Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 05/18/2018 - 09:31
लेखनविषय (Tags)
धर्म
विनोद
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
प्रश्नोत्तरे
वाद
वेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ स्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा धागा वर्गीकरण : #मीचीलाल (संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे ) ------------- "हॅरे क्रिश्ना हॅरे क्रिश्ना क्रिश्ना क्रिश्ना हॅरे हॅरे | हॅरे रॅमा हॅरे रॅमा रॅमा रॅमा हॅरे हॅरे" " च्यायला, इथेपण ह्यांचा तमाशा सुरु आहे का " मित्र वैतागुन बोलला . मी म्हणलो , " थांब रे जरा , बघु तरी ह्यांचे मडके किती पक्के आहे ते " मित्र हसत हसत म्हणाला - " तुला ना साल्या नुसती बोटं घालायची हौस आहे" " ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . आमचे गुरुदेवच म्हणालेत - बेबी माय व्होल वर्क इज टु कन्फ्युज यु . ख्यॅ ख्यॅ ख्यॅ " ------------- " हे पुस्तक तुमच्यासाठी " गोर्‍याटंच युवतीने नेहमीचेच टिपिकल कृत्रीम स्मितहास्य करत माझ्या हातात " भगवद्गीता अ‍ॅज इट इज" पुस्तक चिकटवले ! " थॅन्क्यु " इतकेच म्हणुन तिच्या कृत्रिमहास्याकडे आणि इतर सुंदर गोष्टींकडे जमेल तितके दुर्लक्ष करत मी चालायला लागलो . " तुम्ही फक्त ५ डॉलर डोनेशन द्या " " मी तुम्हाला शष्प एक पेनी सुध्दा डोनेशन देणार नाही " इति अस्मादिक ! टोन : स्वराज्य माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि मी टरफलं उचलणार नाही. " का बरे ?" " मी ही पुस्तक वाचलं आहे , आणि भगवद्गीतेचे ह्याच्या इतके चुकीचे इन्टर्प्रिटेशन दुसरे कोणतेही नाही असे माझे स्पष्ट मत आहे" " व्हॉट ?" " तसेही तुम्ही म्हणाला ना की पुस्त्क तुमच्यासाठी मग डोनेशन कसलं मागताय ? मी तुम्हाला शुन्य डॉलर डोनेशन देतो. हे घ्या" " नो नो तुम्हाला पाच डॉलर डोनेशन द्यावे लागेल " " सांग माझ्या **** ला" " जस्ट ५ डॉलर्स" " एकतर तुम्ही डोनेशन म्हणु नका , स्पष्ट किंमत म्हणा ना , खोटारडेपणा कशाला करताय" ही सारी चर्चा ऐकुन एक काळाशुभ्र साऊदिंडीयन असा माणुस तेच खोटारडे स्मित हास्य घेवुन बोलायला आला ! आता अ‍ॅव्हरेज जरा आपल्या कलर चे झाले ! दुत्त दुत्त ! " हॅरे क्रिश्ना ! बोला सर काय काय म्हणाताय ? " " ॐ नमो नारायणाय " " अं ?" आव्हरेजिंग वर्स हाल्फ धक्का बसल्यासारखा अविर्भाव ! " जर तुम्ही डोनेशन म्हणयताय तर सक्ती कसली करताय ? मी देईन तितके डोनेशन घ्या ना , शुन्य डॉलर ! नाही तर सरळ स्पष्ट बोला की किंमत आहे म्हणुन " " नाही नाही सर ते डोनेशनच आहे , पण तुम्ही द्यावे असा आमचा आग्रह आहे , आपण कुठेही पैसे ऊडवतोच कि नै " सिगारेट पिण्याचा निर्देश करत ! ते पाहुन डोकेच सटकले - भेंचो साला इथे गेल्या ३ महिन्यात सिगारेट पिली नाहीये अन हा कोण शहाणा लागुन गेला मला संस्कार शिकवणारा ? " तुम्ही बिजिनेस मांडलाय माझ्या धर्माचा . इतके चुकीचे आणि मिसलिडींग इंटर्प्रिटेशन मी आजवर वाचले नाहीये भगवद्गीतेचे" आता समोरच्याचा काळ्याचा सात्विकतेचा क्वोटा संपुन तामसिक क्वोटा बाहेर येवु लागला होता . गोरीटंच अजुनही अवाक ! " तुम्ही कोणताही श्लोक सांगा मला संपुर्ण पाठ आहे " अस्मादिक - " बाबा रे मी तुझ्या पाठांतराची परिक्षा घ्यायला नाही आलो , अर्थ कळलाय की नाही ह्याची परिक्षा घेतोय , आता सांग नायं आत्मा बलहीनेन लभ्यः ह्या उपनिषदातील श्लोकाचा अर्थ काय ?" गोरी टंच अवाक +२! " बलहीन माणसाला आत्मतत्वाचे आकलन होणार नाही " " तुमच्या श्रीकृष्ण ह्या पुस्तकात तुमच्या महामहीमांनी ह्याचा अर्थ बलरामाच्या कृपेशिवाय ईश्वरप्राप्ती होत नाही असा काहीच्या बाही रिडिक्युलस अर्थ काढलाय , आता बोला" " नाही नाही त्यांचेच बरोबर आहे , तुम्ही पुस्तक घेणार आहे की नाही ते बोला " " तु ते डोनेशन हा शब्द हटव अन स्पष्ट किंमत म्हण मग बोलु . बिजनेस करतोय तर बिजनेस म्हणावे , उगाच धर्माचा अविर्भाव कशाला ?" गोरी टंच अवाक +३ अंगावर पाल झटकल्यासारखे "ह्यांना माझ्या पेक्षा जास्त माहीत आहे , हे सांगतील" " हो आमचा बिजनेसच आहे " " हां आता कसं स्पष्ट बोललास , ऐक गं टवळे , हा केवळ बिजनेस आहे , ह्यांना आमच्या सनातन वैदिक हिंदु धर्माशी काही घेणे देणे नाही , अब्राहमिक धर्मातल्या जमतील तितक्या वाईट प्रथा सनातन धर्मात घुसडुन तुम्हा लोकांना रुचेल असे बिजनेस मॉडेल उभे केले आहे ह्यांनी . बाकी काही नाही" आता मात्र टवळी बावरली अन काळ्याकडे बघायला लागली . " हो आमचा बिजनेसच आहे - तुमच्या आत्म्याला वाचवण्याच्या . पुढच्या जन्मात तुम्हाला कुत्रा व्ह्यायचंय की मांजर ? " आता सात्विकतेचा रंग जवळपास संपत आलेला ! लगेच आम्ही आमचा लाल डबा बाहेर काढला ! " मला फरक पडत नाही , मी पुढच्या जन्माचा विचारच करत नाही . कार्पे डियाम ! मार्कस ऑरेलियस काय म्हणाला - असे जगा की जणु आजचा दिवस शेवटचा आहे! " " मग भोगा आपल्या कर्माची फळं " " कसली आलीत कर्माची फळं ? मी कर्मफळाची चिंता न करता कर्म करतो:
योगस्थ: कुरु कर्माणि संग त्यक्तवा धनंजय। सिद्धयसिद्धयो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते।।
आता अवाक व्ह्यायची वेळ वेळ काळ्यावर ! क्रोधातिरेकाने काही सुचेनाशी अवस्था ! गोर्‍या टंच पोरीने अलगद माझ्या हातातुन पुस्तक काढुन घेतले अन हातात एक चॉकलेट ठेवले " धिस इज प्रसॅद फॉर यु " " हा हा हा , मला कसला प्रसाद देतेस टवळे , मीच प्रसाद आहे ,
प्रसादे सर्व दुखानाम हानिरस्योपजायते । प्रसन्न चेतसो ह्यायुर्बुद्धि: पर्यवतिष्ठते
आता मात्र काळ्याच्या राग अनावर व्हायला लागलेला . खाऊ का गिळु असे अविर्भाव ! म्हणले अजुन जरा डिवचावे -
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः। ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ||
ह्याचा अर्थ सांगु का रे ह्या लोकांना ? बघु मग किती लोकं येताहेत तुझा बिजनेस करायला !! आता मात्र काळ्या बिथरलाच. काहीही न बोलता फक्त " म्यॅव म्यॅव म्यॅव म्यॅव " असे करत तो दुर निघुन गेला ! मी आणि मित्र हसत राहिलो ! --------------- " यु नो व्हॉट , वी कॅन कॅचप ओव्हर अ ड्रिंक सम टाईम . आपण कधी तरी भेटुन वाईन पिवुयात का ? मी तुला कृष्ण राधेशी कशी रासक्रीडा करायचा ते समजाऊन सांगेन अगदी जयदेवाने सांगितले आहे ना गीतगोविंद मध्ये तसे -
प्रथम समागम लज्जितया, पटुचाटुशतै: अनुकूलम् | मृदुमधुरस्मितभाषितया शिथिलीकृत जघन दुकूलम् ||
टवळीला डावा डोळा मिचकाऊन म्हणालो . अर्थात तिला शष्प काही कळले नसणार हे माहीत होते पण आपल्याला आपला लाल रंगाचा डबा संपवल्याचा आनंद ! टवळीने दिलेले चॉकलेट जाता जाता डस्टबीन मध्ये टाकले अन वाचवलेले ५ डॉलर मस्त वाईनहेन्स्टिफनर पिण्यात सत्कारणी लावले ! इत्यलम ! तळटीप : १) लाल रंगाचा डबा संपला . २) काही संवाद काल्पनिक. ३) आपल्याकडे विठ्ठलाला काळ्या म्हणले जाते! ४) उत्तरदायित्वास नका रं लागु
  • Log in or register to post comments
  • 78985 views

प्रतिक्रिया

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 05/18/2018 - 09:41

Permalink

अप्रतिम गुर्ध्येव

अप्रतिम गुर्ध्येव
  • Log in or register to post comments

Submitted by वीणा३ on Fri, 05/18/2018 - 09:56

Permalink

या उपद्व्यापाबद्दल

या उपद्व्यापाबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला एक चॉकलेट. फार वात आणतात हे लोक. एकदा गीते चा पुस्तक हातात दिलं, म्हटलं नकोय, तर म्हणे देवाला नाही म्हणू नये. जाम चिवट असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 05/18/2018 - 11:10

Permalink

लय भारी ... विठ्ठल... विठ्ठल

लय भारी ... विठ्ठल... विठ्ठल !!!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 05/18/2018 - 11:22

Permalink

=)) =)) =))

=)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Fri, 05/18/2018 - 11:29

Permalink

वा.. वा.. वा.. तोडलंत..

वा.. वा.. वा.. तोडलंत.. आता, कुणी इस्कॉनचा उंडगा किंवा टवळी आली पिडायला तर त्यांची काशी करायला झकास मटेरियल दिलंत.. आमच्या नशीबात हे इस्कॉनवाले, आर्ट ऑफ लिव्हिंगवाले आणि अ‍ॅम्वेवाले फार. गोड बोलून जाल बिछतात..(जमला का मटारी मोड?)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 05/18/2018 - 12:05

Permalink

अरे चांगले प्रिंटिंग अस्ते

अरे चांगले प्रिंटिंग अस्ते त्या गीतेचे, चित्रे पण चान चान असतात. ह्या जन्मातल्या कर्माचे फळ पुढच्या जन्मात कोणती योनी मिळते त्याचे व्हिज्युअलायझेशन पाहा नुसते. दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात. साधेसुधे नाही तर गुलाबी गुलाबी, गोंडस धश्टपुष्ट डुक्कर. आक्खे महाभारत एलए मध्ये घडले होते असेच वाट्ते.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 05/18/2018 - 12:17

In reply to अरे चांगले प्रिंटिंग अस्ते by अभ्या..

Permalink

पुढच्य जन्माच्या ऐवजी याच

पुढच्य जन्माच्या ऐवजी याच जन्मात मिळत्ते का ते पहावे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 05/18/2018 - 13:15

In reply to अरे चांगले प्रिंटिंग अस्ते by अभ्या..

Permalink

दारु पिणारे पुढच्या जन्मी

दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात
त्यांना खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन वाचावयास द्या.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 05/18/2018 - 13:25

In reply to दारु पिणारे पुढच्या जन्मी by प्रचेतस

Permalink

द्या द्या, तुम्हीच वाचायला

द्या द्या, तुम्हीच वाचायला द्या. त्यावर पण तशीच रिअलिस्टिक रिअलिस्टिक चित्रे काढायला सांगा ना गडे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 05/18/2018 - 13:32

In reply to द्या द्या, तुम्हीच वाचायला by अभ्या..

Permalink

तुम्ही जरा शोधायचे कष्ट घ्या

तुम्ही जरा शोधायचे कष्ट घ्या ना गडे.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Fri, 05/18/2018 - 15:37

In reply to दारु पिणारे पुढच्या जन्मी by प्रचेतस

Permalink

डुक्कर होतात

डुक्कर झाल्यावर काय करतात, ते या बातमीत पहा. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/wild-boars-attack-up-farmer-chew-his-genital/articleshow/64220109.cms
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 05/18/2018 - 18:23

In reply to दारु पिणारे पुढच्या जन्मी by प्रचेतस

Permalink

त्या पेक्षा हे चालेल का ?

खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन
>> त्या पेक्षा हे चालेल का ? ;) सभा पर्वातील हे दाखवु का त्यांना की युध्धीष्ठिराने कसे वराहाचे अन हरीणाचे मांस खायला घालुन १०००० ब्राह्मणांना संतुष्ट केले , आय टेल यु बेकन इज अनरेजिस्टेबल =)))) इत्युक्त्वाऽऽलिङ्ग्य वीभत्सुं विसृष्टः प्रययौ मयः'। 2-4-6 (11373) ततः प्रवेशनं तस्यां चक्रे राजा युधिष्ठिरः। अयुतं भोजयित्वा तु ब्राह्मणानां नराधिपः॥ 2-4-7 (11374) साज्येन पायसेनैव मधुना मिश्रितेन च। भक्ष्यैर्मूलैः फलैश्चैव मांसैर्वाराहहारिणैः। कृसरेणाथ जीवन्त्या हविष्येण च सर्वशः॥ 2-4-8 (11375) मांसप्रकारैर्विविधैः खाद्यैश्चापि तथा नृप। चोष्यैश्च विविधै राजन्पेयैश्च बहुविस्तरैः॥ 2-4-9 कुंभकोणम इडिशन किंव्वा ह्या इस्कॉन वाल्यांना हे दाखवु का त्यांना >>> उद्योगपर्व यानसंधीपर्व अध्याय ५९ संजय म्हणतो : नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै | यत्र कृष्णौ च कृष्णा च सत्यभामा च भामिनी ||४|| उभौ मध्वासवक्षीबावुभौ चन्दनरूषितौ | स्रग्विणौ वरवस्त्रौ तौ दिव्याभरणभूषितौ ||५|| अर्जुनोत्सङ्गगौ पादौ केशवस्योपलक्षये | अर्जुनस्य च कृष्णायां सत्यायां च महात्मनः ||७|| - कृष्णार्जुनाच्या अंतःपुरात अभिमन्यु , नकुल सहदेव वगैरेंना प्रवेश नव्हता , तिथे केवळ कृष्ण सत्यभामा अर्जुन आणि द्रौपदी इतकेच लोक होते ! कृष्ण आणि अर्जुन दोघेही मध्वा ( मधु / माध्वी ) नामक सुरा पिऊन मत्त झालेले होते , त्यावेळी कृष्णाचे दोन्ही पाय अर्जुनाच्या मांडीवर होते तर अर्जुनाचा एक पाय द्रौपदीच्या मांडीवर तर दुसरा सत्यभामेच्या मांडीवर ! सत्यभामेच्या ??? आर यु किडींग मी ? इथे तर माझ्यासारख्या सनातनी माणासालाही ठसका लागला होता , इस्कॉनवाल्यांना काय होईल देव जाणे बहुतेक ९११ ला कॉल करावा लागेल =))))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 05/18/2018 - 19:09

In reply to त्या पेक्षा हे चालेल का ? by प्रसाद गोडबोले

Permalink

बाब्बो....एकदा सत्संग ठेव

बाब्बो....एकदा सत्संग ठेव आलास की =))
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 05/18/2018 - 20:37

In reply to त्या पेक्षा हे चालेल का ? by प्रसाद गोडबोले

Permalink

एक शंका

.
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
या ओळीतील शब्दांचा अर्थ कसा वाचला जातो ? आणि या ओळीच्या अर्थात नकुल सहदेवाचे नाव यात कसे अंतर्भूत होते ? मी क्लेम कॉन्टेस्ट करता नाहीए केवळ एका माहिती करून घेण्याची शंका म्हणून .
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 05/18/2018 - 20:55

In reply to एक शंका by माहितगार

Permalink

हां

ह्यात जरा टेक्निकल घोळ आहे . मी उधृत केलेले श्लोक भांडारकरच्या ( BORI च्या) क्रिटिकल एडिशन मधुन कॉपी पेस्ट केलेले आहे अन अर्थ वल्ली सरांनी शेयर केलेया महाभारताच्या मराठी अनुवादतुन घेतलेलेला आहे जे की बहुतेक प्रसाद प्रकाशनाचे आहे आणि कुंभकोणम एडिशन वरुन लिहिलेले. म्हणुन मी हाच श्लोक कुंभकोणम एडिशन मध्ये कसा दिला आहे ते पहायचा प्रयत्न केला तर सापडले नाही :( श्लोकांचे नंबर इव्हन काही काही अध्यायांचे नंबर वरखाली झालेले दिसले. थोडक्यात काय तर बोरी ची आवृत्ती , कुंभकोणम ची आवृत्ती आणि मराठी अनुवाद ह्यात मला १-१-१ वन ऑन वर मॅपिंग साप्डले नाहीये. थोडा वेळ देवुन शोधतो आणि कुंभकोणम आवृत्ती मधील श्लोक टाकायचा प्रयत्न करतो ! अवांतर : बाकी तो सभापर्वातील श्लोक बोरीच्या आवृत्तीत नाहीये , कुंभकोणमच्या आवृत्तीत आहे हे ही नमुद करतो ह्या निमित्ताने ! आणि ह्याच्याही पुढे जाऊन हे सारे संस्कृत लिटरेचर संस्कृत डॉक्युमेन्ट्स . ऑर्ग वरील संदर्भाने लिहिलेले आहे , ते मुळ प्रकाशित आवृत्ती सारखेच असेल असा अंदाज आहे , खात्री नाही . मी फक्त मराठी अनुवाद वाचल्या असल्याने तेवढेच खात्रीने सांगु शकतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 05/18/2018 - 21:22

In reply to हां by प्रसाद गोडबोले

Permalink

या दुव्यावर दिलेल्या हिंदी

या दुव्यावर दिलेल्या हिंदी अनुवादात नकुल सहदेवाचा उल्लेख आहे आणि आपणास मराठी अनुवादातही सापडला म्हणता म्हणजे तो तसा कोणत्यातरी आवृत्तीत असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 05/18/2018 - 23:40

In reply to या दुव्यावर दिलेल्या हिंदी by माहितगार

Permalink

एक दुवा

एक दुवा
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 05/18/2018 - 23:58

In reply to एक दुवा by माहितगार

Permalink

इंग्रजी अनुवाद

इंग्रजी अनुवाद
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 05/18/2018 - 21:24

In reply to या दुव्यावर दिलेल्या हिंदी by माहितगार

Permalink

संपादक कृ. एक पेक्षा अधिक

संपादक कृ. एक पेक्षा अधिक आलेले पोस्टीन्ग हटवावे. अनेक आभार
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 05/19/2018 - 00:05

In reply to हां by प्रसाद गोडबोले

Permalink

इंग्रजी अनुवादात nor the

इंग्रजी अनुवादात nor the Twins असा आहे. न यमौ तं देशम यातील कशाचा अर्थ Twins असा होतो का ?
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sat, 05/19/2018 - 00:11

In reply to इंग्रजी अनुवादात nor the by माहितगार

Permalink

बहुतेक यमौ

प्रथमा विभक्ती द्विवचनातला "यमौ" हाच एक शब्द वाटतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 05/19/2018 - 09:04

In reply to हां by प्रसाद गोडबोले

Permalink

विविध आवृत्त्यांत अध्यायांचे

विविध आवृत्त्यांत अध्यायांचे नंबर वरखाली होतात त्यामुळे हे संदर्भ शोधणे बरेच जिकीरीचे जाते. मात्र मुख्यत्वे बोरी प्रत रेफर करावी. किमान १० व्या शतकानंतरची भर त्यात नाही हे खात्रीने सांगता येते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 05/19/2018 - 09:00

In reply to एक शंका by माहितगार

Permalink

..नैवाभिमन्युर्न यमौ तं

..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
यमौ-यमल-जुळे असा अर्थ आहे तो. येथे नकुल सहदेव हे शब्द वापरले नसून जुळे ह्या अर्थी घेतल्या गेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 05/19/2018 - 09:49

In reply to ..नैवाभिमन्युर्न यमौ तं by प्रचेतस

Permalink

अजून जराशी चिकित्सा

माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक आभार . इथे या शोध दुव्यावर महाभारतात यमौ शब्द येणारे श्लोक एकत्र दिसतील, ते पाहून यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ? कारण टेक्निकली कौरव हे त्यांचे आपापसातले जुळे भाऊ आहेत , ‘तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत ? 'तुमच्या देशातील अभिमान (गर्व या अर्थाने) आणि जुळे कौरव यांना प्रवेश नाही', असा तर अर्थ होत नाही ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 05/19/2018 - 10:29

In reply to अजून जराशी चिकित्सा by माहितगार

Permalink

यमौ शब्द नकुल सहदेव याच

यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ?
ते शोधणे किचकट आणि वेळखाऊ आहे. आख्खं महाभारत उपमांनी भरलेलं आहे त्यामुळे कोणता शब्द कुठे वापरला जाईल किंवा कोणत्या शब्दाचा अर्थ दुसर्‍या वाक्याच्या अनुषंगाने कसा बदलला जातो हे सांगणे अवघड आहे.
तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत
मूळात शब्द देशमभियान्ति असा आहे. देशम अभियन्ति. ह्याचा अर्थ देशाचा अभिमान असा नसून देश (प्रदेश) आणि अभियान (जाणे) अशा अर्थी आहे. म्हणजे " ह्या प्रदेशी (ह्या ठिकाणी) जाण्यास" असा अर्थ होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 05/19/2018 - 11:01

In reply to यमौ शब्द नकुल सहदेव याच by प्रचेतस

Permalink

यन्तव्य चा http:/

यन्तव्य चा http://spokensanskrit.org वर to be restrained or checked or controlled असा आहे, मी अभियन्ति अर्थ जाण्यापासून थांबवणे असा घेतला. * मी देशम अभियन्ति. चे देशाचा अभिमान करत नाहीए ; नैवाभिमन्युर - न एव अभिमन्युर चा अर्थ (गर्व या अर्थाने) अभिमान असू शकतो का ? म्हणजे अर्जून पुत्र अभिमन्यूचा इथे संबम्धच नसेल, असे काही ? गर्व आणि कौरव यांना प्रवेश नाही . * अन्यथा अंतःपूरातील प्रवेशाला असलेल्या मर्यादेचा उल्लेख करताना, देश या व्यापक सज्ञेचे प्रयोजन लक्षात येत नाही . * जरा परंपरा मोड ऑन केल्या सारखे वाटेल पण , अर्जूनाचा एक पाय द्रौपदी साठी आणि एक सत्याच्या दिशेने आहे , आणि म्हणून कृष्णाचे पाय (समर्थन) अर्जूनाच्या दिशेने आहे ; असे काही रुपक असेल तर वर मी म्हणतो तसे गर्व आणि कौरवांना , कृष्ण , अर्जून , द्रौपदी आणि सत्यभामामहाभाच्या अंतःपूरात म्हणजे मनात प्रवेश नाही' असे काहीसे रुपक जरासे ताणल्या सारखे होतेय , ' परंपरा मोड ऑफ . अर्थात हा सर्व तर्क यमौ हा शब्द कौरवांसाठी महाभारतात इतर श्लोकात येत असेल तरच लागू पडेल. यमौ हा शब्द इतरत्र मुख्यत्वे नकुल-सहदेव या अर्थाने येत असेल तर परंपरा मोड मधला तर्क पूर्णच ढासळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 05/19/2018 - 11:11

In reply to यन्तव्य चा http:/ by माहितगार

Permalink

नैवाभिमन्युर्न यमौ तं

नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात. न एव: अभिमन्यु: यमौ तं देशम अभियान्ति वै अभिमन्यु आणि जुळे देखील ह्या स्थानी जाउ शकत नाहीत. आता मात्र उत्तरदायित्वास नकार लागू.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 05/19/2018 - 11:22

In reply to नैवाभिमन्युर्न यमौ तं by प्रचेतस

Permalink

:)) मान्य देश शब्द कदाचित

:)) मान्य देश शब्द कदाचित स्थान या अर्थाने येऊ शकेल; पण जुळे म्हणजे नकुल आणि सहदेवच कसे ठरवणार ? या संदर्भा नुसार महाभारतात जुळ्यांच्या किमान सात जोड्या आहेत. अभिमन्यु कदाचित वयाने लहान म्हणून समजता येते, पण नकुल आणि सहदेवालाच नाही असे सांगण्याचा उद्देश्य काय असावा ? कारण नकुल सहदेव असा विशीष्ट उल्लेख करण्या एवढेही लहान नसावेत , पांडव बंधू मध्ये माझ्या समजानुसार दोन दोन वर्षाचे अंतर होते, सदर संवाद होतोय तो पर्यंत पांडवांची वये नकुल सहदेवासह पुरेशी मोठी असावित.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 05/19/2018 - 11:26

In reply to नैवाभिमन्युर्न यमौ तं by प्रचेतस

Permalink

व्यास आणि गणपती संवाद :))

तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात.
=)) परंपरा मोड ऑनः तुम्हाला तो व्यास आणि गणपती संवाद ठाऊक आहे ना ! परंपरा मोड ऑफ :))
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Sat, 05/19/2018 - 12:38

In reply to व्यास आणि गणपती संवाद :)) by माहितगार

Permalink

काय ठरलं मग शेवटी? कोण होते

काय ठरलं मग शेवटी? कोण होते ते जुळे? बाकी आम्हाला पण सांगा की व्यास आणि गणपतीचा संवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 05/19/2018 - 12:57

In reply to काय ठरलं मग शेवटी? कोण होते by गणामास्तर

Permalink

व्यास गणेश संवाद

व्यास गणेश संवाद महाभारतातला मूळ संदर्भ जाणकारांनी द्यावा.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Fri, 05/18/2018 - 12:11

Permalink

मस्त! :-)

मस्त! :-) मलाही एक असाच भेटला होता.. थोडा वेळ सुद्धा काहीही वेगळं ऐकून घ्यायची यांची तयारी नसते. उगाच पिडतात.. म्हटले मलाही वेळ आहे.. मीच पिडतो तुला.. नंतर शिव्याशापांची लाखोली वाहत गेला.. मजा आली. बाकी तुमच्याएवढा माझा अभ्यास नाही.. त्यामुळे संस्कृत श्लोक तोंडावर फेकून मारता आले नाहीत. आता जरा करावा म्हणतो! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 05/18/2018 - 12:17

Permalink

हॅ हॅ हॅ

हॅरे रॅम, हॅरे क्रिश्ना =))
  • Log in or register to post comments

Submitted by शाली on Fri, 05/18/2018 - 13:22

Permalink

जाम भारी.

जाम भारी. कल्पना करत होतो "तुमचा संवाद ऐकायला तिथे हजर असतो तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळता आले असते" मस्तच. आवडले एकदम.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Fri, 05/18/2018 - 15:00

Permalink

मिपावाल्यांशी नाद नाही करयचा.

मिपावाल्यांशी नाद नाही करयचा.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 05/18/2018 - 18:13

Permalink

लैच भारी!!!

लैच भारी!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Fri, 05/18/2018 - 18:20

Permalink

शाबास...

हे इस्कॉनवाले भलते त्रास देतात कधी कधी. पुण्यात खडी मशीन जवळ एक इस्कॉनचे देउळ आहे. तिकडे संध्याकाळी प्रसाद म्हणुन मिळणारी खिचडी फारच स्वादिष्ट असते. ती खाण्यासाठी बर्‍याच वेळा या लोकांना सहन करावे लागते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 05/18/2018 - 18:23

Permalink

दुत्त दुत्त....!

दुत्त दुत्त....! असं चावतात व्हय इस्कॉनवाल्या लोकांना?? सत्यनारायण भगवान तुमचा मोबाईल हरवून टाकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 05/18/2018 - 18:48

In reply to दुत्त दुत्त....! by प्रचेतस

Permalink

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आम्ही सहस्त्रार्जुनाचा मंत्र म्हणुन आमचा मोबाईल परत मिळवु : कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! पण तसेही आमच्यावर परशुरामाची कृपा आहे , नवीनच मोबाईल देईल तो आम्हाला =))))
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 05/18/2018 - 20:41

In reply to दुत्त दुत्त....! by प्रचेतस

Permalink

=)) =)) =))

=)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 05/18/2018 - 20:45

Permalink

तुमचा चेहराच तसा असावा म्हणून

तुमचा चेहराच तसा असावा म्हणून इस्कॉनवाले तुमच्या मागे लागतात. ;) (हघ्या) आमाला लय वेळा दिसले एनवायसीमध्ये सबवेच्या स्टेशन्सवर पण एकदाही आमच्या मागे लागण्याचे धाडस केले नाही !!! =)) =)) =)) असे अनुभव अजून लिहा. असे हजरजबाबी संवाद वाचायला मजा येते... आम्हाला बर्‍याचदा असे वेळ निघून गेल्यावर सुचते :( ;) :)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Fri, 05/18/2018 - 21:25

Permalink

भारी अनुभव.

भारी अनुभव. एकदोनदा यांचेशी गाठ पडली होती तेंव्हा मी पण अशीच मजा केली होती. अत्यंत ठोंबे लोक असतात असाच अनुभव येतो. त्या 'गीता जशी आहे तशी' पुस्तकाला हल्लीचे आधुनिक इंग्रजी शाळांमधून शिकलेले, संस्कृत वा मातृभाषेचा गंध नसलेले गिर्‍हाईक हमखास मिळतात असे बघितले आहे. मुद्दाम 'जशी आहे तशी' या शीर्षकावरूनच शंका आली होती की काहीतरी चालूगिरी असणार. वाचल्यावर स्पष्टच झाले. उदाहरणार्थ 'निष्काम कर्म' चा त्यांनी दिलेला अर्थ बघा : 'प्रमाणित' गुरूने सांगितलेले कोणतेही काम करणे म्हणजे 'निष्काम कर्म'. आता 'प्रमाणित गुरू' कोण हे तर उघडच आहे. निव्वळ धंदेबाजी. यांच्यातल्या कुणी भ्रमनिरास झालेल्याने यांचे बिंग फोडले पाहिजे. अर्थात अश्या बाबतीत जिवाचा धोकाही असतोच म्हणा. एक मात्र आहे. त्यांच्याकडे खाण्याचे पदार्थ चांगले मिळतात... निदान मी काही वर्षांपूर्वी खाल्ले होते तेंव्हातरी.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 05/18/2018 - 23:10

Permalink

अनुभव

भारी सत्यनारायण अख्खं जहाज गायब करत असल्याने चिल्लर मोबाईल गायब करणार नाही. गोड (बोल्या )प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती न वाचता वाचाल नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Sat, 05/19/2018 - 02:05

Permalink

हायला! तुम्ही फारच हजरजबाबी

हायला! तुम्ही फारच हजरजबाबी आहात!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 05/19/2018 - 09:16

Permalink

अवांतर :-

अवांतर :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Sat, 05/19/2018 - 10:01

In reply to अवांतर :- by मदनबाण

Permalink

कितीही गोड बोलुन प्रवचंनं

कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज ! त्या ला सोबत म्हणुन श्रीमदाद्यशंकराचार्यह्यांचे गीताभाष्य , त्या खालोखाल ज्ञानेश्वरी , ते समजायला किचकट वाटले तर रामकृष्ण मिशन ची संदर्भ पुस्तके हाच क्रम योग्य आहे ! गीतारहस्य अप्रतिम पण सर्वसामान्य सश्रध्द भाविकांना कंफ्युज करते म्हणौन टाळलेलेच उत्त म किंवा हाती घेतलेच तर अगदी साधनेच्या हुच्च अवस्थेत ! राजकारणात जायचे असेल तर विनोबांची गीताई आणि सोबत "युनोहु" सहस्त्रनामे फ्री ! ( हा यु नो हु ची सहत्रनामे हा काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर व्य नि करावा , ओपन फोरमवर लिहायची भीती वाटते . अत्यंत्य धक्कादायक प्रकार आहे हा . एक दांभिक माणुस शहामृगासारखे जमीनीत किती खोलवर मुंडके खुपसु शकतो ह्याचे क्लासिक उदाहरण !) बाकी ओशोची प्रवचने, योगी अरविंदांची प्रवचने , सी.राजगोपालचारी वगैरे वगैरे ऐकुन आहे पण एका ज्ञानेश्वरी नंतर कशाचीही गरज पडत नाही ! अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही , अभ्या म्हणाला तसे चित्रे भारी असतात त्यांची आणि जेवणही =))))
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 05/19/2018 - 10:18

In reply to कितीही गोड बोलुन प्रवचंनं by प्रसाद गोडबोले

Permalink

हरे रामा हरे कृष्णा पंथावरील

हरे रामा हरे कृष्णा पंथावरील वरील मुख्य प्रभाव भागवताचा आहे का ? (आणि म्हणून अंधश्रद्धा प्रभाव अधिक , असे काही आहे का ? ) भागवत परंपरेबद्दल माझा परिचय मर्यादित असल्यामुळे चूभूदेघे ( अपूर्ण ज्ञानीसाठी डिस्क्लेमर : या चर्चेचा भागवतजींशी काही संबंध नाही ) अवांतर : सहसा अन्धश्रद्धेस जनाश्रय मिळतो तेवढा रॅशनल मांडणींना मिळत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 05/19/2018 - 10:38

In reply to कितीही गोड बोलुन प्रवचंनं by प्रसाद गोडबोले

Permalink

भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर

भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज !
आगदी सहमत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 05/19/2018 - 11:26

In reply to कितीही गोड बोलुन प्रवचंनं by प्रसाद गोडबोले

Permalink

कितीही गोड बोलुन प्रवचंनं

कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! म्हणुनच मी अवांतर असे लिहले आहे. मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! असं असेल तर ते चूकच आहे. अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही हे तुमचे व्यक्तिगत मत आहे, माझे नाही. खुलासा :- माझा आणि इस्कॉनचा कुठलाही संबंध नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी मला नक्कीच आवडतात ! जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Sat, 05/19/2018 - 12:36

In reply to कितीही गोड बोलुन प्रवचंनं by मदनबाण

Permalink

जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव

जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. अगदी सहमत. आमच्या इथल्या इस्कॉन मंदिरात जाम प्रेक्षणीय गरबा भरतो नवरात्रात, ते फार चांगलं आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com