✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चावडीवरच्या गप्पा

स
सोत्रि यांनी
गुरुवार, 06/21/2012 - 12:27  ·  लेख
लेख
' 'हा चक्क अन्याय आहे', सकाळी सकाळी तणतणत नारुतात्यांनी चावडीवर हजेरी लावली. नेहमीचे सिनियर सिटीझन्स आधच हजर होते. 'काय झाले?', कोणीतरी विचारले. 'अरे त्या बिचार्‍या संगगम राजीनामा द्यावा लागला, त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षातुन, हे काही ठीक नाही! हे तर त्या स्टीव्ह जॉबसारखे झाले', नारूतात्या. (हा नारुतात्यांच्या नातवाने आणलेले स्टीव्ह जॉबचे आत्मचरित्र त्यांनी नुकतेच वाचल्याचा परिणाम होता.) 'कोssण हा शिंचा संगमाsss', घारुअण्णा अस्लखित चिपळुणी अंदाजात विचारते झाले. 'हाच तर प्रॉब्लेम आहे, इथे उपेक्षितांवर अन्यात होत असताना, उपेक्षित कोण हेच माहिती नसणे हा बहुजनांवरचा अन्याय पुरातन आहे', इति कट्ट्याचे बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका. 'साहेबांशी घेतलास पंगा, भोग म्हणावे आता आपल्या कर्माची फळे', शामराव बारामतीकरांनी साहेबांच्या प्रति असलेली त्यांची निष्ठा व्यक्त केली. 'अरे काय तुमचे साहेब, ज्याच्या मांडीला मांडी लावून नव्या पक्षाची स्थापना केली साधी त्याच्या मनातली ईच्छा समजू नये त्यांना?' नारुतात्यांनी त्यांचा मूळ मुद्दा पुन्हा हिरिरीने मांडला. 'महत्वाकांक्षा सर्वांनाच असते हो, पण ती साहेबांच्या महत्वाकांक्षेच्या आड येणे म्हणजे साक्षात आत्महत्याच हो, दालमिया आठवतोय का?', शामराव बारामतीकर. 'अहो कोण हा संगमा, कर्तुत्व काय ह्याचे?', घारुअण्णांचे पालुपद. 'अहो प्रखर राष्ट्रवाद दाखवून सोनियाला विरोध करून तिला पंतप्रधान होऊ दिले नाही हे कर्तुत्व काय कमी आहे का?', भुजबळकाका. 'त्यात त्याचे कसले आलेय कर्तुत्व? तिचा कात जीव वर आला होता! तसेही काही न करता पैसा ओरपायला मिळणार, सत्ता तशीही ताब्यात, कशाला व्हायचे पंतप्रधान!', घारुअण्णांचे तर्कशास्त्र. 'झाले ह्यांचे सुरु, अहो मुद्दा काय, तुम्ही बरळताय काय? विषय आहे सगमांचा', नारुतात्या. 'अरे! पण त्या शिंच्याला राष्ट्रपती व्ह्यायची खाजच का म्हणतो मी?', घारुअण्णा. 'सोनियाच्या विरूद्ध लढायला सगळेच उतरले पण त्यांना फक्त कपडे सांभाळावे लागले. अहो साहेबांना त्यांनी पक्ष काढायला मदत केली पण मलई सगळी साहेबांनी खाल्ली. हेच खरे दु:ख दुसरे काय! त्यात आता प्रतिभाताईंच्या जगप्रवासाच्या खर्चाचे आकडे प्रसिद्ध झाले आणि फिरले डोळे त्याचे. हाय काय आन नाय काय. चोर सगळे लेकाचे. सर्वसामान्य जनता होरपळतेय त्याचे कोणाला काही आहे? जो तो आपली तुंबडी भरण्याच्या मागे. त्या ममताला प्रणब मुखर्जी नको, कारण एक बंगाली, दुसर्‍या पक्षाचा, सर्वोच्च स्थानावर येऊन त्याने डो़यावर मिर्‍या वाटायला नको. देशाचे कोणाला काही पडले आहे?', इतकावेळ शांत बसलेले सोकाजीनाना. 'अहो पण राष्ट्रपती होऊन परदेशी व्यक्तींना देशात कोणतेही पद भुषबता येऊ नये असा वटहुकुम जारी करायचा छुपा हेतु असेल त्यांचा', घारु अण्णांचा स्वन्पाळु आशावाद. 'घंटा वटहुकुम काढता येतोय! आपल्या देशात राष्ट्रपती पद हे रबर स्टँप टायपाचे पद आहे. खुप काही जबाबदार्‍या पण पावर काही नाही! उगाच नाही अब्दुल कलामांनी नकार दिला पुन्हा राष्ट्रपती होण्याचा, एवढा मोठा, सर्वोच्च मान कोणी असा सुखासुखी सोडेल काय? तेव्हा ह्या फुकाच्या बातां सोडा आणि चहा ऑर्डर करा! चला!!', इति सोकाजीनाना! ह्याला सर्वांनी दुजोरा दिला आणि चहाची ऑर्डर दिली.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
मत
माध्यमवेध

प्रतिक्रिया द्या
3167 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

आत्ताच ब्लॉगवर वाचला. तोच

मृत्युन्जय
गुरुवार, 06/21/2012 - 12:33 नवीन
आत्ताच ब्लॉगवर वाचला. तोच विचार करत होतो की मिपावर कसा नाही हा.
  • Log in or register to post comments

अरे हापिसात मिपा ब्लॊक आहे,

सोत्रि
गुरुवार, 06/21/2012 - 12:48 नवीन
अरे हापिसात मिपा ब्लॊक आहे, त्यामुळे मोबाइलवरुन कसरत करावी लागते.हा धागा इथे कसा टाकला ते माझे मलाच माहिती. -( कसरतपटू) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हा हा...

दादा कोंडके
Sat, 06/23/2012 - 01:00 नवीन
जेन्युन प्रश्न पडलाय की शालजोडीतले मारलेत हे कळायला अजून काही मिपावरचे पावसाळे बघायला पाहिजेत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

क्या बात है!!

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/21/2012 - 12:34 नवीन
सोत्रि -इतके तात्काळ भाष्य, राजकीय घडामोडींवर. मानले बुवा!! याचा पुढचा भागही नक्कीच काढावा लागणार आपल्याला त्यावेळी चावडीऐवजी रात्री उशीराची ओली मैफिल वापरण्यात यावी अशी नम्र सूचना.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो...

विनीत संखे
गुरुवार, 06/21/2012 - 14:27 नवीन
असेच म्हणतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

ओल्या मैफीलीमधे इतरही

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/21/2012 - 16:13 नवीन
ओल्या मैफीलीमधे इतरही "चांगले" "विषय" असतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

छान लिहिलंय

अमितसांगली
गुरुवार, 06/21/2012 - 13:30 नवीन
चोर सगळे लेकाचे. सर्वसामान्य जनता होरपळतेय त्याचे कोणाला काही आहे? जो तो आपली तुंबडी भरण्याच्या मागे. त्या ममताला प्रणब मुखर्जी नको, कारण एक बंगाली, दुसर्‍या पक्षाचा, सर्वोच्च स्थानावर येऊन त्याने डो़यावर मिर्‍या वाटायला नको. देशाचे कोणाला काही पडले आहे?' 'घंटा वटहुकुम काढता येतोय! आपल्या देशात राष्ट्रपती पद हे रबर स्टँप टायपाचे पद आहे. खुप काही जबाबदार्‍या पण पावर काही नाही! सह्मत....
  • Log in or register to post comments

चक्क चहा सोकाजीनाना साठी????

अमृत
गुरुवार, 06/21/2012 - 14:11 नवीन
ऑ? अहो पण सगंमा बाईंची माफी मागायला तयार आहेत की आणि हे काय एवढ्यातच गप्पा संपल्यात? अमृत
  • Log in or register to post comments

भारीच !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/21/2012 - 14:17 नवीन
थोडक्यात आणि मार्मिक. आवडले एकदम. ह्या निमित्ताने मिपावरचे काही जुने चावडीचे धागे आठवले. ;)
  • Log in or register to post comments

सोत्रि, मस्त!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/21/2012 - 16:18 नवीन
थोडक्यात पण छान जमवलय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मस्त गप्पा!

पैसा
गुरुवार, 06/21/2012 - 18:38 नवीन
सोत्रिअण्णा, झक्क जमलंय. या गप्पा अशाच चालू ठेवा!
  • Log in or register to post comments

मस्त लेख...

मुक्त विहारि
गुरुवार, 06/21/2012 - 19:00 नवीन
प्रतिसाद बराच मोठा झाला , म्हणून काही दिवसांनी लेखच टाकीन म्हणतो.
  • Log in or register to post comments

अगदी "शिनीअर सिटीझन्स च्या"

शुचि
गुरुवार, 06/21/2012 - 19:17 नवीन
अगदी "शिनीअर सिटीझन्स च्या" बैठकीत बसल्याचा भास झाला ..... छान लेखन.
  • Log in or register to post comments

छान ! पण बारामतीकर लय छुपे

गणेशा
Fri, 06/22/2012 - 19:30 नवीन
छान ! पण बारामतीकर लय छुपे रुस्तम आहेत हो. तेच संगमांना सांअगणार तुम्ही पक्षाबाहेरुन लढा आम्ही मदत करतो, निवडुन आले की परत पक्षात बांधील. नाहि निवडुन आले तरी सोनियांना आम्ही तुम्हाला मदत केली नंतर चे काय ते तुम्हाला बघावेच लागेल. असा डावपेच.. संगमा पण खुष .. सोनिया पण खुष. संगमा पडले तरी सगळे पैसे , गरज बारामतीकरांचीच ( इच्छा हि बारामतीकरांचीच हो ... )
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा