नमस्कार,
- आजच्या धावपळीच्या जगात लोकांमधला खरा संवाद हरवत चाललाय असं तुम्हाला वाटतं का?
- घरात, बाहेर सगळीकडे सर्वजण आपापल्या मोबाईल-कॉम्पुटर मध्ये डोकं खुपसून बसलेत असं तुम्हाला वाटतं का?
- पुढच्या पिढीचे गॅजेट ऍडिक्शन मुळे वांधे होणार आहेत अशी तुम्हाला सतत चिंता वाटते का? या चिंतेमुळे तुम्ही एक-दिवसाआड उसासे सोडत आपलं ब्लडप्रेशर वाढवत आहात का?
- घरोघरी सतत चालू असणारे टिव्ही., त्यावरच्या अमृत-प्राशन केलेल्या मालिका - यात रमणार्या कुटूंबातील प्रत्येकाचं घरातल्या माणसांशी नातं आणि संवाद दोन्ही तुटत चाललंय, असं तुम्हाला वाटतं का?
- तुमची मुले सदानकदा कॉम्पुटरवर गेम्स खेळत बसलेली असतात असं तुम्हाला वाटतं का?
- “कॉम्पुटर बंद कर!”, असं सांगितल्यावर "मला बोअर होतंय" असं म्हणत तुमची मुलं तुमचं डोकं खातात का?
- शासनाच्या धोरणामुळे मैदानाची संख्या कमी झालीये आणि ट्रॅफिकमुळे मुलांना खेळायला रस्ते सुरक्षित नाहीत असं तुम्हाला वाटतं का?
- तुमची नातवंड तुमच्याकडे येतात तेव्हा ते “नवीन काहीतरी सांगा आजोबा/आजी” असं म्हणतात का?
- कॉलेजच्या होस्टेलमधल्या रूमवर मित्र आले की लॅपटॉप वर पिक्चर बघत बसण्याचा तुम्हाला कंटाळा आला आहे का?
- तुम्हाला कधीतरी अचानक लहानपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यां आठवून नॉस्टॅल्जीक वाटतं का?
या आणि अशा गोष्टींमुळे तुम्ही चिंताक्रांत झाले आहात का? झाले असलात - (किंवा नसलात) - तर तुमच्यासाठी आम्ही एक मराठी वेब सिरीज घेऊन येत आहोत - ज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या बैठ्या खेळांचे नियम शिकवू.
हे खेळ तुम्ही आपल्या मित्र/मैत्रिणी/मुले/पालक यांसोबत खेळा आणि वरच्या सर्व चिंतांपासून मुक्ती मिळवा.
या सिरीज मधला दुसरा व्हिडीओ इथे पहा
हा आमच्या फावल्या वेळातला उपक्रम आहे. आम्ही व्हिडीओ मेकिंग मधले प्रोफेशनल नाही आहोत आणि या विषयातलं बरंच काही नुकतंच इंटरनेटवर शिकलो आहोत.
तुम्हाला व्हिडीओ आवडले तर लाईक/सबस्क्राईब जरूर करा! काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कळवा.
धन्यवाद!
- चहा-बिस्कीट प्रोडक्शन
प्रतिक्रिया
9 Jun 2018 - 5:21 pm | चहाबिस्कीट
थोडं अवांतर - कोणाला व्हिडीओ बनवण्याच्या तांत्रिक गोष्टींची माहिती हवी असेल कृपया विचारा.
व्हिडीओ एडिटिंग साठी आम्ही शॉटकट (ShotCut) तर ऑडिओ एडिटिंग साठी Audacity हे सॉफ्टवेअर वापरले आहे. ही दोन्ही सॉफ्टवेअर फ्री आणि ओपन सोर्स आहेत.
आम्ही खूप एक्सस्पर्ट नाही आहोत पण काही जणांना रस असेल तर बेसिक व्हिडीओ/ऑडिओ एडिटिंग वर एखादे सदर इथे लिहू शकतो.
9 Jun 2018 - 5:34 pm | पिलीयन रायडर
लिहा ना. आपल्या मिपाचे पण युट्युब चॅनल आहे. तिथे आम्ही पण हौशी प्रकार केले होते. वरती मिपा पुस्तक ही लिंक दिसत असेल किंवा मोबाईल वर मेन्यू मध्ये सापडेल. त्यात गोष्ट तशी छोटी हा उपक्रम पहा. त्यात आम्ही काही मुलाखती घेतल्या होत्या. त्या निमित्ताने आधी विंडोज मुव्ही मेकर बद्दल थोडे लिहिले होते जेणेकरून सर्वांना सहभागी होता येईल. मिपा चॅनल वर ते ही सापडेल. चॅनल ची लिंक -
https://www.youtube.com/channel/UCBe8_uPKpiq_GrifRpT2IWA
तुम्ही ह्या दोन सॉफ्टवेअर विषयी नक्की लिहा. सर्वांना मदत होईल.
9 Jun 2018 - 6:07 pm | चहाबिस्कीट
धन्यवाद, मिसळपाव चे चॅनेल आधीच सबस्क्राईब केले होते पण तो विंडोज मुव्ही मेकर चा व्हिडीओ नव्हता पाहिला.
आम्ही वापरलेल्या सॉफ्टवेअर बद्दल लेख लिहू. त्याआधी सर्वाना एक आवाहन - तुम्हाला एखाद्या विशिष्ट गोष्टिबद्दल जाणून घ्यायचे असेल उदा. आवाजात reverb ऍड करणे, किंवा व्हिडीओ झूम करून पॅन करणे किंवा अजून काही, तर कृपया सांगा - म्हणजे त्या दृष्टीने लेख लिहिता येतील.
9 Jun 2018 - 7:36 pm | पिलीयन रायडर
अहो असं काही असतं आणि सोप्प्या पद्धतीने करता येतं हेच माहिती नाही आमच्या सारख्यांना. तेव्हा तुम्ही लिहायला सुरू करा. प्रश्न येतील तशी पुढे चर्चा होईलच.
आता इथे खूप उत्तम शेफ लोकं आहेत. दिवाळी अंकात पाकृ आणल्या होत्या काही. प्रवासवर्णन सुद्धा होते. पण अजून जास्त छान होऊ शकेल ते काम.
10 Jun 2018 - 9:05 am | चहाबिस्कीट
ओके, एक-दीड आठवड्यात पहिला लेख लिहू!
10 Jun 2018 - 7:54 am | हणमंतअण्णा शंकर...
मी चॅनेल पाहिले. प्रयत्न आवडला. मला फक्त एकच गोष्ट खटकली की व्हिडिओचा फील दूरदर्शन सह्याद्री वरच्या कार्यक्रमासारखा येतोय. वाचून दाखवल्या सारखं वाटतं. अगदीच "फन विथ फ्लॅग्ज" सारखा सपाट फील नाही, पण अजून मसालेदार संगीत वापरता येईल का पाहा.
सिरीज आवडली हे मात्र नक्कीच!
10 Jun 2018 - 9:04 am | चहाबिस्कीट
@हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! खेळून पण पहा!
हा आमचा व्हॉईसओव्हर चा पहिलाच अनुभव आहे. पुढच्या वेळी निवेदन अजून प्रभावी करायचा प्रयत्न करू!
या टाईपचे कोणतेच व्हिडीओ मराठीत/हिंदीत नसल्यामुळे निवेदनाची कोणती स्टाईल वापरावी याचा आम्हाला संभ्रम होता. तुम्हाला एखाद्या दुसऱ्या प्रकारची निवेदन स्टाईल कुठल्या व्हिडिओमध्ये सापडली तर कृपया लिंक पाठवा! इंग्रजीमध्ये आहेत असे व्हिडीओ पण त्यांची भाषाच वेगळी असल्यामुळे त्यांची स्टाईल वापरायला आम्हाला अवघड वाटले.
10 Jun 2018 - 9:10 am | चहाबिस्कीट
टीप - सर्व व्हिडिओजना इंग्रजी सबटायटल्स जोडली आहेत.
मराठी (किंवा हिंदी) यामध्ये बैठ्या खेळांचे नियम सांगणाऱ्या वेबसाईट्स/व्हिडीओज जवळपास नाहीतच. म्हणून ही सिरीज सुरु करायचा विचार आम्ही केला.
आमच्या सिरीजची प्रसिद्धी (विनामूल्य, कारण आमच्या चॅनेल मधून आम्हाला काहीच पैसे मिळत नाहीत. मोनेटायझेशन बंद आहे.) कुठे करता येईल याबद्दल तुमचा काही सल्ला असल्यास जरूर द्या.
आमच्या ओळखीतल्या सगळ्यांना वॉट्सअप वर लिंका पाठवून ५०० पण views झाले नाहीत.
त्याबरोबर व्हिडीओत अजून काय-काय सुधारणा करता येतील ते देखील सांगा.
आणि मुख्य म्हणजे आमच्या व्हिडीओज मधले खेळ आधी खेळून पहा!
धन्यवाद!
10 Jun 2018 - 9:12 am | मदनबाण
वेब सिरीजसाठी शुभेच्छा ! :)
अवांतर :- माझ्या हापिसात नव्याने मैत्री झालेल्या अमोलची त्याने बनवलेली एक शॉर्ट फिल्म इथे देत आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बादरवा बरसनको आये... :- Irish Malhar
10 Jun 2018 - 9:47 am | चहाबिस्कीट
@मदनबाण
व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! बघतो ही शॉर्ट फिल्म.
10 Jun 2018 - 9:39 am | गवि
उत्तम कल्पना आहे. अभिनंदन.
जेम्स बॉण्ड या खेळात एक मुख्य त्रुटी जाणवते. लहान मुलं आणि अन्य असमंजस मोठे लोक यांबाबत दोन्ही किंवा तिन्ही खेळाडूंकडून एकाच क्षणी एकाच पत्त्यावर हल्ला होऊ शकतो *आणि इन द्याट केस मी पहिल्यांदा हात लावला यावरून ओढाताण होऊ शकते. विशेष म्हणजे हे वारंवार होऊ शकतं. म्हणून खेळीमेळीऐवजी वादाला कारण होऊ शकतं.
एका आड एक चान्स देणं हा उपाय करता यावा.
* की एक पत्ता दोघांना चालणार नाही असं आहे?
10 Jun 2018 - 9:46 am | चहाबिस्कीट
प्रतिसादासाठी धन्यवाद!
तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे पण हीच या खेळामधली मजा आहे. शेवटी पत्त्यांचा खेळ म्हटला की असे वाद होतातच :)
आम्ही एका- आड-एक असं खेळून नाही पाहिलं कधी, पण तुम्ही खेळून पाहिल्यास सांगा कसं वाटलं ते!
10 Jun 2018 - 9:48 am | गवि
खेळात वाद ठीक पण वाद (पत्ते तीन साईडनी ओढून फाटणं ) हाच खेळ असं नको.
10 Jun 2018 - 9:58 am | चहाबिस्कीट
असं होत असेल तर पत्त्यावर हाताचा पंजा ठेवून मगच उचलावा असा नियमात बदल करता येईल. जो खेळाडू आधी पत्त्यावर पंजा ठेवेल तोच खेळाडू पत्ता घेऊ शकेल. यात पत्ता फाटण्याची शक्यता शून्य होते.
पुढचे व्हिडीओ बनवताना एखाद्या खेळात अशी कंडिशन येत असेल तर नियमात बदल सुचवू.
10 Jun 2018 - 10:42 am | गवि
याने काहीसा कंट्रोल येऊ शकेल. करून पाहू.
10 Jun 2018 - 11:00 am | वरुण मोहिते
गुड डे बिस्कीट:(( चांगला आहे प्रयत्न . सुचवेन लोकांना बघायला/ खेळायला
30 Jun 2018 - 12:51 pm | गवि
आज गोल्फ हा खेळ खेळलो. फारच मजा आली. फ्रेश इनोव्हेटिव्ह.
उत्तम उपक्रम. आभार.
1 Jul 2018 - 1:11 pm | चहाबिस्कीट
@गवि
खेळ प्रत्यक्षात खेळून पाहिला हे वाचून छान वाटले. प्रोत्साहनासाठी आभार. तिसरा खेळ चॅनेलवर यायला अजून एक आठवडा लागेल.