मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

प्रवास कसला? फरफट अवघी!

चौकस२१२ ·
लेखनविषय:
काव्यरस
एक आर्त काव्य , सलील कुलकर्णी ( कवी माहित नाही बहुतेक संदीप खरे किंवा सुधीर मोघे ) https://www.youtube.com/watch?v=xyHtnZW0dNA अजुन उजाडत नाही ग! दशकामागून सरली दशके अन् शतकाच्या गाथा ग! ना वाटाचा मोह सुटे वा ना मोहांच्या वाटा ग! पथ चकव्याचा, गोल, सरळ वा कुणास उमगत नाही ग प्रवास कसला? फरफट अवघी! पान जळातून वाही ग... कधी वाटते 'दिवस'-'रात्र' हे नसते काही असले ग त्यांच्यालेखी रात्र सदाची ज्यांचे डोळे मिटले ग स्पर्श आंधळे. गंध आंधळे भवताली वनराई ग तमातली भेसुर शांतता... कानी कूजन नाही ग... एकच पळभर एखादी कळ अशी सनाणुन जाते ग क्षणात विरती अवघे पडदे लख्ख काही चमचमते ग! ती कळ सरते...

इम्पिरिकल डेटा

बाजीगर ·
लेखनविषय:
काव्यरस
आले कुटीस मेटा सारे ओबीसी नेता हा इम्पिरिकल डेटा कुणी देता का हो डेटा आरक्षणाचा रेटा वकिलांना जा भेटा इलेक्शन ती येता बांधू कुणाचा फेटा 75 वर्षात भरल्या तुंबड्या जनतेस मात्र कुबड्या बाता त्या बड्या बड्या कोर्टात पडल्या उघड्या पाहिजे जरी आरक्षण सीमेवर करा त्या रक्षण सैन्यात जो दणादण त्या कुटुंबास आरक्षण येता नवीन ती पिढी नका लावू ही शिडी व्यसने दारू काडीबिडी आयुष्य नाही सापशिडी धमनीत लाल रक्त सर्वांच्याच आहे फक्त आला आता हा वक्त फेकून कुबड्या व्हा मुक्त ! फेकून कुबड्या व्हा मुक्त !!

जगण्याचे कित्येक मजला अर्थही कळाले

विजुभाऊ ·
लेखनविषय:
काव्यरस
धन्य भाग देवा ऐसे प्रेम ही मिळाले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले वार्‍यावर उडणारा, मी केर, धूळ, माती येता तू सांगाती दगडांचे झाले मोती. परीस तो जाणू कैसा ,सांग काय केले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले. गहिवरले मन माझे ,ओळखले नाही तुजला र्‍हदयात काटा रुतला , माफी दे प्रेमा मजला तालाच्या सोबतीला, बासरीचे सूर आले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.

शाळा आणि "ती"

चक्कर_बंडा ·
लेखनविषय:
                   नावसुद्धा माहीत नसलेली रानफुलं फुलायची त्या माळरानावर, जिथं ती शाळा होती. त्या फुलांच्या ताटव्यांमधून पायवाट काढीत ती चालत यायची. स्वप्नचं जणू तरंगत येतंय हवेतून असं वाटायचं. सायकलवरून रोज घामाच्या धारा लागेपर्यंत, नेटाने किल्ला लढवत रहायचो मी, ती बसलेल्या वडापला गाठण्यासाठी.... ती मात्र खिडकीतून अनोळखी कुतुहलाने पहायची नेहमीचं, सर्कशीतील विदूषकाकडे पाहावं तसं !! कधीतरी ती वेणीत फुलं माळून यायची, मग मी माळरानावरील फुलं गोळा करून खिशात ठेवायचो.. !!!

हॅमिल्टन-संगीत नाटक (म्युजिकल)

कॉमी ·
लेखनप्रकार
काही दिवसांपूर्वी लिन मॅन्युएल मिरांडा ह्या भन्नाट व्यक्तीने लिहीलेले, संगीत दिलेले, अभिनय केलेले आणि रॅप केलेले 'म्युजिकल', म्हणजेच संगीत नाटक पाहिले. खूप आवडले. त्याबद्दल काही. अ‍ॅलेक्झॅन्डर हॅमिल्टन म्हणजे अमेरिकेच्या फाऊंडिंग फादर्स पैकी एक.

कानाखाली जाळ

बाजीगर ·
लेखनविषय:
काय निवडावं लोकांनी बॅड कि वर्स ? कसला लागला आहे हा महाराष्ट्राला कर्स कितवा स्वातंत्रदिन आहे हे विसरणारा मुख्यमंत्री कि कानाखाली वाजवण्याची भाषा करणारा मंत्री तिसरी लाट, अफगाणीस्थान झालं, मिडीयाला चघळायला नवं हाडूक कोरोना, रोजगारी,वाहतूक,सुरक्षा सर्वच मूळविषय झाले गूडूप किती उर्जेचा होतो विध्वंस मनातल्या हिंसा-द्वेषाने कीव येते चूकीचे समर्थन करुन लढणा-यांचे त्वेषाने दोन पक्षांच्या बेरोजगार गुंडांना रोजगार मिळाला करण्याचा राडा जनतेच्या मालमत्तेच्या पहा काचांचा रस्त्यांवर सडा. अजाणत्या राजाला म्हणे हे काही विशेष नाही (?!) राण्यांची हीच संस्कृती म्हणे म्हणून काही निषेध नाही. सुसंस्क

कळेना मला

चांदणे संदीप ·
काव्यरस
मनात मोर कसे नाचतात हे तुला पहिल्यांदा पाहिल्यावर... ...मला कळालं! जीभ कशी अडखळते हे तुझ्याशी पहिल्यांदा बोलताना... ...मला कळालं! हृदय कसे धडधडते हे तुझा हात पहिल्यांदा हातात घेताना... ...मला कळालं! पुन्हा भेटायचयं हे माहीत असूनही तुझा निरोप घेताना, दरवेळी डोळ्यातलं पाणी कस अडवावं हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही! - संदीप चांदणे

विपरीत

मी-दिपाली ·
लेखनविषय:
1 चित्रसौजन्य- शलाका देगवेकर विपरीत दरवळे धुंद केवडा, न हो उलगडा, सुगंधी सडा कोण हा घाली? केसांत खोवुनी पात, नार झोकात, चालते वाट जणू मखमाली। भर दुपारचा तो प्रहर, उन्हाचा कहर, सावरी पदर, चिंब भिजलेला, डौलात पडे पाऊल, नसे चाहूल, उडे का धूळ अशी बाजूला। वाटेत डोलतो नाग, काढुनी माग, म्हणे तो, 'सांग कुठे तू जाशी?' ती म्हणे होवुनी धी

निसर्गाचा न्याय

VRINDA MOGHE ·
लेखनविषय:
निसर्गाचा न्याय हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा, युगे युगे असे ऋतुचक्र फिरे, निसर्ग देतो भरभरून सारे मानवाची हाव तरिही ना सरे !! मानवाचे अनाचार वाढले, निसर्गचक्र सारेच बिघडले अवघी सृष्टी धरूनी वेठीस स्वार्थासाठी तीला लुबाडले !! मग प्रलय बनूनी पाऊस आला झोडपून टाके सर्व जगाला, नदीच झाला सारा गाव , सर्वस्व सवे घेऊन गेला !! डोंगर कुशीतलं टुमदार गाव निसर्ग सौंदर्याने डोळे दिपले पाऊस माराने पडली दरड उभे गावच गाडले गेले !! निसर्गाचे नुकसान केले गोठल्या मानवाच्या संवेदना, हिशोब त्याचा तो घेतोय करून, मागे उरतेय. , फक्त वेदना !!

कविता

VRINDA MOGHE ·
लेखनविषय:
खोल ह्रदयात उमटला, नादमय विणेचा झंकार, सावळे रूप विठाईचे, जाहले नयनात साकार !! मकरकुंडले डुलती कानी, पीतांबर झळके कटीवर, वारक-यांची वाट पाहत, उभा ठाकला विठू वीटेवर !!