✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

निकाल : महाराष्ट्र दिन २०१७ - चारोळी स्पर्धा

स
साहित्य संपादक यांनी
Mon, 05/01/2017 - 14:14  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, महाराष्ट दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या खास दिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या चारोळी स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहोत. इतक्या कमी मुदतीत सुद्धा आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि उत्तमोत्तम रचना पाठवल्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार. सर्वच प्रवेशिका खरोखर सुरेख होत्या. स्पर्धेतल्या तीन विजेते खालील प्रमाणे ~~~~~ प्रथम स्थान : उल्का महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडावा मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजावा (टिप : आधीच जाहीर केल्याप्रमाणे या चारोळीला आजच्या बॅनरमध्ये स्थान देण्यात आले आहे) Banner ~~~~~ द्वितीय स्थान : राघव कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती! फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती.. "महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!! समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!! ~~~~~ तृतीय स्थान : माम्लेदारचा पन्खा "हर हर महादेव" नाद गुंजता सह्याद्री बाहूंना स्फुरण चढे . . . . माऊलीहूनही मृदू होती ते महाराष्ट्राचे या उत्तुंग कडे ! ~~~~~ विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचे आभार! यापुढेही वेगवेगळ्या उपक्रमांना आपण अशीच उत्स्फूर्त साथ द्याल अशी अपेक्षा ठेवून स्पर्धेची सांगता होत आहे हे जाहीर करतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चारोळ्या
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
20751 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

अरे वा ! छान !!!!

मितान
Mon, 05/01/2017 - 14:21 नवीन
अरे वा ! छान !!!! उत्तम बॅनर आणि साजेशा चार ओळी !!!! विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!! :)
  • Log in or register to post comments

सर्व स्पर्धकांचे अभिनंदन

तुषार काळभोर
Mon, 05/01/2017 - 14:23 नवीन
आणि विजेत्यांचे विशेष कौतुक!!! इतक्या अल्पकालीन सुचनेवर भरभरून उत्स्फूर्त चारोळ्या आल्या. मिपाकरांच्या उत्साहाला, कल्पनाशक्तीला, परीक्षकांच्या आयोजनाला, परीक्षकांच्या निवडीला सलाम!!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

पद्मश्री चित्रे
Mon, 05/01/2017 - 14:30 नवीन
Banner मस्तच
  • Log in or register to post comments

सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे

पद्मावति
Mon, 05/01/2017 - 14:57 नवीन
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे कौतुक. एक से एक चारोळ्या होत्या.
  • Log in or register to post comments

बाब्बो...मिपाचे सन्नी पाजी

टवाळ कार्टा
Mon, 05/01/2017 - 15:15 नवीन
बाब्बो...मिपाचे सन्नी पाजी कवीता करु लाग्ले
  • Log in or register to post comments

तिन्ही चारोळ्या खूप सुंदर.

पिशी अबोली
Mon, 05/01/2017 - 15:20 नवीन
तिन्ही चारोळ्या खूप सुंदर. विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्र दिनाच्या मिपाकरांना शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

परिक्षकांना एक विनंती....

शार्दुल_हातोळकर
Mon, 05/01/2017 - 15:20 नवीन
कृपया चारोळ्या कुठल्या निकषांवर निवडल्या हे सांगाल तर बरे होईल. महाराष्ट्राची महती गायची होती ना मिपाकरांनी? विषय "महाराष्ट्र" आणि उच्च दर्जाची मराठी भाषा, चारोळीचे व्याकरण, महाराष्ट्राच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन वगैरे पाहिले तर निवडलेल्या चारोळ्या का निवडल्या गेल्या हे अजिबात कळाले नाही....
  • Log in or register to post comments

नमस्कार.

साहित्य संपादक
Mon, 05/01/2017 - 16:24 नवीन
नमस्कार. स्पर्धेतल्या चारोळ्यांचं गुणांकन खालील निकषांवर केलं गेलं: १. विषय २. शब्दसंख्या ३. प्रमाणलेखन ('शुद्ध'लेखन नव्हे) ४. गेयता ५. अर्थ परीक्षण शक्य तितकं वस्तुनिष्ठ असावं असा प्रयत्न होता. पण अर्थात सगळ्याच निकषांत वस्तुनिष्ठता आणता येत नाही. वैयक्तिक 'बायस' येऊ नये म्हणून तीन साहित्य संपादकांनी केलेल्या गुणांकनाची सरासरी काढण्यात आली. विजेत्या तिन्ही चारोळ्यांना तिन्ही परीक्षकांनी दिलेल्या गुणांत विशेष फरक नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर

असहमत.... अत्यंत सुमार परिक्षण

शार्दुल_हातोळकर
Mon, 05/01/2017 - 17:07 नवीन
महाराष्ट्राची महती गायची असा विषय होता, कशाने काय व्हावे आणि पडघम वाजावा हे अपेक्षित होते काय? एकुणच परिक्षणाच्या दर्जाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मग अशा सुमार दर्जाचे परिक्षण होणार असेल तर इथुन पुढे लोकांनी साहित्य संपादकांच्या विनंतीला मान देऊन सहभाग कसा घ्यायचा? केवळ मी स्वतः सहभाग घेतला होता आणि मला कसा नंबर दिला नाही म्हणुन वादविवाद करतो असे अजिबात समजु नका, पण एक साहित्यप्रेमी आणि महाराष्ट्रभक्त म्हणुन मी माझे म्हणने मांडतो आहे. आता वाचकांनाच ठरवु द्या की वरील तीन निवडलेल्या चारोळ्यांच्या तुलनेत खालील चारोळी कशी वाटते ती (केवळ उदाहरणादाखल). काही अलंकारीक भाषा, महाराष्ट्राचा गुणगौरव, खोल अर्थ वगैरे असते की नाही? बहुविध राज्ये आसेतुहिमाचल जरी नांदती या राष्ट्रामधे नसे तोड शौर्या कलासंस्कृतीला सुखे नांदे जी महाराष्ट्रामधे खरी ज्ञानभक्ती धर्मक्षात्रतेजा मनी जागविते ही पुण्यभूमी चला वंदुया मराठी देवलोका मोहिनी जयाची जगा नेहमी - शार्दुल हातोळकर (लेखन - २८ एप्रिल २०१७)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहित्य संपादक

अप्रतिम !

गौरी कुलकर्णी २३
Mon, 05/01/2017 - 18:23 नवीन
आपण दिलेल्या विषयावर सुंदर चारोळी लिहीलेली आहे ! आपल्या 'महाराष्ट्रावर' त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर लिहीताना आपली मायमराठी अलंकार लेवून सजली - नटली तर ते सुरेख दिसते ! " जय महाराष्ट्र " !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर

हातोळकरांच्या मुद्द्यांचा नक्कीच विचार व्हायला हवा

देशप्रेमी
Tue, 05/02/2017 - 13:41 नवीन
तुमची चारोळी खुप आवडली ! अत्यंत उत्कृष्ट आणि अलंकारिक भाषेत स्पर्धेसाठी दिलेल्या विषयास अनुसरुन महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर

वा! छान! विजेत्यांचे अभिनंदन!

यशोधरा
Mon, 05/01/2017 - 16:18 नवीन
वा! छान! विजेत्यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन.

अजया
Mon, 05/01/2017 - 17:12 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !

संदीप-लेले
Mon, 05/01/2017 - 18:59 नवीन
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

सत्यजित...
Mon, 05/01/2017 - 19:15 नवीन
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! सा.सं.मंडळी आणि परिक्षकांचे आभार! सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

वा! विजेत्यांचे हार्दिक

स्रुजा
Mon, 05/01/2017 - 19:33 नवीन
वा! विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. या उपक्रमासाठी सासंचे आभार.
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!

जुइ
Mon, 05/01/2017 - 19:50 नवीन
स्पर्धेत भाग घेण्यार्‍यांचे आभार.
  • Log in or register to post comments

विजेत्या चारोळ्या मस्त आहेत

इडली डोसा
Mon, 05/01/2017 - 21:40 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि परिक्षकांचे आभार!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

उल्का
Mon, 05/01/2017 - 23:19 नवीन
इतर विजेत्यांचे व सर्व स्पर्धकांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

सुखद आणि अनपेक्षित धक्का !

माम्लेदारचा पन्खा
Tue, 05/02/2017 - 00:24 नवीन
सगळ्या स्पर्धकांचे अभिनंदन ,परीक्षकांचेेे मनापासून आभार . . . . . . . मनाला खूपच उभारी मिळाली . . . .
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे आणि इतर सर्व

रुपी
Tue, 05/02/2017 - 00:38 नवीन
विजेत्यांचे आणि इतर सर्व स्पर्धकांचे अभिनंदन! या उपक्रमासाठी सा.सं.चे आभार!
  • Log in or register to post comments

धन्यवाद आणि अभिनंदन!

राघव
Tue, 05/02/2017 - 09:43 नवीन
सर्व मिपाकरांना मनःपूर्वक धन्यवाद! उल्कातै आणि माम्लेदारचा पन्खा दोघांचेही अभिनंदन. बॅनरला अगदी शोभेशा ओळी आहेत!! :-)
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक

सस्नेह
Tue, 05/02/2017 - 10:25 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! श्री. हातोळकर यांची चारोळीही प्रशंसनीय आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

वरुण मोहिते
Tue, 05/02/2017 - 14:17 नवीन
सगळ्यांचे. ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे . विजेत्यांचे तर खास अभिनंदन . अतिशय कमी काळात मिपाकरांनी चारोळ्या लिहिल्या . मजा आली वाचून .
  • Log in or register to post comments

+१

माहितगार
Tue, 05/02/2017 - 14:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

अभिनंदन !

सपे-पुणे-३०
Tue, 05/02/2017 - 14:54 नवीन
चारोळी स्पर्धेत विजेत्या आणि सहभागी सदस्यांचे अभिनंदन! सर्व चारोळ्या 'एक से बढकर एक' होत्या. महाराष्ट्र दिनानिमित्त 'महाराष्ट्र' ह्या विषयावर चारोळी स्पर्धा घेण्याचा उपक्रम अतिशय आवडला. मिपाचा बॅनरही एक नंबर झालाय.
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र आणि मराठीवरील

माहितगार
Tue, 05/02/2017 - 15:03 नवीन
महाराष्ट्र आणि मराठीवरील 'अतुट विश्वास' या निकष जोडून मी सासं ने निवडलेल्या चारोळ्या पुन्हा वाचल्या तर दोन क्रमांकावर आलेली राघव यांची चारोळी कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती! फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती.. "महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!! समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!! अधिक उजवी वाटली. पहिल्या आलेल्या चारोळीचे स्वरुप महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडतो मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजतो असे असते तर कदाचीत अधिक भावले असते का असे वाटून गेले.
  • Log in or register to post comments

माझे मत

माहितगार
Tue, 05/02/2017 - 15:15 नवीन
महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडावा मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजावा या स्वरूपात कविला सांस्कृतिक narrative विशीष्ट पद्धतीचा असावा अशी इच्छा आहे. सद्य स्थिती हि सुद्धा एक narrative असते सद्य स्थिती च्या narrative बद्दल प्रश्न विचारणारे आणि मार्गदर्शन करणार्‍या काव्यांचाही सांस्कृतीक narrative वर लाँग टर्म मध्ये प्रभाव पडत असू शकतो पण साशंकता शिल्लक ठेऊन पेक्षा तसा विश्वास असल्याचे सांस्कृतीक narrative तसे वागण्यास आणि संस्कृती तशी घदवण्यास अधिक प्रवृत्त करू शकतात असे माझे व्यक्तिगत मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

*घडवण्यास असे वाचावे

माहितगार
Tue, 05/02/2017 - 15:16 नवीन
*घडवण्यास असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

सर्व सहभागींचे अभिनंदन

पैसा
Tue, 05/02/2017 - 16:01 नवीन
सर्व सहभागींचे अभिनंदन! विजेत्यांचे खास अभिनंदन! शार्दुल हातोळकर यांची ओळीही आवडल्या.
  • Log in or register to post comments

सर्व सहभागींचे अभिनंदन

पैसा
Tue, 05/02/2017 - 16:03 नवीन
सर्व सहभागींचे अभिनंदन! विजेत्यांचे खास अभिनंदन! शार्दुल हातोळकर यांची ओळीही आवडल्या.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

नि३सोलपुरकर
Tue, 05/02/2017 - 16:43 नवीन
चारोळी स्पर्धेत विजेत्या आणि सहभागी सदस्यांचे अभिनंदन! मिपाचा बॅनरही एक नंबर झालाय.
  • Log in or register to post comments

मिपा बॅनर नेहमीप्रमाणेच उत्तम

सही रे सई
Tue, 05/02/2017 - 19:45 नवीन
मिपा बॅनर नेहमीप्रमाणेच उत्तम जमला आहे. विजेत्यांचे अभिनंदन. सगळ्याच चारोळ्या एकसे बढकर एक होत्या. शार्दुल हातोळकर यांची चारोळीही छानच होती. कदचित शब्द संख्येमुळे तिचा विचार झाला नसावा असे वाटते. तांत्रिकरित्या पहिलं तर उल्का यांची चारोळी २ च ओळींची (वाक्य या स्वरुपात पाहिले तर) आहे असे दिसते. त्या २ ओळी ४ ओळींमधे लिहिल्या मुळे तिला चारोळी म्हणावी का असा प्रश्न पडला आहे. अर्थात परिक्षकांचे मत अंतिमच आहे. आणि ते मान्यच आहे.
  • Log in or register to post comments

इथे शब्दसंख्येची अडचण नसणार असे वाटते

शार्दुल_हातोळकर
Tue, 05/02/2017 - 22:25 नवीन
स्पर्धेच्या नियमानुसार जास्तीत जास्त चार ओळी आणि प्रत्येक ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असायला हवे होते. माझ्या चारोळीमधे वर लिहीलेल्या स्पर्धेच्या त्या नियमांचे कुठेही उल्लंघन झालेले नाही. शिवाय चारोळी महाराष्ट्राची महती सांगणारी, गेय आणि विषयानुसारच होती. माझी चारोळी आवडल्याचे नमुद करणाऱ्या सर्व रसिक वाचकांचे मनापासुन धन्यवाद. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई

मित्रा एवढे मनाला लावून घेऊ

दशानन
Tue, 05/02/2017 - 22:35 नवीन
मित्रा एवढे मनाला लावून घेऊ नकोस, निवड करणारे देखील शेवटी हाड मास असलेली व्यक्ती आहेत, तुझी रचना छान आहे पण जेव्हा स्पर्धा असते तेव्हा आलेला निकाल खुल्या मनाने मान्य करणे व परत नव्या स्पर्धेची तयारी करणे हेच योग्य आहे, कधी कधी आपल्याला निर्णय मान्य होत नाही, म्हणून काही सगळे विरुद्ध मताचे आहेत असे होत नाही ना? अनेकांना तुझी रचना आवडली व मला देखील, पण पंच निर्णय हा निर्णय आहे, त्यांना आवडल्या पटल्या त्यांना त्यांनी क्रमांक दिला पण तू तुझ्या लेखनाची मोजमाप त्यावर का करतोय आहेस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर

मला वाटते, तुमच्या

यशोधरा
Wed, 05/03/2017 - 07:45 नवीन
मला वाटते, तुमच्या चारोळीमध्ये अजून ओळी वाढवल्यात तर कविता म्हणून ती खरोखरच सुरेख वाटेल. चारोळी हा प्रकार सहसा सुटसुटीत असावा. क्लिष्ट आणि लांबलचक शब्द योजना नसावी. तुम्ही रॉय किणीकर ह्यांचं अतिशय उच्च असं उत्तर रात्र - ह्या अथवा , गेला बाजार चंगोंच्या चारोळ्या वाचल्या असतील. त्या काव्यामध्ये जसा सहजपणा आणि सुटसुटीतपणा आहे, तसा तुमच्या चारोळीत जाणवला नाही. कला संस्कृती हा एक शब्दही होऊ शकत नाही :) - ही तीट समजा. अवांतरः मी परीक्षक नाही पण मिपाकरांचे मत तुम्हांला हवे होते म्हणून लिहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर

महाराष्ट्रासाठीच्या चार ओळी या दणदणीतच असायला हव्यात

देशप्रेमी
Wed, 05/03/2017 - 14:15 नवीन
सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की तुमचे वैयक्तिक मत आम्हाला मान्य आहे, पण..... साध्या चारोळ्या आणि महाराष्ट्रासाठीच्या अर्थगर्भ चार ओळी यांची तुलना कशी काय होऊ शकेल? महाराष्ट्राच्या चार ओळी या ऐकताच रक्त सळसळेल अशाच पाहिजेत. शिवाय हातोळकरांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलेले दिसते आहे कि त्यांचा आक्षेप हा त्यांचा नंबर आला नाही म्हणुन नाहीये. आणि कलासंस्कृती हा एक शब्द कसा काय असु शकत नाही? प्रत्येक गोष्टीला संस्कृती(culture) असते. मराठीत वाचनसंस्कृती, क्रिडासंस्कृती असे इतरही शब्द आहेत. मग इथे कवीला कलासंस्कृती म्हणजे कलेची संस्कृती असे कदाचित अभिप्रेत असावे. राघव यांची चारोळी वगळता इतर दोन रचना या काही महाराष्ट्राचे फार काही वर्णन करत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

शार्दुलजी पुर्ण कविता लिहा.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/05/2017 - 22:02 नवीन
शार्दुलजी पुर्ण कविता लिहा. चारोळीपेक्षा उत्तम जमेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशप्रेमी

सर्व चारोळीकरांचे आणि

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 05/02/2017 - 22:33 नवीन
सर्व चारोळीकरांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! बॅनरही एक नंबर आहे !
  • Log in or register to post comments

+++१११

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/03/2017 - 05:40 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !

पाटीलभाऊ
Wed, 05/03/2017 - 14:46 नवीन
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे

विनिता००२
Wed, 05/03/2017 - 17:11 नवीन
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे कौतुक.
  • Log in or register to post comments

प्रथमतः उल्का ते अभिनंदन.

इरसाल कार्टं
Wed, 05/03/2017 - 21:17 नवीन
प्रथमतः उल्का ते अभिनंदन. ब्यानर वर चारोळी झलकणे काय साधी गोष्ट आहे काय!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन, विजेत्यांचे

चौथा कोनाडा
Fri, 05/05/2017 - 22:26 नवीन
हार्दिक अभिनंदन, विजेत्यांचे ! क्रियाशिल मिपाकरांचा प्रशंसनिय उपक्रम ! मजा आली चारोळ्या वाचायला ! नंबरात न आलेलया, पण उल्लेखनियअसलेल्या चारोळ्यांना मिपाच्या बॅनरवर योग्य त्या निमित्ताने ( दसरा, दिवाळी, साहित्यिकांचे वाढदिवस इ. निमिताने) स्थान देण्यात यावे ही संमंला आग्रहाची विनंती !
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दीक

पाषाणभेद
Sat, 05/06/2017 - 00:56 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन!! लावणी अन अभंग सुखे नांदती तसेच तलवार अन बोरूही महाराष्ट्र माझा सदैव पुढेच राहील उज्वल भवितव्याची ग्वाही ही
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा