सांस्कृतिक दृष्ट्या हिंदू असलेला, हिंदू धर्मांतर्गतचा आधूनिक मुस्लीम पंथ असू शकतो का ?; वस्तुतः हिंदू धर्मात पोषाख, प्रार्थनेची पद्धत काय असावी, ईश्वर एक मानावा कि अनेक, मुर्ती पुजा करावी की करु नये याची बंधने अशी नाहीत. फक्त दुसर्याच्या प्रार्थना स्वातंत्र्याचा आदर केला म्हणजे झाले.
दुसर्या बाजूला मुस्लिम धर्मातही सुरवातीस आमचा धर्म आम्हाला, तुमचा तुम्हाला अशीच व्यवस्था होती जी व्याख्या हिंदू धर्मात चालू शकते. असे हिंदू मुस्लिम सिंथेसिसचे प्रयत्न भारतात झालेच नाहीत असे नाही यात, गुरु नानकांचा शीख धर्म , कबिर पंथ अशी उदाहरणे आहेत त्या बाबत पुन्हा कधी. माझ्या आणि मिपाकरांच्या व्याख्येतील संस्कृतीक दृष्ट्या हिंदू असलेला हिंदोस्लीम पंथाचे स्वरुप कसे असू शकेल याची हि एक केवळ बौद्धीक वैचारीक चर्चा. (बेसिकली असा पंथ स्थापन करत असल्याची माझी स्वतःची उद्घोषणा यात कुठेही नाही)
१) सध्या धर्म आणि संस्कृतीची जी गल्लत होते ती न करता, मुर्ती पूजा नसलेल्या जमतील तेवढी चांगली , आनंददायी मंगलमयी वाटतील ती ती भारतीय सांस्कृतीक परिमाणे स्विकार्य असावीत.
२) हिंदू संस्कृतीतील अनेकेश्वर स्वरुप कबिरा प्रमाणे अद्वैत निराकार स्वरुप म्हणून स्विकारावे.
३) मुर्तीपूजक आणि अनेकेश्वर आणि इतर सर्व प्रार्थना पद्धतींचे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा निरपवाद आदर करावा , आपल्यातील एक समजावे, रोटी बेटीसहीत सर्व सामाजिक व्यवहार मान्य असावेत. आपल्या पेक्षा वेगळ्या श्रद्धा असलेल्यांशी करार मदार संघर्ष झाले तरीही आपले विश्वास कोणत्याही परिस्थितीत वेगळ्या श्रद्धा असलेल्यांवर लादू नयेत. आपली श्रद्धा आपल्या पाशी या न्यायाने ईतर श्रद्धांचा निशेध अथवा उपमर्द करु नये.
४) कोणत्याही प्रकारच्या प्रतिमा अथवा प्रार्थनास्थळ भंजनात सहभागी होऊ नये.
५) नास्तिक मतांचाही आदर करावा.
६) सर्वांसह स्त्रीयांचेही निवड स्वातंत्र्य, अधिकतम अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य असावे . ज्यांना पंथ सोडावयाचा आहे त्यांना सोडावयास अनुमती असावी.
७) सर्वांसह स्त्रीयांनाही क्रिडा, अभिनय, नाट्य, नृत्य, चित्र, मुर्ती, गासं, संगित, अशा सर्व कलांना मोकळीक असावी. व्यवसाय स्वातंत्र्य, समाजात मोकळेपणाने वागण्याचे स्वातंत्र्य, पोषाख स्वातंत्र्य , धर्मस्थळात वावरण्याचे स्वातंत्र्य, पंथिय संस्थात कार्यकारैणीत आणि प्रमुख पदांवर समान संधी, न्यायासनासमोर स्त्री म्हणून जबानीचे मुल्य कमी नसावे -समान असावे . कोणत्याही अमानुष शिक्षांचे समर्थन नसावे.
८) पंथ परमेश्वर प्रार्थनेपर्यंत आणि व्यक्तिगत जिवनातील चांगल्या कालसुसंगत मुल्यांची जोपासने पर्यंत मर्यादीत असावा, कुटूंबसंस्थेचे स्वरुप, राज्यसंस्था, अर्थसंस्था, विज्ञान, शिक्षण यात हस्तक्षेप करु नयेत.
९) नागरीक असलेल्या देशाशी निरपवाद निष्ठा असावी
१०) सर्व हिंदू ग्रंथांचा आदर करावा, इतर हिंदू ज्यांना देव मानतात त्यांना प्रेषित म्हणून स्विकारावे.
११) पंथ आणि धर्म काल सुसंगत असण्याची गरज असते हे लक्षात घेऊन शब्द पुजेचा त्याग करावा, ग्रंथ अथवा व्यक्ती यांच्या चांगल्या बाजूंचा आदर करावा.
१२ ) प्रार्थना पद्धती कर्मकांडे , संकेत, नियमावली, ग्रंथ , व्यक्ती टिका आणि तात्विक चिकित्सेसाठी, कालसुसंगत बदल घडवले जाण्यासाठी मुक्त असावेत. उपपंथ निर्मितिचे स्वातंत्र्य असावे.
१३) व्यक्ति, आणि कुटूंबांना योग्यते व्यक्तिगत, कौटूंबिक बदल करुन घेण्याचे स्वातंत्र्य असावे.
१४) या सर्वाचा उद्देश्य संघर्ष टाळणारे, देशप्रेमावर आधारीत विश्वबंधुत्वाचा आदर करणारे, न लादलेले मंगलदायी शांततामय सहजिवन आहे.
अजून सुचेल तसे काळाच्या ओघात सुधारतो आणि जोडतो.
(इथे मी कुठेशीक वाचलेली संकल्पना सकारात्मक रचनात्मक चर्चेस ठेवणे एवढाच उद्देश आहे. मी स्वतः अधिक वेगळ्या श्रद्धा बाळगत असल्यामुळे या पंथात सहभागी असणार नाही हे आधीच नोंदवतो, )
प्रतिक्रिया
29 Jun 2018 - 11:04 am | यशोधरा
सूफी पंथ थोडाफार असाच आहे ना?
29 Jun 2018 - 11:38 am | माहितगार
माझे सुफी पंथीयांबद्दलचे इंप्रेशन भक्तीपंथीय असे आहे. भक्ती पंथासाठी ऊपयूक्त लवचिकता त्यात दिसते. सुफीपंथ म्हणजे मोनोलिथीक एंटीटी नसावी, संत (एका अर्थाने तेही भक्तच असतात) आणि फालोअर्स जेवढे तेवढ्या वेगवेगळ्या छटा त्यात दिसतात. सुफी पद्धतींची सुरवात इस्लामची रचना होत असतानाच झाली असावी. बाहेरच्या ज्या ज्या प्रदेशात गेले त्या त्या प्रदेशातील संस्कृतीशी सिंथेसीस होण्यात मदत झाली असणार . भारतीय उपखंडात ईश्वराशी नाते केवळ गुलामाचे न रहाता प्रेमाचे होण्यास हातभार लागला, अंशतः स्थानिक संस्कृती अंधश्रद्धांचा स्विकार झाला. या सकारात्मक बाजू स्विकारतानाच, (हिंदूंना प्रीय नसलेली कट्टरता आणि हिंसाही) काही वेळा काही सुफी संत गटात दिसू शकते नाहीच असे नाही. चुभूदेघे
सिंथेसीस हि कायम चालणारी प्रक्रीया असावी. असो.
चर्चा सहभाग आणि प्रतिसादासाठी अनेक आभार.
29 Jun 2018 - 11:09 pm | साहना
आत्याला मिश्या असत्या तर तिला काका म्हणून शकतो अश्यातला हा प्रकार आहे. इस्लाम हा पुस्तकाचा धर्म आहे, मुस्लिम कोण आणि कोण नाही हे अतिशय स्पष्ट पणे पुस्तकांत सांगितले आहे. ते आपण बदलले तर इस्लाम इस्लाम राहत नाही. उदाहरणार्थ मूर्तिपूजा हे इस्लाम मध्ये भयानक मोठे पाप आहे. प्रेषित स्वतः मुर्त्या फोडत असे आणि मुर्त्या फोडणे प्रत्येक मुसलमानांचे कर्तव्य आहे. त्यामुळे हिंदू धर्मातील पंथ म्हणून इस्लाम राहू शकत नाही. आमच्या पूर्वजांनी हे ओळखून त्याला आधीच म्लेंछ ठरवले होते.
पण मुळांत इस्लाम ला इतकी legitimacy देणे म्हणजे सापाला घरांत घेणे आहे. मुस्लिम लोक इस्लामची शिकार असून ह्या लोकांची वेगाने घरवापसी करून धार्मिक आणि अध्यात्मिक प्रगतीसाठी त्यांना हिंदू धर्माचा मुक्त मार्ग देणे माझ्या मते खरे सोल्युशन आहे.
30 Jun 2018 - 11:41 am | माहितगार
अशा मत परिवर्तनासाठीच्या तुमच्या जादूच्या छ्डीचे नेमके स्वरुप काय आहे ? ते जाणून घेणे आवडेल.
तुमच्या फॅमिलीचे पुर्वज असा मर्यादीत अर्थ असेल तर कल्पना नाही पण सर्वसाधार ण सर्वांच्या पुर्वजाम्बद्दल म्हणाल तर बर्याच जणांनी जुळ्वऊन घेण्यास हात आखडता घेतला असेल हे समजण्यासारखे आहे पण आपल्याला पटो ना पटो परिस्थितीशी जुळवून घेणारेही राहीले असावेत असा अंदाजा आहे. चुभूदेघे.
माझ्या मतानुसार, खरं म्हणजे कुठल्याही जगात सगळेच जण पुस्तके वाचत नसतात, वाचतात त्यातले बोअर होऊन न बोलता स्वतःला बाजूस करुन घेणारेही बरेच असतात. अलिकडच्या सर्वे चाचण्या पाहिल्यातर सगळीकडे १२ ते १८ टक्के जनसमुदाय लिबरल असावेत , अंदाजे तेवढाच दुसर्या स्पेक्ट्रमला आपल्या प्रमाणे परंपरावादी असतो आणि मधले ७० टक्के परंपरावाद्यांना डोळे झाकून डोके हलवत असतात त्याम्च्या डोए हलवण्यात पुस्तकांचे सखोल अभ्यास वगैरे नसतात. परंपरावाद्याम्च्या कट्टरतेचे स्वरुप आणि धाक याच्या प्रमाणावर लिबरल्सना डोके वर काढण्याची किती संधी मिळते ते अवलंबून असते.
दुसर्या ग्रंथाच्या वाचनात माणुस गढला की आधीच्या ग्रंथाचे प्रभाव कमी होतात यास मोठा कालावधी जात असतो. वेद, उपनिषदे, स्मृती यांचे प्रभाव कमी होण्यासही हजार हजार वर्षाम्चा काळ सहज गेला असेल, रामायण महाभारत गीता आणि पुराणे आली की आधीच्यांचे प्रभाव कमी झाले, आता नवे विचार टिव्ही सिरियल चित्रपट आले की ते जुन्यांची जागा घेतात. उलट आजच्या काळातली माध्यमे नव्या गोष्टी जनमानसावर बिंबवण्यात कैकपटींने प्रभावी आहेत त्यामुळे सुधारणा कठीण असल्यातरी अगदीच निराशेचे कारण असावे असे वाटत नाही. सुधारणेचे प्रयत्न हा सातत्याचा भाग आहे.
परंपरावादी हिंदू धर्मिय एवढे निराश का असतात हे समजत नाही. ईस्लाम येण्याच्याही आधि उपनिषद कारांनी प्रतिमापुजन टाळण्याचे एकेश्वर वाद प्रसारीत करण्याचे प्रयत्न करुन पाहिले पण पुराणकारांनी अनेकेश्वर अद्वैतता आणि मुर्तीपूजा यास पुर्नप्रस्थापित यशस्वीपणे केले. अगदी औरंगजेबाच्या काळात महानुभाव समाजाने आणि इतरही समाजाम्नी पादुका पुजा पुढे रेटल्या. पादुका पुजेचे काय करणार याला इस्लाम मध्ये निश्चित उत्तर आहे का या बद्दल मी साशंक आहे.
जर एखाद्या साऊंड स्पेशालीस्टने देवाचे नाव घेणारे छोटे छॉटे स्पीकर्स जोडून मुर्ती बनवली तर ते त्या मुर्तीचे नेमके काय करु शकतील. आणि इथे तुमच्या धर्मात तुम्ही भंजकातही इश्वर पहाता हे पाहिल्यावर स्वतःचे भंजन नाही किमान स्वतःच्या डोक्यावरचे केस उपटण्याची वेळ समोरच्यावर नक्कीच येत असणार ;) एनीवे या धागा लेखात मुर्ती-मंदिर भंजन अग्राह्य असणे अभिप्रेत असल्याचे आधीच नोंदवले असल्याने त्याबाबत साशंकता रहावयास नको. इन एनी केस शिख आणि कबिर पंथीयांनी धार्मिक सिंथेसीस करुन काळाच्या ओघात जम जमवला तर आजच्या काळातल्या त्यांच्यातील रॅशनलीस्ट श्रद्धावंताना उपरोक्त किंवा तत्सम पंथाच्या माध्यमातून हिंदू संस्कृतिशी जोडून घेणे उपयूक्त वाटू शकावे असे वाटते असो .
मुख्य म्हणजे रॅशनलीस्ट लोक सर्वत्र असतात कधी उघडपणे बोलतात कधी नाही त्यांच्या साठी उपरोल्लेखीत व्यवस्था ऊपयूक्त असू शकावी.
30 Jun 2018 - 1:00 am | साहना
Starting with Al-Bilãdhurî who wrote in Arabic in the second half of the ninth century, and coming down to Syed Mahmudul Hasan who wrote in English in the fourth decade of the twentieth, we have cited from eighty histories spanning a period of more than twelve hundred years. Our citations mention sixty-one kings, sixty-three military commanders and fourteen sufis who destroyed Hindu temples in one hundred and fifty-four localities, big and small, spread from Khurasan in the West to Tripura in the East, and from Transoxiana in the North to Tamil Nadu in the South, over a period of eleven hundred years. In most cases the destruction of temples was followed by erection of mosques, madrasas and khãnqãhs, etc., on the temple sites and, frequently, with temple materials. Allãh was thanked every time for enabling the iconoclast concerned to render service to the religion of Muhammad by means of this pious performance.
http://web.bookstruck.in/book/chapter/20346
http://www.sadhana108.com/2018/06/30/violent-truth-behind-sufi-mask/
30 Jun 2018 - 11:08 am | माहितगार
साहनाजी आपणास फार्सी, उर्दू, संस्कृत आणि मोडीची जाण सोबत इतिहास सम्शोधनाची प्रमाणसाधने आणि इतिहास लेखन या विषयांचे ज्ञान असल्यास विरुद्ध बाजूच्या डाव्या इतिहास संशोधकाम्च्या मांडणी मुद्देसूदपणे खोडण्यास आपल्या सारख्या उजव्यां अभ्यासकांची या विषयास नितांत गरज असावी, आपण अधिक अभ्यासपूर्वक या विषया वर स्वतंत्र लेखनचर्चा अवश्य करावे.
माझे व्यक्तिगत मत युरोपीय वसाहतवाद कालीन युरोपीयन आक्रमणा मागे असलेला व्यापाराचा उद्देश्य, पुरेसे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असल्यामुळे अधिक सुस्पष्ट पणे लक्षात येतो. अरब आणि इस्लामिक आक्रमणामागेही अप्रत्यक्ष व्यापारी उद्देश्य राहिले असण्याची शक्यता व्यक्तिशः मला बरीच वाटते इस्लाम स्थापने नंतरचा किमान एक खलिफा व्यापारी होता (चुभूदेघे), पण त्या दिशेने इतिहासकारांनी कितपत अभ्यास केला आहे माहित नाही. भारतीय माल आफ्रीकन समुद्र आणि अरेबीक जमिनी मार्गांवरुन युरोपात जात असे, या व्यापारावर नियंत्रणासाठी ट्रायबल टोळ्या सातत्याने प्रयत्नरत असणार एकमेकांवर कुरघोडी करत असणार, टोळी सदस्याम्च्या लॉयल्टी केवळ पैस्यांवर घेता येत नाहीत कारण व्यापार सुरक्षीत ठेवण्यासाठी प्रत्येक जण पैसा मोजण्यास तयार असतो. दैवी श्रद्धा या अधिक कायम स्वरुपी निष्ठा मिळवण्यास ऊपयूक्त ठरतात. प्रत्येक टोळीचे दैवत वेगळे आणि अनेक टोळ्या यामुळे व्यापारास बाधा आल्यामुळे एकच दैवत तत्वज्ञान लादण्याचे प्रयास ज्युडायीक काळापासूनच चालू झालेले तत्वज्ञान अरबांनीही पुढे नेले असणार. आणि त्यांचा वेगाने सत्ता विस्तारास धर्माच्या चित्रामागच्या व्यापारी एकीकरणाने आलेले यश उपयूक्त ठरले असणार. हे सत्ता विस्तार करताना त्यांनी हिंसा आणि मुर्तीमंदिर भंजनासारख्या गोष्टी नक्कीच केल्या असणार. डावे इतिहासकार असे काही झालेच नाहीचे बहाणे करतात उजवे झाले त्यापेक्षा जरासे अधिक रंगवत असतील तथ्य मध्ये कुठेतरी असावे.
असो पण आपण वेगळ्या धाग्यातून या विषयावर सविस्तर चर्चा अवश्य कराव्यात. या धाग्यासाठी एकदा मुर्ती-मंदिर भंजन अग्राह्य ठरवलेले असले की हा अनुषंगिक विषय तसे पहाता संपतो. मनमोकळ्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार.
14 Jul 2018 - 5:13 pm | माहितगार
हा पाकीस्तानी वृत्तपत्र डॉन मधील निखील मंडलपार्थी यांनी दिलेला आषिष नंदीचा अँथ्रॉपॉलॉजीकल सर्वे ऑफ ईंडियाचा संदर्भ ( डॉक्युमेंटेशन ऑनलाईन नाही मिळाले) बरोबर असेल तर, भारतात जवळपास ३५ समुदाय अलरेडी असे आहेत जे स्वतःस हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही गटात मोडतात.
14 Jul 2018 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारतात जवळपास ३५ समुदाय अलरेडी असे आहेत जे स्वतःस हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही गटात मोडतात.
हे एक सामान्य शास्त्रिय निरिक्षण आहे. यात आश्चर्यकारक असे काहीच नाही ! इतिहासाचे थोडेसे अवलोकन केले तरी खालील वस्तुस्थिती ध्यानात येईल...
इतिहास पाहिला तर, जेव्हा इस्लामी आक्रमक भारतात येत असत आणि लूटमार करून जात असते तेव्हा आणि नंतर जेव्हा ते भारतात स्थिरस्थावर होऊन राज्ये स्थापन करू लागले तेव्हाही, त्यांचे मुखिया आणि सैन्य त्यांचा कुटुंब बरोबर घेऊन येणे शक्यच नव्हते. किंबहुना, त्यापैकी बहुतेकांकडे आपले स्वतःचे खडे सैन्यही नसे. त्या वेळेची त्यांची सैन्य जमा करण्याची पद्धत पाहिली तरी तरी असे ध्यानात येईल की, ते येण्याच्या वाटेवरच्या प्रदेशांतून (वाटेवरच्या राजे/सरदार/कबिले/सामान्य जनता/इ) यांच्याकडून काही बदल्याच्या बोलीवर सैन्य जमा करत येत असत.
वरच्या मजकुराचा अर्थ असा की...
१. (एखाद-दुसरा अपवाद वगळता) मुख्य राजे-सरदारांसह इतर कोणाला आपले कुटुंब बरोबर आणणे शक्य नव्हते. जे इथून परत गेले त्यांनी जाताना केवळ धन लुटून नेले नाही तर इथल्या सैन्य व प्रजेतील अनेक स्त्री-पुरुषांना गुलाम बनवून नेले, हा अगदी मुहम्मद बिन कासीमच्या सिंधावरच्या विजयापासूनचा इतिहास आहे. अर्थातच, थोड्या प्रमाणात का होईना, भारतातला जीन पूल बरोबर नेला.
२. जेव्हा, इथे बसून राहणे जास्त फायद्याचे आहे हे ध्यानात येऊन त्यांनी इथेच कायमची राज्ये स्थापन करणे सुरू केले तेथपासून अगदी मुस्लीम सत्ता खालसा होऊन इस्ट इंडिया कंपनीचे राज्य स्थापन होईपर्यंत आणि नंतरच्या कालखंडातही कोणताही मोठा लोकांचा आगम-निर्गम झाल्याची एकही घटना घडलेली नाही. त्या काळापर्यंत, सर्वसामान्य जनतेमध्ये आणि राजाच्या पदरी आणि सैन्यात काम करणार्या लोकांमध्येही (बहुदा, भारताच्या सतत बदलत्या धर्मबदलांच्या प्राचीन इतिहासाच्या प्रभावामुळे असावे, पण) राजा शैव आहे की वैष्णव की बौद्ध की जैन की मुस्लिम या मुद्द्याने फारसा फरक पडत नव्हता असे दिसते. त्यामुळे एखाद्या राजाविरुद्ध, केवळ धर्म वेगळा आहे यासाठी जनतेने राज्यक्रांती केली, असे उदाहरण भारतात दिसत नाही. याविरुद्ध, बहुतेक इस्लामी राजांच्या पदरी ज्ञानी, हुशार आणि बलवान हिंदूंची उत्तम अथवा तुलनेने उत्तम पदावर नेमणूक झाली होती... याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. बंडाळी टाळून केवळ जर केवळ बळाच्या उपयोगाने उत्तम महसूल मिळत असला तर ते जास्त सोईस्कर होते. तरीही धर्मबदलासाठी जोर-जबरदस्ती अजिबात केली गेली नाही असेही नाही, पण पश्चिम व मध्य आशियामध्ये एखादा भूभाग संपूर्ण मुस्लिम बनविण्याचे यशस्वी प्रयत्न केले गेले तसे मोठ्या भूभागावर किंवा लक्ष-दशलक्ष इतक्या मोठ्या जनतेवर करणे भारतात शक्य झाले नाही. खुद्द औरंगजेबासारखा त्या काळाचा अर्थ व सामरिक ताकदीने जगातला पहिल्या पाचात असलेला सम्राट दख्खनमध्ये उतरला तेव्हा त्याचे उद्दिष्ट भूभाग आपल्या सत्तेखाली आणणे हाच होता... कट्टर मुस्लिम असून त्याने जनतेच्या धर्मबदलासाठी काही खास प्रयत्न केल्याचे दिसत नाही... मुस्लिम सत्ता स्थापन झाल्यावर हे नंतर होईलच असा त्याचा होरा असावा.
तरीही, अश्या व्यवस्थेत अनेक हिंदू धर्मांतर करून मुस्लिम झाले, याची महत्त्वाची कारणे खालील प्रमाणे असावीत...
१. वरचा भारतीय सत्ताबदलांचा इतिहास पाहता, चांगल्या पदावरच्या लोकांतील आणि इतर जनतेतीलही काही लोकांना 'धर्मबदल करणे' हे त्यांच्या आर्थिक-सामाजिक-राजकीय उन्नतीचे साधन वाटले तर आश्चर्य नव्हते.
२. आजच्या तुलनेने खूपच मोकळ्या-ढाकळ्या समाजव्यवस्थेतही जातिव्यवस्था हे हिंदू धर्मातल्या दुफळी नव्हे तर अनेक-फळीचे कारण आहे यात दुमत असूच शकत नाही. मुस्लिम आक्रमणाच्या काळात तर जातिव्यवस्था जुलुमी म्हणावी इतकी भेदभावी होती... हे हिंदूतील अनेक जातीगटांमध्ये केवळ आर्थिक-सामाजिक-राजकीय दुराव्याचे नव्हे तर मानसिक दुराव्याचे महत्त्वाचे कारण होते. अशाने दुरावलेले लोक "सर्व मुस्लिम एकाच दर्जाचे" या तत्त्वज्ञानाला भुलून तिकडे वळले असले तर ते आश्चर्यकारक नाही. किंबहुना अश्या धर्मबदलाने प्रशासनात मिळणारा वरचा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दर्जा या गोष्टीही धर्मबदलाला कारण झाल्याच असणार.
३. भारतात धर्मबदलाला मदत करणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू धर्ममार्तंडांची संकुचित वैचारिकता... त्यांना परधर्मातील लोकांना आपल्या धर्मात सामावून घेण्याचे वावडे होते हे म्हणणे उलट-अतिशयोक्ती होईल ! त्यांनी तर जबरदस्तीने मुस्लिम बनवलेल्या आपल्या सेनापतीला परत हिंदू धर्मात घेण्याच्या विचारासाठी त्या काळी त्यांचे स्वतःचे रक्षण करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मातून बाहेर काढण्याची धमकी दिली होती ! या पार्श्वभूमीवर इतर कोणत्या महत्त्वाच्या अथवा सामान्य जनाने हिंदू धर्मात परतणे किंवा परधर्मीयाने हिंदू होणे हे अशक्यच होते.
त्यानंतर जवळच्या इतिहासात हिंदू धर्मातला प्रवेश "तुलनेने*" शक्य झाल्यानंरतरही, "हिंदू धर्मात परतणार्या किंवा नव्याने येणार्यांची जात कोणती ?" हा प्रश्न खुद्द इतर हिंदूच सर्वात प्रथम विचारणार यात संशय नाही ! त्याचे उत्तर आजतागायत तथाकथित** धर्ममार्तंडासह कोणालाच माहीत नाही ! तथाकथित धर्ममार्तंड आणि बहुसंख्य हिंदू, धर्मपरिवर्तन करून हिंदू होणर्या लोकांना, आपल्या जातीत सामावून घेणार नाही, त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार करणार नाही, त्यांनी हिंदू धर्मात जरूर यावे, पण आमच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्नही करू नये असे म्हणणार... जरी ते वर वर जातिभेदाच्या विरुद्ध बोलत असले आणि त्यासाठी काही हिंदू नेत्यांच्या लेखनाचा अथवा कार्याचा सतत दाखला देत असले तरीही !!! सगळी गंमतच आहे ! जर हिंदू धर्मात मानाचे किंवा किमान समतेचे स्थान मिळत नसेल तर, "इतरांनी हिंदू धर्मात यावे" असे म्हणणे फारश्या बुद्धिमत्तेचे लक्षण नसेल, हे काय सांगायलाच हवे काय ?!
वरचा इतिहास व परिस्थिती पाहता, भारतीय मुस्लिमांमध्ये परकी (अरबी, पर्शियन, मध्य आशियाई, इत्यादी) जनुके नाहीत किंवा असलीच तर अत्यंत कमी (१% किंवा त्यापेक्षा खूप कमी) प्रमाणात आहेत, हे जनुकीय अभ्यासात दिसते यात फारसे आश्चर्य नाही.
या शास्त्रीय वस्तुस्थितीला मुख्य विरोध काही मूठभर प्रस्थापित व समाजाची सूत्रे आपल्या हातातून जातील अशी भिती असलेल्या मुस्लिम उलेमा आणि इतर संस्थापदाधिकार्यांचाच आहे. त्याविरुद्ध, अश्या गोष्टींना, त्यातील फोलपणा जाणून असलेल्या पुढारलेल्या मुस्लिम तरुणाईत, अश्या परदेशी वंशावळीच्या तत्त्वाला विरोधच दिसतो. मात्र, इस्लाममधील सद्य सामाजिक परिस्थिती पाहता त्यांना त्यांचे विचार प्रकट करणे तितकेसे सोयीचे वाटत नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. तरीही, याबाबत काही लोक प्रकटपणे आपले मत मांडू लागले आहेत. (http://www.newageislam.com/islamic-society/muslim-genetic-studies-show-i...)
=======================================
* इथे "तुलनेने" हा शब्द मुद्दामच वापरला आहे. कारण, आजही, ...
इतर धर्मात प्रवेश करण्यास काय करावे लागते, हे त्या धर्मातील सर्व जणांना माहीत असते व ती प्रक्रिया अत्यंत सोपी असते. ख्रिश्चन धर्मात त्यासाठी चर्च व धर्मगुरुची गरज असते. मुस्लिम धर्मात तर त्याकरिता मस्जिद किंवा मौलवीचीही गरज नसते, कोणताही मुस्लिम पुरुष ती प्रक्रिया करू शकतो.
या पार्श्वभूमीवर, हिंदू धर्मात येण्यासाठी काय प्रक्रिया आहे हा प्रश्न विचारला तर किती हिंदू त्याचे उत्तर देऊ शकतील ? आणि किती तथाकथित हिंदू धर्ममार्तंड त्या प्रश्नाचे उत्तर छातीवर हात ठेवून खात्रीलायकरीत्या देऊ शकतील ???!!!
***************
** : इथे "तथाकथित" हा शब्द मुद्दाम वापरला आहे. कारण...
हिंदू धर्माकडे, ख्रिश्चन धर्माप्रमाणे जागतिक व्यवस्थापकीय प्रणाली नाही आणि मुस्लिम धर्माप्रमाणे आक्रमकरीत्या आपले मत खरे करवून घेणारी विस्कळित का होईना पण स्वयंघोषित प्रणाली नाही. त्यामुळे, हिंदू धर्माचे खरे धर्ममार्तंड कोण हे ठरवण्याची, सर्वसामान्य हिंदूंच्या जीवनावर प्रभाव असणारी, कोणतीही व्यावहारिक प्रणाली नाही. म्हणजे हे बहुतांश धर्ममार्तंड हे, "अनधिकृत मतप्रदर्शन करणारे स्वयंघोषित आणि म्हणूनच संशयास्पद विश्वासार्हता असणारे तथाकथित धर्ममार्तंड" झाले, नाही का ?
व्यवहारातली वस्तुस्थिती अशी आहे की...
(अ) हिंदू विधी/कर्मकांड सांगणारा प्रत्येक ब्राम्हण/पुजारी आपण स्वतःच धर्ममार्तंड (प्रती-पोप) असल्यासारखा मतप्रदर्शन करतो, पण तरीही,
(आ) त्याचे मत मानावे की नाही याचा अधिकार यजमानाकडे असतो आणि तो यजमानाच्या सामाजिक-आर्थिक-राजकीय वजनाच्या प्रमाणात वाढतो. त्याचा हा अधिकार वापरून यजमान विधीत फेरफार करून घेतो व ते ब्राम्हण/पुरोहित फारश्या प्रतिकाराशिवाय मानतो. धर्माचे इतके "कस्टमरच्या बल आणि/किंवा आग्रहामुळे केले जाणारे व्यापारी कस्टमायझेशन" इतर कोणत्याही धर्मात दिसणे केवळ अशक्य आहे !
14 Jul 2018 - 5:47 pm | गब्रिएल
तुम्ची मुसलमान धर्मावर लिवण्याची चिकाटी जंक्शन हाय. पन तुमी त्या धर्माच्ये पयला आणि अखेरचा शबूद अस्लेले जानारे पुस्तक उर्फ कुरान (आरबीतून नायतर कमीत्कमी त्येचा समजणार्या भाषेत्ला इस्लामी स्कॉलर्चा भाषांतर) वाच्ले हाय काय ? नस्ल्यास अदुगर वाच्ने जर्रूर हाय.
त्येच्यात दिल्येलं सोडून तुम्च्या मनात ज्ये काय बाय येतं त्येला कायबी किंमत नाय बगा. तेवा त्ये वाचाच, काय म्हंता ?
15 Jul 2018 - 6:30 pm | मदनबाण
हिंदुस्थानतले सगळेच मुसलमान वाईट आहेत / देशद्रोही आहेत या विचारांचा मी अजिबात नाही, कारण अब्दुल हमीद पासुन ते अगदी हल्लीच इस्लामी अतिरेक्यांकडुन ठार केलेल्या लष्करातील औरंगझेब यांची परंपरा या देशाला लाभली आहे. अनेक मुस्लीम विचारवंत, उच्च पदाधिकारी या देशाला लाभले आहेत आणि यापुढे सुद्धा लाभतील याची मला खात्री वाटते.
परंतु या धर्मातील लोकांना या देशात राहुन अजुनही कर्मठ मुल्ला / मौलवींच्या किंवा नेते मंडळींच्या नादाला लागणे सोडता आलेले नाही ! उच्च शिक्षण घेउन सुद्धा माथेफिरुपणा करण्यास ही मंडळी कमी करत नाहीत याची उदाहरणे सहज सापडतील तसेच अनेक राष्ट्र विघातक कारवायांन मध्ये या धर्मातील मंडळींचा सहभाग लक्षणीय आहे हे अनेक वेळा दिसुन आलेले आहे, ज्यात अर्थातच आपल्यावर जिवापाड प्रेम करणारा पाकिस्तान आणि अरब राष्ट्रातुन येणार निधी कारणीभूत आहे असे दिसुन येते.
अनेक वेळा देशविघात कॄतींना या समाजातील जाणत्या वक्तींनकडुन विरोध [ निषेधात्मक ] दर्शवला जात नाही, किंवा दाखवल्यास त्याला प्रसिद्धी दिली जात नाही. [ ही प्रसार माध्यमांची मोठी चूक आहे. ]
इथे राष्ट्रावर प्रेम करणारे मुसलमान आणि राष्ट्र विघातक कारवाया करणारे मुसलमान दोन्ही राहतात, मला वाटतं या देशातील जाणत्या मुसलमानांनीच त्यांच्या धर्मातील लोकांचे सातत्याने प्रबोधन करण्याची अधिक गरज आहे. याच बरोबर हिंदु नेते मंडळींनी फक्त मतांसाठी कट्टरतावादी मुस्लीम मंडळींना पोसणे वेळीच सोडायला हवे !
जाता जाता :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है, बरसता है जो आँखों से वो सावन याद करता है... :- Arzoo [ 1965 ]
16 Jul 2018 - 2:23 am | गामा पैलवान
डॉक्टर सुहास म्हात्रे,
आपला इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो.
१.
मानाचे स्थान मिळण्यासाठी म्हणून हिंदू धर्म सोडणारे बरेच होऊन गेले. मात्र मानाचे स्थान मिळतं म्हणून हिंदू धर्मात घरवापसी होऊ शकंत नाही. साधना करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळावं हा घरवापसीचा मूळ हेतू आहे.
२.
यांस धर्म म्हणंत नसून हे कर्मकांड आहे.
३.
अशाच अनेक कारणांसाठी हिंदूंना धर्मशिक्षण अत्यावश्यक आहे.
४.
नवहिंदूंच्या जातीसंबंधी प्रतिसाद यापूर्वी इथे दिला होता : https://www.misalpav.com/comment/998878#comment-998878
एक माहितीसाठी : https://www.misalpav.com/comment/998916#comment-998916
५.
अनेकांनी नोंदवलेलं एक निरीक्षण सांगतो. भारतात जिथे जातीव्यवस्था कडक होती तिथे इस्लामला कडवा प्रतिकार होत आला आहे. भारतात इस्लाम प्रामुख्याने पसरला तो पूर्व बंगाल व पश्चिमेस पंजाब ते गांधार पट्ट्यात. दोन्ही ठिकाणी पारंपरिक हिंदू जातीव्यवस्था असली तरी तितकीशी कडक (=रिजिड) नव्हती. याउलट दिल्ली ते बिहार या पट्ट्यात (कनौज, प्रयाग, वाराणसी वगैरे) जातीव्यवस्था कडक होती व आजूनही तशीच आहे.
त्यामुळे जातीव्यवस्थेतल्या अन्यायामुळे इस्लाम स्वीकारण्याचं प्रमाण अत्यल्प असावं असा माझा अंदाज आहे.
आ.न.,
-गा.पै.
17 Jul 2018 - 3:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
गा पै साहेब,
आपल्या बर्याच गोष्टींबद्दलच्या "निरागस" मतांबद्दल आश्चर्ययुक्त गंमत वाटते, हे नमूद करायलाच हवे !
मात्र, अती स्वप्नरंजन करण्याने फारतर स्वत:ला स्वतावर खूष व्हायला मदत मिळते, पण, व्यवहारात त्याचा शून्य उपयोग होतो, हे नक्की.
१.
मानाचे स्थान मिळण्यासाठी म्हणून हिंदू धर्म सोडणारे बरेच होऊन गेले. मात्र मानाचे स्थान मिळतं म्हणून हिंदू धर्मात घरवापसी होऊ शकंत नाही.
तर मग अश्या भेदभाव मानणार्या आणि समानतेचा शत्रू असलेल्या धर्माबद्दल इतरांना आकर्षण वाटावे हे स्वप्नरंजनच नाही काय ? स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना "गये गुजरे" समजणे हे तर "तथाकथित स्वयंघोषित" हिंदू धर्ममार्तंडांचा मुख्य दोष आहे... आणि त्याच्यामुळे निर्माण झालेल्या दुफळीचा फायदा राजकारणी घेत आहेत आणि त्रास सर्वसामान्य हिंदू भोगतो आहे. जागे व्हा !
साधना करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळावं हा घरवापसीचा मूळ हेतू आहे.
हे कारण लोकांना मोठ्या संखेने हिंदू धर्माकडे आकर्षित करेल असे तुम्हाला वाटते ?! ऐकावे ते नवलच ! हे कारण व्यवहारात ०.००००००००००००००००००००००००००००००क्ष% वेळा जरी सापडले तरी धन्य म्हणायला हवे. (टीप : क्ष च्या जागी तुमच्या आवडीचा कोणताही आकडा टाकला तरी चालेल !) आणि वादासाठी ते मानले तरी अश्या घरवापसीने घर्मातील लोकांची संख्या कितीशी वाढेल ???!!! असे स्वप्नरंजन करायचे आणि त्याच श्वासात "हिंदू धर्माचा विकास आणि प्रसार" यांच्या गोष्टी करायच्या. सगळी गंमतच आहे !
गेल्या काही वर्षांत भारतात घरवापसीचे जे प्रकार केले गेले, त्यामागे "साधना करण्यासाठी अनुकूल वातावरण" हा उदात्त उद्येश होता असे म्हणत असलात तर माझा वरचा स्वप्नरंजनाचा मुद्दा तुम्ही समर्थपणे सिद्ध करत आहात. धन्यवाद !
२.
यांस धर्म म्हणंत नसून हे कर्मकांड आहे.
तर मग, सद्याचा व्यवहारातला "हिंदू धर्म" हा केवळ कर्मकांडापुरताच उरला आहे असेच म्हणावे लागेल, नाही का ? व्यवहारात असलेले, नाव घेण्याइतके, इतर अजून काय आहे ?
३.
अशाच अनेक कारणांसाठी हिंदूंना धर्मशिक्षण अत्यावश्यक आहे.
"इतरांना आपल्या धर्मात घेण्याबद्दल हिंदू समाजात प्रचंड उदासिनता आहे" हेच तुमच्या वरच्या उत्तरावरून सिद्ध होत आहे. पुन्हा एकदा माझा मुद्दा उचलून घरल्याबद्दल धन्यवाद !
शिवाय धर्मशिक्षण म्हणजे नक्की काय देणार ? आणि ते शिकायला किती जण (अगदी, किती हिंदू) तयार होतील ?! (पुन्हा स्वप्नरंजन !)
४.
नवहिंदूंच्या जातीसंबंधी प्रतिसाद यापूर्वी इथे दिला होता : https://www.misalpav.com/comment/998878#comment-998878 व एक माहितीसाठी : https://www.misalpav.com/comment/998916#comment-998916
इथली चर्चा इतक्या खालच्या वैचारिक स्तरावर जाऊ लागली होती की ती तेथे थांबवणे मला योग्य वाटले व मी तिला खालील वाक्याने पूर्ण्विराम दिला होता...
"हे सगळे केल्याने, या लेखात व चर्चेत असलेल्या मूळ समस्येचे 'आता तर नाहीच' पण 'भविष्यात कधितरी' निराकरण होईल का ?" असा विचार करून पहा, इतकेच सांगू इच्छितो व चर्चा पुरी करतो.
आता, तुम्हीच ते प्रकरण परत उकरून काढल्यामुळे काही गोष्टी स्पष्ट करणे भाग आहे.
आपल्या चर्चेचा गोषवारा असा...
मी : "हिंदू धर्मात परतणार्या किंवा नव्याने येणार्यांची जात कोणती ?" हा प्रश्न खुद्द इतर हिंदूच सर्वात प्रथम विचारणार यात संशय नाही ! त्याचे उत्तर आजतागायत तथाकथित** धर्ममार्तंडासह कोणालाच माहीत नाही !
तुम्ही : वीर सावरकरांच्या पतितपावन मंदिरात जात विचारली जात नाही.
मी : असे "मनापासूनच नव्हे तर केवळ वरकरणीही मानणार्या-करणार्या एकूण सर्व व्यक्तींचा" संपूर्ण हिंदू समाजातला टक्का किती ? (आपण, सद्य व्यवहारात प्रचलित / शक्य असलेल्या लक्षात घेण्यायोग्य (significant) गोष्टींबद्दल चर्चा करत आहोत.) अशा लोकांपैकी किती लोक, नवहिंदू व्यक्तिशी सहजपणे रोटीबेटी व्यवहार करायला तयार होतील, याची प्राथमिक चाचपणी केली तरी, मी काय म्हणतो आहे ते ध्यानात येईल.
याबद्दल तुमचे मौन होते... आणि ते का याचे कारण कळायला फार हुशारीची गरज नाही.
...............
तुम्ही : त्यानवहिंदूस कोणतीही जात लावायची गरज नाही. आणि भेद लावायची तर नाहीच नाही. वीर सावरकरांच्या पतितपावन मंदिरात जात विचारली जात नाही. त्यातूनही कोणाला हवीच असेल तर खुशाल जन्मजात लावावी.
मी : जन्मापासून कॅथॉलिक खिश्चन असलेली एखादी व्यक्ती हिंदू झाली तर तिची "कॅथॉलिक हिंदू" अशी जात असेल का ?!
तुम्ही : हवी असेल तर लावा की बिनधास्त.
आणि
मी : नवहिंदू व्यक्तिशी तुमच्या आजूबाजूच्या लोकांपैकी किती लोक सहजपणे रोटीबेटी व्यवहार करायला तयार होतील ....
तुम्ही : नाही झाले तर नवहिंदूंचा म्हणून एक समूह उत्पन्न होईलंच की. त्यांना आपसांत बेटीव्यवहार करता येतील. रोटीव्यवहार समान पंगतीने निकालात काढता येतील. किंबहुना रोटीव्यवहार निदान शहरांतून तरी सामायिक झाला आहे.
थोडक्यात, तुम्ही हिंदू धर्मात या. पण, आम्ही तुम्हाला समान वागणूक देणार नाही, वेगळेच ठेवू, तुमच्याशी रोटीबेटी व्यवहार करणार नाही... किंबहुना, तुम्हाला आमच्यापेक्षा कमी प्रतीचा नवहिंदू उपसमाज समजू. (धन्य आहे !) इतके वंशविद्वेषक अनाचार-अविचार सहन करायला कोण शहाणा माणूस धर्मबदल करून हिंदू होईल ?
किंबहुना, इतके वंशविद्वेषक विचार, ही कोणत्याही सुधारलेल्या समाजात धृणास्पद व लांछनास्पद गोष्ट आहे. पूर्णविराम.
...............
५.
अनेकांनी नोंदवलेलं एक निरीक्षण सांगतो. भारतात जिथे जातीव्यवस्था कडक होती तिथे इस्लामला कडवा प्रतिकार होत आला आहे. भारतात इस्लाम प्रामुख्याने पसरला तो पूर्व बंगाल व पश्चिमेस पंजाब ते गांधार पट्ट्यात. दोन्ही ठिकाणी पारंपरिक हिंदू जातीव्यवस्था असली तरी तितकीशी कडक (=रिजिड) नव्हती. याउलट दिल्ली ते बिहार या पट्ट्यात (कनौज, प्रयाग, वाराणसी वगैरे) जातीव्यवस्था कडक होती व आजूनही तशीच आहे.
ही एक, कार्य-कारणभाव सिद्ध न झालेली, गोड गैरसमजूत आहे !... आपल्या स्वप्नरंजनाला सोईस्कर वाटते यासाठी ती सहज (पण अज्ञानाने) पुढे केली जाते.
भारतात इस्लाम प्रामुख्याने पसरला तो पूर्व बंगाल व पश्चिमेस पंजाब ते गांधार पट्ट्यात. दोन्ही ठिकाणी पारंपरिक हिंदू जातीव्यवस्था असली तरी तितकीशी कडक (=रिजिड) नव्हती.
हिंदू जातीव्यवस्थेचा याच्याशी काहीही संबंध नाही. कडव्या मुस्लीम सत्ता हे तिथल्या बहुसंख्य मुस्लीम जनसंखेचे कारण आहे. महंमद बिन कासीमने सिंधमध्ये विजय मिळ्वल्यावर केलेल्या अमानुष कत्तलींचा, धर्मबदलासाठी केलेल्या अत्याचारांचा आणि धनसंपत्तीबरोबर गुलामाचे तांडे बगदादच्या खलिफाकडे पाठविण्याचा इतिहास तुमच्या वाचनात आलेला दिसत नाही. पंजाब व पूर्वेस आणि बंगालमध्ये मुस्लीम सत्ता फार सुरुवातीच्या काळापासून (आठवे शतक) पाय रोऊन होत्या. वाचन वाढवावे लागेल.
याउलट दिल्ली ते बिहार या पट्ट्यात (कनौज, प्रयाग, वाराणसी वगैरे) जातीव्यवस्था कडक होती व आजूनही तशीच आहे.
त्यामुळे जातीव्यवस्थेतल्या अन्यायामुळे इस्लाम स्वीकारण्याचं प्रमाण अत्यल्प असावं असा माझा अंदाज आहे.
तुमचे म्हणणे बरोबर आहे... तो तुमचा अंदाजच आहेच, आणि तो चुकीचा आहे... त्याच्या मागे काही ठोस पुरावे नाहीत, केवळ सोईस्कर स्वप्नरंजन आहे !
सद्याचे प्रमाण पाहिले तर दिल्ली ते बिहार, म्हणजेच, मुख्यतः उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड यांच्यात अनुक्रमे सुमारे २०%, १७% आणि १५% अशी मुस्लीम लोकसंख्या आहे ( https://www.census2011.co.in/data/religion/2-muslims.htm ). सन २०११ च्या लोकसंखेप्रमाणे भारतात मुस्लीम धर्मियांची लोकसंख्या १४.२% आहे. म्हणजे हे पण प्रायव्हेट लॉजिकच्या बळावर केलेले विधानच आहे !
याशिवाय, हिंदू जातीव्यवस्था जर योग्य आणि धर्माला एकसंध मजबूत व संरक्षित करणारी होती/आहे तर...
१. बर्याच इस्लामी सत्तांमध्ये, मुख्यत: उच्च्वर्णीय हिंदूंना, प्रशासनात, दरबारात, वतनदार म्हणून, मांडलिक म्हणून आपली वर्णी लावणे सोईचे (बर्याच ठिकाणी, मानाचे० का वाटले... अश्या लोकांनी मुस्लीम सत्ता मजबूत करण्यास आणि हिंदू धर्माचा र्हास करण्यासच मदत केली नाही का ? उदा :
अ) शिवाजी महाराजांना पकडून आग्र्याच्या कैदेपर्यंत नेणारा श्रीरामांच्या वंशाचा म्हणवणारा मोंगली सत्तेचा हिंदू मांडलिक राजाच होता ना ?
आ) मोंगल, विजापूर, गोलकोंडा, अहमदनगर, बीदर, इत्यादी मुस्लीम सत्तांच्या पदरी असलेल्या उच्चवर्णीय हिंदूंची यादी काढली तर एक पुस्तक लिहावे लागेल.
असो. इतके मुद्दा स्पष्ट करायला पुरे.
२. शिवकाळात जबरदस्तीने मुस्लीम झालेल्या/केलेल्या व परत हिंदू धर्मात येऊ इच्छिणार्यांच्या बाबतीत ही कडक जातीव्यवस्था का बरे कामी आली नाही ?
३. "पोर्तुगिजांनी पाव टाकलेल्या विहिरीतले पाणी प्यायले म्हणून बाटले" या आणि अश्याच विचित्र नियमांनी गोव्यात ज्यांना हजारोंच्या संखेने त्यांच्या इच्छेविरुद्ध ख्रिश्चन धर्मात लोटले, त्या कडक हिंदू धर्म-जाती व्यवस्थेने, हिंदू धर्माच्या हिताचे काम केले काय ?
४. डॉ आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश करायला कोणी व का भाग पाडले ? तेव्हा ती कडक जातीव्यवस्था, मूळ हिंदू धर्मातील एका मोठ्या गटाला समानतेची वागणू़क देऊन आपल्यात सामावून घेण्यास का कमी पडली ?
प्रश्न साधे आहेत, उत्तरे सोपी आहेत... मात्र, आपले हितसंबंध पकडून बसलेल्यांसाठी उत्तरे सोईस्कर नाहीत. बस, इतकेच.
हिंदू जातीव्यवस्था, हिंदूंमध्ये दुफळी माजवणारी, जातीजातीत वैमनस्य पसरवणारी, राजकारण्यांना आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्यास मदत करणारी, एक घट्ट जम बसवून असलेली घातक व्यवस्था आहे... हे सत्य, फक्त त्या जातीव्यवस्थेपासून मानसिक-सामाजिक-आर्थिक-राजकिय फायदा काढून घेऊ इच्छिणारे लोकच नाकारतात. इतर सर्व कारणे केवळ दिशाभूल करण्यासाथी दिली जातात. पूर्णविराम.
हे सत्य हिंदू समाजाला जितक्या लवकर समजेल-उमजेल तेवढे त्याच्या प्रगतिला जास्त चांगले ठरेल.
17 Jul 2018 - 3:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
असो. समजून घ्यायचे असेल त्याला सहज समजेल. समजून घेणे सोईस्कर नसेल तो न समजल्याचे नाटक करून विषयांतर किंवा टोलवाटोलवी करत राहील.
18 Jul 2018 - 2:56 am | गामा पैलवान
डॉक्टर सुहास म्हात्रे,
तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.
१.
धन्यवाद. :-) तुम्ही ज्याला निरागस म्हणता त्याला मी विजिगिषु म्हणतो.
२.
हिंदू धर्म भेदभाव करणारा आहे हे मेकॉलेछाप विद्वानांनी पसरवलेली बाजारगप्प आहे. तिचा वस्तुस्थितीशी काडीमात्र संबंध नाही. काही व्यक्ती अगदी ब्राह्मणांपासनं तळागाळातल्या बहुजानापर्यंत जात्यंध असतील, पण त्यामुळे हिंदू म्हणजे पारंपरिक वैदिक धर्म भेदभावजनक बनंत नाही. मुस्लिम, इसाई वगैरे इतर पंथांत जितका भेदभाव असतो तितकाच हिंदूंत आहे.
३.
आजिबात नाही. धर्मशिक्षणाबद्दल उदासीन असणं हा त्यांचा प्रमुख दोष आहे.
४.
हो. जरी हिंदू व्यवहारांत हिंदू धर्म साधनेसाठी पाळीत नसले तरी परपंथीय त्यांचा पंथ निष्ठेने पाळतात. मात्र सध्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानामुळे अब्राहमी पंथांच्या झोटिंगशाहीची उघड चर्चा होऊन आव्हान मिळू घातलंय. उदाहरणार्थ पोपसकट क्याथलिक चर्च भ्रष्टाचाराने नखशिखान्त बरबटलेलं आहे. अमेरिकी पाठींब्यावर सौदी अरेबिया हरामाचा पैसा छापतो आहे. अशा पंथांच्या भारतीय अनुयायांसाठी साधनेचं सलगत्व हा आकर्षक पर्याय आहे.
५.
नेमक्या याच कारणासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणं आवश्यक आहे.
६.
योग, भक्ती उपासना इत्यादि साधना आजूनही हिंदू धर्माचा भाग आहे. तुम्ही समजता तितका हिंदू धर्म पोकळ नाही. मात्र तरीही धर्मशिक्षणास पर्याय नाही.
७.
प्रश्नंच नाही. हे औदासिन्य घालवायला पाहिजे.
८.
धर्मशिक्षण म्हणजे काय ते इथे बघायला मिळेल : https://www.hindujagruti.org/marathi/newstags/dharmashikshan
ते शिकायला भरपूर हिंदू तयार आहेत.
९.
भारतात तसंही पाहता मुस्लिमांत जातीव्यवस्था पाळली जातेच. त्याच जाती कायम राहिलेल्या नवहिंदूंना चालतील, नव्हे आवडतील.
१०.
हा तुमचा खयाली पुलाव आहे.
११.
हिंदू नामक कोणताही वंश अस्तित्वात नाही.
१२.
मला या तथ्याचा संदर्भ देता आला नाही हे मान्य. पण म्हणून काही वस्तुस्थिती बदलंत नसते. गांधारपंजाब व पूर्वबंगाल इथे जातीव्यवस्था कनौजइतकी कडक नव्हती.
१३.
पूर्व बंगालमध्ये कडवी मुस्लिम सत्ता नव्हती. संदर्भ : This made East Bengal a thriving melting pot with strong trade and cultural networks.
१४.
पहिली बंगाली सल्तनत १४ व्या शतकात उत्पन्न झाली. आठव्या शतकांत नव्हे. : https://en.wikipedia.org/wiki/Bengal_Sultanate
मात्र तरीही तुमचा वाचन वाढवायचा सल्ला योग्य आहे. त्याप्रमाणे मी प्रयत्न करेन. जमल्यास तुम्हीही जातीभेद आणि विषमता यांच्या पलीकडला हिंदू धर्म समजावून घ्यायचा प्रयत्न करा म्हणून सुचवेन.
१५.
मला या तथ्याचा संदर्भ देता आला नाही हे मान्य. पण म्हणून काही वस्तुस्थिती बदलंत नसते. गांधारपंजाब व पूर्वबंगाल इथे जातीव्यवस्था कनौजइतकी कडक नव्हती. फार काय आसामात देखील मुस्लिमांसकट सर्व जाती मिळून मिसळून रहात होत्या.
१६.
हिंदू जातीव्यवस्था जर योग्य आणि धर्माला मजबूत बनवते, असा माझा बिलकुल दावा नाही. हिंदूंच्या जातिव्यवस्थेमुळे इस्लामला कडाक्याचा विरोध झालाय असा तो मुद्दा आहे.
त्यामुळे या विभागाखाली विचारलेले प्रश्न समर्पक पण असंबंधित असल्याने त्यांची उत्तरं देऊ इच्छित नाही.
१७.
हा तुमचा भ्रम आहे. शिंदे व होळकर याच व्यवस्थेतनं पुढे आले. आसामात अशाच धर्तीवर व्यवस्था होती. तिथं जातीभेद अत्यल्प प्रमाणावर आढळून येतो.
१८.
हे मात्र खरं बोललात. स्वप्नरंजन करायची अनेकांना सवय आहे.
२७२ हे असंच एक स्वप्नरंजन होतं. २०१३ साली. त्या वेळेस प्रकांडतत्ज्ञ १८५ ते २२० च्या पट्ट्याबाहेर जायला तयार नव्हते. कोणी चुकार अंदाज दाखवून फारतर २४० पर्यंत खेचलं होतं. प्रत्यक्षात निकाल आले तेव्हा एकटा मोदीच २८३ ला पोचला. गोतावळा मिळून ३३८.
असो.
सांगायचा मुद्दा काये की योग्य प्रकारे कष्ट केले की स्वप्नरंजन सत्यात उतरतं. धर्म ही प्रत्यक्षात आचरणांत आणायची वस्तू आहे. तस्मात हिंदू धर्माचा प्रसार कसा करायचा ते प्रत्यक्ष आचरणांत आणणारे अधिक चांगलं जाणून असतात.
आ.न.,
-गा.पै.
19 Jul 2018 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
(अ) समोर दिसणार्या धडधडीत सत्याचा अस्विकार,
(आ) कोणत्याही पुराव्याशिवाय केवळ प्रायव्हेट लॉजिकच्या पायावर केलेली विनापुरावा स्वप्नरंजीत विधाने आणि
(इ) मनातली उच्चनीचतेची भावना
यांचा प्रतिवाद करायचा कंटाळा आला आहे.
त्यामुळे, बाकी गोष्टी टाळून फक्त तुमच्या प्रतिसादांतल्या काही प्रच्छन्न विरोधाभासी गोष्टीच सांगतो आहे...
१.
त्याच जाती कायम राहिलेल्या नवहिंदूंना चालतील, नव्हे आवडतील.
हे कोणत्या नवहिंदूने तुम्हाला सांगितले ?! याचा अर्थ तुम्हाला "आम्ही तुमच्यापेक्षा कनिष्ठ आहोत" असे आनंदाने मानणारे लोक हिंदूंमध्ये यायला हवेत ! अशी माणसे हिंदू धर्मात येणे धर्माला अभिमानाचे असेल ??? छान स्वप्नरंजन !!! शुभेच्छा !!!
असा विषमतेत आणि खालच्या स्थानावर राहण्यात आनंद मानणारा नवहिंदू बघायला आवडेल... आणि दिसलाच तर तो हिंदू आहे यात अभिमान वाटण्यासारखे काहीच नसेल, हे नक्की !
एका बाजूने सावरकरांचा हवाला देत "आम्ही जातिभेद मानत नाही" असा डंका पिटायचा आणि त्याच श्वासात, "त्याच जाती कायम राहिलेल्या नवहिंदूंना चालतील, नव्हे आवडतील" अश्या नवीन जाती निर्माण करण्याची गोष्ट करायची आणि वर त्या जातीशी आपली जात रोटीबेटी व्यवहार करणार नाही असे म्हणायचे (पक्षी : हिंदूंतील जातीसंख्या आणि जातिभेद अजून जास्त वाढवायचे). या कृतीला साध्या सोप्या मराठीत दुटप्पीपणा किंवा ढोंगीपणा म्हणतात आणि त्यात अभिमानास्पद काहीच नाही. हे तर सद्या राजकारणी जोमाने करत त्या आगीवर आपली भाकरी शेकून घेत आहेत ! स्वयंघोषित धर्ममार्तंड म्हणवणारे तुम्ही त्यांना प्रत्यक्ष मदत कराल अशी अपेक्षा नव्हती.
हा माझ्याही धर्माच्या अस्मितेचा प्रश्न आहे, म्हणून मी हे पूर्ण प्रामाणिकपणे पण अत्यंत खेदाने लिहिले आहे.
२.
भारतात तसंही पाहता मुस्लिमांत जातिव्यवस्था पाळली जातेच.
"बाकीचे कोण किती जास्त चिखलात आहेत" असे सांगून आपल्या अंगावरचा चिखल कमी होत नसतो. स्वतःच्या स्वच्छतेसाठी, दुसरा कितीही अस्वच्छ असला तरी, आपण स्वतः चिखलातून बाहेर पडून अंघोळ करावी लागते. पूर्णविराम. नाही तर, "जगातले इतर सर्व शहाणे झाल्यावरच मग आम्ही शहाणे होऊ" असे म्हणण्यासारखे होईल व त्यात कोणतेच मोठेपण नाही... उलट, ती आपण जगातील इतर मागास लोकांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा दोन पावले मागेच आहोत, अशी प्रच्छन्न कबुली आहे !
शेवटी, एकुणात, खालच्या एकाच गोष्टीचा विचार करता आला तरी खूप फरक पडेल...
हिंदू धर्मातील आणि धर्मग्रंथातील "वसुधैव कुटुंबकम्" हे तत्त्व मोठ्या अभिमानाने मिरवले जाते. ते तत्त्व अत्यंत उच्च आहे यात संशय नाहीच, पण... अगदी कोणत्याही कारणाने... जे लोक स्वतःच्या धर्मातच उच्च-नीचता आणि भेदाभेद मानतात/पाळतात ते "वसुधैव कुटुंबकम्" म्हणायला लायक कसे ठरतील. ते तर आपल्या वचनाने व कृतीने ते उच्च तत्त्व पायदळी तुडवत असतात. अश्या लोकांचा हिंदू धर्माबद्दलचा अभिमान पोकळ आहे, हे सांगायला नकोच. अश्या मतांमुळेच लोकांना हिंदू धर्माची नाचक्की करायला सबळ भांडवल मिळते.
आतापर्यंतच्या तुमच्या प्रतिसादात, प्रायव्हेट लॉजिकवर आधारीत इतके विनापुरावा दावे आहेत, शिवाय त्यांच्यात इतके परस्पर विरोधाभास आहेत आणि तरीही ते दावे तुम्ही इतक्या ठामपणे करत आहात की, त्यांचा प्रतिवाद करत राहणे म्हणजे सतत दिशा बदलणार्या वार्याशी स्पर्धा करण्यासारखे होईल.
तसेही, जगातील सर्वांचे सर्व गैरसमज दूर करणे हे माझे काम आहे असा माझा समज अजिबात नाही. जेव्हा एखाद्या वादविवादाचे "परिणाम-किंमत गुणोत्तर (इफेक्टिव्हिटी-कॉस्ट रेशो)" खूपच घसरते आहे असे ध्यानात आले की मी तो वादविवाद थांबवणे सोईस्कर समजतो. तेव्हा माझ्या दृष्टीने, पूर्णविराम.
धन्यवाद !
20 Jul 2018 - 5:15 pm | गामा पैलवान
१.
उच्चनीचत्वाच्या कल्पना तुमच्या आहेत. नवहिंदूंच्या नाहीत.
२.
ती काळजी वाहण्यास नवे व जुने स्वाभिमानी हिंदू समर्थ आहेत. शिंदे व होळकर सुद्धा कोणे एके काळी सामाजिक दृष्ट्या नगण्य होते. पराक्रमाने ते वर चढले. ही सोय इतर कुठल्याही पंथांत उपलब्ध नाही.
३.
तथास्तु. फक्त एक पक्कं ध्यानात ठेवा. जशी स्वत:ची दृष्टी असते तसंच जग दिसतं.
४.
नवहिंदू स्वत:शी प्रामाणिक राहिलेलं पुरेसं ठरावं. त्यासंबंधी काही शंका असतील तर त्या दूर करणं माझं कर्तव्य आहे. भले त्यामुळे मी ढोंगी म्हणून सिद्ध झालो तरी बेहत्तर.
५.
राजकारणी गैरफायदा घेताहेत म्हणून धर्म कसा मलीन होतो?
मी त्यांना नक्की कसली मदत केली? उच्च व नीच हे शब्द तुम्ही लिहिलेत. मी नाही.
६.
तुमची अस्मिता फक्त स्वताडनात मग्न आहे. जमल्यास जातीभेद, उच्चनीचत्व वगैरेंच्या पलीकडला हिंदू धर्म पहाण्याचा प्रयत्न करा म्हणून सुचवेन.
७.
एकट्याने साफ होण्यास माझा आक्षेप नाही. पण इथे आपण घाऊक प्रमाणावर घरवापसी करायची म्हणतो आहोत. मोठ्या प्रमाणाचे नियम वेगळे असतात. एकमेकांना धरून धरून रहायला प्राधान्य असतं. तिथे उच्चनीच वगैरे सबबी आपोआप मोडीत निघतात.
८.
हा तुमचा आरोप आहे. वस्तुस्थिती नाही.
९.
हे तर फारच चांगलं. फुकटची बदनामी झाली तर दुधात साखरच.
१०.
शिंदे व होळकर अशाच परस्परविरोधी परिस्थितीत तग धरून पुढे आले. नवहिंदूही येऊ शकतात. फक्त अंगी पराक्रम हवा.
११.
भूमिका स्पष्ट केल्यानिमित्त धन्यवाद. मी मात्र यावर आजूनही हिरीरीने वादविवाद करायला तयार आहे. मला आजिबात कंटाळा आलेला नाही.
आ.न.,
-गा.पै.
20 Jul 2018 - 8:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
आधिच्या प्रतिसादांत कोणकोणत्या दिशेने वाहत होता हे न कळता वार्याने परत दिशा बदलली =)) धन्य, धन्य !!! शुभेच्छा !