मोबाइल - होल्डर ( D I Y )

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
21 Aug 2018 - 6:49 am

***********************
कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा
************************

मोबाइल हँडल ( DIY )

रेल्वेतून अथवा गर्दीत किंवा ट्रेकिंगमध्ये मोबाइलने फोटो,व्हिडिओ काढताना तो हातातून निसटू नये म्हणून केलेले हँडल.
बाजारात मिळणारे प्लास्टिक कवर - त्यालाच दोरी बांधायची.
फोटोसाठी "Easy Selfie free" हे कॅम्रा अॅप वापरायचं. आवाज करून शटर चालू करता येतो. फोकसिंग होऊनच फोटो निघतो. जिथे सेल्फि स्टिक वापरता येत नाही अथवा जवळ नसते तेव्हाही उपयोगी.
फोटो १)

फोटो २)

फोटो ३)

सूचना: दोरी त्या कवरमध्ये लूप करून घ्या. एकदा दोनदा ओढून खात्री करा. जुने कवर वापरू नका. मनगटातून दोरीचे वेटोळे सहज सुटणार नाही असे पाहा.
रेल्वे डब्याच्या दारात एका हाताने दांडा धरून दुसऱ्या हाताने मोबाइलने फोटो व्हिडिओ सहज जमतो. कॅम्रा बटणाकडे बोट येईल अशी दोरी बांधा. काही मोबाइलात व्हॅाल्युम डाउनचे बटण शटरसाठी असते तेसुद्धा सहज वापरता येईल. समारंभात हात उंच करून डोक्यावर धरून पटापट फोटो काढता येतात. ट्रेकिंगच्यावेळी चालत सेल्फि व्हिडिओ काढत चालत राहता येते.
करून पाहा. मी तीन वर्षे वापरत आहे.

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

21 Aug 2018 - 10:14 am | खटपट्या

कोणताही फोटो दीसत नाही.

कंजूस's picture

21 Aug 2018 - 3:11 pm | कंजूस

फोटो बदलले.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Aug 2018 - 1:58 pm | प्रकाश घाटपांडे

दोरी बांधता येईल असे मोबाईल असायचे पुर्वी. नॉच असायचे केस मधे. हल्ली तसले मोबाईल येत नाहीत.

मार्मिक गोडसे's picture

21 Aug 2018 - 3:57 pm | मार्मिक गोडसे

रेल्वे डब्याच्या दारात एका हाताने दांडा धरून दुसऱ्या हाताने मोबाइलने फोटो व्हिडिओ सहज जमतो.
धोकादायक सल्ला.

१)इतका धोकादायक नाही कारण गाडी घाटातवगैरे वळणावळणाने जाते तेव्हा हळूच जाते, वळतानाच सर्व डबे, एंजिन दिसते. निसर्गही छान असतो. जेव्हा सपाटीवर सरळ ट्रॅकवर सुसाट जाते तेव्हा व्हिडिओ काढण्यासारखे काहीच नसते.
२) एसीचा डबा असल्यास खिडक्या बंद असतात, दारातच उभे राहावे लागते.
३) गाडीच्या दाराबाहेर हात दीडदोन फुट बाहेर काढण्याची गरज नसते, फक्त सहा आठ इंच पुढे नेला तरी काम होते. इतक्या जवळ खांब नसतात.

टर्मीनेटर's picture

21 Aug 2018 - 4:27 pm | टर्मीनेटर

कंजुस साहेब, तुमच्या क्रिएटीव्हीटीला सलाम. _/\_

उपयोजक's picture

22 Aug 2018 - 8:59 am | उपयोजक

कधीही सुरक्षित!

फ्लिप कवर एकहाती कसं धरायचं?

प्रकाश घाटपांडे's picture

24 Aug 2018 - 10:00 am | प्रकाश घाटपांडे

समजा कव्हर मधून मोबाईल पडला तर?

कवरमधून मोबाइल पटकन निघतच नाही. कोणतेही बाजारातले कवर बघा. ( ते फ्लिपवाले पुस्तकासारखे उघडणारे कवर हे गोरिला ग्लास नसलेल्या मोबाइलसाठी असते.)फोटोतले दिसते त्याटाइपातले.
आता दोरी बांधताना मातमात्र आत एक वेढा घालावा आणि बाहेर येणाऱ्या दोरींची छिद्रं दोन इंचापेक्शा दूर नको. कारण मनगटाचे माप त्यापेक्शा मोठे असते आणि घट्ट पकड मिळते. निसटत नाही.

हे जरा डिटेलमध्ये. दोरी अशी अडकवा.
फोटो ३)

फोटो ५)

प्रकाश घाटपांडे's picture

26 Aug 2018 - 9:04 pm | प्रकाश घाटपांडे

मी लेदर केस ला असलेल्या रिबेट मध्ये क्यामेरा ची दोरी घातली

काही केसेस मोबाइलच्या मागच्या झाकणास चिकटतात त्या झाकण निघाल्यावर फक्त झाकणालाच चिकटून राहातात तशा नको.
वर फोटोत दाखवलेले प्लास्टिक कवर हे मोबाइललाच सर्व बाजूने धरून थोडे स्क्रीनच्या कडेवर येते त्यातून मोबाइल अजिबात निघत नाही.
दोरी मोबाइल कवरच्या खालच्या कडेला लावून हाताचे बोट कॅम्रा बटणवर येत नव्हते म्हणून कवरच्या वरच्या कडेला बांधली तेव्हा जमले॥ फोटो ३ /५ पाहा.