज वगैरे घ्या हा अट्टाहास आवडत नव्हता. त्या मानाने ह्या शाळेत असे काही नाही. पुस्तकांची लिस्ट दिली जाते, तुम्ही कुठूनही आणा. युनिफॉर्म वगैरेचे व्हेंडर आहेत, पण किंमत वाजवी आहे. काही लहान सहान मुद्दे आहेत, नाही असं नाही. पण ते असायचेच. जुने पालक म्हणतात की आपण ते संस्थेला कळवले तर त्यावर विचार होतो. शाळा तशी कोपरेटिव्ह आहे.

अक्षरनंदनला प्रयत्न तर करा. मिळालं तर उत्तमच.

आनन्दा's picture

4 Oct 2018 - 5:13 pm | आनन्दा

+10000

अत्रुप्त आत्मा's picture

5 Oct 2018 - 12:00 am | अत्रुप्त आत्मा

उपयुक्त धागा.

बोलघेवडा's picture

5 Oct 2018 - 8:26 pm | बोलघेवडा

शाळा निवडीचे माझे काही निकष:

  1. शाळा घरापासून जवळ हवी
  2. फीस आपल्याला परवडणारी हवी. कारण पुढे १० वर्षे ती भरायची आहे ते हि १०-२०% वाढ दर वर्षी. म्हणजे मग मुलाला नन्तर परदेशी शिक्षणाला पाठवायचे झाल्यास परवडू शकते. नाहीतर नमनालाच घडाभर तेल होते.
  3. शाळा किमान १५-२० वर्षे जुनी हवी.
  4. शाळेत खेळ आणि कला (extra curricular) ची सोय हवी
  5. शाळेतील वातावरण आपल्या घराच्या वातावरणाशी मिळते जुळते असावे. फार उच्च वातावरण असेल तर मुलांना ते जड जाते आणि थोडे मोठे झाल्यानंतर पाल्याला आपल्या पालकांविषयी न्यूनगंड येतो.
  6. CBSE किंवा ICSE हे एक खूळ आहे. सतत फिरतीचा जॉब असेल तरच त्याचा उपयोग आहे. अन्यथा एक सोशल स्टेटस यापलीकडे त्याचा उपयोग नाही. SSC बोर्ड आणि जोडीला एक बर्यापैकी चांगली शाळा हा एक उत्तम पर्याय आहे.
बंड्याभाय's picture

5 Oct 2018 - 9:14 pm | बंड्याभाय

मुद्दा उपस्थित केल्या बद्दल आणि प्रतिसाद देण्यार्याचे धन्यवाद!

जवळपास वर्षभराने मीही याच परिस्थितीत असणार आहे. मुलगा ६ वर्षाचा आहे, चांदणी चौक परिसरात राहिल्यास कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा असा प्रश्न आहे. त्या च बरोबर खालील मुद्द्यावर मार्गदर्शन मिळाल्यास आभारी आहे.

१. सहामाही नंतर प्रवेश मिळू शकतो का नवीन वर्षाच्या सुरुवातीला च घ्यावा लागतो.
२. शाळेपासून ते घराचे अंतर हा निकष किती कटाक्षाने बघतात?
३. मिलेनियम शाळेबद्दल बरच ऐकले आहे त्याबद्दल अनुभव सांगवे.

पिलीयन रायडर's picture

6 Oct 2018 - 6:51 am | पिलीयन रायडर

खूप नावाजलेल्या शाळेत प्रवेश मिळत नाहीत. ते डायरेकट पुढच्या वर्षीचे फॉर्म्स भरा म्हणतात. त्यात तुम्ही बहुदा दुसरीसाठी जागा शोधत असाल, जे बऱ्यापैकी अवघड आहे.

पण वॉलनट सारख्या तुलनेने नवीन शाळा प्रवेश देतील असं वाटतं. त्यांच्या वेबसाईटवर तसं लिहिलंय. मिलेनियम ही तिचीच बहीण आहे त्यामुळे तिथेही असा प्रवेश मिळणं शक्य असावं. फक्त मिलेनियमची फिस जास्त आहे, त्यामानाने रिव्ह्यूज ओके आहेत. डे बोर्डिंग आहे म्हणे.

बावधन साईडच्या विद्या व्हॅली बद्दल ऐकून आहे. पण ती सुद्धा महाग आहे. रायन इंटरनॅशनल बद्दल लोकांचं चांगलं मत आहे, माझं नाहीये. लांब चालणार असेल तर भुगाव कडे संस्कृती आणि श्री श्री रविशंकर सुद्धा आहेत.

इंग्रजी असूनही माझं चांगलं मत असलेली शाळा म्हणजे न्यू इंडिया. प्रवेश मिळायला अवघड आहे. पण बघा प्रयत्न करून. जवळ आहे एकदम चांदणी चौकातून.

कोथरूड मध्ये समजा चालणार असेल तर बालशिक्षण, सेवासदन, परांजपे, अभिनव ह्या जुन्या शाळा आहेत. प्रवेश मिळणं अवघड.

अभिजीत अवलिया's picture

6 Oct 2018 - 5:53 pm | अभिजीत अवलिया

चांदणी चौक परिसरात राहिल्यास तुम्हाला इंग्रजी माध्यमासाठी अभिनव किंवा न्यू इंडिया संकुल हा पर्याय सुचवेन. मराठी माध्यम चालणार असल्यास अभिनव योग्य राहील. थोडे जास्त अंतर चालत असेल तर 'नवीन मराठी शाळा' किंवा पिरा ह्यांनी नमूद केलेली 'गोळवलकर गुरुजी' चांगल्या आहेत. २ वर्षात वनाझ ते रामवाडी मेट्रोचे काम पूर्ण झाल्यास (आणि जर त्याचे चांदणी चौकापर्यंतचे एक्सटेंशन लवकर पूर्ण केले तर अंतराचा मुद्दा फारसा महत्वाचा राहणार नाही)

मराठी माध्यम चालणार असल्यास नेत्रांजन ह्यांना देखील 'नवीन मराठी शाळा' सुचवेन.

पिलीयन रायडर's picture

6 Oct 2018 - 6:23 pm | पिलीयन रायडर

अभिनव दोन्ही माध्यमात आहे.. मराठी आणि इंग्रजी. दोन वेगवेगळ्या शाळा आहेत..क्रेझ माझ्या मते इंग्रजीची जास्त आहे.
बाकी बालशिक्षण, परांजपे, सेवासदन, न्यू इंडिया.. इंग्रजी माध्यम.

ही "नवीन मराठी शाळा" कुठेय?

अभिजीत अवलिया's picture

6 Oct 2018 - 6:51 pm | अभिजीत अवलिया

हो. अभिनवची इंग्रजीची क्रेझ मराठी माध्यमापेक्षा जास्त आहे. ऍडमिशन मिळेलच ह्याची खात्री नाही.

नवीन मराठी शाळा 'न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग'च्या बाजूला आहे (शनिवार पेठेत). पुण्यातील जितक्या मराठी शाळा पाहिल्या त्यातील मला वैयक्तिकरित्या सर्वात जास्त आवडलेली मराठी शाळा म्हणजे नवीन मराठी.

पिलीयन रायडर's picture

6 Oct 2018 - 8:06 pm | पिलीयन रायडर

अरे वा! अजून एक चांगली शाळा कळली. इथे अजून माहिती देऊन ठेवली तर अनेकांना उपयोग होऊ शकतो. :)

अनुप ढेरे's picture

8 Oct 2018 - 11:54 am | अनुप ढेरे

'नवीन मराठी शाळा'

माझी शाळा. :) १ली ते ४थी.

बंड्याभाय's picture

6 Oct 2018 - 8:11 pm | बंड्याभाय

पिरा आणि अभिजित यांना धन्यवाद!

न्यु इंडिया आणि अभिनव हे सद्ध्या तरी योग्य पर्याय वाटत आहे त. तिथे प्रयत्न करूच.वँलनट हा नवीन पर्याय कळाला.

परांजपे इंग्रजी माध्यम आणि CBSC आहे का?
बालशिक्षण कुठे आहे?

अर्धवटराव's picture

6 Oct 2018 - 11:05 pm | अर्धवटराव

झेड.पी. च्या शाळेत नाव नोंदवायचं. गणित, विज्ञान, इंग्लीश वगैरे विषयांचे प्रायव्हेट क्लासेस लावायचे. नुसरे अ‍ॅकॅडमीक शिक्षण देणारे नव्हे तर अ‍ॅक्चुअल विषय शिकवणारे. खेळ, व्यक्तीमत्व विकास, कला, विज्ञान, डोळस पर्यटन आणि समाज-दर्शन, सामाजीक उपक्रमांमधे समरसून सहभाग, शेती प्रयोग, विवीध अभ्यासगटांत सहभाग, गिर्यारोहणासारखे साहसी खेळ, कॉम्प्युटर सायन्स... अशा सगळ्या गोष्टी अगदी सिरीयसली करायच्या.
वयाच्या १४-१५ वर्षापर्यंत मुलाचा सर्वांगीण विकास साधायचा. शक्ती पेरायची. व्हिजन डेव्हलप करायचं. अदरवाईज जे पैसे शाळेची फी भरण्यात गेले असते ते व्यवस्थीत इन्व्हेस्ट करुन मुलाकरता संपत्ती निर्माण करायची. १०वी पर्यंतचा अभ्यास संपवायचा. अ‍ॅक्चुअल दहावीचं वर्ष अगदी पहिल्या दिवसापासुन पेपर सेट सोडवण्यात घालवायचे. १०वी ची परिक्षा प्रायव्हेटमधुन द्यायची.
अशा तर्‍हेने वयाची १६ वर्षे पूर्ण झालेलं अपत्य शरीर, मन, बुद्धी, संपत्ती, जीवनाची दिशा आणि भान अशा सर्व बाजुंनी परिपक्व झालेलं असेल. लेट हर टेक चार्ज ऑफ हर लाईफ नाऊ.

मुक्त विहारि's picture

7 Oct 2018 - 11:02 am | मुक्त विहारि

+ १

झेड.पी. च्या शाळेत नाव नोंदवायचं. ---सरकारी शाळाच होती.कमी फी.शिवाय खिचडी फुकट...

गणित, विज्ञान, इंग्लीश वगैरे विषयांचे प्रायव्हेट क्लासेस लावायचे. --- तसेच केले.

नुसरे अ‍ॅकॅडमीक शिक्षण देणारे नव्हे तर अ‍ॅक्चुअल विषय शिकवणारे. --- अशी शाळा मिळाली नाही.

खेळ, व्यक्तीमत्व विकास, कला, विज्ञान, डोळस पर्यटन आणि समाज-दर्शन, सामाजीक उपक्रमांमधे समरसून सहभाग, शेती प्रयोग, विवीध अभ्यासगटांत सहभाग, गिर्यारोहणासारखे साहसी खेळ, कॉम्प्युटर सायन्स... अशा सगळ्या गोष्टी अगदी सिरीयसली करायच्या.----- दोन्ही मुले स्वतःच ट्रेक आखतात आणि पार पाडतात.दोन्ही मुले उत्तम पोहतात.बास्केट बॉल खेळतात.

वयाच्या १४-१५ वर्षापर्यंत मुलाचा सर्वांगीण विकास साधायचा. शक्ती पेरायची. व्हिजन डेव्हलप करायचं. अदरवाईज जे पैसे शाळेची फी भरण्यात गेले असते ते व्यवस्थीत इन्व्हेस्ट करुन मुलाकरता संपत्ती निर्माण करायची. ---- मुलांच्या दहावी पर्यंतच्या शैक्षणिक खर्चात(काय ते तुमचे, सी.बी.एस.सी. इ.,) जर्मनीचे आणि फ्रान्सचे, एम.एस.चे शिक्षण घेता येते.निदान एका वर्षाचे तरी नक्कीच.....

१०वी पर्यंतचा अभ्यास संपवायचा. ---- +१, आणि तसेही, दहावी आणि बारावी कसेही पास होता येते.

माझा धाकटा मुलगा पहिल्याच फटक्यात, १०-१५ दिवस घोकंपट्टी करून, १०वी आणि १२वी पास झाला आणि माझा शिक्षणावरील विश्र्वास उडाला.

अ‍ॅक्चुअल दहावीचं वर्ष अगदी पहिल्या दिवसापासुन पेपर सेट सोडवण्यात घालवायचे. ---- मुलांनी फक्त घोकंपट्टीच केली.

१०वी ची परिक्षा प्रायव्हेटमधुन द्यायची. ---- हा बॅक-अप प्लॅन होता.पण राज्य सरकारची शैक्षणिक धोरणामुळे, मुले पास झाली.

अशा तर्‍हेने वयाची १६ वर्षे पूर्ण झालेलं अपत्य शरीर, मन, बुद्धी, संपत्ती, जीवनाची दिशा आणि भान अशा सर्व बाजुंनी परिपक्व झालेलं असेल. लेट हर टेक चार्ज ऑफ हर लाईफ नाऊ. ----- +१..... जास्तीत जास्त काय होईल? कागद मिळणार नाही.पण व्यवहार ज्ञान जर उत्तम असेल तर, अशा कागदांची सुरनळी करून बंबात टाकावा......एखादा पानवाला किंवा मिसळपाव विकणारा किंवा वडा-पाव वाला पण उत्तम आर्थिक बस्तान बसवू शकतो.

सुदृढ शरीर, उत्तम मानसीक आरोग्य, निर्व्यसनी, हसतमूख आणि स्वतःचा स्वैपाक स्वतः बनवता येणारा, पाल्य असेल तर, यश फार वेळ दूर राहू शकत नाही.....अर्थात यशाची, समाधानाची संकल्पना व्यक्ती नुसार बदलते.कुणाला स्वतःची बांबूची झोपडी पण महाला सारखी वाटते, तर कुणाला सरकारी प्रशस्त बंगला प्रिय.....कुणाला वरकड कमाईत आनंद तर कुणाला स्वकष्टाच्या मीठ-भाकरीत आनंद.....समाजाला सगळ्या प्रकारची उत्तम माणसे हवीच असतात....प्लंबर, इलेक्ट्रिशियन, रंगारी, आचारी, टेलर, अशी कामे करणारी माणसे, समाजाला हवीच असतात.

पिलीयन रायडर's picture

7 Oct 2018 - 1:01 pm | पिलीयन रायडर

बरोबर, समाजाला सगळेच हवे आहेत.

आणि वर जे जे गुण वर्णील्या गेले आहेत ते असायला सरकारी शाळेतच जायला हवं असं नाहीये. पुन्हा खाजगी क्लासेस लावायचे असतील तर असा उरफाटा घास घेण्यापेक्षा सर्वसाधारणपणे सर्वांगीण लक्ष देणारी शाळा पहावी. जिथे पून्हा क्लास लावायची वेळ येऊ नये. पण शाळा ह्या सिस्टीमच्या काही लिमिटेशन्स आहेत हे लक्षात घेऊन आपणही मुलांच्या शिकण्याच्या प्रोसेस मध्ये उतरावं. खेळाची आवड, सामाजिक भान, आरोग्याचे महत्व हे जन्मल्यापासून करायचे संस्कार आहेत. आयुष्याचा भाग आहेत. आणि अशी मुलं परिपकव होणारच आहेत. नसतील अभ्यासात हुशार तर दुसऱ्या कशात तरी हुशार असतील. यशस्वी व्हायला नाही तरी कोणती तरी एकच गोष्ट उत्कृष्टपणे करता यायला हवी. ती नेमकी कोणती हे कळलं की झालं.

अभिजीत अवलिया's picture

7 Oct 2018 - 2:08 pm | अभिजीत अवलिया

सहमत.

@मुवि काका,
सरकारी शाळेत जायचे आणि पुन्हा खाजगी क्लासेस लावायचे हा उफराटा कारभार आहे. त्यापेक्षा एकच व्यवस्थित शाळा लावली की खाजगी क्लासला जायचा वेळ आणि पैसा वाचेलच की. कुठलीही चांगली शाळा असली म्हणजे झाले. खाजगी असो वा सरकारी. सर्व खाजगी शाळांच्या फी भरमसाट आहेत असे देखील नाही. (उदा. अभिनव मराठी शाळेची पहिलीची फी फक्त ६००० रु. आहे. पुढच्या वर्गांची ५०० रु. जास्त असेल)
तसे बघितले तर सुट्ट्या वगळल्यास वर्षाचे जेमतेम ७ महिने शाळा असते. उर्वरित वेळेचा सदुपयोग करून मुलांमध्ये अन्य गोष्टींची आवड,कौशल्य निर्माण करण्यासाठी पालकांनी थोडे कष्ट घेतले पाहिजेत.

शाळा कशी ही असली तरी चालतय पण शिक्षकगण व्यवस्थित हवेत.
मुलं आपोआप घडतात.
...

अभ्या..'s picture

7 Oct 2018 - 3:14 pm | अभ्या..

मग चांगले शिक्षक घडवायची सुरुवात आपल्यापासून नव्हे येत्या पिढीपासून सुरु करायला हवी. डिमांड ह्यालाच येणार.

पिलीयन रायडर's picture

7 Oct 2018 - 2:45 pm | पिलीयन रायडर

अनुदानित मराठी शाळा आहे ना अभिनव? म्हणूनच कमी फिस आहे. गोळवलकर कायम विनाअनुदानित आहे, फिस 24000. पण शिक्षक उत्तम. त्यांचे पगारही मग त्याप्रमाणे द्यावे लागतात. पण मला ही फिस सुदधा अगदी नॉमिनल वाटते. वर्गात मुलं 40 आहेत, मला वाटतं अनुदानित शाळांमध्ये 70-80 असतात (आमच्या शाळेत तरी होते..)

अखेरीस शिक्षक महत्वाचे हे खरंच.

मुक्त विहारि's picture

7 Oct 2018 - 11:26 pm | मुक्त विहारि

पण मला ही फिस सुदधा अगदी नॉमिनल वाटते.

मग तुमचे बरोबर आहे.....

२४,००० गुणिले १० अधिक व्याज, एकूण ४ ते ४.५ लाख खर्च....हा तर जवळपास, जर्मनीतल्या एका वर्षाचा खर्च....मला नसतेच परवडले.

सगळी सोंगे आणता येतील, पण हे आर्थिक सोंग कसे आणणार?

शिवाय, इतका पैसा खर्च करून देखील, धाकटा फ्रेंचच शिकणार होता.कारण त्याचे पाचवी पासूनचे तेच ध्येय होते.असो, दोन मुलांच्या, दहावी पर्यंतच्या, शैक्षणिक खर्चात, एकाचे तरी जर्मनीत उच्च शिक्षण होईलच.

बरे झाले, मी त्या सी.बी.एस.सी.च्या भानगडीत पडलो नाही.

पैसा भी बचा और बच्चे भी खूष.

अभिजीत अवलिया's picture

8 Oct 2018 - 8:50 am | अभिजीत अवलिया

हो. अनुदानित आहे म्हणून फी कमी आहे. वर्गात ५५ च्या आसपास मुले असतात. नेहमीच्या विषयांखेरीज इंग्रजी लिखाण व बोलणे शिकवले जाते सध्या.

मुक्त विहारि's picture

7 Oct 2018 - 11:14 pm | मुक्त विहारि

.... पुन्हा खाजगी क्लासेस लावायचे हा उफराटा कारभार आहे.

असेलही, मला तरी आर्थिक फायदाच झाला.इतरांचे मला माहीत नाही.

क्लासची फी जेमतेम १० हजारच होती.आणि क्लास पण फक्त १०वी पुरताच लावला.(आणि तो नसता लावला तरी चालले असते.)

शिवाय, शाळेशिवाय क्लास इतरही लोक लावत असतीलच. अगदी सी.बी.एस.सी. वाले पण क्लास लावतातच.

असो,

मला जसा आर्थिक फायदा झाला तसा इतरांना पण होईलच असे नाही आणि तशी माझी अपेक्षा पण नाही.

बादवे,

दोन्ही मुले सेमी इंग्रजी मध्ये जरी शकली तरी, एकाने आय.एल.टी.एस. मध्ये ८ पॉइंट्स मिळवले आणि जर्मन भाषेतील पहिली परीक्षा ९९% गुणांनी पास झाला.तर दुसरा फ्रेंच भाषे वर बर्‍यापैकी कमांड मिळवतो आहे.

बायको जर्मनचे क्लास पण मराठीतूनच घेते आणि मराठी माध्यमातील मुले जर्मन भाषा फार पटकन आत्मसात करतात, असा तिचा अनुभव आहे.

असो,

इंग्रजी शाळेत न घातल्याने, माझ्या मुलांच्या शिक्षणात काही खंड पडला नाही....पण माझा मात्र आर्थिक फायदा खूप झाला.पैसे वाचले म्हणून मी खूष तर अभ्यासाचे दडपण नसल्याने मुले पण खूष.

इंग्रजी माध्यमातली सगळीच मुले आय.आय.टी. किंवा आय.ए.एस. होत नाहीत आणि सेमी इंफ्रजीतली मुले उच्च शिक्षण घेत नाहीत, असे सरसकटी करण्यात काहीच अर्थ नाही.

घटा घटाचे रूप आगळे , प्रत्येकाचे माध्यम वेगळे.

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2018 - 1:02 am | पिलीयन रायडर

ज्याचा त्याचा प्रश्न झाला हा. फक्त तुमचा बहुदा गैरसमज झालाय काही तरी, माझा मुलगा ssc मराठी माध्यमात शिकतो, cbse इंग्रजी मध्ये नाही. त्यातही अनुदानित शाळा मिळाली असती तर 5-6 हजारच फिस असती. स्वतः शिक्षकांचे पगार करणारी शाळा थोडी फार तर फिस घेणार इतकाच मुद्दा आहे. बाकी आपापले पैसे कसे वापरावे हा वैयक्तिक मुद्दा झाला. तुमच्या मुलांची प्रगती ऐकून आनंद वाटला.

तुम्हाला आकडेमोड करायची असेलच तर इंग्रजी CBSE वगैरे किमान 60 हजार तरी फिस घेतात. ह्या वर्षी बरीच वाढली म्हणे फिस. अजून आनंद मानून घ्यायचा असेल तर काही इंटरनॅशनल शाळा नर्सरी पासून "पावणे दोन लाख" इतकी नाममात्र फिस घेतात! बघा आता त्यात काय काय करता येईल.. मी जग फिरवून आणीन पोराला.

हा तर युरोप मधला एका महिन्याचा खर्च...

"काही इंटरनॅशनल शाळा नर्सरी पासून "पावणे दोन लाख" इतकी नाममात्र फिस घेतात! .....बघा आता त्यात काय काय करता येईल.. मी जग फिरवून आणीन पोराला...."

खरे आहे. + १

एकदम सही.

शेवटी आपला सगळ्यांचा हेतु काय.. तर आपल्याकडे मातिचा गोळा आहे आणि आपल्याला योग्य फिरतं चाक आणि थोपटता हात हवा आहे. आयुष्याची पहिली १६ वर्षे सर्वात क्रिटीकल असतात. १६ पूर्ण झालेलं मूल त्याच्या/तिच्या आयुष्याचं सोनं करायला तयार असण्याची ११०% टक्के गॅरेंटी देणारं शिक्षण मिळणं हि सर्वांची इच्छा असते (किंवा असायला हवी). त्याकरता शक्य असल्यास १००% कस्टमाइझ्ड, १००% एफिशियण्ट, ०% फेल्युअर चान्सेस असणारी पद्धती हुडकुन काढणे व ति अमलात आणणे हे आपल्या हाती आहे. सध्या कुठल्याही शाळेत अशी गॅरेण्टी मिळु शकत नाहि. शाळेत घालवलेला ७०% वेळ भावी आयुष्याच्या दृष्टीने केवळ कालापव्यव असतो. १० वर्षे इतीहास शिकलो पण कुठल्याच मानवी संस्कृतीच्या जनन-जतन-मरणाची शृंखला स्पष्ट करु शकलो नाहि तर इतीहास शिकण्याचा सगळा वेळ वायाच गेला. तेच भूगोलाचं. विज्ञानाच्या बाबतीत तर बोलणंच नको. त्या विज्ञानाचा आणि एकुणच मानवी व्यवहाराचा बॅकबोन असणारं गणीत आलं नाहि तर सगळा टाईम वेस्ट. मनाचा ठाव घेणार्‍या शब्दांची जादु अवगत झाली नाहि तर भाषेचा अभ्यास म्हणजे केवळ घोकंपट्टी. कलेच्या जोपासनेनी जीवनाची अथांगता अनुभवली नाहि तर कलेचा सर्व अभ्यास फक्त मार्क मिळवण्याचं साधन.
१/३ आयुष्य घालवल्यावर मुलाला समोर केवळ जगाच्या कॉम्पीटिशनचं टेन्शन देणारं जीवन दिसत असेल तर इट्स अ बिग फेल्युअर फॉर पॅरेण्ट्स.
असो.

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2018 - 12:47 pm | पिलीयन रायडर

मला एक लक्षात आलं की ज्या विषयांना चांगले शिक्षक मिळाले ते विषय कळले आणि मनापासून आवडले. इतिहास भूगोलाला कायम वाईट शिक्षक असल्याने ते फक्त मार्क मिळण्यापुरत राहिलं. पण नशिबाची गोष्ट अशी आहे की माझं गणित आणि विज्ञान चांगलं असेल तर नवऱ्याला इतिहास भूगोलाची खूप आवड आहे. म्हणजे दोन पालक मिळून आम्ही मुलाला सगळ्या विषयांची गोडी लावू शकतो. किमान निव्वळ मार्कांपुरते न रहाता त्यातून काही ज्ञान खरंच मिळेल हे बघू शकतो.

आपण जे जे शिकलो, जो वेळ शाळेत घालवला तो निव्वळ वायाच गेला असं मला वाटत नाही. मला शाळेत जाऊन, अनेक मुलांमध्ये राहून कळलं की मला नक्की काय जमतं. कोणते विषय आवडतात. आजूबाजूच्या मुलांमध्ये मिसळून रहाता येतं का, भांडणं काय किंवा मैत्री काय, करता येते का..

त्यातून मी आज आहे तशी घडले. तिथे मला कळलं की इंजिनिअरिंग मला जमेल. ते कळायला आयुष्याची काही वर्षे द्यावी लागतातच की. दहा मधला हा एकच विषय आवडतो हे कळायला आधी ते दहाही विषय थोडेसे शिकून बघावे लागतील. कोणत्याही निष्कर्षाला यायला वेळ द्यावा लागतो. आपल्याला एखाद्या विषयाचा उपयोग होतो, दुसऱ्या मुलाला दुसऱ्याच विषयाचा उपयोग होत असेल. सगळं शिकून बघणं मात्र आवश्यक आहे.

फक्त ट्रिक ही आहे की हे शिकणं सोडून आयुष्य मार्कंमागे पळण्यात घालवला तर त्याचा उपयोग नाही. आणि नेमकी आपली शिक्षण पद्धत आपल्याला तेच करायला भाग पाडते, रादर आपली मानसिकता तशी बनवून टाकते.

पण ह्या बाबतची जागरूकता माझ्या आजी आजोबांच्या पिढीत तितकी नव्हती, त्यामानाने माझ्या आई बाबांमध्ये जास्त होती. त्याहून जास्त आपल्यात आहे. आपल्या अनुभवांचा उपयोग आपल्या मुलांना नक्कीच होईल. आपल्याला पोरांना वझ्याचे बैल नाही बनवायचं इतकं तर कळलं ना, झालं तर मग. शाळा कोणतीही असली तरी पालक विचारी असणं जास्त महत्वाचं आहे.

कदाचीत हाच निर्णायक फॅक्टर असावा.
शिक्षणाच्या बाबतीत दोन गोष्टी प्राकर्षाने जाणवतात. एक म्हणजे, आपलं शिक्षण ज्ञानाच्या बेरजेचं नाहि. १० वर्षे शिक्षणाची गोळाबेरीज तेव्हढ्या प्रमाणातल्या ज्ञानावर जमा होत नाहि. वर्षभराच्या शिक्षणानंतर विद्यार्थी फारतर काहि आठवड्यांच्या ज्ञानाने पुढे गेलेला असतो. आपलं शिक्षण अनियमीत व्यायामासारखं आहे. पहिल्या वर्षी १ किमी प्रतितासाच्या गतीने सुरुवात केली तर १० वर्षानंतर आपली स्पीड एक्स्पोनेन्शीअल वाढ होऊन २५ किमी/तास व्हायला हवी... पण ति फार तर ५ किमीपर्यंत पोचली असते. दुसरं म्हणजे ज्या प्रमाणात जग बदलतं त्या प्रमाणात शिक्षणात बदलाची लवचीकताच नाहि. नाविन्याला आत्मसात करायची वृत्ती आणि ते पचवायची शक्ती हि २१व्या शतकातली सर्वात मोठी आवष्यकता आहे. हि गरज एक शैक्षणीक मुल्य म्हणुन अभ्यासात अंतर्भूत असायला हवं... ते म्हणावं तसं दिसत नाहि. असो.

मी पिंपरी मध्ये राहते. माझा मुलगा आताशी वर्षाचा झाला परंतु शाळेचा मुद्दा मला आतापासूनच भेडसावत आहे. मलाही नेत्रांजन यांच्याप्रमाणेच शाळा हवी आहे . न शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त बाकीच्या गोष्टीही तितक्याच महत्वाने शिकवणारी शाळा हवी आहे. कुणास माहिती असल्यास मला जरूर सांगा.

चिनार's picture

10 Oct 2018 - 5:55 pm | चिनार

ताई..माफ करा..
पण मुलगा आत्ता कुठे वर्षाचा झाला अनु तुम्हाला त्याच्या शिक्षणाची चिंता वाटते आहे ही परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. ह्याच परिस्थितीचा फायदा उचलल्या जातो आणि त्यात आपण नकळत फसत जातो.

माझ्या मते मुलगा/मुलगी पहिलीत जाईपर्यंत त्याचं शिक्षण फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. Playgroup , nursary ,KG1 आणि २ यासाठी खालीलप्रमाणे प्राधान्य असावे.
१. घरापासून शाळा जवळ असावी.
२. शाळेत खेळण्याचे साहित्य आणि खेळण्याची मोकळीक असावी.
३. शाळेत सणवार साजरे व्हावेत

या चारही वर्षात मुलावर अभ्यास वगैरे दडपण नसावे. या चार वर्षात शाळेची ओळख नीट झाली तरच मुले पुढे शाळेत आनंदाने जातात. जर याच वयात शाळेचा तिटकारा निर्माण झाला तर पुढे अवघड होते.
तुमचा मुलगा एक वर्षाचा आहे. हळूहळू तुम्हीच त्याला घरी शिकवू शकता. चित्रांची पुस्तके,गाणे,कविता वगैरे ऐकवल्यास उत्तम. तुमचा विश्वास बसणार नाही एवढ्या कमी वेळात मुले ह्या गोष्टी आत्मसात करतात.
मुलाला डायपरची सवय असल्यास ती आत्तापासूनच सोडवण्याचा प्रयत्न करा. अडीच-तीन वर्षांची मुले डायपर लावून शाळेत जाताना मी बघितली आहेत. ही गोष्ट वाटते तितकी साधी आणि सोयीची नाही.

गतीशील's picture

7 Oct 2018 - 4:27 pm | गतीशील

मी विश्रांतवाडी जवळ दिघी येथे राहतो. माझा मुलगा आत्ता १.५ वर्षाचा आहे. मला त्याला मराठी शाळेतच घालायचं आहे.
कृपया कोणाला दिघी पासून ३-४ किमी वर असणारी चांगली मराठी शाळा माहिती असल्यास येथे सांगावे
माझ्याकडे शेवटचा पर्याय म्हणजे आहे ते घर भाड्याने देऊन पुण्यात कुठेतरी घर भाड्याने घेतले पाहिजे, जर वरील उल्लेख केलेल्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर.

लई भारी's picture

9 Oct 2018 - 11:12 am | लई भारी

आपल्यासारख्या उप-उपनगरामध्ये(!) राहणाऱ्या लोकांना मराठी शाळेची अडचण आहेच. माझ्या मित्राने तुम्ही म्हणताय तेच केलंय, प्रभात रोड ला भाड्याने घर घेतलं.

लई भारी's picture

9 Oct 2018 - 12:29 pm | लई भारी

मला मनापासून इच्छा आहे की मराठी माध्यमातच शाळा असावी, पण घरी हा मुद्दा पटवणं जरा अवघड आहे. कुठेही जॉब केला आणि जगभर फिरून आलो तरी घरात मराठीच बोलणं होणार त्यामुळे मराठी मेडीयम घेऊन बाकीच्या गोष्टी करून इंग्लिश सुधारणं शक्य आहे या मताशी निश्चित सहमत आहे. बाकी करिअर साठी CBSE/ICSE च पाहिजे असा आग्रह मला तरी अनाठायी वाटतो.
पण सोसायटीतील बाकीची सगळी मुलं हाय-फाय विंग्लिश मेडीयम ला जातात म्हटल्यावर मुलांवर 'peer pressure' येईल असं वाटतं. मी तर असं 'ऐकलंय' कि मुलं पण आपसात भेद करतात कि हा इंग्लिश मेडीयम ला नाही. ह्यावर काय करायचं कळत नाही. हा मुद्दा विशेषतः नवीन वसलेल्या उपनगरात जास्त आहे असं वाटतं.
आणि ह्या इकडच्या शाळांचे अगदी नर्सरी चे फी चे आकडे ऐकले तरी मला गरगरायला होत. त्यात आमचं 'जुळ्यांचं दुखणं' आहे :)

वाकड पासून जवळ काय पर्याय सुचवाल? निगडी मधील ज्ञानप्रबोधिनी बद्दल ऐकलं आहे, थोडं लांब पडेल पण.

अर्धवटराव's picture

9 Oct 2018 - 5:44 pm | अर्धवटराव

असं 'ऐकलंय' कि मुलं पण आपसात भेद करतात कि हा इंग्लिश मेडीयम ला नाही.

मराठी / फाडफाड इंग्रजी येत नसलेल्या मुलांना हा त्रास नेहेमी सहन करावा लागतो. विशेषतः कॉलेजमधे जिथे चमकोगिरी करावीच लागते. मराठी मुलांनी त्यात अजीबात मागे राहु नये असं वाटतं. उपाय देखील सोपा आहे. १-२ महिन्याचं स्पोकन इंग्लीशचा क्लास लावा मुलांना. अगदी लहानपणी. ट्रेंडींग कार्टुन सिरीयल्स बघा त्यांच्यासोबत आणि त्यावर इंग्लीशमधे चर्चा करा. काहि जुने-नवीन इंग्लीश गाण्यांचे अल्बम्स ऐकण्याची प्रॅक्टीस करुन घ्या. ३-४ महिन्यात आपला मराठी बच्चा फुल्ल चमकोगिरी एक्स्पर्ट होऊन जाईल :) तसंही या दिल्लीवाल्या/ इंग्लीश मिडीयम पोरांना इंग्रजी भाषेचं काहि घेणंदेणं नसतं. आपण चमकोगिरी+इंग्लीश निबंध लेखनाची व्यवस्थीत प्रॅक्टीस करायची आणि त्यांच्या नाकवर टिच्चुन शेखी मिरवायची :)

वेल्लाभट's picture

11 Oct 2018 - 8:25 am | वेल्लाभट

फाडफाड इंग्रजी बद्दल मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात ऐका
https://www.youtube.com/watch?v=O737FAbkEiM

या चॅनलवरचे इतरही व्हिडिओ बघा
https://www.youtube.com/channel/UCRuEVEtM1LRY67X0HM2b8aQ/videos

लई भारी's picture

11 Oct 2018 - 3:26 pm | लई भारी

दोन्ही प्रतिसादांसाठी धन्यवाद.

कोणी ज्ञानप्रबोधिनीबद्दल सांगू शकेल का?
बाकी सगळ्या शाळांचा उल्लेख आला आहे, पण ज्ञानप्रबोधिनीबद्दल नाही.

अभ्या..'s picture

10 Oct 2018 - 3:23 pm | अभ्या..

त्यांचा सोन्याचा कळस चक चक चमकतो. ;)

ज्ञानप्रबोधिनी चांगली शाळा आहे. जरूर प्रयत्न करण्यासारखी.