अलिबाग म्हणजे समुद्रकिनारा (बीच) हे समिकरण सागळ्यांनाच माहिती आहे. पण अलिबागाचे काही पैलू कमी माहितीचे आहेत. उदा. २००० वर्षांपूर्वी भारतात आलेल्या ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ - सिनेगाॅग, यहुदी निर्वासितांच्या प्रवेशाचा स्मृतिस्तंभ, ज्यू दफनभूमी, जेरुसलेम गेट.
नुकतीच मी या स्थळांना भेट दिली. या स्थळांची छायचित्रे, माहिती आणि आणि बेने-इस्राएल समाजाबद्दल माहिती वाचा माझ्या ब्लॉगवर.
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.com/p/unconventional-israeli-alibag.html
इथे थेट फोटो अपलोड करता येत नाहीत तर दुसरीकडे अपलोड करून लिंक द्याव्या लागतात. म्हणून.इथे सगळ्या फोटोंची लिंक देण्यापेक्षा सगळे फोटो एका ब्लॉगवर टाकून एकच लिंक इथे देत आहे. जर हे मिपा च्या नियमांविरुद्ध असेल तर नि:संकोचपणे हे लेखन काढून टाकावे.
प्रतिक्रिया
3 Oct 2018 - 1:22 pm | खटपट्या
छान माहीती,
ठाण्यातही एक खूप जुने सिनेगॉग आहे. सद्या हे सिनेगॉग सिव्हील इस्पितळाजवळ आहे. हे १८७८ साली बांधले गेले. हे जेव्हा बांधले गेले तेव्हा भारतातील एकूण इस्रायली लोकसंख्येच्या ४०% जनता ठाण्यात रहात होती असा उल्लेख आहे.
"शार हाशमियाम" = स्वर्गाचे प्रवेश्द्वार असे याचे नाव आहे. (जाला प्रमाणे)
3 Oct 2018 - 1:42 pm | अथांग आकाश
अशी लिंक देणे हि जाहिरात वाटू शकते! त्यामुळे माहिती इथेच दिलीत तर चांगलं होईल!
दोन्ही फोटो आवडले! अन्य फोटों साहित संपूर्ण माहिती मिपावर वाचायला आवडेल!
3 Oct 2018 - 11:30 pm | कौशिक लेले
पुढच्या वेळी प्रयत्न करतो.
3 Oct 2018 - 2:51 pm | यशोधरा
+1
3 Oct 2018 - 11:30 pm | कौशिक लेले
पुढच्या वेळी प्रयत्न करतो.
3 Oct 2018 - 7:19 pm | कंजूस
ब्लॅागचे स्थलांतर करून -
अनवट अलिबाग. इस्राएली अलिबाग. Unconventional Israeli Alibag.
अलिबाग म्हणजे समुद्रकिनारा (बीच)हे समिकरण सागळ्यांनाच माहिती आहे. पण अलिबागाचे काही पैलू कमी माहितीचे आहेत. उदा. अलिबागमधील ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ - सिनेगाॅग, यहुदी निर्वासितांच्या प्रवेशाचा स्मृतिस्तंभ, ज्यू दफनभूमी, जेरुसलेम गेट
२००० वर्षांपूर्वी परागंदा झालेल्या इस्राएली कुटुंबाचे गलबत फुटून अलिबाग जवळच्या नवगाव इथे लागले. इथल्या लोकांनी त्यांना उदार आश्रय दिला आणि पारशी समाजाप्रमाणे अजून एक धर्मप्रवाह भारतात मिसळला. दोन हजार वर्षे या समाजाने आपला धर्म, संकृती व्यवस्थित जपली तरीही भारताशी एकरूप झाले. याचा स्मृतिस्तंभ नवगाव इथे आहे. बरेचसे ज्यू इस्रायल ला स्थलांतरित झाले तरी अजूनही बरीच ज्यू कुटुंबे आहेत. अलिबागेतही एक नांदता सिनेगाॅग आहे. तुमच्यासाठी या ठिकाणांची ही छायाचित्रे. फोटोंवर क्लिक करून झूम करून पाहू शकाल. तसेच शेवटी "मॅप लोकेशन" आणि अधिक माहितीसाठी काही लिंकही दिल्या आहेत.
पार्श्वभूमी :
ग्रिकांनी जेरुसलेमवर आक्रमण केल्यावर सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी वाट फुटेल तिकडे आणि समुद्र घेऊन जाईल तिकडे ज्यू पळून जाऊ लागले. त्यातले दोन मचवे आपल्या कोकण किनाºयापर्यंत आले. हे मचवे आजच्या खांदेरी-उंदेरीच्या आसपास फुटले असावेत. त्यामुळे बोटीतील बहुतांश लोक मरण पावले. परंतु केवळ सात पुरुष आणि सात स्त्रिया मात्र अलिबागजवळ नवगावच्या किनाºयावर जिवंत उतरले. पाण्यात बुडून मेलेल्यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्थानिक लोकांनी लाकडं आणि अग्नीची व्यवस्था केल्यावर मात्र त्या १४ लोकांनी खाणाखुणा करत थांबायला सांगितलं आणि मृतदेह पुरण्याची परवानगी मागितली. या लोकांनी तेथेच आश्रय घेतला. त्यांना आॅलिव्हपासून तेल काढता येत होतं. कोकणात आल्यावरही तेल काढण्याचं काम त्यांनी गावकऱ्यांकडे मागितलं. कोकणात त्यांनी खोबरं, शेंगदाणे, तिळाचं तेल काढायला सुरुवात केली. त्यांनी मुखोद्गत असणारे श्लोक आपल्या पुढच्या पिढ्यांना शिकवायला सुरुवात केली. शबाथच्या ज्यू परंपरेप्रमाणे हे लोक शनिवारी काम बंद ठेवून सुटी घेत. शनिवारच्या सुटीमुळे त्यांना कोकणातल्या लोकांनी शनवार तेली असं नाव देऊन टाकलं. हिंदू तेली सोमवारी सुटी घेत म्हणून त्यांना सोमवार तेली म्हणत. ज्यूंची संख्या वाढत गेली आणि ते अलिबागसह उत्तर कोकणात सर्वत्र स्थायिक होऊ लागले. साधारणत: अकराव्या शतकामध्ये डेव्हिड रहाबी अलिबागजवळ आले. काही लोकांच्या मते त्यांचं १५ व्या किंवा १७व्या शतकात येणं झालं. पण ते आले यावर सगळ्यांचं एकमत आहे. रहाबी यांनी झिराडकर, शापूरकर आणि राजापूरकर अशा तीन कुटुंबातल्या एका व्यक्तीला धर्मशिक्षक बनवले आणि त्यानंतर हिब्रू शिक्षणालाही सुरुवात केली. अशाप्रकारे बेने इस्रायलींची त्यांच्या धर्मग्रंथाशी ओळख झाली आणि पुढील सांस्कृतिक, धार्मिक विकासाची वाट खुली झाली. नंतर अलिबाग, मुंबई, पुणे, ठाण्यासह लहान लहान गावांमध्ये सिनेगॉग किंवा प्रार्थनास्थळं बांधण्यात आली. हिब्रूंचं अध्ययनही सुरू झालं. त्यांना बेने इस्रायली असं नावच पडलं. मराठा साम्राज्य, अलिबागचे आंग्रे, ब्रिटिश लष्करात त्यांनी चांगल्या नोकºया मिळवल्या. शिक्षणाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे त्यांना ब्रिटिशांच्या काळात विविध खात्यांमध्ये कामाची संधीही मिळाली होती. जगभरातले ज्यू जेरुसलेमला पुन्हा जाण्याचं स्वप्न मात्र विसरले नव्हते. १९४८नंतर जगभरातले ज्यू इस्रायलमध्ये गोळा होऊ लागल्यावर भारतातले ज्यूसुद्धा तिकडे गेले.
फोटो १

नवगाव स्मृतिस्तंभ
फोटो २


स्तंभावरील इंग्रजी मजकूर : Here are buried the ancestors of the Bene-Israel community of India who were shipwrecked on the shores of Nawgaon nearly 200 years ago. From Nawgaon the Bene-Israel community spread all over India. In the beginning they were engaged in oil pressing and agriculture. Later they took to small scale industry, the armed forces, and government services and attained the highest positions. They have been true citizens of India and have participated in the freedom movement of the country. With the establishment of the state of Israel in 1948 they have emigrated in large numbers to the state of Israel where they are happily settled.
फोटो ३
स्तंभाजवळची यहुदी दफनभूमी
फोटो ४

इस्राएलला स्थलांतरित झालेल्या ज्यू धर्मियांनी बांधलेले "येरूशालाईम द्वार" "जेरुसलेम गेट"
फोटो ५

अलिबागमधील मागेन अबोथ सिनेगॉग
3 Oct 2018 - 11:31 pm | कौशिक लेले
आपण केलेल्या स्थलांतराबद्दल आभार
3 Oct 2018 - 11:32 pm | कौशिक लेले
आपण इन्स्टाग्रामवर फोटो टाकून सगळ्याच्या लिंक्स दिल्या का?
4 Oct 2018 - 5:16 am | कंजूस
१) ब्लॅागवरच्या फोटोवर कर्सर नेला/बोट धरून ठेवल्यावर एक पॅापअप येतो copy link / save image /open in new tab वगैरे.
२) त्यातून copy link करा.
३) टेम्प्लेट
( टेम्प्लेट उभ्या फोटोसाठी )
फोटो १
शीर्षक
<img src="लिंक" width="480"/>
( टेम्प्लेट आडव्या फोटोसाठी )
फोटो २
शीर्षक
<img src="लिंक" width="560"/>
फोटो
४) कॅापी केलेली लिंक योग्य टेम्प्लेटात "लिंक"
च्या जागी पेस्ट करा. " " हे राहू द्या.
५) लेखनात हवे तिथे हे संपूर्ण कॅापी _ पेस्ट करा.
६) एकदा पूर्वपरीक्षण करून / डोळ्याच्या चिन्हावर क्लिक केल्यावर तपासून
प्रकाशित करा.
4 Oct 2018 - 10:55 pm | चौथा कोनाडा
फोटो मिपावर कसा चढवावा या संबंधी अधिक माहिती देण्यासाठी मिपा मदत पाना ( वरचीआडवी मेनूपट्टी) वरिल यादीवर टिककी मारली असता मिपाचे होमपेज (स्वगृह) सुरु होत आहे.
संपादक मंडळ, कृपया तपासून ठीक कराल का ते ?