संजय दत्तची लोकसभेची उमेदवारी

हरकाम्या's picture
हरकाम्या in काथ्याकूट
12 Mar 2009 - 12:54 pm
गाभा: 

सर्वांचा लाडका ? आणि गांधीजींच्या विचारांवर आधारित अशा सिनेमात काम करुन
लोकप्रियता मिळालेला अभिनेता ? आणि बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी शिक्शा
सुनावण्यात आलेला संजय दत्त याला एका राजकीय पक्शाने लोकसभेसाठि उमेदवारी
देउ केलेली आहे व त्यासाठि उभे राहता यावे यासाठि हा प्राणी सर्वोच्च न्यायालयात
गेला आहे.
संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी तुरुंगात असलेला अफजल गुरु यालाही उद्या असेच
वाटू लागले तर काय होइल . याची कल्पनाही करवत नाही. नशीब आमचे हे की
अजुन आमच्या एकाही राजकीय पक्शाच्या हे लक्शात आले नाही. की अफजल गुरु
यालाही उमेदवारी द्यावी.
हा लोकप्रिय प्राणी संजय दत्त हा त्या लोकसभा मतदार संघाचे असे काय भले करणार
आहे हे त्याला व त्याला तिकिट देणार्या पक्शाला माहिती पण याप्रकाराने
माझ्यासारख्या सरळ्मार्गी विचार करणार्या प्राण्याला अस्वस्थ केले आहे हे नक्की.
क्रुपया यावर आपल्याला काय वाट्ते हे मला कळवा..

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

12 Mar 2009 - 1:10 pm | छोटा डॉन

आजकाल ही पदे फक्त शोभेच्या बाहुल्या असतात असे आमचे मत आहे, त्यामुळे कुणीही निवडुन गेल्यास काय आश्चर्य ?

महाराष्ट्रातुन ४८ खासदार निवडुन जातात.
किती जण मराठी आणि महाराष्ट्रासाठी संसदेत तोंड उघडतात ?
किती जणांनी ह्यासाठी आपले वजन( शब्द चपखल आहे खरा ) खर्ची घातले आहे ?
थोडक्यात फरक पडत नाही ...

जेव्हा राम नायकांसारख्या जनमानसात प्रतिमा असलेल्या नेत्याचा पराभव गोविंदा फक्त त्याच्या "स्टार इमेज" च्या लौकीकाच्या आधारे करु शकतो तर संजय दत्तचे काय चुकले ?
आता ह्यावेळी असेच होणार हे नक्की ...
कपिल सिब्बलांसारख्या हुशार संसदपट्टुच्या विरोधात केवळ स्टारडम म्हणुन "स्मॄती इराणी" उभी राहते तेव्हा "निवडणुक" ही प्रक्रियाच संपते ...
असो.

चालायचेच ...!!!

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

12 Mar 2009 - 1:16 pm | घाशीराम कोतवाल १.२

कपिल सिब्बलांसारख्या हुशार संसदपट्टुच्या विरोधात केवळ स्टारडम म्हणुन "स्मॄती इराणी" उभी राहते तेव्हा "निवडणुक" ही प्रक्रियाच संपते ...

सहमत १००% सहमत

आज बिहार उत्तरप्रदेश मधे राजकारनात जाण्यासाठी
पहले बाहुबली बनो फिर नेता बनो हेच सुत्र आहे..
आता महाराष्ट्राचे घ्या ना
अरुण गवळी - आमदार
भाई ठाकुर - आमदार
पप्पु कलानी - आमदार
आता म्हणे अरुण गवळी ला लोकसभेचे वेध लागलेत
त्यात एक नविन नाव घ्या दक्षीण मुंबईतुन मोह्हमद अलि शेख नामक कोणी प्राणी पैसे वाटत आहे
का तर याला संसदेत जायचे आहे ह्या माणसा बद्दल खुप काहि वाचणात येत आहे ..

काय म्हणावे हि लोकशाही कि ठोकशाही?????
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

छोटा डॉन's picture

12 Mar 2009 - 1:23 pm | छोटा डॉन

गुन्हेगारी पार्श्वभुमी असुन काम करणारे आणि स्वच्छ चरित्र्यचे परंतु निष्क्रीय असे २ फरक मी केले आहेत.
माझा रोख हा "निष्क्रीय लीडर्स" वर होता ...

तुम्ही वर ज्यांची नावे लिहली आहेत ती माणसे जरी गुन्हेगार असली तर अगदीच टाकावु आणि निष्क्रीय होती हे मी मान्य करणार नाही.
बाकीचे सोडले तर भाई ठाकुरांचे, कलानी आणि गवळीचे त्यांच्या मतदारसंघात "काम" नक्कीच आहे.
ह्याची उदाहरणेसुद्धा देता येतील ...

पण राजकारणी जेव्हा साधनशुचितेच्या गप्पा मारतात तेव्हा हे "अब्राम्हण्यम" मध्ये येते.
सलग ७ वेळा निवडुन जावुन एकदासुद्धा संसदेत तोंड न उघडाणार्‍या व १००० रु. सुद्धा विकासनिधी मदतारसंघात न आणणार्‍या संदिपान थोरांतापेक्षा हे ठाकुर, गवळी आणि कलानी केव्हाही परवडले.
असो. तो वेगळा विषय आहे.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

12 Mar 2009 - 1:35 pm | घाशीराम कोतवाल १.२

फरक पडतो डॉनराव नक्किच फरक पडतो
अहो ह्या लोकांवर रासुका, टाडा देशद्रोह या सारखे गुन्हे दखल झाले आहेत
आणी अजुन हे लोक काहि सुधरले नाहित
अरुण गवळी - मकोका रासुका जन्मठेप

भाई ठाकुर - टाडा रासुका
पप्पु कलानी - टाडा रासुका
अहो अशा लोकांना निवडुन देणार मग हे उजळमाथ्याने गुन्हे करणार साहेब एक वेळ ते निष्क्रीय राजकारणी परवडतात हो
पण हे नाहि परवडत

चिरोटा's picture

12 Mar 2009 - 2:55 pm | चिरोटा

बर्याच लोकप्रिय नेत्यान्च्या मतदारसन्घात तुम्हाला वरिल वाक्य ऐकु येईल्."जगात कोण खात नाही?/थोडे खाल्ले तर काय बिघडले?आपण त्यान्च्या जागी असलो तरि तेच करु" ही वाक्ये मी शिकलेल्या सधन मध्यम वर्गातिल लोकान्कडुन ऐकली आहेत.भाई /पप्पु ह्यान्ची प्रतिमा विरार्/उल्हासनगर मधे 'पैसे खाणारे पण काम करणारे' अशीच आहे.

मराठी_माणूस's picture

12 Mar 2009 - 3:51 pm | मराठी_माणूस

उद्या दाउद ने एखद्याला मालामाल केले म्हणुन तो माणुस त्याला देव मानु लागला तर ते बरोबर का ? कदाचीत व्यक्तीगत पातळीवर त्याने मानले तर सोडुन देता येईल पण अशांचा एखादा गट त्याला निवडुन आणून लोकांच्या उरावार आणूस बसवला तर चालेल का ?

एक वेळ निष्क्रीय परवडले पण लोकांचे जीव घेणारे गुन्हेगार कदापी नको

चिरोटा's picture

12 Mar 2009 - 1:18 pm | चिरोटा

हेमामालिनि,सुनिल दत्त्,धर्मेन्द्र,विनोद खन्ना,शत्रुघ्न सिन्हा खासदार होवुन 'जन कल्याण' करु शकतात तर सन्जु बाबाने काय घोड मारलय?
परिस्थिती अशी आहे की तुम्हि आम्ही काळा पैसा नसल्याने काही देवु नाहि शकत पक्षाना .कितीही सोज्वळ्तेचा आव आणला तरी निवडणुक लढवाय्ला काळा पैसा लागतो हे सत्य आहे.आणी हा पैसा ज्याच्याकडे जास्त त्याला उमेद्वारि मिळाय्चा चान्स जास्त.
(अवान्तर्-राजकिय पक्षान्च्या कार्यालयात लोकान्शी जर आपण बोलुन बघित्लेत तर पहिला प्रश्ण असतो 'किति देवु शकता?"

चिरोटा's picture

12 Mar 2009 - 4:36 pm | चिरोटा

एक वेळ निष्क्रीय परवडले पण लोकांचे जीव घेणारे गुन्हेगार कदापी नको

हे लोकान्चे जीव घेणारे गुन्हेगार निष्क्रीय राजकारणी/नोकरशाहीनेच तयार केले ना?
'दाउद आमचा नम्बर एकचा शत्रु' हे पालुपद आपण अनेक वर्षे ऐकतो आहोत्.परन्तु त्याची टोळी मुम्बैत कार्यरत आहेच्.अगदी पोलिस मुख्यालयाच्या जवळच त्याच्या मालकिचे शोपिन्ग सेन्टर होते.जर तो शत्रु आहे तर त्याची टोळी उद्व्हस्त का नाही करत्?आजही बोलिवुड आणी इतर काळ्या धन्द्यान्मधे बर्याच टोळ्या आहेत. निष्क्रीय राज्कारण्याना/नोकरशाहाना त्यान्ची पुर्णपणे कल्पना आहे.थोडक्यात गुन्हेगार आणि राजकारणी ह्यात लोकानी भेदभाव करायचा सोडुन दिला आणि जो काम करतो त्याला मत हे तत्व स्वीकारले.

फ़क्त राजकीय पक्षाना जबाबदार धरान्यपेक्षा तेवढ्याच प्रमाणात मतदार सुद्धा जबाबदार आहेत.
संजय दत्ता ला एखाद पक्ष उमेदवारी देत असें तर ती मतदार हानून पडू शकतात. अरुण गवाडी ला तर लोकानी अपक्ष म्हणुन खाद्यावर घेतले आहे हाही मुद्दा लक्षात घ्यायलाच हवा.
अब्राहम लिंकन च्या मतानुसार "लोकशाहीत जर एखादा निष्क्रिय उमेदवार निवडून येत असेल त्या वरुण तेथील मतदारांची मानसिकता कळते" मित्रहो गोविंदा शेवटी उत्तरमुंबई मधून निवडूनयेतो ही खुप मोठी लज्जास्पद गोष्ट आहे. मला वाटते हे मुद्दे पुढच्या निवडनुकित लक्षात घ्यावी .

मराठी_माणूस's picture

12 Mar 2009 - 4:42 pm | मराठी_माणूस

थोडक्यात गुन्हेगार आणि राजकारणी ह्यात लोकानी भेदभाव करायचा सोडुन दिला आणि जो काम करतो त्याला मत हे तत्व स्वीकारले.

अगदी बरोबर आणि इथेच गल्लत झाली. लोकांचे जास्तीत जास्त प्रबोधन होणे आवश्यक आहे.

यन्ना _रास्कला's picture

12 Mar 2009 - 5:28 pm | यन्ना _रास्कला

भाऊ तुम्ही एक विसरताहात. संजय एकदा तुरुंगात जाउन आल्यावर शाहाणा बनला. त्याने
नंतर कुठलेही वाईट काम केले नाही. पण सलमानकडे पाहा. सतत वादात राहतो. सतत
काहीतरि अघोरी गोष्टी करत असतो.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

12 Mar 2009 - 5:37 pm | घाशीराम कोतवाल १.२

अहो रास्कल राव हा संजय दत्त अजुन ही या भाई लोकांच्याशी फोन वर बोलतो
सलमान खानने जेव्हा रॅश ड्राईव्हिंग मधे ५ जणांना चिरडले तेव्हा हाच संजय दत्त त्याची बाजु घेउन मिडिया
समोर आला होता
म्हणे हा सुधरला **************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

चिरोटा's picture

12 Mar 2009 - 5:41 pm | चिरोटा

आणि इथेच गल्लत झाली
गल्लत कशी? राजकारणी आणि गुन्हेगार ह्यान्मध्ये काहिही फरक नाही याची खात्रि पटल्यानेच लोक काम करतो त्याला मत देवु लागले.लोकान्च्या मते जर तो गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा करा की आणि निवड्णुक लढवायला देवु नका. कायद्याने त्याला निवडणुक लढवायला द्यायची,तो कुठुन पैसा आणतो हे माहित असुनपण तिकडे कानाडोळा करायचा,आणि लोकाना सान्गायचे की 'हा वाइट आहे ह्याला मत देवु नका?" हे प्रबोधन काही उलगडत नाही. प्रबोधन चान्गले आहे यात वाद नाही पण त्याने मुळ प्रश्नावर घाव नाही घातला जात्.शिवाय 'मी गुन्हा केला होता,त्याची शिक्षा भोगली आहे.परन्तु आता कुठ्लाही गुन्हा माझ्यावर नाही.मग आता निवडणुक लढ्वली तर गैर काय?" ह्याला उत्तर काय?