(१) एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक!
(२) एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात.
(3) आई वडील सर्व ब्रम्ह!! आई श्रेष्ठ देवा पेक्षा!! वडील श्रेष्ठ गुरु पेक्षा!!
आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व देतांना त्यांचे माणूसपण विसरू नका.
त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे, नाही का?
(४) पत्नी/सून ही गृहलक्ष्मी असते. मान्य! पण तीला देवत्व देताना तीला माणूस म्हणून समजुन घेणे आणि स्वीकारणे जास्त महत्वाचे आहे, नाही का?
(५) स्त्रीच्या अस्तित्वामुळेच पुरुषाच्या पुरुषत्वाला अर्थ प्राप्त होतो.
आणि पुरुषाच्या अस्तित्वामुळेच स्त्रीच्या स्त्रित्वाला अर्थ प्राप्त होतो.
दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आणि निरर्थक.
दोन्ही एकमेकांचे नाही स्पर्धक.
दोन्ही एकमेकांना आहे पूरक.
(६) नेहेमीची वाट:
बऱ्याच तथाकथित आणि स्वयंघोषित बंडखोराना वाटते की जन्म, बालपण, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, लग्न, मुले, त्याना मोठे करणे वगैरे गृहस्थाश्रम ही नेहेमीची आणि सोपी वाटचाल आहे. त्यात काय मोठे?
मग हे बंडखोर वेगळी वाट चोखाळतात: कुणी लग्न करायचे नाही म्हणतो तर कुणाला मुले नको असतात. कुणी हा "सरळ" रस्ता सोडून देतात आणि बंडखोरीचा आव आणत स्वत: ला हिम्मतवान म्हणवतात. त्याना वाटते की आपण ही नेहेमीची सोपी वाट तोडली, समाजाचे नियम तोडले आणि "हिम्मत" केली.... बाकी त्या वाटेवर चालणारे भित्रे आहेत!! पण तसे नसते!!
ही नेहेमीची वाटणारी वाटच बिकट वाट असते. त्यातच जास्त कसोटी असते. ही नेहेमीची वाट चालणे कधीच सोपे नसते. हे या बंडखोरांना माहित असते. म्हणून ते या वाटेला जात नाहीत कारण त्यांच्यात हिम्मत नसते. मग कुणी सन्यास घेतो आणि या वाटेपासून बचाव करतो तर कुणी काही दुसरे करतो आणि बचाव करतो.... या "सरळ" वाटणाऱ्या पण "कठीण" असणाऱ्या वाटेवर हिमतीने चालणाऱ्या सर्वांना माझा प्रणाम!!
(७) || निंदकांचे घर असावे शेजारी || स्तुतकांची फौज असावी बाजारी ||
|| निंदकांना बसवावे शेजारी || स्तुतकांना वळवावे माघारी ||
(८) समोरचा मनुष्य तलवार असेल तर तुम्ही तलवार किंवा ढाल बनू नका तर म्यान बना.
तलवार बनलात तर वार होईल.
ढाल बनलात तरी वार होईल.
म्यान बनलात तर तो मनुष्य तुमच्यात सामावून जाईल.
(९) जाता जाता -
आज ज्येष्ठ नागरिक दिन:
अनुभवांचा चालता बोलता खजिना असलेल्या सर्व ज्येष्ठ (आणि अर्थातच श्रेष्ठ) नागरिकांना शुभेच्छा!!!
प्रतिक्रिया
1 Oct 2014 - 12:44 pm | टवाळ कार्टा
मी पयला \m/
1 Oct 2014 - 12:54 pm | काउबॉय
मेरी कॉम चे जाहिर हार्दिक अभिनंदन
1 Oct 2014 - 2:23 pm | खेडूत
असेच म्हणतो!
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना भाजपने मुळीच पदे देऊ नयेत!
1 Oct 2014 - 2:42 pm | आदूबाळ
+४
असेच म्हणतो!
कीबोर्डवर कॉफी सांडून कॅप्स लॉक बंद होणं ही किती वैतागवाणी गोष्ट आहे...
1 Oct 2014 - 3:24 pm | अजया
कीबोर्डवर सांडलेली काॅफी कुंथुन विचार करणार्यांनी प्यायली तर विचारजंत बरे होतात असं ऐकलंय.
1 Oct 2014 - 3:55 pm | यसवायजी
होम्योपदी हाय की मग. :))
1 Oct 2014 - 2:47 pm | योगी९००
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना भाजपने मुळीच पदे देऊ नयेत!
का म्हणून? पण टाईल लावताना सिमेंट कमी पडले तर फर्नीचर मोडून कुत्रा पिसाळण्याचा संभव असतो ना..मग हे का नाही?
1 Oct 2014 - 3:55 pm | विटेकर
ने मुळीच पदे देऊ नयेत!का म्हणून? पण
पाषाण तलवात कमळे फुलली आणि शनवारवाड्ञावरिल सिंहाची कोल्हेकुई न्यूयॉर्कच्या वरातीत ब्यांड म्हनून वापरायला घेऊन गेलेले गणू न्हाव्याचे नागडे पोरं रांगत रांगत चंन्द्रावर पोचले. सुमन सुईण बाळांत झाली आणि आमच्या गाइचे रेडकु ओरडले " युरेका युरेका !!" आता काय बोंबलायचे म्हनून तात्यांनी तोंडावर आडवा हात घेतला आणि भागुबाईच्या तमाशातील नाच्या पाट्लाच्या बुलेटिवर बसून तालुक्याला गेला. मास्तरांनी शाळेतील पोरं तलावावर चरायला सोडली आणि सोनाराच्या सखुनं बाळ्या गुरवाचे पाप लपावायला आडात उडी घेतली.
1 Oct 2014 - 4:14 pm | बबन ताम्बे
हो. पण बाळ्या गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून कोप-यात पाचकन पिचकारी मारली त्याचे काय?
1 Oct 2014 - 4:22 pm | धन्या
मोदींनी हाक दिली आहे की उदया गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवायची म्हणून. बाळ्या गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढायचा.
1 Oct 2014 - 4:55 pm | अजया
गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढल्याला असेल तर तिथे तोल सांभाळुन घसरण्याचा अानंद मिळेल.
1 Oct 2014 - 5:09 pm | धन्या
तोल सांभाळून घसरण्याचे, भय इथले संपत नाही
1 Oct 2014 - 5:12 pm | विटेकर
गुरवाच्या बपाने कोपरा तर धुतला पण चिन्त्या सोनाराने पाटलाच्या नावाने चावडीत बोंब मारली, येश्या तराळाने वाड्यावर भाकरी खाल्ली आणि बिडीचा लांबलचक झुरका मारला ,त्याचे बटाट्याएव्ढे डोळे लालबुन्द झाले आनि नाकाच्या शेण्ड्यावर रक्ताचा ठिपका आला. अन मग येश्या जिवाच्या आकांताने खोकला . पारावरची मानसं खाली पड्ता पड्ता वाचली पर तोपर्यनत वरच्या कबुतरानं पचका केलाच. तालुक्याला गेलेल्या आबा मेस्त्रीनी गिरणीचा दगूड डोस्क्यावरुन खांद्यावर घेतला आणि तिथून वराड्ला, "येश्या बेन्या , मरत का न्हाईस? ही तराळं लै माजलीत , बुकलून काडाय पायजेत "
मास्तरांनी धोतर्याच्या सोग्याने नाक फेंदारलं आणि पाटलाच्या बुलेटीचा आवाज आला. त्याबरुबर पारावर हालचाल झाली अन
जगू कुंभारानं पटका बांधाय घेतला. गेल्या जत्रतल्या पिवळ्या फटाक कोलाटणीच्या आटवनीनं तेज्या छातीत एक जोर्दार कळ आली. औन्दा कौलापूरची रन्गी कोलाटीन येनार हेच्या समाधानात तेनं परश्याला हाट्कलं, चल वाईच च्या मारु , त्वांड लैच वंगाळ झालायं , बायलीच तराळ कस्ल खोकतया, पार मूड्च गेला. "
पर्श्या पैलवानानं कानावरची इजलेली बिडी परत पेटवली अन् म्हनाला ," मायला पिवळा हत्ती पिवून लै दिस झालं , चल जरा वाण्याकडं, पन पैसं हायत नव्ह? बेनं इदुळा उदारीवर द्याच न्हाय "
1 Oct 2014 - 5:51 pm | बबन ताम्बे
श्री. विटेकर,
तुमच्या लिखानाने पु.लं. च्या असामी असामी तील नानू सरंजामेच्या आत्मचरित्राची आठवण झाली..." पुर्वेकडे जांभळी पहाट फसफसली आणि माझ्या मनाचा पारवा नागवा झाला .." :-)
1 Oct 2014 - 2:12 pm | दिनेश सायगल
निमिष, लवकर बरे व्हा.
1 Oct 2014 - 3:31 pm | राजेंद्र मेहेंदळे
आणि डोक्याची भजी व्हायच्या आत निघतो ईथुन..
लेखकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
1 Oct 2014 - 3:33 pm | नाव आडनाव
विचार संग्रह? विचार मोती म्हणा. विचार मोती.
1 Oct 2014 - 4:04 pm | प्रमोद देर्देकर
हायला धाग्याचं कश्मिर/बेळगांव जे काय समजायचं ते झालेलं हाये.
लेखक महोदयांचा हा तर पहिला भाग आहे. लेखक बाकीचे भाग टाकु कि नको या संभ्रमावस्थेत.
1 Oct 2014 - 4:56 pm | माम्लेदारचा पन्खा
उरलेली सगळी सुट्टी जाणार....
1 Oct 2014 - 5:05 pm | जेपी
@€$£§%¥*+#¿¡¤¢«»®©°.,-!?@~_\/&;"':^|`()<{}>[]=
1 Oct 2014 - 5:20 pm | विटेकर
जेपी तुमच्याशी पूर्ण सहमत !
जागतिक मंदीचा साकल्याने विचार करताना मंदा आगलावेचे हरणासारखे डोळे बापटांच्या शेतात शिकार करताना सापडले याची अमेरिकन लोकांना काय कल्पना?
1 Oct 2014 - 5:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
काय ह्ये ? येका दमात यितक्या श्या देवूने. ठेवा की थोड्या फुडच्या येळेसाटी ! :) ;)
1 Oct 2014 - 5:16 pm | नावातकायआहे
Your connection is not private....
Attackers might be trying to steal your information from www.yahoo.com (for example, passwords, messages, or credit cards).
आता???
पु. ले. शु.
भाग २ च्या प्रतिक्षेत....
1 Oct 2014 - 5:50 pm | प्यारे१
मी रस्ता चुकलोय. वाट सापडत नाहीये. मदत करा कुणीतरी!
1 Oct 2014 - 6:49 pm | निराकार गाढव
काय वो. म्या काय म्हनतो, मदत कराया येऊ का?

1 Oct 2014 - 5:54 pm | विजुभाऊ
मदत करायला जायचा आणि वेगळा विदर्भ व्हायचा........
1 Oct 2014 - 6:14 pm | जेपी
वेगळा विदर्भ व्हायलाच पायजे.
2 Oct 2014 - 11:44 am | तुषार काळभोर
भोपाळ, रांची, पाटणा, त्रिपुरा, मणिपूर, गडहिंग्लज, शिरुर, कराड (दक्षिण), शहादा सहीत संयुक्त विदर्भ व्हायलाच पाहिजे!!
1 Oct 2014 - 6:27 pm | विजुभाऊ
वेगळा विदर्भासाठी गडकरीना बबनशी बोलावं लागेल
1 Oct 2014 - 6:36 pm | सुहास..
निमीषदा ..कधी आलात मंगळावरुन परत ;)
1 Oct 2014 - 6:41 pm | संजय क्षीरसागर
रोज सकाळ संध्याकाळ रिवर्समधे चालण्यानं अल्झायमरची शक्यता शून्य होते.
1 Oct 2014 - 11:19 pm | मुक्त विहारि
जीवनाचे आरसपानी दर्शन
2 Oct 2014 - 11:20 am | धन्या
आरसपानी = आ रस पानी ?
2 Oct 2014 - 10:56 pm | मुक्त विहारि
चिंचेच्या चटणीतल्या वड्यांसारखे...
1 Oct 2014 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा
2 Oct 2014 - 12:36 am | शिद
एकुण किती भागाची लेखमालिका आहे? ;)
2 Oct 2014 - 10:21 am | संजय क्षीरसागर
यावर आहे.
2 Oct 2014 - 11:51 am | काउबॉय
ते "भय इथले संपत नाही भाग xxx" बद्दल विचारणा करत नाहीयेत.
2 Oct 2014 - 12:42 am | भृशुंडी
ज्या लेखाची चातकासारखी वाट पहात होतो, तो अखेर मिळाला.
लेख आवडला हे वेगळं सांगायला नको. लिहित रहा.आम्हाला गरज आहे.
2 Oct 2014 - 4:59 pm | असंका
अगदी अगदी!! +१
2 Oct 2014 - 12:04 pm | विटेकर
वाण्याच्या गजाने ही दुक्कल येताना बघितली आणि अन आपल्या बायकुला पहिल्यांदा आत पाठ्वला. ही दुक्कल होतीच तशी कर्तृत्ववान ! परश्या पैलवानाचा बाप लै तालेवार गडी, ऐन जवानीत तेनं बायकोला माह्यारी पाटीवलं अन उभ्या तमाशाच्या फडातनं बाय आणली , मोजून शंभर रुपायचा खुर्दा केला पठ्ठ्याने ! तेज्या बा वर औन्ध सर्कारचा लै जीव, तालीम बांधून दिलीवती सरकारनं आपल्या पैश्याने ! पन औदसा आटिवली अन कशाचं काय घिऊन बसला राव. रगतपितीनं मेला म्हातारा गुदस्ता साली ! नादं वाईट. तसाच पोरगा परश्या बी लै गुनाचा...सातवीला पाच वेळा नापास झाल्यावं शाळेच्या सायबालं वड्यात धरुन मारला ... कुनी म्हतंय मास्तरानच सायबाचा काटा कहाड्ला...त्याला बिड्या पियाचा लै नाद. बाप हुता तवर दूध - दुभतं खायला मिळायचं आता हाडं उरली ..
कुंबाराचा नाद तर लैच वंगाळ, तालुक्याच्या गावाला म्हातारीबरुबर बाजाराच्या दिशी मडकी इकायला बसालवता, तर गुजराच्या पोरीचा हात धरला. हवालदारानं तिथ्चं ठिवून दिली .. उगं म्हातारी हाता-पाया पडली म्हणून सोडला तरी .. नाय तरं आतच टाकीत हुते.
अनं ही दुक्कल दुकानाकडे येताना बगितल्यावर गजाच्या कपाळवर आठ्या पडल्या. अस्वस्थ होऊन वाढत्या ढेरिवरचा भोकं पडलेला गन्जीफ्राक अजूनच खाली वडला आणि भो़कं मोट्टी केली.
2 Oct 2014 - 12:06 pm | विटेकर
मागणी प्रमाणे ढील दिली आहे ....
खेचा रे खेचा .. खच्चून खेचा !
2 Oct 2014 - 12:29 pm | धन्या
आमच्या धाग्याला मिळते ती दाद आणि इतरांच्या धाग्यांना मिळते ती ढील. :)
2 Oct 2014 - 4:50 pm | अन्या दातार
>>आमच्या धाग्याला मिळते ती दाद
हो. कारण शेवटी तुमचा धागा म्हणजे कंपूने कंपूसाठी काढलेला असल्याने ढिल्या हाताने प्रतिदाद येतात ;)
2 Oct 2014 - 11:59 pm | संजय क्षीरसागर
मान गये!
2 Oct 2014 - 5:48 pm | आदूबाळ
भाग २ कधी येणार?