✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक आठवण, धुळीतली...!

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 06/07/2011 - 11:27  ·  लेख
लेख
परवाच कुठेतरी नभोवाणीवर कुणी गात असलेली बिलावलमधली 'कवन बटरिया गईलो..' ही बंदिश कानावर पडली आणि माझं मन एकदम काही वर्ष मागे गेलं. वर्ष आता आठवत नाही परंतु सवाई गंधर्व महोत्सवातील आठवण आहे ही..अण्णांनी खास करीमखासाहेबांची 'प्यारा नजर नही..' ही बंदिश आणि त्यालाच जोडून 'कवन बटरिया..' फार सुरेख गायली होती त्याची आठवण झाली. पं अच्युतराव अभ्यंकर यांनी माझ्या कानावर केलेले किराणा गायकीचे संस्कार आणि वारंवार समजावून दिलेले करीमखासाहेब आणि पुढे जाऊन त्याच गायकीतील भक्कम वीण समाजावून देणारे आमचे दस्तुरबुवा आणि अण्णा. दस्तुरबुवांचं अत्यंत सुरेल किराण्याचं गाणं. कधी त्यांचा स्वराचा एकेक मोती उलगडून दाखवणारा यमन, तर कधी खासाहेबी गोपाला मेरी करुना, किंवा जादू भरेली कौन अलबेली..! तर कधी अण्णांनी अनेकदा उलगडून दाखवलेला शुद्ध कल्याण किंवा तोडी. झालंच तर पुरीया.! सवाईं गंधर्वांची ही शिष्यजोडी मलाही अगदी भरपूर लाभली. तो दिसच माझ्या आयुष्यातला खूप भाग्याचा दिस होता. अण्णांच्या आणि दस्तुरबुवांच्या पायाशी बसण्याचे खूप दिवस मनात होते, अखेर ती इच्छा पूर्ण झाली. आमचे दस्तुरबुवा म्हणजे ख्वाजा मोईउद्दीन चिस्तीने पाठवलेला एक अवलिया स्वर-जादुगार; तर आमचे अण्णा म्हणजे माझ्याकरता साक्षात पंढरीचा विठोबाच..! त्या दिवशी खरंतर अण्णा माझ्यावर जरा वैतागलेलेच होते. का? तर मी मस्त मांडी ठोकून खाली धुळीत बसलो म्हणून..! :) "च्च.. अरे इथे धुळीत काय बसतोस? कपडे मळतील की! तुला आमच्यासोबत फोटोच काढायचा आहे ना? मग बाजूला खुर्चीत बस की..!" "नको हो अण्णा, मी आपला धुळीतच बरा..!" :) असो.. आता अश्या अनेक आठवणी निघतात आणि मन उदास होतं. आजही कधी ग्रँटरोडला जाणं होतं. दस्तुरबुवा राहायचे त्या बिल्डिंगपाशी दोन क्षण उभा राहतो. पटकन दोन जिने चढून जावं आणि दस्तुरबुवा भेटावेत, त्यांच्या पायांना मिठी मारावी असं वाटतं. तर कधी दादरच्या प्रकाशचा बटाटवडा बाबुजी-ललीमावशीची आठवण करून देतो..! चार-आठ दिसांपूर्वीच पुण्याला गेलो होतो. पाय नकळत कलाश्री बंगल्याकडे वळले. क्षणभर वाटलं की बंगल्यात जावं आणि किमान अण्णांच्या तंबोर्‍यांना तरी नमस्कार करावा. पण धीर नाही झाला. वळलो तसाच माघारी..! -- तात्या अभ्यंकर.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
7565 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

धुळीमध्ये माखलेली .. ह्रद्यात

गणेशा
Tue, 06/07/2011 - 13:22 नवीन
धुळीमध्ये माखलेली .. ह्रद्यात कोरलेली आणि गगनात विसावलेली आठवण आवडली.
  • Log in or register to post comments

हृद्य आठवण

ऋषिकेश
Tue, 06/07/2011 - 13:26 नवीन
हृद्य आठवण
  • Log in or register to post comments

क्या बात है !! अप्रतिम अमोल

अमोल केळकर
Tue, 06/07/2011 - 13:52 नवीन
क्या बात है !! अप्रतिम अमोल केळकर
  • Log in or register to post comments

छान रे तात्या. या आटवणी

सन्दीप
Tue, 06/07/2011 - 13:59 नवीन
छान रे तात्या. या आटवणी नीमित्ये लीहीता झालास. ती रोशनी पुर्ना कर ना दादा. सन्दीप
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

निवेदिता-ताई
Tue, 06/07/2011 - 19:25 नवीन
अप्रतिम..
  • Log in or register to post comments

आईशप्पत

गोगोल
Tue, 06/07/2011 - 19:45 नवीन
तात्या अ‍ॅज अ यंग बॉय .. नाक वगैरे फेंदारून .. तात्या तुम्ही चित्रपटात काम का नाही केलं?
  • Log in or register to post comments

तात्या अ‍ॅज अ यंग बॉय ..

विसोबा खेचर
Wed, 06/08/2011 - 09:36 नवीन
तात्या अ‍ॅज अ यंग बॉय ..
हम्म! सोनेरी दिवस होते ते. तेव्हा आम्ही तरूण होतो. व्यायामबियाम पण भरपूर करयचो. एकाच वेळेला ५-५ पोरींना वचनं गेली होती आम्ची. त्यांच्यासोबत आणाभाकाही घेतल्या होत्या..! ;) असो.. गेले ते दिस.. :( तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

आयच्या गावात....

आंबोळी
Wed, 06/08/2011 - 22:13 नवीन
एकाच वेळेला ५-५ पोरींना वचनं गेली होती आम्ची. त्यांच्यासोबत आणाभाकाही घेतल्या होत्या..! " भव्य उत्कट तेची घ्यावे... मिळमिळीत अवघेची टाकावे" (एकाही पोरी बरोबर आणाभाका घेउ न शकल्याने तात्यावर जळणारा) आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

छानच

आत्मशून्य
Wed, 06/08/2011 - 00:01 नवीन
.
  • Log in or register to post comments

विसोबा खेचर हे नाव नाही

आर्या अंबेकर
Wed, 06/08/2011 - 13:12 नवीन
विसोबा खेचर हे नाव नाही आवडले, परंतु त्यांचे लेखन उत्तम आहे. ही आठवणही छानच!
  • Log in or register to post comments

तात्या चिकणे दिसत होते की

शाहरुख
Wed, 06/08/2011 - 23:00 नवीन
तात्या चिकणे दिसत होते की :)
  • Log in or register to post comments

तात्या छान आठवण जागवली आहे

पाषाणभेद
Fri, 06/10/2011 - 08:15 नवीन
तात्या छान आठवण जागवली आहे तुम्ही.
  • Log in or register to post comments

वा!

पिवळा डांबिस
Fri, 06/10/2011 - 10:17 नवीन
"च्च.. अरे इथे धुळीत काय बसतोस? कपडे मळतील की! तुला आमच्यासोबत फोटोच काढायचा आहे ना? मग बाजूला खुर्चीत बस की..!" "नको हो अण्णा, मी आपला धुळीतच बरा..!" क्या बात है!! असंच असावं रे तात्या!!! प्रभूजी, तुम चंदन, हम पानी!!!! जियो!!! _/\_
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादींचा मी ऋणी

विसोबा खेचर
Fri, 06/10/2011 - 10:34 नवीन
सर्व प्रतिसादींचा मी ऋणी आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा